Homeनागपूर न्यूज...आणि त्या वासराने अखेर श्‍वास सोडला!

…आणि त्या वासराने अखेर श्‍वास सोडला!

‘सेव्ह स्पीचलेसची’ धाव ठरली निरुपयोगी

नागपूर,ता.२४ मे: गड्डीगोदामच्या रेल्वे पुला जवळ एक वासरु नागपूरच्या रणरणत्या आणि भाजून काढणा-या उन्हात गेल्या अनेक तासांपासून निपचित पडल्याचा फोटो एका व्हाॅटस ॲप ग्रूपवर आला आणि तातडीने शहरातील सुप्रसिद्ध प्राणीमित्र व ‘सेव्ह स्पीचलेस’च्या संचालिका स्मिता मिरे यांना तो फॉरवर्ड केला.फोटो मिळताच स्मिता यांनी महानगरपालिकेच्या अारोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महल्ले यांना फोन करुन वासरासाठी एंबुलेस पाठविण्याची विनंती केली. डॉ.मोहल्ले यांनी तातडीने त्या वासरासाठी एंबुलेस व कर्मचारी पाठवले मात्र….तो पर्यंत त्या वासराने दम सोडला होता!

हे कर्मचारी पोहोचले तेव्हा थोडासा श्‍वास या वासराचा सुरु होता मात्र…!वासराने श्‍वास सोडताच कर्मचारी निघून आले. येथे स्मिता हिने गोरक्ष् णला फोन करुन वासरु आणत असल्याचे कळवले.पशुवैद्यकीय डॉक्टरही तयार होते मात्र..त्या वासरालाच जणू हे निर्दयी जग सोडून जाण्याची घाई झाली असावी. माहीती नाही ते वासरु त्या घाणीत..त्या भाजून काढणा-या उन्हात कितीवेळचा पडला असावा…असंख्य माणसे त्या रस्त्यावरुन आली-गेली असावी…मात्र कोणालाही उसंत नव्हती..नाही काही तर महापालिकेला फक्त एक फोन करुन कळवळ असतं तर…! या भागातील नगरसेवकांची देखील ही जवाबदारी होती.

मालकांचीच निर्दयता-
पाळीव प्राण्याचे मालक ही माणसे नसून कसाईच असतात अशी वेदना स्मिता व्यक्त करते.त्यांना फक्त दूध देणा-या गाईची काळजी असते.एवढेच नव्हे तर आपल्या गाईंना चरण्यासाठी ते बाहेर सोडून देतात. त्यांना पोटभर कडबा खाऊ घालणं हे देखील ते आपले कर्तव्य समजत नाही. दिवसभर त्या गाई भटकंती करतात,जे मिळेल त्याने आपले पोट भरतात..सायंकाळी परत आल्यावर मालकाला फक्त त्यांच्या दूधाशी घेणं-देणं असतं!

कूत्रा असता तर मी माझ्या स्वत:च्या गाडीने धाव घेतली असती मात्र माझ्या शेल्टर होममध्ये फक्त श्‍वानांना ठेवण्याची परवानगी आहे.गाय हा विषय गोरक्ष् ण अंतर्गत येतो.आजच माझ्या शेल्टर होममध्ये २ नवे जखमी श्‍वान आलेत. आता स्मिताच्या हजारी पहाड येथील शेल्टर होममध्ये ११८ श्‍वान हे उपचार घेत आहेत. एकाचे तर समोरचे दोन्ही पाय तुटले आहेत. गाडीने ठोस मारली असती तर मागचे पाय तुटले असते. समोरुन धडक दिली असती तर या श्‍वानाचे तोंड ही फूटले असते,मात्र फक्त या श्‍वानाचे दोन्ही पायांचे हाडे मोडली आहे,याचा अर्थ याच्या मालकाने त्याचे पाय तोडून त्याला घराबाहेर काढले असल्याची शक्यता स्मिता व्यक्त करते.

मालकांवर गुन्हा नोंदवण्यासाठी भारतात खूप कठोर कायद्यांची गरज आहे.जे काही कायदे आहेत त्यात ३००,५०० रु.दंड,तीन महिन्यांची शिक्ष्ा अश्‍या शिक्ष्ेची तरतूद आहे.आपल्या पाळीव प्राण्यांना त्रास देणे,मारहाण करणे, त्यांना सोडून देणे अश्‍या गुन्ह्यांसाठी ५ हजार दंड व किमान ७ वर्षांची शिक्ष्ा हवी आणि विशेष म्हणजे भारतातील हजारो मालकांना अशी शिक्ष्ा झाल्यास तेव्हाच कायद्याचा धाक बसेल,असे स्मिता सांगते.

या वासराला ज्या मालकाने पाण्यावाचून डी-हायड्रेशन होऊन मरणासाठी सोडले,त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी पशुप्रमी स्मिता मिरे ही करते.

मनपाची अक्ष् म्य हलगर्जी…भटक्या कूत्र्यांनी नोचले वासराचे मास!
मनपाचे जे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले त्यांना फक्त जखमी प्राणी उचलून पशुवैद्यकीय रुग्णालयात किवा गोरक्ष् ण येथे पोहोचविण्याची जवाबदारी असते.मृत प्राण्यांची विल्हेवाट लावणे हे त्यांच्या कर्तव्याचा भाग नसतो. वास्तविक बघता वासरासाठी तातडीने मनपाच्या ज्या कर्मचा-यांनी गड्डीगोदाम येथे धाव घेतली त्यांनीच फोन करुन मृत प्राण्यांची विल्हेवाट लावणारे कर्मचारी यांना बोलावून घ्यायला हवे होते. त्यांनी योग्यरितीने मृत वासराला खड्डा खोदून त्यात पुरले असते तर…!
गझलकार सुरेश भट सांगून गेले..जगण्याने छळले होते..मरणाने सूटका केली..’या वासराला तर ते ही भाग्य लाभले नाही. भर उन्हात पाण्यासाठी तडफडून मेल्यानंतरही भटक्या कूत्र्यांनी आणि डूकरांनी त्याचे मास नोचून खालले…!आणि माणूस नावाचा प्राणि फक्त हे दृष्य टिपत राहीला…!

शहरात मृत प्राण्यांसाठी डंपिंग यार्डच नाही-
या शहराचा कचरा साठवण्यासाठी कित्येक चौ.मी.जागा उपलब्ध करुन दिली जाते. माणसाला पुरण्यासाठी,जाळण्यासाठी श्‍मशान घाट,कब्रिस्तान आहेत मात्र,या शहराचाच एक घटक असणारे प्राणि, मृत पावल्यावर त्यांच्यासाठी कोणत्याही पशु महाविद्यालयात ‘शवागार’नाहीत किंवा त्यांना पुरण्यासाठी डंपिंग यार्डच नाही.

अनेक मालक हे गाय मृत पावल्यावर कातडी सोलायला कसायांकडे देऊन टाकतात,पुढे त्यांच्या चामड्यांच्या चपला किवा इतर वस्तू घडवल्या जातात. मात्र भारतीय संस्कारातील सोळा संस्कारांपैकी एक शेवटचा संस्कार हा अंतिम संस्कार असल्याकारणाने,मृत प्राण्यांवरही तो झालाच पाहीजे,त्यासाठी शहरातील प्राण्यांना पुरण्यासाठी देखील मनपा आयुक्तांनी डंपिंग यार्डाची व्यवस्था करण्याची मागणी सेव्ह स्पीचलेसच्या संचालिका स्मिता मिरे यांनी केली.

Latest बातम्या