Homeनागपूर न्यूजमनपा चालवण्याची लायकी नाही तर चालले गेले पाहिजे!आयुक्तांनी झेलले वार

मनपा चालवण्याची लायकी नाही तर चालले गेले पाहिजे!आयुक्तांनी झेलले वार

प्रदीप पाेहोणे यांचे वक्तव्य: सभेत आज २० सभासदांचे मनोगत

नागपूर,ता. २४ जून: महापालिका आयुक्त तुकराम मुंढे हे अनिल कपूर यांच्या चित्रपटातील ‘नायक’ वाटतात कारण रुजू होताच आयुक्त हे सर्वात आधी भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमध्ये गेलेत. फोटो छापून आणलेत.आम्हाला ही वाटलं उत्तम आयुक्त नागपूर शहराला लाभले.आयुक्तांनी घोषणा ही केली लवकरच येथील दुर्गंध कमी होईल व येथील रहीवाश्‍यांची दुर्गंधीपासून सुटका होईल मात्र झाले उलटेच!आयुक्तांनी कारभार हाती घेतल्या पासून येथील ‘वास’आणखी वाढला. आयुक्तांची मात्र टीआरपी वाढली.२०१२ पासून मनपाची आर्थिक स्थिती ही नाजूक आहे. एलबीटी आली आणि उत्पन्नाचे स्त्रोत आटले.मात्र इतर आयुक्तांनी तरी देखील कारभार रेटला.नगरसेवकांना कधीही एका गडरच्या झाकणासाठी हताश व्हावे लागले नाही.मुंढे यांनी मात्र सर्व नगरसेवकांचे संमत झालेले कामच रद्द केले आणि एकच कारण सांगितले,‘मनपाकडे पैसा नाही’मनपा चालवण्याची लायकी नाही तर चाललं गेलं पाहिजे,अश् वक्तव्य  माजी स्थायी समितीचे अध्यक्ष् प्रदीप पोहोणे यांनी स्थगन प्रस्ताववरील आज दि. २४ जून च्या दुस-या दिवशीच्या सभेत चर्चेची सुरवात करताना केले.

विशेष म्हणजे,आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पोहोणे यांचे हे वक्तव्य लगेच टिपूण घेतले. मुंढे हे जनतेसमोर ‘हिरो’आहेत मात्र प्रत्यक्ष्ात नगरसेवकांना एखाद्या गडरचे झाकण ही देऊ शकत नसल्याची बोचरी टिका त्यांनी केली.शहरात आऊटर भागात ९ हजार खंबे हे फक्त उभे आहेत.त्यावर एलईडी लाईट्स लावण्याचे टेंडर संमत झाले.स्थायी समितीकडून निधी संमत झाला.मात्र आयुक्तांनी ते देखील रद्द केले. आता त्या खंब्यांवर आम्ही काय तेलाचे दिवे लावायचे का?यालाही मग आम्ही इलेक्ट्रीक खांब्यांवर तेलाचे दिवे असा ’मुंढे पॅटर्न’नाव देतो. दिव्यां अभावी अंधा-या भागात रस्त्यावरील खड्डे नागरिकांना दिसत नाहीत.पावसाळ्यचे दिवस असल्याने साप,विंचूसारखे प्राणी निघतात.उद्यान विभगाने ११ हजार २६० झाडे लावून नागपूर शहर हे हिरवेगार करण्याची मोहीम हाती घेतली ती देखील रद्द केली.नाग नदी स्वच्छ केली ती ही अर्ध्या पैशात मग गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या प्रशासकीय अधिका-यांनी बोगस टेंडर काढले होते का?किती टन माती आणि गाळ काढला?त्या माती आणि गाळाचे काय केले?मिनीमाता नगर येथे ६० एकर जागा दवाखान्यासाठी राखीव आहे तिथे दवाखाना न काढता, के.टी.नगर येथील शॉपिंग मॉलचे आरक्ष् ण का बदलण्यात आले?

