Homeनागपूर न्यूजनियमांच्या उल्लंघनात अडकले मनपाचे झोनल वैद्यकीय अधिकारी!

नियमांच्या उल्लंघनात अडकले मनपाचे झोनल वैद्यकीय अधिकारी!


मोमिनपु-यात मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांचे पुन्हा आंदोलन

नागपूर,ता. ९ जून : गांधीबाग झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी ख्वाजा मोईनूद्दीन यांनी आज मोमिनपुरा भागात कर्तव्यावर असताना,सावलीत विसावा घेतला असता, पाण्यातील बाटलीतून गुळणे करुन त्याच ठिकाणी थुंकण्याचा व सोबत असणा-या इतर अधिकारी व विलगीकरणासाठी सोबत घेऊन जाणा-या दोन संशयितांसोबत कोणतेही सुरक्षित अंतर न पाळल्यामुळे, नियमांच्या उल्लंघनात ते आज चांगलेच अडकले.

विशेष म्हणजे,तेथील एका इसमाने त्यांचा हा व्हिडीयो फार लांबून चित्रबद्ध केला,त्यामुळे या व्हिडीयोत ‘ऑडीयो’ रॅकॉर्ड झाला नाही,मात्र अनेकांच्या मोबाईलवर हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला.एकीकडे महापालिका आयुक्त तुकाराम मुुंढे हे लॉक डाऊनच्या पहील्या दिवसांपासूनच शहरातील जनतेला ओरडून-ओरडून, लॉक डाऊनचे नियम सांगत आहेत मात्र त्यांच्या नाकाखाली असणारे त्यांचे अधिकारी त्या नियमांचे किती पालन करीत आहे?हा संशोधनाचाच विषय आहे.

सुरक्ष्ति अंतर राखावे,मास्कचा वापर करावा,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,कोरोनासंबंधी या तिन्ही अत्यावश्‍यक निमयांच्या पालनाची अक्ष् र: धज्जीया उडवण्यात आल्याचे या व्हिीडयोमध्ये दृष्टिक्ष्ेपात येते.नागपूरात कारोना बाधितांची संख्या आज मंगळवार दि. ९ जून रोजी ७९६ च्या घरात पोहोचली असून लवकरच ८०० चा टप्पा गाठण्याची शक्यता असताना मनपाचेच जवाबदार,कर्तव्यदक्ष् झोनल वैद्यकीय अधिकारी अश्‍याप्रकारचा निष्काळजी व्यवहार करीत असल्याने,याबाबत बरिच चर्चा या भागात दिवसभर रंगली.विशेष म्हणजे,एका जागरुक नागरिकानी नेमके या बेजवाबदार व्यवहराला, अचूक मोबाईलमध्ये टिपले.परिणामी मनपाच्या आयुक्तांसह त्यांच्या या योद्धांना या पुढे किती दक्ष् राहवे लागणार आहे याचे हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे.

शेवटी माणूस आहे मी,कृती चुकीचीच मात्र सुधारणेला वाव आहे-ख्वाजा मोईनूद्दीन

सकाळी १० ते ४ पर्यंत एवढ्या उन्हातही नेहमीसारखेच आजही कर्तव्यच बजावत होतो,अचानक पाऊस आला तेव्हा गडरच्या बाजूने असलेल्या एका दूकानाचा आडोसा घेतला.सोबत अतिक्रमण विभागाचे अधिकारी अशोक पाटील हे देखील होते. ज्यांना विलगीकरणात घेऊन जात होतो त्या दोन जणांनाही पावसामुळे येथेच आडोसा घ्यावा लागला.

तहान लागल्यामुळे पाणी प्यायलो मात्र त्यापूर्वी घश्‍याला कोरड पडल्यामुळे गुळणे केले. शेवटी मी देखील हाडा-मासाचाच माणूस आहे. सुरक्ष्ति अंतर पाळायला हवे होते, सार्वजनिक ठिकाणी थूंकणे योग्य नव्हते मात्र त्या क्ष् णी पावसामुळे दूसरा पर्याय नव्हता.
उलट आज पुन्हा येथील नागरिकांनी आंदोलन केले. जोरदार नारेबाजी केली. मला नेहमीच धमक्या मिळत असतात. आपंल वाटोळं करणारा..हाच तो अधिकारी म्हणून माझ्या डीपीवरील फोटोसह मॅसेज व्हायरल केला जातो.गेल्या तीन महिन्यांपासून मी हे सगळं सहन करतोय. या आंदोलन करणा-यांनी आज देखील कोरोना नियमांची धज्जीया उडवली आणि एकत्रित जमले. अनेकांनी मास्कचा वापर देखील केला नाही. आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन या भागात कर्तव्य बजावत असतो. हरामखोर..मोमीनपुरा को नोच नोच के खानेवाला…चाकू मारो साले को..मर्डर हो जायेगा…!असे मॅसेज माझ्या विरोधात फिरत असतात. मी पोलीस संरक्ष् णात काम करतो. गेल्या १४ वर्षांपासून याच झोनमध्ये कर्तव्य बजावत आहे.यापूर्वी लक्ष्मीनगर झोनमध्ये कार्यरत होतो.
येथील समस्या फार वेगळ्या आहेत. आजची कृती ही चूकीची होती,मान्य करतो मात्र या पुढे दक्ष् राहील.

का होतात मोमिनपु-यात वारंवार आंदोलन?

’सत्ताधीश’ने आजच्या देखील आंदोलनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता,मोमिनपु-यातच वारंवार मनपा प्रशासनाच्या विरोधात का आंदोलने होतात?हा प्रश्‍न तेथील सामान्य नागरिकांना विचाराला असता,अनेक पैलू समोर आले.

आमचा विरोध कोणालाही नाही उलट आम्ही मनपा प्रशासन असो किवा पोलीस प्रशासन,सर्वांना संपूर्णत:सहकार्य करतो,मात्र आमच्या समस्या आतातरी मनपा प्रशासनाने समजून घ्यायला हव्यात. आजही येथील ६ नागरिकांना विलगीकरणात घेऊन जाण्यात आले. आमची मागणी एवढीच आहे,जे कोरोनाबाधित आढळतात त्यांच्या आजूबाजूला राहणा-या कोरोना निगेटीव्ह नागरिकांना देखील ’हाय रिस्क’च्या नावावर उचलून का नेण्यात येतं?त्यांचे घरीच विलगीकरण का करीत नाही?

मग हाच न्याय शहरातील इतर भागात का लागू होत नाही? इतर भागातही कोरोना रुग्ण आढळतात आहेत,मोमिनुपरा वगळता त्या भागातील किती नागरिकांना ’हाय रिस्क’चे कारण सांगून ‘मोठ्या संख्येने’ विलगीकरणात पाठवण्यात आले?हा दूजाभाव का?कशासाठी?
‘मोमिनपुरा’ हा शब्दच प्रसार-प्रचार माध्यमात एवढा ’बदनाम आणि भीतीदायक’करण्यात आला आहे की,आमच्यावर उपाशी मरण्याची वेळ आली आहे आता! मी सामान्य मध्यम वर्गीय माणूस असून मी फूटपाथवर दूकान चालवित होतो. लॉक डाऊनच्या पहील्या टप्प्यात ’अल्लाह की दूआ से’मी स्वत: या भागातील गरिबांना मदत केली मात्र आता माझ्यावरच उपासमारीची वेळ आली आहे! तीन महिन्यांपासून घराचे भाडे दिले नाही,उद्या घरमालक हाकलून लावेल तर कुटुंबाला घेऊन कुठे जाऊ?

