
बाधितांची संख्या पोहोचली ८६२ वर
नागपूर,ता.१० जून: मुंबईतील धारावीत दाटीवाटीने घरे असल्यामुळे तिथे कोरोना संसर्गाचा ज्याप्रमाणे उद्रेग झाल, त्याचीच प्रचिती नागपूरात आता नाईक तलाव-बांग्लादेश या भागात नागपूरकरांना पाहायला मिळत अाहे.आज बुधवार दि. १० जून रोजी नाईक तलाव-बांग्लादेश भागातील आणखी ७२ लोकांचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला असून ६ सतरंजीपुरा व ७ ईसासनी भागातील आहेत.
हे सर्व रुग्ण आधीपासूनच विलगीकरणात होते. एकट्या नाईक तलाव येथून गेल्या चार दिवसात ८० पेक्ष्ा जास्त कोरोना बाधित आढळून आले होते. आज पुन्हा त्यात ७२ रुग्णांची भर पडली. गेल्या १३ दिवसात नागपूरात १८४ बाधित आढळून आल्याने नागपूरकर आता चांगलेच धस्तावले आहेत.
मोमिनपुरा व सतरंजीपुरा भागातून सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली होती.यानंतर नाईक तलाव-बांग्लादेश हा भाग आता नवा ‘हॉट स्पॉट’ सिद्ध झाला आहे.विशेष म्हणजे या भागातील घरे ही देखील अत्यंत दाटीवाटीची असल्यामुळे येथे कोरोनाचा प्रार्दुभाव जलद गतीने पसरल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूरातील ‘धारावी’असा उल्लेख आता या परिसरासाठी केला जात आहे.
आज आढळून येणा-या बाधितांचा चाचणी अहवाल हा नेहमीप्रमाणे माफसू,मेयो,मेडीकल,व्हेटरनरी लॅब व एम्सच्या प्रयोगशाळेतून आला असून यात व्हीएनआयटीमध्ये नाईक तलाव येथील विलगीकरणातील एकूण ६१ बाधितांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला.पाचपावली विलगीकरणातील एकूण १५ बाधितांचा अहवाल मेडीकलच्या प्रयोगशाळेत पॉझिटीव्ह आला.यात ६ सतरंजीपुरा तर ९ हे नाईक-तलाव बांग्लादेश येथील आहेत.एम्सच्या प्रयोगशाळेतून आमदार निवास येथे विलगीकरणा असणा-या एकूण ९ रुग्णांचा अहवाला पॉझिटीव्ह आला यात ७ रुग्ण हे ईसासनी हिंगणा भागातील तर २ नाईक तलाव-बांग्लादेश भागातील आहेत.
काल मंगळवार दि. ९ जून रोजी शहरात ४२ बाधितांची भर पडून एकूण आकडा हा ७७७ वर पाेहोचला होता.यात आज बुधवारी आणखी ८५ रुग्णांची भर पडली असून आकडा आता ८६२ वर पोहोचला आहे. शहरात सर्वच भागातून बाधितांची झपाट्याने वाढणारी संख्या बघून लवकरच हा आकडा ’हजार’च्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाची पूर्ण तयारी!
