Homeनागपूर मनपाआता धंतोलीत येणार का करोना? भाजी बाजारात तूफान गर्दी!धंतोलीकरांचा तीव्र संताप

आता धंतोलीत येणार का करोना? भाजी बाजारात तूफान गर्दी!धंतोलीकरांचा तीव्र संताप

सामाजिक अंतराचा टोटल फज़्जा

नागपूर, २५ एप्रिल: काेरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत शहरातील मोठे बाजारही बंद करण्यात आले आहे. या बाजारातील विक्रेत्यांना महापालिकेतर्फे व्यवसायाकरीता जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र या जागांवरही फळे व भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मनपाने निर्धारीत केलेल्या शहरातील विविध भागांपैकी एक यशंवत स्टेडीयम समोरील रिकामी जागा ही आहे.मात्र दररोज सकाळी येथे ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागत असून,तूफान गर्दी उसळते.यामुळे धंतोलीकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून मनपा आयुक्त यांना ‘करोना’विषाणूची लागण ही धंतोलीत देखील झाली पाहिजे,असे वाटत आहे का?असा संतप्त सवाल येथील अमर पॅलेसमधील रहीवाश्‍यांनी केला आहे.

अगदी मेहाडीया चौकापर्यंत दररोज सकाळी येथे ट्रक्सच्या लांबच लांब रांगा असतात,तिच स्थिती स्टेडीयममधील भगवती मंदिरापर्यंतची असते. अगदी सीताबर्डीतील मेट्रो स्टेशनपर्यंत ही गर्दी सहज नजरेत भरते. विशेष म्हणजे या गर्दीत कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर हे पाळले जात नाही.केवळ चेह-यावर कापडांचे मास्क लावणे म्हणजे ‘करोना’सारख्या संसर्गजन्य रोगापासून बचावाचा उपाय नसल्याचे येथील नागरिक सांगतात.

शहरात आतापर्यंत पूर्व नागपूरात सतरंजीपुरा,बैरागीपुरा, शांतीनगर,दलालपुरा भागात एकूण ५६ संसर्गितांची नोंद झाली आहे. मध्य नागपूरात मोमिनपुरा,टिमकी व गांधीसागर परिसरातील हाऊसिंग सोसायटीमध्ये २०,दक्ष्णि-पश्‍चिममधील खामला, बजाजनगर, अभ्यंकर नगर व स्वावलंबी नगर येथे १०,उत्तर नागपूरातील जरीपटका व राजीवगांधी नगरमध्ये ७,पश्‍चिम नागपूरातील गिट्टी खदानमध्ये १ करोना बाधितांची नोंद झाली आहे. मात्र अद्याप दक्ष्णि नागपूर या संसर्गापासून अलिप्त राहीले असताना यशवंत स्टेडीयम समोर भरणारा भाजी बाजार येथील स्थानिकांसाठी चांगलीच डोकदूखी ठरला आहे.

मनपा आयुक्तांना शहरातील हा भाग देखील संसर्गित व्हावा असे वाटत आहे का? नसल्यास येथील भाजी बाजार हा त्वरीत इतरत्र हलवावे अशी विनंती येथील रहीवाश्‍यांनी केली आहे. याबाबत धंतोली पोलीस ठाण्यात देखील येथील रहीवाशी गेले असता,या ठिकाणी भाजी बाजार भरवण्याचा आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच दिला असल्याचे सांगून पोलीस देखील आपले हात झटकून घेत आहेत.या ठिकाणी पोलीसांसमोरच कोणतेही सामाजिक अंतर न पाळता तूफान गर्दी उसळते. येथील बाजार हा ताबडतोब उठवावा व इतरत्र विभागून द्यावा,असे निवेदन आता येथील रहीवाशी महापौर संदीप जोशी तसेच आयुक्त तुकराम मुंढे यांना देणार असल्याचे सांगितले जाते.

नव्याने झालेत भाजी विक्रेते!
या ठिकाणी फक्त ग्राहकांची गर्दी नसते तर उद्योग्,व्यवासय बंद झाल्याने अनेकानंी नव्याने भाजीचा व्यवसाय सुरु केला आहे त्यामुळे फूटकळ भाजी विक्रेत्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी उमडते. काेरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे अत्यावश्‍यक असताना भाजी बाजाराच्या नावाखालीच जणू संपूर्ण शहर एकाच ठिकाणी गर्दी करीत असतो. प्रशासनाने औषधे व भाजी,दूध विक्रीला बंदी घातली नसल्यामुळे यातील सर्वात सोपा व्यवसाय भाजी विक्रीच असल्यामुळे गल्लोगल्ली धोबीचं काम करणारे,मंदिरा समोर फूले विकणारे,पाणी पुरी,चायनीजचे ठेलेवाले असे अनेक फूटकळ व्यवसायी यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केल्यामुळे भाजी विकत घेण्यासाठी माननीय आयुक्तांनी शहरात नेमून दिलेल्या भाजी बाजारांमध्ये एवढी गर्दी होत असल्याचे ठोक भाजी विक्रेत्याने सांगितले.

प्रशासन नागरिकांच्या सोयीसाठी निर्णय तर घेते मात्र त्यांच्या अंमजबजावणीत पराकोटीच्या त्रुटी असल्यामुळे नागरिकांना ‘करोना’च्या दहशतीत दिवस कंठावे लागत आहे.प्रशासनाने यशवंत स्टेडीयम समोरील भाजी बाजार त्वरीत हटवावा,अथवा येथील प्रचंड गर्दीला आवर घालून येथील नागरिकांचे आरोग्य जपावे,अशी मागणी केली जात आहे.धंतोलीत एक ही करोना बाधित झाल्यास याची संपूर्ण जवाबदारी ही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ढिसाळ कारभारावर राहील अशी संतत्प भावना एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली.

कळमना भाजीबाजार अटींसह सुरु-
कळमना येथील भाजीबाजार आज शनिवार दि.२५ एप्रिल पासून रात्री १ ते सकाळी ७ पर्यंत फक्त ५० आडतियांसाठी सुरु करण्यात आले आहे. सुरक्ष्ति अंतर जपण्यासाठी कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील तीन जागांवर भाजीबाजार राहील. त्यापैकी २० आडतिया भाजीबाजारात,२० नवीन धान्य बाजारात आणि उर्वरित प्रस्तावित नवीन भाजीबाजारात व्यापार करतील. प्रत्येक आडतियाला ५ हमाल ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.तसेच सर्वांना ओळखपत्र देण्यात आले आहे. कोणतेही वाहन ३० मिनिटांपेक्ष्ा अधिक काळ उभे राहू शकणार नाही.दूचाक्यांना बाजाराज प्रवेश नसून त्यांच्यासाठी बाहेर वेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

Latest बातम्या