Homeनागपूर न्यूजएकाच पार्थिवाची करोना चाचणी..निगेटीव्हही पॉझिटीव्ह ही!

एकाच पार्थिवाची करोना चाचणी..निगेटीव्हही पॉझिटीव्ह ही!

मेयो रुग्णालयात वांद्रे कुटुंबियांची क्रूर थट्टा: गेटवेलने दिला वेळेवर धोका

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ११ ऑगस्ट:   जाटतरोडी नं २,इंदिरा नगर भागात राहणारे ५४ वर्षीय रमण वांद्रे यांचा ८ ऑगस्ट रोजी सकाळी साढे सात वा.दरम्यान दूर्देवी मृत्यू झाला.दूर्देवी यासाठी की सध्या कोविडच्या काळात कोरानाचा चाचणी अहवाल नसल्यानेच त्यांना धंतोली येथील सुप्रसिद्ध ’गेटवेल’रुग्णालयाच वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि मेयोमध्ये त्यांना घेऊन जातानाच रस्त्यातच त्यांनी मृत्यूला कवटाळले. मेया रुग्णालयात त्यांचे शवविच्छेधन झाले त्याचवेळी त्यांची कोविडची चाचणीही करण्यात आली मात्र आश्‍यर्चजनकरित्या दूपारी २ ते ३ वा.दरम्यान मेयोमधील कोविड रुग्णांचा अहवाल जो प्रसिद्ध झाला त्यात रमण यांचे नाव नव्हते,ते निगेटीव्ह असल्याचे त्यांच्या कुटुंबियांना सागंण्यात आले मात्र अर्ध्या तासातच पुन्हा त्यांची चाचणी ही करोना पॉझिटीव्ह आल्याचे सांगून त्यांचे शव शासकीय नियमाप्रमाणे पाच पदरी प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आले व सायंकाळी ६ वा. मोक्ष् धाममध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एकाच पार्थिवाची पहीली चाचणी ही निगेटीव्ह आल्यानंतर लगेच अर्ध्या तासात त्याच पार्थिवाला करोना पॉझिटीव्ह दाखवल्याने त्याचे कुटुंब सदम्यात आहे. ५४ वर्षीय रमण यांना कोणताही त्रास नव्हता.फक्त थोडा उच्च रक्तदाबाचा त्रास होता त्याचेही ते नियमित औषधे घेत असत. मात्र ७ ऑगस्टच्या रात्री त्यांना श्‍वास घ्यायला त्रास होत असल्याने खासगी लॅबमध्ये त्यांची रक्त तपासणी करण्यात आली त्यात त्यांचे हिमोग्लोबिन हे ३ टक्क्यांपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले. एवढ्या रात्री आता कुठे हिमोग्लोबिनसाठी कुठे उपचारासाठी नेणार म्हणून दुस-या दिवशी खासगी रुग्णालयात त्यांना भरती करण्याचे त्यांच्या कुटुंबियांनी ठरवले.घरीच बिटचे जून वगैरे त्यांना पाजले.

घरी ते नॉर्मलच होते,पायी चालणे, फोनवर बोलणे,मात्र नियतीला काही दूसरेच मंजूर होते. सकाळी ४ वा. रमण यांची प्रकृती जास्त ढासळली. त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी खासगी रुग्णालयांना फोन केलेत मात्र करोनाच्या चाचणीचा अहवाल असल्याशिवाय भरती करणार नसल्याचे त्यांना कळवण्यात आले! शेवटी कुटुंबियांनी त्यांना मेडीकलमध्ये भरती केले.तेव्हा तिथेही सर्व वेंटिलेटर हे कोविड वॉर्डात असल्याचे सांगण्यात आले.मात्र तेथील स्टाफने रमण यांना ऑक्सीजन,आैषधोपचार सुरु केला होता,त्यांना ४ इंजेक्शन लावले, छातीच्या तपासणीनंतर त्यांना न्यूमोनियाचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले.येथे भरती करण्यापेक्ष्ा खासगीत आणखी चांगले उपचार होती,असा सल्ला रमण यांच्या कुटुंबियांना मेडीकलमधील एका मॅडमने दिला.