मनपा प्रशासनाने नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्ात घेता आधीच मेयो-मेडीकल व एम्ससारख्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या रुग्णालयात कोव्हिड-१९ वर उपचारासाठी वॉर्ड निर्माण करुन ठेवले होते. सध्या मेडीकलमध्ये १५९ काेरोना बाधितांवर तसेच कोव्हिड वॉडमध्ये १३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय मेयोमध्ये १३८ कोरोना बाधित उपचार घेत असून एम्समध्ये ५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शहरात बाधितांची वाढती संख्या लक्ष्ात घेता,मुंबईसारखी कोरोनाबाबत,वेळेवर उपचारासाठी बेड न मिळण्यासारखी‘विदारक’स्थिती नागपूरात निर्माण होणार नाही याची संपूर्ण दक्ष् ता, आधीपासूनच मनपा प्रशासन घेत आहे.यासाठी युद्ध पातळीवर मनपाने पूर्वतयारी केली असून,बाधितांची वाढती संख्या जरी असली जरी प्रत्येकाला उपचाराची सोय हा नैसर्गिक न्याय महाराष्ट्राच्या उपराजधानीत सध्यातरी प्रचितीस येत आहे. महाराष्ट्राच्या राजधानी‘ मुंबईत’ मात्र अगदी या उलट परिस्थिती आढळत आहे. मुंबईत आतापर्यंत ४९,८६३ पॉझिटीव्ह आढळून आले असता तेथील आरोग्य व्यवस्था पार कोलमडून पडल्याचे चित्र असून,रुग्णांना वेळेवर कोणत्याच सरकारी किवा खासगी रुग्णालयात बेड देखील उपलब्ध होत नाही. नागपूरकरांकडे या बातम्या येऊन जेव्हा धडकतात तेव्हा त्यांच्याही काळजाचा ठोका चूकतो. मुंबईत आतापर्यंत १,८५७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. नागपूरात मात्र रुगण संख्या कितीही वाढली तरी, उपचारांची संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याचा दावा वारंवार प्रशासन करीत आहे.
चाचण्यांचे गौडबंगाल!
भारतात लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी चाचण्या केल्या जात असल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनीही केला आहे,परिणामी १३७ कोटींच्या या देशात बातिधांची संख्या ही फक्त लाखभर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमेरिकेचा दावा आहे की भारतात किमान २० लाखांच्या वर बाधित आहेत मात्र भारताने मूळातच कमीत कमी चाण्यांचे ‘धोरण’स्वीकारले असून बाधितांच्या बाबत जगाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
नागपूरात देखील मेयो,मेडीकल व एम्समध्ये प्रत्येकी ४०० ते ४५० चाचण्यांची क्ष् मता असताना या तिन्ही प्रयोगशाळांमधून दररोज संपूर्ण क्ष् मतेने हजार ते दीडहजारांच्या वर चाचण्यांचा अहवाल प्रसिद्ध झाला पाहिजे,मात्र नागपूरकर जनतेला अद्याप प्रशासनाकडून या प्रयोगशाळेत होणा-या एकूण चाचण्यांच्या संपूर्ण क्ष्मतेबाबत कोणताही ठोस आकडा सांगितला जात नाही. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे’मूळात कमी चाचण्या आणि कमी बाधित’असे धोरण नागपूरातही स्वीकारण्यात आले आहे का?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एक बिर्याणी पार्टी पडली खूप महागात!
नाईक तलाव-बांग्लादेश येथील तीन मित्रांनी दिलेली बिर्याणी पार्टी तेथील रहीवश्यांना खूपच महागात पडली. यांनी ही बिर्याणी चक्क मोमिनपुरासारख्या प्रतिबंधित क्ष्ेत्रातून आणली,जिथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले.या तिन्ही मित्रांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काल ८० तर आज ७२ जणांना काेरोनाची लागण झाली.याशिवाय या भागातील ८०० संशयितांना विलगीकरण केंद्रात नेण्यात आले.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत एका वाहीनीवर भाष्य करताना सांगितले, एवढ्या मोठया संख्येने या भागातील नागरिकांना देखील विलगीकरण केंद्रात दाखल केले,यात काहीच हरकत नाही,कोरोना संपर्काची साखळी तुटली पाहीजे,हा हेतू साध्य झाला पाहिजे.नाईक तलाव बांग्लादेश भागात एवढ्या मोठया संख्येने बाधित आढळण्यामागील कारण विचारले असता,कोणतीही शक्यता सांगता येत नसल्याचे ते म्हणाले.
या तीन मित्रांपैकी एकाचा व्यवसाय हा शिंपीचा आहे तर दूसरा टरबूज विक्रेता आहे. व्यवसायानिमित्तही ते अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.मात्र शक्यता कोणतीही असली तरी त्यांच्या या अविचारी वागण्याने नागपूरात बाधितांच्या संख्येत झालेली लक्ष् णीय वाढ,यामुळे नागरिक चांगलेच धस्तावले आहेत.
