
वैद्यकीय सेवा कि वैद्यकीय व्यवसाय?
नागपूर,ता. ३० जुलै: ’करोना हा आता कोणताही आजार राहीला नसून मेडीकल इंडस्ट्रीचा धंदा झाला आहे’कुठे आहे मलेरिया,डेंग्यू,न्यूमाेनिया,काविळ,टायफाईड,हिवताप हे आजार?अचानक कसे हे सगळे आजार हद्दपार झालेत?साधी सर्दी,खोकला झाला तरी टेस्ट मात्र ’करोना पॉझिटीव्हच ’येते!या चाचणीचे शास्त्रीय प्रमाण कोणते? कोणत्या जागतिक दर्जाच्या किटने स्वॅब तपासण्यात आले?अश्या अनेक पोस्ट सोशल मिडीयावर अलीकडे दररोज व्हायरल होत आहेत, कोविड महामारी…किती कमाऊ किती खाऊ’असा आता नागरिकांमध्ये समज पसरला आहे,नागपूरातही दोन घटना अश्या घडल्या ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होणा-या या पोस्ट ख-या तर नाहीत?अशी विचारणा आता लोकांमध्येच ऐकू येत आहेत.
बर्डीवरील एका नामांकित औषध दूकानाच्या मालकाचा पुतण्या हा करोना बाधिताच्या संपर्क साखळीत आला असल्याचा ठपका ठेऊन त्याला(नियमाप्रमाणे) विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र सध्या नागपूर शहरातील विलगीकरण केंद्रांची ’ख्याती’ही अख्ख्या महाराष्ट्राभर पसरली असल्याने या युवकाने मनपाच्या विलगीकरण केंद्रात राहण्यास नकार दिला. त्याचा स्वत:चा फार मोठा व प्रशस्त बंगला असल्या कारणाने त्याने घरीच विलगीकरणात राहण्याची विनंती तेथील महिला झोनल वैद्यकीय अधिकारी यांना केली.मात्र त्यांनी त्याची मागणी धूडकावून लावली व विमानतळासमोरील एका नामांकित हॉटेलमध्ये विलगीकरणात राहण्याची ’सूचना ’केली. या तरुणाला या विलगीकरणाचा खर्च किती आला? दीड लाख रुपये!
लक्ष् णे नसल्यास विलगीकरणात आला फक्त १० दिवसच ठेवण्याचा शासनाचे निर्देश असताना अनेक मोठे हॉटेल्स व मोठे रुग्णालय हे उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांना तर हॉटेलमध्ये विलगीकरणातील संशयितांना १४ ते २८ दिवसही ठेवित असल्याचे ’वास्तव’समोर आले आहे.विशेष म्हणजे या औषध विक्रेत्याचे दूकान तर बंद करण्यातच आले त्यांच्या बंगल्यासमोर अख्खी ’पोलीस चौकीच’बसवण्यात आली!या मुळे सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला तो वेगळा,व्यवसायाचे नुकसान झाले ते वेगळे आणि पदरातले दीड लाख रुपये गेले ते वेगळे!
या औषध विक्रेत्यांच्या कुटुंबियांनी मनपाच्या या महिला झोनल अधिकारीने त्या प्रशस्त हॉटेलमध्ये विलगीकरणात राहण्यासाठी त्या तरुणाला बाध्य केल्याची तक्रार स्थायी समिती अध्यक्ष् पिंटू झलके यांना देखील केली. त्यांनी ताबडतोब त्या महिला झोनल अधिकारीला फोन लावला. याशिवाय त्या कुटुंबियांना त्वरीत हॉटेल सोडण्याचा सल्ला दिला. मात्र हॉटेलवाल्यांनी आधीच संपूर्ण १४ दिवसांचे पैसे हे आगाऊ भरुन घेतले होते,पैसे परत मिळणार नसल्याच्या अटीवर!
लॉ कॉलेज चौकातील विलगीकरण केंद्र तर इतके घाणेरडे ’ठेवण्यात’आले आहेत की,स्वस्थ व कणखर मनाचा व शरीराचा माणूस ही या खोल्यांमध्ये राहीला तर कोलमडून पडून जाईल. नुकतेच या ठिकाणी विलगीकरणासाठी आणण्यात आलेल्या पाच जनांच्या कुटुंबियांनी देखील लिहून दिले की आम्ही स्वत:च्या जवाबदारीवर विमानतळासमोरील एका नामांकित हॉटेलमध्ये राहण्यास जात आहोत.पुढे त्यांच्या रिपोर्टचं काय झालं? सर्वांच्या चाचण्या या निगेटीव्ह आल्या मात्र लाखांच्या वर पैसे हॉटेल मालकाच्या गल्ल्यात जमा झाले होते!
