अपशब्द बोललोच नाही:दटके यांचा दावा
नागपूर,ता. १३ जुलै : रसत्याचे एक काम गेले अनेक दिवसांपासून रखडले असल्याने नगरसेविका स्वाती अखातकर यांनी नगर संचालक नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमाेद गावंडे यांच्याकडे वारंवार विचारण केली. मात्र करोना तसेच आयुक्तासाेबतच्या बैठकीचे कारण देऊन वारंवार नगरसेविकेची बोळवण करण्यात येत असल्याने शेवटी हे प्रकरण भाजपचे आमदार व माजी महापौर प्रवीद दटके यांच्या कानावर गेले. गावंडे यांना यासंबधीची विचारणा करताना फोनवर दटके यांनी त्यांना शिवीगाळ केली असा आरोप करीत आज मनपाच्या ‘राष्ट्रीय नागपूर कॉरपोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन,इंटक’या संघटनेच्यावतीने एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन आज सोमवार दि. १३ जुलै २०२० रोजी पुकारण्यात आले.
हा वाद इतका पराकोटीला पोहोचला की यात महापौर संदीप जोशी यांनाही मध्यस्थी करुन माफी मागावी लागली.आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या. खुलासे-निवेदन झाले.संघटनेचे अध्यक्ष् सुरेंद्र टिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्याच्या एका कामानिमित्त माजी महापौर प्रवीण दटके यांनी शनिवारी यांनी गावंडे यांना कॉल केला. रविवारची सुटी असल्याने गावंडे यांनी याविषयावर सोमवारी बघतो,असे उत्तर दिले. सोमवारी सकाळी दहा ते सव्वा दहादरम्यान दटके यांचा पुन्हा गावंडे यांना फोन आला,तेव्हा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बैठक असल्याचे गावंडेय ांनी सांगताच,कधी करोना,कधी आयुक्तांची बैठक अशी कारणे सांगून लोकप्रतिनिधींची कामे तुम्ही टाळता,असा पारा चढवत दटके यांनी फोनवर खालच्या पातळीवर शिविगाळ केल्याचे टिंगणे यांनी सांगितले.
आयुक्तांच्या बैठकीत गावंडे यांनी माझा स्वाभिमान दुखावल्याचे सांगून राजीरामा देण्याची तयारी दाखवली.यावेळी बैठकीत सर्वच अधिकारी उपस्थित असल्याने त्यांनी या घटनेचा निषेध केला व संघटनेला कळविण्यात आले. संघटनेने पदाधिका-यांच्या अश्या वर्तवणूकीच्या विरोधात आज एक दिवस लेखणी बंद आंदोलन पुकारले असून याबाबतचे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आधीच मनपाचे सर्व अधिकारी,कर्मचारी हे कोरोनामुळे त्रस्त आहेत.अश्यावेळी अधिकारी,कर्मचा-यांना प्रोत्साहीत करण्याचे सोडून त्यांच्यावर विविध कामांना घेऊन मानसिक दबाव निर्माण केल्या जात असल्याचे ते म्हणाले.
जनतेच्या प्रश्नासाठी ओरडलो, काय चूक केली ?
रस्त्याचे एक काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे, एक महिला नगरसेविका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करीत आहे, ते मानत नाहीत कधी बैठकीचे कारण सांगतात कधी कधी कोरोनाचे कारण सांगतात ज्यांना विनंतीची भाषा काळत नाही त्यांना त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलावे ?
जनतेच्या करातून ज्यांचा पगार होतो ते जनतेचीच कामे करत नसतील तर त्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी काय करावे ?
माझे पूर्ण संभाषण तुम्ही तपासा, मी जोरात बोललो, मी खड्डयात जा अशा आशयाचे बोललो पण मी अश्लील बोललो नाही, आधी सगळ्या गोष्टी तपासा नंतर राजकारण करा असे आवाहन मी त्या अधिकाऱ्याच्या बोलवित्या धण्यास करीत आहे.माझ्या विरुद्ध कितीही आंदोलन करा , राजकारण करा जनतेच्या प्रश्नासाठी मी आवाज मोठा करणारच, गुन्हे कितीही लागू द्या.
आयुक्त बोलविते धनी!
या सर्व घटनेमागे आयुक्त तुकाराम मुंढे हेच कारणीभूत असून नागपूर मनपाच्या इतिहासात एका आयएएस अधिका-याने अश्याप्रकारे अधिकारी व पदाधिका-याच्या वादात प्रथमच अशी भूमिका बजावल्याची आज चांगलीच चर्चा मनपात रंगली होती. दटके यांनी देखील त्यांच्या खुलाश्यामध्ये अधी सर्व गोष्टी तपासा व नंतर राजकारण करा असे अावाहन मी त्या अधिका-याच्या बोलविता धनीस सांगतो आहे,असे शब्द वापरले.
आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर अति.आयुक्त राम जोशी व संघटनचे अध्यक्ष् सुरेंद्र टिंगणे यांनी अधिकारी व कर्मचा-यांना संबोधित केले व लगेच लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करुन यासंबधीचे निवेदन राज्य सरकारच्या प्रधान सचिवांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मूळात मुंढे रुजू झाल्यापासून ज्या मनपात मुंढेंच्या आदेशाशिवाय एक कागदही हलू शकत नाही तिथे अति.आयुक्त राम जोशी यांनी चक्क अधिकारी व कर्मचा-यांना संबोधित करणे व लेखणी बंदचा निर्णय जाहीर करणे,हे अनेक लोकांच्या पचनीच पडले नाही.मुंढे यांच्या ‘तोंडी’आदेशाशिवाय राम जोशी यांनी सत्ताधा-यांच्या विरोधात उघडपणे हे बंड पुकारलेच नसते. त्यामुळे या सर्व घडामोडीमागे मुंढे यांचेच ‘मौखिक’आदेश असल्याचे मानले जात आहे. मूळात मुंढे आणि दटके यांच्यातील वैर हे विळा-भोपळ्याचे असल्याकारणाने मुंढे यांनी देखील दटके यांना कोंडीत पकडण्याची अायती संधी न गमावता,अधिकारी व कर्मचा-यांना व संघटनेला समोर करुन
नेम साधला,अशी चर्चा आज मनपात चांगलीच रंगली होती. मात्र अधिकारी-पदाधिकारी यांच्या वादात किंबहुना राजकारणात मुंढे यांच्यासारख्या आयएएस सनदी अधिकारी यांनी पडावे,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते.
आधी हकीकत….आधा फसाना
गेल्या वर्षी १७ जुलै रोजी अशीच एक घटना आरोग्य समितीच्या बैठकीत घडली होती,तेव्हाही दटके यांनी त्या बैठकीत एका महिला आरोग्य अधिकारीचे चक्क ‘पितृवृंद’ म्हणजेच ‘बाप’ काढल्याचीही चांगलीच चर्चा रंगली होती!
तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मनपाच्या सर्व दवाखान्याची वेळ ही शासन नियमाप्रमाणे सकाळी ८ ते दुपारी २ ऐवजी ४ पर्यंत करण्याच्या सूचना केल्या.अति.आयुक्त राम जोशी यांनी तसे आदेश काढून त्यावर बांगर यांची सही घेतली,त्या महिला अधिकारीची कोणतीही सही त्या आदेशावर नव्हती,फक्त त्यांनी त्या तश्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवल्या,यावर ते कर्मचारी संघटनेकडे गेले,संघटनेचे पदाधिकारी यांनी दटके यांच्याकडे दाद मागितली.
परिणामी दटके यांनी मनपाच्या आरोग्य समितीच्या बैठकीत राम जोशी व त्या महिला वैद्यकिय अधिकारी यांना बैठकीत पाचारण केले.
याच बैठकीत दटके यांनी त्या महिला अधिकारीचा अपशब्दांनी केलेला उद्धार,याची बरीच चर्चा,बरेच दिवस मनपा मुख्यालयात रंगली होती,विशेष म्हणजे त्याच बैठकीत आज संघटनेच्या ज्या पदाधिकारी यांनी,प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाभिमानासाठी लेखणी बंद आंदोलन करण्याची किमया केली,हेच पदाधिकारी तेव्हा आपल्याच प्रशासकीय, ती ही एक महिला अधिकारी,ज्यांचा काहीही दोष,त्या निर्णयात नव्हता,त्यांचा उद्धार होताना गर्वाने ताठ मान करून बैठकीत बसून ऐकत होती…!
२ तास…फक्त २ तास कामाचे,ते ही शासकीय नियमाप्रमाणे,आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वाढवले म्हणून गेल्या १७ जुलै ला मनपा मुख्यालयाच्या त्या बैठकीत आभाळ कोसळले होते,आज १३ जुलै रोजी,तेच दटके, गावंडे यांना अपशब्द बोलताच,मुंढे यांच्या हिंमतीवर संघटना कशी’स्वाभिमान आणि अधिकार रक्षणा साठी’ तत्पर झाली,याचीही चर्चा आज मनपात रंगली होती…!
संघटना एकच मात्र रूप दोन…!!
कहता है जोकर सारा जमाना….आधी हकीकत…आधा फसाना’ ही गाण्याची मार्मिक ओळ ही गाऊन दाखवण्यात आली…!

आमचे चॅनल subscribe करा