Advertisements

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
नागपूर,ता.३ जून २०२६: आधुनिक समाजक्रांतीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले या उभयतांना संयुक्तपणे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
२०१७ साली या विषयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते व त्या अनुषंगाने त्यांनी केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव अजुन कार्यान्वित झाला नाही त्यामुळे फुले प्रेमींचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कडे येण्यास ईच्छुक आहे असे निवेदनात नमुद केले .
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अविनाश ठाकरे यांनी सांगितले. महात्मा फुले दांपत्याचे शिक्षण, सामाजिक न्याय, स्त्रीशिक्षण आणि समतेसाठीचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना संयुक्त मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली.
अविनाश ठाकरे हे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी महामंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दर्जाचे उपाध्यक्ष तसेच केंद्र सरकारच्या महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी महोत्सव उच्चस्तरीय समितीचे सदस्य आहेत.
……………………………………….