
सत्तास्थापनेत कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही
नागपूर: मातोश्रीवर झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहीलेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा ही जनतेच्या मनातील भावना आहे.महाराष्ट्राला दिल्लीतून कंट्रोल केल्यास हा जनभावनेचा अनादर होईल.राष्ट्रपती राजवटीच्या आड संविधानाचा अपमान होऊ देणार नाही,राष्ट्रपती राजवट म्हणजे शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राचा अपमान आहे, कनार्टकप्रमाणे घोडेबाजार करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही. राज्यात भाजपचा कोणताही पॅटर्न चालवाल तर यशस्वी होऊ देणार नसल्याचा ईशारा शिवसेनेचे संजय राऊत यांनी दिला. ते शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. मुंबई येथे घेतलेल्या पत्र परिषदेत बोलत होते.
भाजपसमोर कोणीही झूकणार नाही, महाराष्ट्रात कोणताही पॅर्टन चालणार नसल्याचे ते म्हणाले. ज्यांच्याकडे बहूमत आहे त्यांनी सरकार बनवावे असे आव्हान ही त्यांनी केले. राज्यात ‘काळजीवाहू ’सरकार स्थापनेचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.काळजीवाहू बसवावे,सूत्रे हलवावी,असे डावपेच सुरु आहे. आज राज्यात संवैधानिक सरकारची कालमर्यादा संपत असून उद्यापासून राष्ट्रपतींच्यावतीने राज्यपालांचे शासन राज्यात लागू होणार. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा देऊन बाहेर जावे अन्यथा हा जनादेशाचा,बहूमताचा अपमान होईल. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल. मुख्यमंत्र्यांसाठी आज शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्राला काळजीवाहूची गरज नसल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हा भाजपचा डाव असल्याचे ते म्हणाले. पडद्यामागे कर्नाटक पॅर्टनचा डाव असून काळजीवाहू मुख्यमंत्री पदासाठी हे डावपेच सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. नितीन गडकरी हे मुंबईत दाखल झाले आहेत यासंबधी बोलताना नितीन गडकरी यांचे वरळीत स्वत:चे घर असल्यामुळे ते मुंबईत आपल्या घरी येऊ शकतात.ज्यांचे घरच मुंबईत आहेत ते मुंबईत आल्यास याची बातमी कशी बनू शकते? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आमचा चेहरा काळवंडलेला नाही, आम्ही आंनदी आहोत असा टोलाही त्यांनी मारला. काँग्रेसने आपल्या अामदारांना आमिष दाखवल्याचा आरोप भाजपवर केला असल्याकडे राऊत यांचे लक्ष् वेधले असता, याचा अर्थ समजून घ्या,महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? आज काँग्रेसचे आमदार एकाच ठिकाणी रहावेत अशी वेळ का यावी? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर देशात पारदर्शी,स्वच्छ कारभाराची ग्वाही देत असतील तर,हा प्रकार म्हणजे त्यांच्या स्वच्छ काराभाराला आव्हानाच नाही का? आमची लढाई ही न्याय आणि अस्तिमेची लढाई असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना कोणापुढेही लाचार होणार नाही. आम्ही रणांगणातून पळून जाणारे नाही. अटल बिहारी बाजपेयी यांचेच शब्द आहेत ‘ना दैन्यं ना पलायनं’. हम भागेंगे नही लडते रहेंग. मध्यस्थीसाठी संभाजी भिडे हे मातोश्रीवर येऊन गेलेत मात्र उद्धव ठाकरेंशी भेट झाली नाही, यासंबधी बोलताना महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत मूळात तिसर्यांच्या मध्यस्थीची गरज नाही.उद्यापासून राज्याचे प्रमुख हे राज्यपाल असणार आहे त्यामुळे या पुढे राज्यपालांशी भेटणार असल्याचे ते म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा