सोशल मिडीयावर रंगली चर्चा
नागपूर: नागपूरातील काही मौलवींनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत समुदायाला ‘करोना’बाबतच्या प्रशासनाच्या खबददारीच्या सर्व सूचना पालन करण्याचे कळकळीचे आवाहन केल्याचे चार व्हीडीयो हे प्रसिद्ध करण्यात आले. यात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी देखील मौलवींनी पुढे येऊन त्यांच्या समुदायातील लोकांना दिलेली साद,केलेले आवाहन याचे भरभरुन कौतूक केले मात्र आपल्या संपूर्ण संदेशात या मौलवींनी ज्या तब्लीगी जमातमुळे उपराजधानी नागपूरच नव्हे तर संपूर्ण देश होरपळून निघत आहे,देशातील हजारो निरपराध नागरिक गंभीर संकटात सापडले,त्यांच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नसल्याने याबाबत चांगलीच चर्चा सोमवारी सोशल मिडीयामध्ये रंगली होती.
नागपूरात सोमवार दि. १३ एप्रिल रोजी करोना बाधित रुग्णांची संख्या ही ४७ वर पोहोचली. विशेष म्हणजे यातील बहूतांश करोना बाधित हे तब्लीगी जमातशी संबंधित आहेत किंवा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. मुस्लिम समुदायातील महिला,लहान लहान मुले, तरुण मुले व पुरुष करोनाच्या संसर्गाला बळी पडले असून आता याचा सर्वात जास्त फटका याच सुदायाला बसला आहे.नागपूरातील मोमिनपूरा,हंसापूरी, बैरागीपूरा,आशिनगर प्रभगातील अनेक झोन हे ‘डेंजर झोन’मध्ये आले असून याच भागात करोनाचा प्रसार झपाट्याने झाल्याचे प्रशासन देखील कबूल करीत आहे.हा आकडा येथेच थांबणार नसून अद्याप विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या अनेक संशयितांच्या चाचणीचा अहवाल देखील करोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढली असल्याचे खाजगीत बोलले जात आहे.या सर्व विदारक परिस्थितीची जाणीव या मौलवींना झाल्यामुळेच त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
आवाहन करण्यासाठी उजाडला एप्रिलचा दूसरा आठवडा!
ज्या मौलवींनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुस्लिम समुदयाला प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले त्यांना असे आवाहन करण्यासाठी एप्रिलचा महिन्याच्या दूसरा आठवडा उजाडावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हेच आवाहन त्यांनी मार्च महिन्याच्या दूस-या आठवड्यात केले असते तर आज नागपूरात संसर्गितांची संख्या ही अत्यंत कमी राहीली असती ,असे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे मार्च महिन्यातच दिल्ली येथील निजामुद्दीन भागातील मजिदीमध्ये तब्लीगी जमातचा जलसा भरला होता,आणि तिथूनच करोनाची लागण ही देशभर पसल्याचे केंद्रिय शासनाच्या अारोग्य विभागाचाच अहवाल सांगतोय.
दिल्लीतील मरकजमध्ये १२ व १३ मार्च रोजी तब्लीगी जमातचे ९ हजारच्या वर जमाती सहभागी झाल्याचे सांगितले जाते.यात १००० च्या वर हे चीन,मलेशिया,थायलैण्ड,श्रीलंका,बांग्लादेश इत्यादी करोनाबाधित देशांमधून सहभागी झाले असल्याचा सांगितले जात आहे. देशात मार्च महिन्याच्या दूस-या आठवड्यात ‘करोना’विषयी केंद्राकडून ठोस पावले उचलली जात असताना त्यांच्या व दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या ऐन नाकाखाली दिल्लीतील निजामुद्दीन भागात तब्लीगी जमातचे जमाती यांनी २ दिवस संमेलन भरवले.याचे परिणाम ंसंपूर्ण देशासह नागपूरला देखील भाेगावे लागत असल्याचा संताप सोशल मिडीयावर चांगलाच व्यक्त होत आहे.
अश्यावेळी नागपूरातील हे मौलवी समोर येऊन समुदायाला अावाहनकर्ते झाले असते तर याचे खूप चांगले परिणाम नागरिकांना बघायला मिळाले असते. उशिरा का होईना आतातरी सामोरे येऊन त्यांनी केलेले आवाहन समुदायातील व्यक्तिंनी ऐकावे व स्वत:हून सामोरे यावे.असे झाल्यास नागपूर शहरातून करोना लवकरात लवकर हद्दपार करता येऊ शकेल व मुस्लिम समुदायातील व्यक्तिंमध्ये होणारी लागण ही थांबवता येऊ शकेल,असे सांगितले जात आहे.