नगरसेविका दिव्या धुरडे यांनी नागपूरात लोकसंख्येच्या मानाने कोरोना बाधितांची संख्या ही आटोक्यात आहे याचे श्रेय प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवेतील कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,पोलीस विभाग,महापौर तसेच शहरातील नागरिकांचे असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे धुरडे यांनी या ‘नामावलीत’आयुक्तांचे नाव जोडले नाही.शिस्तबद्ध आयुक्त हे फक्त ॲपवर नागरिकांच्या तक्रारी सोडवतात मात्र नगरसेवक ६-६ महिने एखाद्या समस्येचा पाठपुरावा करतात त्यावर कोणतीही कारवाई होत नाही.गडरचा एक चेंबरही बनवण्याची लायकी आयुक्तांनी ठेवली नसल्याचा संताप व्यक्त केला.

इब्राहिम टेलर यांनी नगरसेवक तर आता ’चोर’ठरले आहेत.नगरसेवकांच्या फाईली थांबवून ऍपद्वारेच समस्या सोडविल्या जात आहेत. पैसे नसल्याचे वारंवार एकच कारण सांगितले जात आहे. आता मनपा मुख्यालयात एक मोठा फलक‘मनपाकडे पैसे नाहीत’असा लावून द्या.’आर्थिक तंगी की वजह से महानगरपालिका बंद’असं त्या फलकावर लिहून टाका,म्हणजे आम्ही जनतेला उत्तर देण्यास समर्थ होऊ शकू.आधी विधान सभेच्या निवडणूकांची आचार संहिता,मग आयुक्त,आता कोरोना,पुन्हा आम्हाला आता या सभागृहात निवडून येण्याची शक्यताच नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.

नगरसेवक रमेश पुणेकर यांनी नाईक तलाव परिसरात सर्वाधिक हलबा समाजाचे नागरिक राहतात. मात्र या समाजाची बदनामी करण्यासाठीच येथे एका कोरोना बाधित रुग्णाने बिर्याणी पार्टी केल्याचे आयुक्तांनी माध्यमांना सांगितले.आयुक्त स्वत: या भागात फिरकलेत का?कि अधिका-यांचे ऐकून असे वक्तव्य केले? मीच राजीनामा देतो,आयुक्तांनी आता आमचे नगरसेवक पद सांभाळावे व जनता किती त्रास देते हे अनुभवावे,असे आव्हान त्यांनी केले.हरीश ग्वालबंसी यांनी सूडाच्या भावनेने आयुक्तांना नागपूरा पाठविले असल्याची शंका व्यक्त केली.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी किती आयुक्तांना विरोधी पक्ष्ाची सत्ता असणा-या मनपात पाठवले?असा प्रश्‍न उपस्थित केला.मी आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आता नाहीच करणार,मी तर सभागृहातील सदस्यांचे नाव ही घेण्यास आता धजावतोय,असा टोला त्यांनी हाणला. आयुक्त हे खूप चांगले प्रशासकीय अधिकारी आहेत तर त्यांनी देशात इतर कुठेही जावे,देशाच्या बाहरे जाऊन नाव कमवावे,अशी ‘सदिच्छा’त्यांनी व्यक्त केली.नसेल जमत तर जप्रतिनिधींच्या भावनांची किंमत करा,असा सल्ला दिला.

बसपाचे मोहम्मद जमाल यांनी नेहमीच्या शैलीत शेरो-शायरी करीत ‘नफरत का बाजार ना बन,फूल खिला तलवार ना बन,रिश्‍ता-रिश्‍ता लिख मंजिल,रास्ता बन दिवार ना बन,सबकी अपनी सांसे है,सबका दावेदार ना बन’असे सांगत माझ्या स्वत:च्या वस्तीतील एक विवाहित बेटी ही सतरंजीपुरा येथील आपल्या सासरहून माहेरी आली तर बस्ती मे‘कोहराम’मच गया!पोलीसांना बोलावण्यात आले.लोकं इतके भयभीत आहेत की माणूसकीच उरली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली,तरीही सभागृहाबाहेर काही लोकं हे ’जिंदाबाद,मुर्दाबाद’चे नारे लावित आहे.मला तर नारे लावणारेच ‘मुर्दा’वाटतात,असे सांगून ‘वो मायुसी के लम्हे मे जरा सा भी हौसला देता..तो हम कागज की कश्‍ती पर समंदर मे उतर जाते’अश्‍या शायरीने आपले संभाषण संपवले.