शंकरनगर येथील एका नामांकित रुग्णालयात तर शहरातील एका धनाढ्य कुटुंबातील ५ जणांना कोणतीही कोविडची चाचणी न करताच मनपा प्रशासनाने भरती होण्यास बाध्य केल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.काय आरोप होता?तर ते करोना बाधिताच्या संपर्क साखळीतील असू शकतात!रिपोर्ट काय आली?या पाचही जणांचा करोना चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह आला,रुग्णालयाचं बिल किती आलं?साढे सात लाख रुपये!मनपाचे प्रशासन सध्या अवघ्या महाराष्ट्रभर गाजलेल्या ’प्रामाणिक’सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कार्यभार करीत आहेत मात्र अश्या घटनांचे वाढलेले प्रस्थ नागपूरकर जनतेच्या विश्वासाला तडा पोहाचवित असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे.
कोविडचे नियम आणि रुग्णालयांबाबत डॉ.गंटावार यांची भूमिका!
धंतोली येथील एका सुप्रसिद्ध रुग्णालयात करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर नियमाप्रमाणे त्या रुग्णालयाला सील करणे,तेथील संपूर्ण स्टाफला कोरोंटाईन करणे,अद्यावत यंत्रे यांचा वापर करण्याची मनाई,संपूर्ण सेनिटायझेशन इ.अनेकविध जाचक अटींमुळे या रुग्णालयाने प्रामाणिक आयुक्त तुकाराम मुंढे यांचे ’खास व अत्यधिक जवळचे सिपाहसलार डॉ.प्रवीण गंटावार’यांच्याशीच ’डील’केली व हे रुग्णालय सील होण्यापासून वाचले!केवळ हेच रुग्णालय नव्हे तर कोविडच्या काळात अश्या अनेक रुग्णालयांकडून डॉ.गंटावार यांनी अशी ’आर्थिक देवाण-घेवाण’केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व बाबींमुळेच आता नागपूरात ही ‘कोविड महामारी म्हणजे किती कमाऊ आणि किती खाऊ’अशी हॉटेल्स,रुग्णालये व मनपा प्रशासनाच्या अनेक अधिका-यांसाठी खाण्याचे कूरण ठरली असल्याचे बोलले जात आहे.एवढेच नव्हे तर आता मध्यमवर्गीय व श्रीमंत वर्गीय यांनाच करोना होत आहे,झोपडपट्टीत तर करोना नियंत्रणात आला असल्याचे मार्मिक व्यंग देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
देशपातळीपासून तर स्थानिक पातळीपर्यंत प्रशासकीयस्तरावर करोनाचे ’गौडबंगाल’आता नागरिकांनाही समजून-उमजून घ्यायचे आहे.प्रत्येक करोना रुग्णामागे दीड लाख रुपये खर्च म्हणून नगरपालिका व महानगरपालिकेला मिळणार असल्याचे केंद्राच्या निर्णयाचे मॅसेज देखील चांगलेच व्हायरल होत आहेत.महानगरपालिका, नगरपालिका,पॅथोलॉजी लॅब व खाजगी रुग्णालये सगळे मिळून करोना रुग्णांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल या प्रयत्नात असल्याचे मॅसेज देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
खरंच केंद्राचा असा निर्णय अाहे का? मनपा प्रशासनाने याची पुष्टि अ्थवा खंडण करणे गरजेचे असून यामुळे नागपूरकर जनतेमध्ये पसरलेला संशय हा दूर होऊ शकेल.करेाना हा आता कोणताही आजार राहीलेला नसून मेडीकल इंडस्ट्रीचा धंदा झाला असल्याचेही बोलले जात आहे. ५ हजाराचे इंजेक्शन ४० हजार रुपयात मिळत आहेत,३ लाख कमाई सहजपणे फक्त करोना झाला असे सांगण्यासाठी मिळत असल्याचे देखील मॅसेज सोशल मिडीयावर टाकल्या जात आहे.
नागपूर शहरात तसेच ग्रामीण भागात सध्या करोनाचा स्फोटच झाला असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.देशातही बाधितांची संख्या ही १५ लाखांवर गेली त्याच बरोबर मृतांचा आकडाही वाढला. जगात संसर्गाच्या आकडेवारीत अमेरिका,ब्राजिल नंतर भारताचा क्रमांक लागला आहे. विशेष म्हणजे १५ लाख ३१ हजारपैकी ९ लाख रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ५ लाखांवर रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.५० असून देशातील मृतांचे प्रमाण हे २.२३ टक्के आहेत,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.