या कुटुंबियांच्या ओळखीची काकू या खासगी रुग्णालयात परिचारिका असल्यामुळे त्यांनी धंतोलीतील गेटवेलमध्ये फोन करुन तेथे वेंटिलेटर उपलब्ध आहे का?याची विचारणा केली तेव्हा त्यांना ’हो’असे उत्तर मिळाले.रुग्णाला घेऊन या,असे देखील सांगण्यात आले.परिणामी वांद्रे कुटुंबियांनी मेडीकलमधून डिस्चार्ज मागितला त्यांना ऑक्सीजन असणा-या रुग्णवाहिकेतून गेटवेलमध्ये आणले.
गेटवेलमध्ये रुग्णावर उपचारच करण्यात आले नाहीत!

गेटवेलमध्ये रमण वांद्रे यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाही त्यांना भरतीच करण्यास नकार देण्यात आला.आधी कोविडची चाचणी करा,अहवाल आणा मगच भरती करु!अशी धक्कादायक मागणी त्यांनी केली.यावर रमण यांच्या २३ वर्षीय मुलाने अजिंक्य वांद्रे यांनी रिसेप्शनवरच दटावले रुग्णाला मेडीकलमधून हलविण्याच्या पूर्वीच काेविडविषयी का नाही विचारले?आता कमीत कमी ऑक्सीजन तरी लावा बाबांना!मात्र गेटवेलमध्ये रमण यांना ऑक्सीजन मास्क देखील लावण्यात आला नाही, तो ही अजिंक्य याने त्यांच्या औषध दूकानातून विकत घेतला. तुम्ही त्यांना परत मेडीकलला घेऊन जा,असे गेटवेलतर्फे यांना सांगण्यात आले!
रमण यांना यावेळी अत्यधिक त्रास होत होता…ते वारंवार तोंडाला लावलेला मास्क काढून फेकत होते.गेटवेलमध्ये बाबांना चांगले उपचार मिळतील या अाशेने त्याने बाबांना खासगीमध्ये आणले होते मात्र कोविड चाचणीचे कारण देऊन त्यांना परत पाठविण्यात आले. मूळात त्यांच्याकडील सर्व वेंटिलेटर हे फूल होते,असे त्या परिचारिका काकूंकडून वांद्रे कुटुंबियांना नंतर कळले!

मेयोमध्ये जाईपर्यंत प्राणज्योत मावळली….!
मेडीकलमध्ये बाबांना पुन्हा भरती करुन घेणार नाही म्हणून अजिंक्य याने मेयोकडे धाव घेतली मात्र…..मेयोमध्ये जाईपर्यंत रमण यांची प्राणज्योत मावळली….!मेयामध्ये रमण यांचा आधार कार्ड घेण्यात आला.बॉडी पॅक केली. मरर्च्युरीमध्ये नेण्यापूर्वी सकाळी १० ते ११ वा.दरम्यान त्यांची कोविड चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. यानंतर दुपारी २ ते ३ वा.दरम्यान मेयोमध्ये जी कोविड पॉझिटीव्ह यांची पहिली रिपोर्ट प्रसिद्ध झाली त्यात बाबांचे नाव नव्हते. दुस-या चाचणीमध्ये मात्र त्यांना कोविड पॉझिटीव्ह असल्याचे दाखवण्यात आले!या दोन्ही चाचण्या तीन तासांच्या अंतराने घेण्यात आल्याचे तेथील प्रशासन सांगत असल्याचे अजिंक्य यांनी खास ’सत्ताधीश’ला सांगितले.
शवागारगृहात एकवेळा बॉडी पॅक करण्यापूर्वी रमण यांचा चेहरा अजिंक्य यांना ओळख पटण्यासाठी दाखविण्यात आला.यानंतर मोक्ष् धाममध्येही कुटुंबियांच्या आग्रहानंतर त्यांचा चेहरा दाखविण्यात आला मात्र मनपा कर्मचा-यांनी यासाठी वांद्रे कुटुंबियांकडून चक्क पैसे घेतले….!

