(रविवार विशेष)

गैकायदेशीर बाबींसाठी दबावाद्वारे मानकिस छळ:स्तनपान मातेला तीन महिन्याच्या बाळापासून केले दूर
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २८ जून: ‘नियम…नियम…नियम’जगातील कोणत्याही देशाच्या कोणत्याही संविधानातील नियमांपेक्षाही सर्वात जास्त महत्वाचा नियम या भू-तळावर जर कोणी बनवला आहे तर तो आहे निसर्गाचा..प्रकृतीचा!याच नियमात प्रकृतीने स्त्रीला मातृत्व ही बहाल केले आहे,केवळ गर्भधारणा किवा नवसृजनाची निर्मितीच नव्हे तर स्तनपान,संगोपन,बाळावर संस्कार देऊन ‘माणूस’ म्हणून घडवण्याची जवाबदारी, ही देखीेल केवळ मातेवर सोपवली.अशात जर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारखा एखाद्या ‘निष्ठूर’ अधिकारी,मनपात शासकीय नोकरीवर असणा-या एका मातेच्या नशीबात आला तर दोष कोणाला द्यावा?
ही स्त्री,ही स्तनपान माता,ही शासकीय अधिकारी महिला आहे मनपातील स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलेमेंट कॉर्पोरेशन लि.(एनएसएसडीसीएल)ची अधिकारी. या कंपनीच्या अध्यक्षाना श्री.प्रवीण परदेशी यांना २२ जून २०२० रोजी त्यांनी एक पत्र लिहले. यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रामनाथ सोनवणे यांच्या राजीनाम्याच्या पत्रावरील त्यांनी दिलेल्या शे-यानुसर आयुक्त तुकाराम मुंढे यांना‘ मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून नियुक्तीचे निर्देश किवा त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी हा ‘अतिरिक्त’ प्रभार दिला आहे का?याबाबत मार्गदर्शनासाठी मेल पाठवला.
मात्र त्यांना त्यांच्या पत्राचे उत्तर अद्याप मिळाले नाही. आयुक्त मुंढे हे तरी देखील ज्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद सांभाळत आहे त्यासंबधी कुठलेही अधिकारीक दस्तावेज माझ्याकडे नाही. मुंढे तसे मुख्य लेखाधिकारी मोना ठाकूर यांनी परस्पर ‘कायम ’मुख्य अधिकारी यांची नियुक्ती होईपर्यंत मुंढे यांना हा अतिरिक्त प्रभार दिला असून हा प्रभार असाच सुरु ठेवण्याबाबत संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेण्यात येईल व त्याच पद्धतीने हा अतिरिक्त प्रभार सुरु ठेवण्यासाठी या संचालक मंडळाच्या सभेसाठी तयार करण्यात येणा-या विषय सूचीमध्ये, नोट तयार करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात असल्याची व्यथा मांडली आहे.
कायदेशीररित्या अशी नोट मी तयार करु शकत नसल्याचे सांगितल्यााने मुंढे हे माझ्यावर,मी संचालकांना खोटी व दिशाभूल माहिती दिली असल्याचा आरोप करीत, सतत माझा मानसिक छळ करीत आहेत.तसेच ‘मी एक प्रशासकीय अधिकारी(आय.ए.एस) असून तुम्ही माझ्या प्रतिष्ठेला आव्हान दिले आहे,तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल आणि अतिशय वाईट पद्धतीने ती परतफेड असेल’अश्या शब्दात मला धमकी दिली. मुंढे यांनी मला त्यांच्या कक्षात बरेचदा बोलावून मनपाच्या तसेच स्मार्ट सिटीच्या कर्मचारी-अधिका-यांसमोर अतिशय वाईट वागणूक दिली.अपमानास्पद शब्दांमध्ये पानउतारा केला,माझा व्यवसाय व व्यवसायिक क्ष् मतेवर प्रश्न उपस्थित करुन माझ्या आत्मसन्माला धक्का पोहोचवला.
