Homeनागपूर न्यूजया पुढे मनपाची निवडणूक लढणार नाही!महापौरांची मोठी घोषणा

या पुढे मनपाची निवडणूक लढणार नाही!महापौरांची मोठी घोषणा

वाढदिवसाच्या दिवशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून साधला नागपूरकरांशी संवाद

नागपूर,ता. २० ऑगस्ट: महापौर संदीप जोशी यांनी आज वाढदिवसानिमित्त फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून नागपूरकरांशी संवाद साधला,यावेळी त्यांनी या पुढे महानगरपालिकेची निवडणूक यानंतर लढणार नसल्याची घोषणा केली.यावर अनेकांच्या भुवया उचांवल्या. महापौरांची तयारी आता आमदारकीसाठी असणार असल्याचेही खासगीत बोलले जात आहे.एवढेच नव्हे तर महापौर संदीप जोशी असे व्यक्तिमत्व आहे जे खासदारकीसाठी ही लढू शकतात,अशी ही प्रतिक्रिया एका काँग्रेसच्या आमदारांनी दिली.

 केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे पुढील खासदारकीची निवडणूक लढविणार नसल्याची देखील वार्ता आहे,अश्‍यावेळी महापौर हे अगदी खासदारकीची निवडणूक देखील लढवू शकतात,अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात आली.भारतीय जनता पक्ष् हा असा पक्ष् आहे की तो पक्ष् कोणालाही आमदार,खासदार बनवू शकतो,अशी देखील प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

तर आणखी एका काँग्रेस आमदारांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘जसं वाटतं तसं केलं पाहिजे,व्यक्तिविशेष विषयी बोलू शकत नाही’.
महापौरांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर देखील चांगलाच निशाना साधला. शहरातील लॉक डाऊन संदर्भात,व्यापा-यांवर लादण्यात आलेल्या नाेंदणीच्या अटी संदर्भात,शहरातील प्रतिबंधक क्ष्ेत्राबाबत मुंढे यांनी घेतलेले निर्णय,ऑड-इवनचे निर्णय,जिम आंदोलन,स्मार्ट सिटीबाबतची आक्रमकता इ. अनेक विषयांवर महापौर खूलून बोललेत.

प्रारंभी शहरातील करोना संदर्भात प्रेझेंटेशन दाखविण्यात आले.करोना संबंधी मार्च महिन्याची दहशत आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक असल्याचे त्यांनी सांगितले.११ मार्च रोजी शहरात पहीला करोना बाधित रुग्ण आढळला.११ मार्च ते १८ ऑगस्ट दरम्यान १३ हजार ६६७ रुग्ण आढळले.५,७०७ रुग्ण बरे झाले,७,७७५ रुग्ण हे एक्टीव्ह आहेत.

देशात २२ मार्च रोजी पहीली टाळेबंदी लावण्यात आली,यानंतर सतत अडीच महिने देशातील जनता संपूर्णत:टाळेबंदीतच राहीली. १ जून रोजी ‘मिशन बिगेन अगेन’मोहिमेअंतर्गत अटींसह टाळेबंदी उठविण्यात आली, यानंतरही करोना बाधितांची संख्या ही सतत वाढत राहीली.परिणामी टाळेबंदी हा करोनावर प्रभावी उपाय ठरुच शकत नसल्याचे सिद्ध झाले,त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा शहरात १५ दिवसांची कर्फ्यूसह टाळेबंदी लादण्याच्या निर्णयाचा विरोध केल्याचे ते म्हणाले.टाळेबंदीमुळे करोना थांबणार असेल तर पंधरा दिवसांची टाळेबंदी करायला पूर्ण समर्थन आमचंही राहील मात्र काहीच शाश्‍वती नाही,त्यामुळे या पुढे तरी नागपूरातील गरीब जनतेला उपाशी मरु देणार नाही.

जनप्रतिनिधी सांगतात ते मुंढे यांना चुकीचं वाटतं. माझ्या एकट्याची भूमिका बरोबर,असं वागणं योग्य नसल्याचा टोला महापौरांनी लगावला. अनेक बाबींवर महापौरांनी आयुक्तांवर चांगलेच शिरसंधान साधले.केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्ष् हे देखील आयुक्तांच्या निर्णयांवर विरोध दर्शवतात.