या भागातील स्वयंसेवी संस्था या गरिबांना मदत करीत आहेत मात्र मध्यम वर्गीयांचे काय? अाम्ही स्वाभिमानाने रोजी-रोटी कमावून खाणारे आहोत मात्र संपूर्ण साढे तीन किलोमीटरचा परिसरच प्रतिबंधित करण्यात आल्यामुळे बाहेर पडताच येत नाही.आमची मागणी एवढीच आहे, प्रतिबंधाचे क्ष्ेत्र आता तरी थोडे कमी करावे. एवढा मोठा परिसरच सील करण्यात आल्यामुळे उलट आतल्या भागात लोकं खुलेआम घूमतात व कोरोनाचा संसर्ग वाढतोय. एवढे देखील प्रशासनाला कळत नाही का?ज्या ठिकाणी बाधित आढळला,तेवढा भाग सील करावा. इतरी ठिकाणी मनपा हेच करते ना?मग मोमीनपु-याशी दूजाभाव का?

आमच्याच भागातील एक विना आईचा मूलगा हा शहरातील एका गॅरेजमध्ये काम करतो. त्याला आता मोमिनपुरासारख्या ‘हॉट स्पॉट’म्हणून घोषित केलेल्या भागातून असल्यामुळे कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागात सर्वाधित गाेर गरीब व मध्यम वर्ग राहतो.ज्याचे हातावर पोट आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आमचे प्रश्‍नच कोणीच समजून घेतले नाही.किती राजकीय पक्ष्ाचे किती नेते पुढे आलेत?

एवढे मोठे क्ष्ेत्र इतक्या दिवसांपासून प्रतिबंधित असल्यामुळे आतमध्ये‘ माणूस’ म्हणून जगताना आम्हाला काय समस्या आहेत?हे कोण समजून घेणार?आमच्या येथे नुकतेच एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला कारण त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेताच आले नाही. आतल्या आत त्याचे कुटुंबिय फिरत राहीले.बाहेर कसे पडणार?

या भागातील नागरिक दवाखान्याची फाईल दाखवतात,त्यांना उपचाराची गरज असते तरी देखील त्यांना बाहरे पडू दिले जात नाही,आणि हे असे किती दिवस चालणार? देशातला,जगातला कोरोना कधी नष्ट होणार,हे तरी सांगा ना आम्हाला!तशी मग आम्ही आमची मानसिक तयारी करतो. मायबाप सरकार आणि प्रशासनालाच माहिती नाही,कोरोना कधी नष्ट होणार आणि दूसरीकडे आमच्यावर महिनो नं महिने सक्तीने विना काम द्यंद्यांचे घरात उपाशी बसून राहण्याची प्रशासन जर अपेक्ष्ा करीत असेल तर हे कसे शक्य आहे?
आमचा राग कोणावरही नाही.पोलीस खात्यावर तर आमचा मूळीच राग नाही,ते त्यांचे कर्तव्य बजावतात. मनपा प्रशासन असो किवा आरोग्य विभाग,आमचे एकच मागणे आहे,प्रतिबंधित क्ष्ेत्राची व्याप्ती आता हळूहळू संकूचित करीत न्यावी. येथील नागरिकांच्या,गर्भवती महिलांच्या, लहान लहान मुलांच्या दूधाची,औषधांची काळजी घेण्यात यावी.इतर ठिकाणी कोरोना बाधित आढळतात तेव्हा प्रसार-प्रचार माध्यमांनी तेथील स्थिती रंगवून सांगावी अशी आमची मागणी नाही मात्र तिथे ५७ बाधित निघतात तेव्हा ती देखील बातमी तेवढ्याच सत्यतेने दाखवण्यात यावी.

नुसतं मोमीनपु-याला बदनाम करुन आणखी येथील ’माणूसकीचे ’नुकसान करु नका. आम्ही प्रशासनाला संपूर्णत:सहकार्य करीत ईद देखील घरीच साजरी केली. पुढे ही सहकार्य करीत राहू मात्र या भागात वारंवार आंदोलने होतात कारण…कुठेतरी प्रशासनावरचा ‘विश्‍वास’हा ‘डळमळीत’झाला असल्याचे वास्तव..हे मान्य करावेच लागेल…!

Latest बातम्या