नागरिदिल्लीवरुन आलेल्या त्या बाधिताला मूळात संसर्ग झाला तरी कुठे?
धंतोलीसारख्या नागपूरातील सर्वात क्रिम एरिया समजल्या जाणा-या भागात बॅनर्जी मार्गावरील एका तीन मजली इमारतीत, गेल्या आठवडयात दिल्लीवरुन व्यवसायाने डॉक्टर असणारा नागरिक परत आला. मात्र चार दिवसात त्यांना कोरोनाची लक्ष् णे दिसत असल्याने त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. मेडीकलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु अाहेत.मात्र दिल्लीच्या विमानतळावर त्यांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली.यानंतर संपूर्ण विमान प्रवासात त्यांनी संसर्गापासून बचावाची काळजी घेतली. नागपूरच्या विमानतळावर देखील त्यांची थर्मल स्क्रीनिंग झाली,तरी देखील त्यांना दिल्ली ते नागपूर दरम्यान विमान प्रवासात काेरोनाचा संसर्ग झाला कसा,याबाबत आश्यर्च व्यक्त केले जात आहे.
कोरोनाचा विषाणू हा १४ दिवसही सुप्तावस्थेत असल्याने कोणत्यातरी ‘सुपर स्प्रेडरने’धंतोलीतीी या डॉक्टरांना करोनाचा संसर्ग दिला असल्याचे सिद्ध झाले. यामुळेच देशात कोरोना विषाणू गेल्या तीन महिन्यांपासून अक्ष् रश: थैमान घालत असून देखील ना केंद्र,ना राज्य ना स्थानिक प्रशासन हे ‘कोरोना विषाणूविषयी‘धस्तावलेल्या नागरिकांचे कसलेही योग्य व प्रभावी समुपदेशन करु शकले नाहीत. यामुळेच कोरोनाविषयी नागरिकांची भीती ही शिगेला पाेहोचली आहे.
नागरिकांनी सतर्क राहणे हाच एकमेव प्रभावी उपाय-
नागपूरात ९०० च्या जवळ पोहोचलेला बाधितांचा आकडा हा कशाचा निर्देशांक आहे?हे सांगता येणे अवघड असले तरी, लॉक डाऊनमध्ये मिळालेली शिथिलता,इतर शहरांमधून येणारे नागरिक,आणि कोरोनासारख्या महामारीच्या काळातही अनेकांची बेजवाबदारपणाची वर्तवणूक,यामुळे निश्चितच गेल्या दोन आठवड्यात नागपूरात बाधितांच्या आकड्यांनी दोनशेचा टप्पा पार केला.
लॉक डाऊनचा काळ हा कायम असू शकत नाही.परिणामी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ न देण्याचा एकमेव उपाय म्हणजे,अनोळखी माणसांच्या संपर्कात कमीत कमी प्रमाणात येणे. सतत मास्कचा उपयोग करणे, वारंवार हात धूत राहणे व सर्वात महत्वाचे ‘सतत सतर्क’राहणे,हाच सध्यातरी एकमेव उपाय आहे.
नागपूरात लॉक डाऊनमध्ये शिथिलता दिल्याबरोबर मोदी नं २ मधील मोबाईलच्या दूकानांमध्ये तरुणाईची सर्वाधिक गर्दी उसढळली,हे कश्याचे द्योतक आहे?मोबाईलचे एसेसरीज हे जिवनावश्यक गोष्टींप्रमाणे गरजेचे आहेत का?मूळात जिवनावश्यक नसणा-या दूकानांना सध्यातरी परवानगी का देण्यात आली?असा संतप्त सवाल ही आता विचारला जात आहे?
सरकार किवा प्रशासन हे प्रत्येक नागरिकाची सुरक्ष्ा करु शकत नाही. नागपूरकर नागरिकांनीच आता कोव्हिड-१९ पासून बचावासाठी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता सांगितली जात आहे.

आमचे चॅनल subscribe करा