भाजपचे बंटी कुकडे यांनी देखील नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली.आयुक्तांनीच नगरसेवक पद घ्यावे असे आव्हान केले. सिम्बॉयसिस विलगीकर केंद्र माझ्याच प्रभागात असताना मला साधे एक पत्र ही प्रशासनाकडून मिळाले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.एवढा मोठा भाग सील केला की त्या सील केलेल्या टिनांकडे बघून ’टिना पाहून प्राण तळमळला’हे गीत गावे लागत असल्याची मिश्‍कीली केली.मय्यत झाली तरी अस्थि विसर्जनाला बाहेर निघू दिले नाही.फक्त ३ जण जाणार होते मात्र आयुक्तांनी ‘बादलीभर पाण्यात अस्थि विसर्जित करा’असा आदेश दिला! अश्‍या परिस्थितीत जर नगरसेवकांवर गुन्हे दाखल होत असतील तर अधिका-यांवर देखील गुन्हे दाखल झाले पाहीजे,अन्यथा मी पण ‘फेसबुकीया’कार्यक्रम चालवेल.शहरात मोठमोठे फलक लावील की आम्ही नगरसेवक जनतेचे काम करण्यास असमर्थ आहोत,त्यावर आयुक्तांचा फोन क्रमांक टाकेल.जनतेने यांनाच संपर्क करावा,असे लिहील.

काँग्रेसचे युवा नगरसेवक बंटी शेळके यांनी टँकरचा मुद्दा उपस्थित करीत विविध पक्ष्ांचे कार्यकर्ते पोसले गेले पाहिजेत म्हणून आजही अनेक प्रभागात नळाद्वारे पाणी येत नाही,असा घणाघाती हल्ला चढवला.एखाद्या व्यक्ति विशेषावर एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन बोलण्यात येतं. तो दबत नसेल तर विरोध करायचा का?कालपासून सभागृहात आयुक्तांविरोधात फक्त ’कॉपी-पेस्ट’ संभाषण चाललं आहे.आयुक्तांनी असे कोणते कांड केलेत? फेसबुकीया पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत का?१५० वर्षांचा शहराचा गरिमामय इतिहास आठवतो मात्र गेल्या १३ वर्षांचा तुमच्या सत्तेचा इतिहास आठवत नाही का? सभागृहात सर्व पक्ष्ांचे १५६ सभासद आहोत,इतक्या वर्षात जनतेच्या आरोग्यासाठी शहरात १५६ बेड तरी होते का?फक्त १३१ खाटा होत्या.आयुक्तांनी त्या फक्त तीन महिन्यात ४५० खाटा केल्या. अायुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी नियोजन केले होते,शहराच्या पूर्व व पश्‍चिम भागात मनपाचे आरोग्य दवाखाने बनले पाहिजे मात्र तुमच्या सत्ताकाळात कागदावरचे निर्णय कागदावरच राहीलेत!तुम्हीच काहीतरी ’काळंबेरं’केले असेल म्हणून मुंढेंना घाबरत आहात,असा आरोप देखील शेळके यांनी केला.
नगरसेवक चौधरी यांनी बंटी शेळके हे आयुक्तांना संरक्ष् ण द्यायला उभे आहेत का?असा आक्ष्ेप नोंदवला.आयुक्तांची बाजू आयुक्तांनीच मांडली पाहिजे,असे चौधरी म्हणाले,हा सर्वात मोठा जोक असल्याची टिका त्यांनी केली.यावर भारतीय रिझर्व बैंकेचे गर्व्हनर हे अर्थतज्ज्ञ नाहीत ते इतिहासातज्ज्ञ आहे,एखाद्या सक्ष् म अधिका-याल किती टार्गेट कराल?आज डिजिटल युग आहे ते ऍपवर समस्या सोडवतात तर यात वाईट काय आहे?शहरात कोरोना बाधितांची बरं होण्याची संख्या देशात सर्वाधिक आहे.आयुक्तांच्या अनेक निर्णयांना केंद्र व राज्याने आदर्श मानून  ते इतरत्र राबविले.आयुक्त फोन उचलत नाहीत अशी तक्रार करता मात्र एकच माणूस मुख्यमंत्री,इतर मंत्री,पालक मंत्री,खासदार,आमदार,नगरसेवकांचे फोन उचलत राहीला तर २२ जास त्यांना ‘यस सर,नो सर’करत रहावे लागेल,मग ते काम कधी करणार?आयुक्तांचा प्रखर विरोध न करता संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला बंटी शेळके यांनी आपल्या संभाषणात दिला.

परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी आयुक्तांवर प्रहार करताना ’ढोलच पिटून राहीलेत मी सिंघम,मी सिंघम’असे मत मांडले.आरोग्य विभागाचे डॉक्टर्स,परिचारीका,सेवक एक-एक महिना आपल्या घरी गेले नाहीत.प्रतिबंधित क्ष्ेत्रात टिनांच्या बाजूला पोलीसांनी रात्र-दिवस कर्तव्य बजावले. मात्र सगळं श्रेय आयुक्तांनाच हवे. आयुक्त फोन उचलू शकत नाही असे शेळके म्हणतात मात्र या आधी मनपात आयुक्त नव्हते का?त्यांना फोन येत नव्हते का?चॅनलवर राधास्वामी केंद्रातील पाच हजार खाटा दाखवण्यासाठी वेळ होता.यासाठी टेंडर तरी काढला होता का?सभागृहाबाहेर ‘जिंदाबाद,मुर्दाबाद’साठीही ठेका दिल्याची शंका येते.आंदोलन असे होते का?मी पण नागपूर शहराच्या युवा मोर्च्याचा अध्यक्ष् होतो,उद्या मी पण ५ हजार आंदोलक फक्त घोषणा देण्यासाठी सभागृहाबाहेर जमवू शकतो. मुंढे साहेब आले आणि मनपाचे पैसेच संपले.साहेब तुमच्यावर रोष नाही तुम्ही सरकारी अधिकारी आहात म्हणून विचारावं लागतंय.स्मार्ट सिटीचे कोट्यावधी रुपये वाटलेत मात्र नगरसेवकांना एक गडरच्या चेंबरसाठी पैसे नाही देत.सकाळी ६ वा.जनता आमचे दरवाजे ठोकत असते.झोपला असेल म्हणून शिव्या देऊन निघून जातात.आयुक्तांनी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष्ांसोबत बसावे आणि यापुढे समन्वय साधावा.

विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी ‘ही मगरुरी विरुद्ध विनम्रतेची लढाई’असल्याचे सांगितले.ही लढाई श्रेयवादाची असल्याचे ते म्हणाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्याही संविधाना रुल ऑफ लॉ चा केंद्रबिंदू हा ‘माणूस’होता.माध्यमांना तुम्हीच सांगितले सभागृहात आम्ही नगरसेवक अधिका-यांची मुस्कटदाबी करतो.हा आमच्या चरित्र्याचा विश्‍वासघाताने केलेला खूनच आहे!३५ लक्ष् नागरिकांची,१५६ नगरसेवकांची तुम्ही मुस्कटदाबी करीत नाही का?हे गडकरींचे,फडणवीसांचे शहर आहे,हे महापौरांचे शहर आहे.या शहराचा ‘हिरो’दररोज गडर साफ करणारा स्वच्छता कर्मचारी आहे, रस्ता झाडणारा कर्मचारी आहे.या शहराने अनेक हिरो दिले.सुपर हिरो दिले मात्र सुप्रिम असल्याचा अनुभव पहील्यांदाज येत आहे.तुमच्या हूकूमशाही कार्यपद्धतीने दंडेली निर्माण केली आता मात्र दंडेली विरोधात दंडूके असा संघर्ष उभा राहील.या देशाच्या संविधानाने,संस्कृतीने मुसोलिनी,हिटलर किवा झार जन्माला येऊ दिले नाहीत.‘सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल मे है’अश्‍या ओळी मेश्राम यांनी वाचून दाखवल्या.