अजिंक्य यांनी अधिकचे पैसे देऊ केले व वडीलांची किट उघडून त्यांच्या शरिरातील कोणते ऑर्गनतर काढण्यात आले नाही ना…याची शहनिशा केली…!त्याची मोबाईलवर रेकॉडिंग केली.मनपाच्या त्या कर्मचा-यांनी पुन्हा बॉडी पॅक करुन गट्टंवर जाळली…!कुटुंबियांना ती डिझेल वाहिनीवर नव्हती जाळायची कारण त्यांना आपल्या माणसाच्या शेवटच्या अस्थि हव्या होत्या…!
करोनाच्या तथाकथित कहरने आणि माणूसकीशून्य झालेल्या वैद्यकीय व प्रशासनाच्या व्यवस्थेने आधीच एक चालते-बोलते सद् गृहस्थ त्यांच्यापासून कायमचे हिरावले होते अाता निदान त्यांच्या अस्थि तरी कुटुंबियांना हव्या होत्या…!
बाबांची चाचणीच्या निकष काय?अजिंक्यचा सवाल

बाबांची करोना चाचणी केली म्हणजे मेयोच्या प्रशासनाने नेमके काय केले?त्यांची रक्त तपासणी केली?स्वॅब तपासणी केली?घश्‍यातले नमूने घेतले की नाकातले नमुने घेतले?ते कसे तपासण्यात आले? पहीला अहवाल निगेटीव्ह आला असताना अर्ध्या तासात दूसरा अहवाल पॉझिटीव्ह आला याचा काय अर्थ होतो?पहीला अहवाल हा घश्‍यातला चाचणीचा होता का? दूसरा अहवाल हा नाकातल्या स्त्रावाच्या चाचणीचा होता का?असे अनेक सवाल वांद्रे कुटुंबियांना छळतात आहेत..याचे उत्तर देणे ही मनपा प्रशासन, मेयो प्रशासनाची जवाबदारी नाही का?
गेटवेलवर कारवाईसाठी आयएमएला निवेदन-
गेटवेल सारख्या खाजगी रुग्णालयामुळे बाबांना शेवटच्या तीन तासात जो भयंकर त्रास झाला त्याची भरपाई कुटुंबियांना आता हवी आहे. गेटवेलच्या विरोधात त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.यासाठी अजिंक्य याने आयएमएचे अध्यक्ष् डॉ.झुनझुनवाला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना आयएमएच्या कार्यालयात लिखितमध्ये तक्रार देण्याची सूचना डॉ.झूनझूनवाला यांनी केली.

तर दुसरीकडे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना अजिंक्य याने फोन केला असता तो त्यांनी कापला. आयुक्तांना अजिंक्य याने व्हॉट्स ॲपवर माहिती पाठवून कॉल करण्याची विनंती देखील केली .मात्र उत्तर मिळाले नाही. आयुक्तांचा एकंदरित स्वभाव बघता,एका मृतकाच्या कुटुंबियांप्रति मुंढे सारखे सनदी अधिकारी किती संवेदनशीलतेने वागतील हे सांगता येणार नाही. या कुटंबियाला गेटवेलच्या विरोधात आयुक्तांनी कठोर कारवाई करावी एवढीच त्यांची मागणी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे प्रत्येक करोना मृतकांसाठी दीड लाख रुपये दिले जात असल्याने माझ्या बाबांना निगेटीव्ह असताना करोना पॉझिटीव्ह घोषित करण्यात आले का?असा या तरुणाचा आर्त सवाल मनपा तसेच मेयोच्या वैद्यकीय प्रशासनाशी आहे.
रमण वांद्रे यांच्या अहवालात अजिंक्य यांचा मोबाईल क्रमांक नमूद आहे. या कुटंबियांना न्यायाची अपेक्ष्ा आहे.

अजिंक्यचा डीपीवर त्याच्या लाडक्या बाबांचा फोटो असून…’मिस यू बाबा’हे स्टेटस वाचून काळजाला पीळ पडते….!

Latest बातम्या