खेदाची बाब म्हणजे अगदी लहान मुलांना देखील करोनाचा संसर्ग झाला असून त्या निरागस,निष्पाप जीवांना उगीचच या रोगाची व उपचाराची यातना भोगावी लागत आहे. जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत तर अब्दूल बारी पटेल यांच्या भावनांचा बांध फूटला व त्यांनी ‘करोनाला धर्म,जातीत विभागू नका,घरातच रहा आणि आपला जीव वाचवा‘ असे आवाहन केले. या बैठकीत अमन फाऊंडेशनचे झाकीर खान,मौला हाफीज मसूद अहमद व हाफीज अब्दुल वाशीद आदी उपस्थित होते. या सर्वांनी व्हीडीयोच्या माध्यमातून आपल्या समुदायाला प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले मात्र….ज्या तब्लीगी जमातमुळे त्यांच्याच नव्हे तर अवघ्या मानवजातीवर जे जीवघेणे संकट कोसळले त्या विरोधात एक शब्दही उच्चारला नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या वेळी त्यांनी घरातच नमाज पठण,किमान तीन फुटांचे अंतर इ.चे काटेकारे अंमलबजावणी करण्याचे अावाहन केले मात्र हेच आवाहन त्यांनी मार्चमध्ये केले असते तर या आवहानांचा प्रभावी परिणाम झाला असता कदाचित म्हणूनच जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सूचक विधान केले ‘मार्गदर्शक सूचनांचे आधीच पालन केल्या गेले असते तर…एकाच दिवसात १४ लोकांना करोना संसर्ग झाला नसता’.
केंद्राचा धक्कादयक अहवाल! तब्लीगीचे अद्याप ६ हजारच्या वर जमाती नॉट रिचेबल-
दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार १२ ते १५ मार्च दरम्यान मरकजमध्ये ९ हजारच्या वर तब्लगी जमातींचा जलसा भरला होता,त्यातील फक्त ३ हजार १९८ लोकांचे फोन क्रमांक ट्रेस करण्यात यश मिळाले. ६ हजारच्या वर तब्लीगी जमातींच्या लाेकांचे फोन ट्रेस करण्यास केंद्राला सपशेल अपयश आले असून या सर्व लोकांनी त्यांचे मोबाईल फोन बंद करुन ठेवले आहेत. शासनाच्या आवाहनानुसार ते समोर आले तरच करोनाचा प्रादुर्भाव प्रभावीपणे आता रोखता येणार असल्याचे सांगितले जात आहे.केंद्र सरकारच्या आवाहनाला न जुमानता त्यांनी जर देशभर करोनाचा प्रसार केला तर शासन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे यात
बहराईच मधील १७,इंडोनेशिया मधील १०, थायलंड मधील ७ विदेशी मौलवींचा समावेश आहे. केंद्राने या सर्वांचे पारपत्र रद्द केले आहेत,तब्लिगी जमातीच्या लोकांनी स्वतः हुन सामोरे यावे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केंद्र सरकार आता करीत आहे. या जमातीच्या लोकांनी लपून राहील्यास करोनाचा धोका हा अनेक पटीने देशात वाढला असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने तर या जमातीच्या लोकांची रवानगी रुग्णालयातून बरे झाल्यावर सरळ तुरुंगात करण्याची सुरवात केली आहे,महाराष्ट्रातील ठाकरे सरकार शरद पवारांच्या दडपणाखाली ताब्लिगीच्या विरोधात असे कठोर पाऊल उचलणार का? या विषयी देखील सोशल मीडियावर चर्चेचे गुऱ्हाळ रंगले.
मीडिया विरोधात ‘जमियत उलेमा ए हिंद’सर्वोच्च न्यायालयात!
आश्चर्याची बाब म्हणजे देशाला गंभीर संकटात ढकळणाऱ्या ताब्लिगीच्या विरोधात बोलण्याचे सोडून जमियत उलेमा ए हिंद ही संघटना आज सरळ मीडियाच्या विरोधात सर्वोच्च न्यायलायत गेली.
प्रचार- प्रसार माध्यमांमध्ये ताब्लिगीना घेऊन माध्यमे ही ‘हिंदू-मुस्लिम’ वाद निर्माण करीत असल्याचा आरोप यात करण्यात आला. केंद्र सरकारच्यावतीने तब्लिगीचे संपूर्ण आकडे सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आले, 6 हजारच्या वर अद्याप जमातीमध्ये सहभागी तब्लिगी हे बेपत्ता असल्याचे धगधगते वास्तव केंद्राने सर्वोच्च न्यायालयात आकडेनिशी व पुराव्यानिशी माहिती मांडली, माध्यमात याचीच चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आणि सर्वोच्च न्यायालयाने या संघटनेच्या नेत्यांना चांगली फटकार लावल्याची माहिती माध्यमातून उमटली.

आमचे चॅनल subscribe करा