दुनेश्‍वर पेठे यांनी कोविडच्या काळातील तीन महिन्यातच सत्ताधारी एवढे बैचेन झाले आम्ही तर गेेल्या आठ वर्षांपासून सत्ताधा-यांच्या काळात कोविडचा काळ भोगत असल्याची टिका केली.नितीन साठवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला कारण संवाद नव्हता. आयुक्तांनी फोन उचलला असता तर हे घडले नसते.गेल्या अनेक अंदाजपत्रकात अतिशय जास्त खर्च झाला असावा म्हणूनच मनपा आता इतक्या आर्थिक अडचणीत आली असल्याचा टोला त्यांनी लगावला.आज एका गडर लाईन,चेंबरलाही नगरसेवकांना तरसावं लागत आहे.आयुक्त जंयत पाटील यांना भेटले याचा अर्थ दवाब आण्णासाठी भेटले असा याचा अर्थ होत नाही.कारोना काळात शहरातील सर्व खासगी दवाखाने बंद होते,महापौरांनीही यात लक्ष् घालायला हवे होते.समन्वय आणि संवाद असता तर एवढ्या अडचणी निर्माण झाल्या नसत्या.अनेकांची दूकाने,व्यवसाय आजही बंद आहेत. याची ही दखल घ्यावी लागेल.सामाजिक अंतरचे कारण देऊन आणखी किती महिने त्यांना उपाशी मारणार?असा सवाल त्यांनी केला.

नितीश ग्वालवंशी यांनी मनपा मुख्यालयात कोराना बाधित कर्मचारी आढळला,झोन क्र ७मध्ये ही मनपाचे कर्मचारी बाधित आढळले,किती जणांना क्वरंटाईन केले?झोनला सील केले का? ५० हजार लोकांना दररोज जेवण पुरविण्यात आले असा दावा आयुक्तांनी केला आहे.माझ्या प्रभागात आदीवासी नगर,गौतम नगर,ताज नगर,कुतुबशहर नगर इ.स्लम भागात एकदाही असे अन्न वाटप झाले नाही.सभागृहातील सगळेच नगरसेवक हे दहावी-बारावी नसून उच्च शिक्ष्ति देखील आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशंवतदादा पाटील फक्त चौथी पास होते मात्र त्यांच्या कर्तृत्वाने मोठमोठी महाविद्यालये आज राज्यात त्यांच्या नावाने चालतात.नगरसेवकांनाही शहराचा विकास हवा आहे मात्र अगदी याच्या उलट प्रतिमा रंगविण्यात आली. विधीमंडळ व कार्यकारी मंडळाने एकरुप होऊन शहराच्या विकासाठी काम केले पाहीजे,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कमलेश चौधरी यांनी देखील एकाच माणसाच्या मागे लागले असल्याचा आरोप केला.प्रशासन पुर्ण मुस्तेदीने कोरोना रोखण्यासाठी काम करीत असल्याचे ते म्हणाले.चांगले दवाखाने निर्माण केले. नाग नदी स्वच्छ केली आता मनपा शाळांचीही दुर्दशा सुधरावी अशी अपेक्ष्ा व्यक्त केली.

आज बुधवारी एकूण २० नगरसेवकांनी चर्चेत सहभाग नोंदवला. काल एकूण २५ नगरसेवकांनी चर्चेत सहभाग नोंदवला होता. बहूतांश सत्ताधा-यांनी आयुक्तांवर चांगलेच तोंडसुख घेतले मात्र कालसारखे आयुक्त आज देखील शांतपणे सगळे प्रहार झेलत होते.उद्या गुरुवार दि. २५ जून रोजी सकाळी ११ वा.पुन्हा सभा भरणार असून उर्वरित सदस्य हे स्थगन प्रस्तावावर बोलतील. यानंतर आयुक्तांच्या उत्तराकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष् लागले आहे.

Latest बातम्या