Homeनागपूर मनपामरकजमधून आलेल्या संशयितचा अहवाल पॉझिटिव्ह!नागपूरात पॉझिटिव्हचा आकडा झाला १७

मरकजमधून आलेल्या संशयितचा अहवाल पॉझिटिव्ह!नागपूरात पॉझिटिव्हचा आकडा झाला १७

नागपूर: मरकजमधून १४ आणि १५ मार्च दरम्यान नागपूरात आलेल्या मोमिनपूरावासी संशयिताची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह निघाल्याने नागपूरकर चांगलेच धस्तावले अाहेत.वनामतीत विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या या संशयिताच्या चाचणीचा अहवाल आज शनिवार दि. ४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह निघाल्याने नागपूरात हा आकडा चार वरुन अनेक दिवसांच्या खंडानंतर १७ पर्यंत पोहोचला.विशेष म्हणजे कराेना पॉझिटिव्ह निघालेला हा इसम १ एप्रिल रोजी विलगीकरणात ठेवण्यात येण्यापूर्वी १४ मार्चपासून किती गर्दीच्या ठिाकणी हजारो लोकांच्या संपर्कात आला असावा, याची चांगलीच धास्ती नागपूरकरांनी घेतली असल्याचे दिसून पडतेय.

डॉ.गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वनामतीमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या या रुग्णाचा अहवाल आज शनिवार दि. ४ एप्रिल रोजी करोना पॉझिटिव्ह आला असून हा रुग्ण दिल्लीतील तब्लिगी मरकजमधून नागपूरात १५-१५ मार्च दरम्यान आला होता. या अहवालानंतर नागपूरकरांच्या काळजाचे ठोकेच चूकले आहेत. मरकजमधून आलेले अद्याप ५४ संशयितांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त व्हायचा आहेत. नागपूरातील २२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ एिप्रल रोजी या ५४ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते.यातील काहींना आमदार निवास तर काहींना वनामतीमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मोमिनपू-यातील या रुग्णाला आता मेडीकलमध्ये पाठवण्यात आले असून मोमिनपु-यात आता प्रशासन विशेष दक्ष् ता घेत असल्याचे सांगितले जात आहे.या रुग्णाच्या संपर्कात आलेले, ओळखीचे,कुटुंबियांचे परिचित ,नातेवाईक यांच्या विलगीकरणासाठी प्रशासनाचे अधिकारी हे मोमिनपु-यात धडकले. युद्धस्तरावर मोमिनपु-यातील गल्ल्यांमध्ये फव्वारणी केली जात आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितल्याप्रमाणे मरकजमधून परतलेल्या या रुग्णाविषयी केंद्रा सरकारकडून डिजिटल फुटप्रिंट दिली असल्याने त्वरीत कारवाई करणे शक्य झाले.यासाठी मनपाच्या वॉर रुममुळे त्वरीत निर्णय घेणे शक्य होत आहे.सुरवातीचे ४ रुग्ण हे आता बरे झाले आहेत मात्र दिल्ली वरून आलेल्या १९ जणांचा अद्याप शोध लागला नसल्याचे शुक्रवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच कबूल केले होते.

मोमिनपु-यात करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळयामुळे तेथील स्थानिकांनाही प्रशासनाने सर्तक केले आहे. करोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. निजामुद्दीन मरकजमधून आलेला संशयित करोना पॉझिटिव्ह निघाल्याने दिल्लीहून आलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून सामोरे येऊन प्रशासनाला माहिती कळवावी,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात मरकजच्या कार्यक्रमात देश विदेशातून सुमारे अडीच ते तीन हजार लोकं जमा झाली होती. त्यातील अनेकांना पुढे करोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. मरकजमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये महाराष्ट्र व नागपूरमधून किती लोकं सहभागी झाले होते,याची यादीच केंद्र सरकारने प्रशासनाकडे सोपविली आहे. त्यात नागपूरच्या ५४ लोकांचा सहभाग असल्याचे प्रशासनातर्फे कळवण्यात आले.

नागपूरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही बरेच दिवस खंडीत झाल्याने नागपूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला होता मात्र दिल्लीतील हे मरकज प्रकरण पुढे आले आणि नागपूरकरांचा संयम सुटू लागल्याचे दिसून पडतंय. दिवस भर प्रचार-प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा फोन खणखणत असतो. प्रशासनच नव्हे तर पंतप्रधान मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दिल्लीत संपूर्ण देशात लाॅक डाऊन असताना केंद्र सरकार व दिल्ली सरकारच्या नाकाखाली एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम झालाच कसा?नागरिकांच्या या प्रश्‍नावर मात्र पंतप्रधान मोदी किवा केजरीवालांकडे अद्याप तरी कोणतेही उत्तर नाही. सध्या देशात संपूर्ण आणिबाणिची परिस्थिती लागू असल्यामुळे माध्यमांवर देखील अनेक बंधने आली आहेत. कधी नव्हे ती प्रिंट मिडीया या संपूर्ण कालावधीत चांगलीच भरडल्या गेल्याचे दिसून पडतेय.