या सर्व पाश्नार्श्वभूमीवर करोना विषयीची आता वेगळी ’जनजागृती’ मनपा प्रशासनाला राबविणे अपरिहार्य असल्याचे बोलले जात आहे. ठाणे आणि मुंबईत करोना बाधिताचे फक्त घर सील केले जात आहे.वेगळी झोपेची खोली असल्यास घरीच विलगीकरण केले जात आहे मात्र नागपूरात प्रशासनाची कोणतीही ’पॉलीसीच’ठरत नसल्याचा संताप अनेक बुद्धिजीवी व्यक्त करतात. बाधित व्यक्ति ७ ते ८ दिवसात घरी परत येतो मात्र त्याची संपूर्ण गल्ली(दोन्ही बाजूंनी)अद्यापही २८ दिवस सील केली जात आहे!
रामदासपेठेत अश्याच एका प्रतिबंधित गल्लीच्या कोप-यात प्लास्टिीकच्या ताडपत्रीखाली एक पंखा व एक पलंग टाकलेल्या ’राहूटीत’डोकावल्यानंतर तेथील कर्तव्यावर असणारा पोलीसकर्मी हा पर्याय नसल्याने मोबाईलवर व्यस्त होता.’सत्ताधीश’ने त्यांना बोलते केले असता,खूपच विचित्र धोरण मुंढे साहेब राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. आधीच पोलीस दलात मनुष्य बल अपुरे त्यात आता संपूर्ण नागपूरातच बाधित आढळत असल्याने १२-१२ तास कामाचा ताण पडत असल्याची वेदना त्यांनी मांडली. ’तुम्हीच सांगा मॅडम रामदासपेठेसारख्या या बंगल्यांसमोर गल्लीत या प्रतिबंधनाची गरज होती का?त्यांनीच उलट प्रश्न विचारला. हे सर्व बंगलेवाले,नियम पाळतात,आपापल्या घरातच राहतात, ज्याला करोना झाला होता तो तर केव्हाचाच घरी परत आला,त्याचे शेजारी हे सुद्धा निगेटीव्ह आलेत तरी देखील आम्हाला मात्र त्यांच्यावर ’नजर’ठेवण्यासाठी उन-पावसात १२-१२ तास अश्या अनेक ठिकाणी ’अडकवून’ठेवण्यात आले आहे!झोपडपट्टी एरिया असता तर समजू शकलो असतो,तेथील लाेकं ऐकत नाही पण,धंतोली,रामदासपेठेतही २८-२८ दिवस गल्लीत बंदोबस्तावर ठेवणे योग्य आहे का….?
मनपा आरोग्य विभागात सावळा गोंधळ….
नुकतेच बाबूलखेडा येथील मनपाच्या दवाखान्यातील एका वरिष्ठ डॉक्टरने राजीनामा दिला,आतापर्यंत जवळपास २२ डॉक्टरांनी मनपाच्या आरोग्य विभागातील नोकरी सोडल्याची धक्काादयक माहिती आहे.या वरिष्ठ डॉक्टर यांना आता घरीच बाधितांचा उपचार करण्याचे फरमान सोडण्यात आले होते. या डॉक्टरने यासाठी पीपीई किटची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.मात्र पीपीई किट ही तुम्ही स्वत: स्वत:साठी अरेंज करा…असा निरोप त्यांना मिळाला!विशेष म्हणजे मनपा हे परमनेंट डॉक्टरर्सची तर काळजी घेत आहेत मात्र कंत्राट पद्धतीवर रुजू झालेल्या डॉक्टर्सना आरोग्य विभागाच्या अधिकारी यांनी वा-यावर सोडून दिल्याचे ही घटना द्योतक आहे.त्या डॉक्टर नोकरीच सोडून निघून गेल्या!
नुकतेच अति.आयुक्त राम जोशी यांनी १०दिवसांच्या वर रुग्णाला लक्ष् णे नसल्यास ठेऊ नका असा आदेश काढला.या आदेशाला एका झोनल महिला अधिकारी यांनीच केराची टोपली दाखवत,मी हा आदेश मानणार नसल्याचे कळविले!या महिला आधिकारीचा रुग्णाला कोणत्याही रुग्णालयात किवा हॉटेलध्ये १० दिवसांऐवजी १४ दिवस ठेवण्यामागे कोणता स्वार्थ दडला आहे?याची कुजबुज मनपा कर्मचारी यांच्यामध्ये चांगलीच रगंली होती….!

आमचे चॅनल subscribe करा