प्रतिबंधित क्ष्ेत्राविषयी देखील आयुक्तांनी मनमानेल तसे निर्णय नागपूरकरांवर लादले.उदाहरणादाखल पार्वती नगर सारख्या अति निम्नवर्गाच्या लोकांना अक्ष् रश: ५ मे ते २६ जून पर्यंत डांबून ठेवले. परिणामी एक दोन नव्हे तर सात नागरिकांनी मला पत्र लिहले की प्रतिबंधित क्ष्ेत्रातून बाहेर पडता न आल्याने त्यांची नोकरी गेली!ही केवळ पार्वतीनगरची बाब नसून संपूर्ण शहरातील प्रतिबंधित क्ष्ेत्रातील अनेक नागरिकांच्या नोक-या गेल्या. हजारो नागरिक बेरोजगार झालेत.

व्यापा-यांच्या प्रश्‍नावर मुंढे यांनी करोनाच्या नावाखाली शहरातील व्यापा-यांना अक्ष् रक्ष्:पॅनिक केले असल्याचा पुनरोच्चार केला. शहरात एका दिवसात जास्तीत जास्त तीन हजार चाचण्या होत आहे. लाखो व्यापारी व त्यांचे कर्मचारी यांची सहा दिवसात करोना चाचणीची कोणती यंत्रणा प्रशासनाकडे उपलब्ध आहे?हे तर खासगी लॅबवाल्यांना कोट्यावधीचा लाभ पोहोचविण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याची त्यामुळेच शंका येते असल्याचा आरोप उघडपणे त्यांनी केला.

जिम आंदोलनाबाबत देखील त्यांनी भूमिका स्पष्ट करत केंद्राने जिम,मंदिरे आणि वाचनालये यांना कधीचीच परवानगी प्रदान केली आहे मात्र राज्य सरकारला केंद्राच्या निर्णयांचेच वावडे असल्याने त्यांनी राज्यात या तिन्ही गोष्टी उघडण्यास नकार दिला. यामुळे जिम संचालकांच्या आंदोलनात सहभागी झालो.

या अनेक गोष्टींबाबत आयुक्तांना वारंवार पत्र दिलेत,निर्देश दिले मात्र आयुक्तांनी त्या निर्देशांची दखलच घेतली नाही.ऑड-इवनच्या प्रश्‍नावर देखील त्यांनी निर्णय घेतलाच नाही.उलट व्यापा-यांवर एकानंतर एक असे आदेश लादत आहेत.व्यापारी वर्ग आधीच फार मोठ्या संकटात सापडलेला आहे.शेवटी महानगरपालिकेकडे शहराचे पालकत्व असते. पालक म्हणून आम्ही आमची जवाबदारी झटकू शकत नाही.

स्मार्ट सिटीबाबत बोलताना महापौरांनी पुन्हा एकदा आयुक्त मुंढे हे कश्‍याप्रकारे तेच या प्रकल्पाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कसे आहेत?याचा कागद माध्यमांना दुरुनच दाखवित राहीले. या प्रकल्पाचे अध्यक्ष् प्रवीण परदेशी यांनी कधीही लिखित किवा मौखिक आदेश दिले नसताना त्यांच्या आदेशानुसार मी या पदांवर कार्यरत असल्याचे मुंढे हे वारंवार सांगत राहीले.त्यांचे हे वारंवार खोटे बोलणे आणि खोटा व्यवहार याविरोधात आक्रमकता स्वीकारली असल्याचे ते म्हणाले.

थोडक्यात महापौर संदीप जोशी यांनी तब्बल दीड तास वाढदिवसानिमित्त फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून नागपूरकर जनतेसोबत संवाद साधला. संपूर्ण दीड तास ते फक्त ‘मुंढे आणि मंुढे‘यांच्याच तुघलकी निर्णयांविरोधात कंठशोष केला मात्र याउपरही आमचा विरोध मुुढेंना नसून त्यांच्या धोरणांना असल्याचे ते म्हणाले.

शेवटी त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून ’या पुढे महानगरपालिकेची निवडणूक लढणार नसल्याची’घोषणा केली व पक्ष्ातील कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या घोषणेमुळे अनेकांना धक्का बसला तर शहरात राजकीय वर्तुळात देखील चांगलीच चर्चा सुरु झाली. महापौर आता भावी आमदारच नव्हे तर खासदार देखील होऊ शकतात,अशी या वर्तुळात चर्चा रंगली.

Latest बातम्या