महाराष्ट्र राज्याच्या १८ जून २०१६ व ३ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयाचा हवाला देऊन त्यानुसार ते आपोआपच मुख्य कार्यकारी अधिकारी हाेतात आणि आपण मला हा प्रभार दिला हे मान्य करण्यासाठी वारंवार माझ्यावर दबाव आणत आहेत.
शासन निर्णयामध्ये कुठेही महापालिका आयुक्त हे मुलभूतरित्या ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ होतात हे सांगितलेले नाही.तरीही मुंढे हे जवळपास दररोज मला कक्षात बोलावून, मी जर त्यांना लिखित स्वरुपात ,मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य केले नाही तर बळजबरीने राजीनामा द्यायला लावतील अश्या शब्दात धमकावतात.नुकतेच मुंढे तसेच मोना ठाकूर यांनी मला आपल्या कक्षात बोलावले व संचालक मंडळाच्या सभेत चर्चा करण्याच्या विषय सुचीमध्ये काही ‘विशिष्ट’ विषय टाकण्याचे निर्देश दिले, जे विषय त्यांनी मागील ४ महिन्यांमध्ये केलेल्या ‘चुकीच्या’बाबींना ‘नियमीत’ करण्यासाठीचे आहेत! मी तो अजेंडा बनविला नाही कारण ते कंपनी कायद्याच्या अगदी विपरित होते,तेव्हा त्यांनी परत मला व्यवसायिक दृष्टया व पारवारीक दृष्टया आयुष्य खराब करण्याची धमकी दिली!
कार्यालयीन वेळेनंतरही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत फोन वर फोन करतात व जर मी माझ्या वैयक्तीक कारणांमुळे फोन घेऊ शकली नाही तर पुन्हा कार्यालयात बोलावून,फोन का उचलला नाही,तुम्हाला कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे,असे म्हणून धमकावतात.माझ्या पदावर नेहमीच ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तसे कंपनीतील इतर पदाधिका-यांसमोर अपमानास्पद शब्दांमध्ये पाणउतारा केला जातो. यामागील कारण एकच आहे की मी आयुक्त श्री.मुंढे व लेखाधिकारी मोना ठाकूर यांच्या अवैध मागण्यांसमोर व चुकीच्या शब्दांसमोर मान झुकवित नाही.
महोदय,मी आताच मातृत्वाचा उंबरठा चढले….तरीही मला कारणे दाखवा नोटीस पाठवली. मी मातृत्व रजे अंतर्गत लाभ मागू नये व मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ यांचा,आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ‘सही’केलेला प्रत्येक आदेश पाळावा या अटींसह मला रुजू करुन घेतले.प्रत्येक स्त्री कर्मचा-याचा नैसर्गिक अधिकार असलेली मातृत्व रजा व लाभ देखील मला नाकारण्यात आले.माझी चूक केवळ हीच होती मी त्यांना वारंवार त्या ‘पत्राची’विचारणा केली ज्या पत्रात त्यांना हा प्रभार मिळाला असल्याचा उल्लेख आहे!यावर कहर म्हणजे आयुक्त आणि लेखाधिकारी यांनी त्यांना खुश करण्यासाठी ‘खोटे कागदपत्रांच्या’संचालक मंडळाची विषय सुची करण्याकरीता दबाव आणला.