आजवर देशाच्या इतिहासात एक आणिबाणिचा काळ सोडला तर कोणत्याही प्रकारच्या महामारीत प्रिंट मिडीया पूर्णंत ठप्प झाल्याचे उदाहरण नाही.मात्र करोना नावाच्या विषाणूमुळे नागरिक इतके धस्तावले की त्यांनी वृत्तपत्र देखील घेण्याचे बंद केले. परिणामी प्रशासनावर कोणताही दवाब राहीला नाही. प्रशासनाचा जनसंपर्क विभाग जी माहिती पाठवतो त्यावर माध्यमांना निर्भर राहावे लागत आहे.
एकीकडे रामेश्‍वरीसारख्या भागात अनेक नागरिकांनी आज पेपर वाटणा-यांना दमदाटी केली,पेपर टाकला नाही तर या पुढे पेपर घेणार नाही,त्यामुळे आज अनेकांच्या घरी वृत्त पत्र पोहोचले मात्र दूसरीकडे एका पॉश सोसायटीतील सुशिक्ष्ति माणसे यांनी सोसायटीच्या गेटवरच वृत्तपत्रांची होळी केली व करोना जाईपर्यंत सोसायटीत वृत्तपत्र टाकू नये म्हणून हॉकरला बजावले. एकंदरित नागरिक हे करोनाला घेऊन अतिशय धस्तावले आहेत. घरातच बंदिस्त झाले आहेत. संतापाला आता बरीच कारणे सापडली असून संपूर्ण देशात करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असताना मरकजमधील प्रकरणाने नागरिकांचा संयम सुटत चालल्याचे दिसून पडतंय.

लहान लहान मुले,वृद्ध मंडळी,आजारी मंडळी यांना सख्तीने घरात डांबून आम्ही प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करीत असताना दिल्लीत धर्माच्या नावाखाली देश विदेशातील हजारो लोकांना त्यातही करोना बाधितांना एकत्रित जमू दिलेच कसे?हा प्रश्‍न नागपूरकर नागरिकांनाही भेडसावत असून दिवसभर सोशल मिडीयावर या विरोधात मोठ्या प्रमाणात नकरात्मक चर्चा घडताना दिसली.

शनिवारी मरकज प्रकरणाशी संबधित पहील्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपूरकरांनी आता याची चांगलीच धास्ती घेतली आहे. नागपूरातील जिल्हा प्रशासन,मनपा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन हे आपापल्या परीने सर्वोत्तम काम करीत असले तरी केंद्र व दिल्ली सरकारच्या गलथानपणामुळे किंबहूना हेतुपुरस्सर एका समुदायाला झूकते माप दिल्यानेच देशावर करोनाबाबतच संकट कित्येक पटीने वाढल्याचे आता प्रशासनच सांगत आहे.

गुडीपाडवा सारखा नवसंवत्सर,रामनवमीसारखा काळजातला सण महाराष्ट्रातील जनतेने अतिशय संयमाने घरीच साजरा केला.मात्र दुसरीकडे एका विशिष्ट समुदायाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मजिदित जमू देण्यात आले,एवढेच नव्हे तर नागपूरसह संपूर्ण देशात त्यांनर मुक्तपणे संचार करु देण्यात आला.याचा पराकोटीचा राग जनतेच्या मनात खदखदतोय. नागपूरात करोनाचे वाढते संकट लक्ष्ात घेता अनेकांनी मोदींच्या आवाहानाला उद्या रविवारी रात्री ९ वा. कोणताही प्रतिसाद देणार नसल्याचेही मोकळेपणाने सांगितले.

मोदींच्या आवाहनावर लाखोंनी दिवे उजळले असते मात्र मरकज प्रकरण योग्य वेळी थांबावायला हवे होते असा संताप अनेकांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केला आहे. येणारी हनुमान जयंती,महावीर जयंती व त्याच दिवशी असणारा विशिष्ट समुदायाचा सण याकडे आता प्रशासन कसे लक्ष् पुरविते याकडे नागरिकांचे आता लक्ष् लागले आहे.

Latest बातम्या