Homeनागपूर न्यूजकरोना विषाणूचा प्रसार रोखणे हे फार मोठे आव्हान महाराष्ट्राच्या जनतेसमोर-अनिल देशमुख

करोना विषाणूचा प्रसार रोखणे हे फार मोठे आव्हान महाराष्ट्राच्या जनतेसमोर-अनिल देशमुख

अतिशय महत्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका

नागपूर: संपूर्ण जगभरात करोना विषाणूने थैमान घातले असता व हजारो लोकं मृत्यूमुखी पडत असताना देशात व महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रसार रोखणे हे फार मोठे आव्हान महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे.त्यामुळे अतिशय महत्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडूच नये असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवार दि.१९ मार्च रोजी पत्र परिषदेत केले.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. याबाबत राज्य शासनाने,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय महत्वाच्या सूचना महाराष्ट्रातील जनतेला केल्या आहेत,त्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन नागरिकांनी केले पाहिजे.लोकांनी गर्दीची ठिकाणे टाळावी,प्रवास टाळावा, दिवसभरातून वारंवार हात स्वच्छ धुवावे, तोंड,नाक व डोळ्यांना स्पर्श करु नये,याबाबत देखील काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.

खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व हॉटेल्स,पानठेले,पब,जिम, रेस्टॉरेंट,बार इ. बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. महाराष्ट्रातील जनता शासनाच्या सर्व सूचनांचे चांगल्या पद्धतीने पालन करीत आहे.सेनिटायझरर्स व मास्कची साठेबाजीवर सरकार पूर्ण लक्ष् ठेऊन आहे.

राज्यात सध्या कारागृहात एकूण ६० हजारच्या जवळपास कैदी आहेत.त्या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात असून नवीन आलेल्या कैद्यांना वेगळे ठेवण्याची सूचना कारागृह निरीक्ष् कांना देण्यात आली अाहे.जे हॉटेल्स किवा रेस्टोरेंट सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला. या विषाणूचा प्रसार रोखण्यात आरोग्य विभागासह,पोलिस विभाग व इतर अनेक विभागांचे सहकार्य घेतले जात असल्याचे ते म्हणाले. लग्न समारंभात देखील लाेकं गर्दी टाळत असून ही अतिशय चांगली बाब असल्याचे ते म्हणाले.नागरिकांचे अजूनही सहकार्य मिळावं अशी अपेक्ष् ा त्यांनी व्यक्त केली.

मुंबईतील लोकल प्रवास हा अतिशय धोकादायक असून लोकलमधील गर्दी टाळावी.अतिशय महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका,असे आवाहन त्यांनी केले. बाहेर देशातून येणा-या नागरिकांची विमानतळावरच संपूर्ण चाचणी होत असून त्यांना आमदार निवासातील आरक्ष्ति जागेत ठेवले जात असल्याचे ते म्हणाले.नागरिकांनी सहकार्य केले तरच एवढ्या भयंकर आव्हानाला तोंड देणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चूकीच्या अफवाह पसरवण्यांवर कायदेशीर कारवाई-
व्हाॅट्स ॲपवर करोनाबाबत काही चूकीच्या अफवाह पसरविण्यात आल्याचे निर्दशनास आले.त्यांच्यावर सायबर सेलमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातून आलेल्या प्रवाश्‍यांची योग्य ती निगा आयसोलेशन वार्डात करण्यात येत आहे. मध्यंतरी चार संशयित रुग्ण हे आयसोलेशन वार्डातून पळून गेले होते,अश्‍याप्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न करणा-यांवर देखील कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.आयसोलेशन वार्डात आरोग्याच्या सर्व सोयी पुरविण्यात आल्याचे ते म्हणाले.

Latest बातम्या