महोदय.या अचानक उद् भवलेल्या कोविड-१९ च्या महामारीच्या उद्रेकामुळे नागपूरपासून १०० किलोमीटर दूर माझ्या जन्मगावी मी माझे ३ महिन्याचे बाळ सोडून आली आहे!माझे जन्मगाव सुरक्षित असल्यामुळे ,आयुक्तांना घरुन काम करण्याची(वर्क फ्रॉम होम)तसेच शासकीय धोरणानुसार १० वर्षांखालील मुलांना सुरक्षेच्या दृष्टिने बंधनकारकरित्या प्रवास नाकारण्यात आल्याने मी माझ्या ३ महिन्याच्या बाळाला नागपूरला कसे काय घेऊन यावे याबाबत मुंढे यांना मार्गदर्शन मागितले होते.या विचारणेवर मला, सेवा संपुष्टात आणण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली!इतकेच नव्हे तर आयुक्तांनी बाळाबद्दल कुठल्याही प्रकारे एक ही कारण मी ऐकून घेणार नाही,असे सांगितले!
महोदय,मी स्तनपान माता आहे आणि अशा परिस्थितीत माझ्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टिने माझी मानसिक स्थिती व आरोग्य स्वस्थ राहणे गरजेचे आहे. मात्र या उलट मला श्री.मुंढे व लेखाधिकारी यांच्याकडून सतत मानसिक दडपणात ठेवले जात आहे.मला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा आहे,तुम्ही या सर्व बाबींचे मुल्यांकर करुन,माझी या मानसिक त्रासातून सुटका करावी….!
वरील पत्र एका स्तनपान मातेने कंपनीचे अध्यक्ष् प्रवीण परदेशी यांना लिहले आहे. मुंबईत सरकार बदलली की सूड घेण्याची धोरणे ही बदलतात,सचिव,आधिकारी,कर्मचारी सर्वच यात भरडली जातात,याचे उत्तम उदाहरण ही स्त्री आहे,ही महिला अधिकारी आहे. परदेशी यांनी अद्याप या महीला अधिका-याल कोणतेही उत्तर देण्याची तसदी घेतली नाही…ते घेणारही नाहीत..कारण त्यांच्याच सरकारने आयुक्त मुंढे यांना नागपूरातील विकास कामे थांबविण्याचा,स्मार्ट सिटीचा बट्टयाबोळ करण्यासाठी पाठवले आहे,असा सत्तापक्षानेही उघडपणे पत्र-परिषदेत आरोप केला आहे.
मूळात प्रश्न उरतो तो मुंढे यांचा महिलांप्रति धोरणाचा. मी बीडचा आहे…मी बीडचा आहे…मी आयएएस अधिकारी आहे..मी आयएएस अधिकारी आहे…!याचा अर्थ माणूसकी,संस्कार,जीवन मुल्ये,नीतीमत्ता विसरणे असा होतो का? एखाद्या महिला अधिका-याप्रति निष्ठूर होणे हीच गौरवास्पद कामगिरी असते का एखाद्या आयएएस अधिका-याची? गर्भवती महिला व प्रसुती नंतर स्तनपान माता झाल्यानंतरही मुंढे यांचा संपूर्ण ‘लोभ‘ फक्त स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ पद बळकावण्याचा, किती पराकोटीचा आहे?हे या पत्रातून स्पष्ट होतंय.
अशी वर्तवणूक ‘नियमात‘ बसते का?एखाद्या महीला अधिकारीला नियमबाह्य कृती करण्यास बाध्य करीत राहणे,तिचा पराकोटीचा मानसिक छळ करणे,हाच आहे का मुंढेंचा शिस्तप्रिय कारभार?राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भरवश्यावर मुंढे यांची ही ‘मगरुरी’सुरु असल्याची चर्चा सभागृहातही उमटली. शरद पवार यांना निश्चितच नागपूरचा ‘विकास’हा डोळ्यात खूपत होता,हा आरोप काही नवीन नाही.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यावधीचा निधी नागपूरासाठी खेचून आणला,ही सल पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना,महाविकासआघाडीची सरकार स्थापण्यापूर्वीपासूनच सलत होती.मुंढे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नेम मात्र त्यांचा गडकरी,फडणवीसच आहेत,यात शंका उरली नाही.
विदर्भ,मराठवाडा यांचा हक्काचा निधी प.महाराष्ट्राच्या,विशेषत:राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दशकोनी दशके कसा पळवला, हे विदर्भ,मराठवाड्याच्या बालवाडीतील विद्यार्थ्यांनाही सांगावे लागत नाही. तरीही ‘मी बीड चा…मी बीड चा’टेंभा मिरवणारे तुकाराम मुंढे हे,विदर्भ पयार्याने नागपूरचा बट्टयाबोळ करण्यासाठी,माणूसकीच्या मूल्यापासून इतके खाली पडले?एका गर्भवती माता,एका स्तनपान स्त्रीचा एवढा छळवाद मांडला!संस्काराच्या बाबतीत बीड शहर किवा विदर्भ-मराठवाडा अद्याप ही एवढा मागास आहे?
त्यांच्या मनात स्त्रीची प्रतिमा आहे तरी कशी?पाच दिवस चालणा-या मनपाच्या सभेत अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी, महिला अधिकारी व कर्मचारी यांचा प्रति मुंढे यांचा व्यवहाराकडे अंगुलीनिर्देश केले.दयाशंकर तिवारी यांनी तर मुंढे कश्याप्रकारे महिला अधिका-यांना सुद्धा ‘कमरेच्या खालची’ भाषा वापरुन अपमानित करतात,यावरील मुद्दे सभागृहात मांडले,जे सदनाच्या अहवालात कायमचे कलमबद्ध झाले.
त्या आईचे काय….?
मगरुर मुंढे यांनी मनपा मुख्यालयात, माध्यमात खूप मोठा गाजावाजा करुन ‘कोविड हेल्प सेंटर’सुरु केले मात्र त्या हेल्प सेंटरमध्ये आमदार निवासातून मोमिनपुरा येथील एका तरुण मुलाच्या आईचा कॉल येतो. माझ्या मुलाला मूळव्याधीचा भयंकर त्रास आहे,त्याची चादर ही रक्ताने माखून जाते.औषधी पोहोचवा हो..त्याचा त्रास मला बघवत नाही…मी त्याला तिस-या मजल्यावरुन खाली ढकलून देईल…!कोण धावलं त्या आईच्या मदतीला?विलगीकरण केंद्रात शहरातील नागरिकांना उचलून-उचलून कोंबले,मात्र नंतर त्यांच्या त्रासांकडे कोणीही लक्ष् दिले नाही. मुंढे यांचे खास प्रिय डॉ.गंटावार यांच्याकडे कॉल घेणा-या व कर्तव्यावर असणा-या कर्मचारी यांनी त्या मूळव्याधी असणा-या तरुणाची माता असणा-या आईबाबत विचारणा केली असता…डॉ.गंटावार म्हणाले ’हे लोकं असेच नाटक करतात’ठेऊन दे फोन!
कदाचित म्हणूनच भाजपचे आमदार व माजी महापौर प्रवीण दटके यांनी सभागृहात मुंढेंवर आरोप-प्रत्यारोप करताना विलगीकरणातील नागरिकांचा उल्लेख ’शाेषित-पीडीत’असा केला असावा.
संविधानाने दिलेल्या खूर्चीचा मान ही मुंढे राखत नाही-
मुंढे यांच्याकडे बहूजन समाजवादी पक्षाचे मनपातील सर्व १० सदस्य भेटावयास गेले तर मुंढे यांच्या कक्षात खुर्च्या किती?फक्त ५! बसपाच्या गटनेत्या या मुंढेंशी बोलत होत्या,तेव्हा अर्धे सदस्य हे उभे होते,मग ज्या भारतीय संविधानाने मुंढे यांना त्यांचे प्रशासकीय पद दिले, खुर्ची दिली, त्या संविधानात असा नियम आहे का की आयएएस अधिकारी तुकराम मुंढे यांच्यासमोर बसपच्या कार्यकर्त्यांना बसण्याची परवानगी नाही?असाही आरोप मुंढे यांच्यावर सभागृहात झाला. माजी महापौर मायाताई इवनाते,प्रगती पाटील, आभा पांडे असो किवा कोणत्याही महिला नगरसेविका,त्यांना मुंढे हे भेटण्याची परवानगी देत नाही….कारण..त्यांच्या लेखी या महिलांची कोणतीही किंमत नाही!
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहील्यांदाज एका महिलेला देशाचे संरक्ष् ण मंत्री बनवले, अर्थमंत्री बनवले,त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन देशाच्या तिजाेरीच्या किल्ल्या त्यांच्याकडे सोपवल्या मात्र प्रगत महाराष्ट्राच्या उपराजधानीत,मुंढे यांच्या कार्यकाळात सगळ विपरीत घडतंय…!आजच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ’सज्जनांची विद्या ही सत्कारणी लागली पाहिजे’असा उल्लेख केला.
मुंढे यांची विद्या मात्र महिला अधिकारी-कर्मचा-यांचा अपमान करणे,त्यांची लायकी काढणे,त्यांना आपल्या कतृत्वाने जे पद मिळाले त्याला कमी लेखणे..स्वार्थ साधण्यासाठी स्तनपान मातेला आपल्या पिलापासून दूर ठेवणे…याचत खर्ची होत असल्याचे दूर्देवी चित्र दिसून पडत आहे.ज्या काँग्रेसच्या नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरोधात त्यांनी तक्रार नोंदवली त्यांची पत्नी ही दहा वर्षांनतर प्रसूत होणार होती.मात्र प्रतिबंधक क्षेत्रात सगळीकडे टिना टाकल्या असल्यामुळे,दिवस भरलेल्या त्या गर्भवती महिलेल्या लाकडी बल्ल्यांमधून वाकून बाहेर पडावे लागले….धावपळ करीत रुग्णालय गाठावे लागले आणि एका तासात तिची प्रसूती झाली…!
कोविड काळात केलेले अनेक ’महनीय’कामांपैकी हे देखील त्यांचे एक महानतम काम मात्र माध्यमात पुढे आलेच नाही.
महिलांसोबत स्वार्थासाठी सूडबुद्धीने वागणारा असा अधिकारी कितीही कतृर्त्ववान असला ,कितीही हूशार आणि प्रामाणिक असला तरी त्याची किंमत ही शेवटी ‘संस्कारावरुनच ’होत असते. नागपूर मनपाने नजीकच्या काळात श्रावण हर्डीकर,अश्विन मुद् गल,अभिजित बांगर यांच्यासारखेही आयएएस अधिकारी बघितले आहे मात्र महिलांप्रति त्यांच्या व्यवहार हा अतिशय सन्मानजनक हाेता,याचीही प्रचिती तीव्रतेने जाणवली.
मुंढे मात्र मुंढे आहेत….भारतातील…किंबहूना जगातील एकमेवद्धितीय आयएसएस अधिकारी….बीड जिल्हयातून आलेले..लहानश्या सरकारी शाळेत शिकलेले…कष्टातून प्रतिष्ठित पद मिळवणारे…ज्यांना जणू पदासोबतच अधिकार मिळाले…एका तीन महिन्याच्या चिमुरड्यापासून मातृसुखं हिरावण्याचा….!महिला कर्मचा-यांसोबत कमरेखालची भाषा बोलण्याचा…!त्यांचे व्यवसायिक व पारविारीक आयुष्य खराब करण्याची धमकी देण्याचा…!सर्वोच्य न्यायालय व या देशाच्या संविधानाने ज्या महिलांना हक्काची मातृत्व रजा प्रदान केली,ती सूडबुद्धिने रद्द करण्याचा..त्यांच्या कर्तृत्व,बुद्धिमत्ता,प्रतिभा आणि प्रामाणिकेतला कमी लेखण्याचा….!
ब्रेव्हो मुंढे…हॅट्स ऑफ

आमचे चॅनल subscribe करा