Homeनागपूर न्यूजकिस्सा!जोशी-सोलेंच्या मंचावरील खुर्चीचा

किस्सा!जोशी-सोलेंच्या मंचावरील खुर्चीचा

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २९ नोव्हेंबर: हा किस्सा आहे कविवर्य सुरेश भट सभागृहातील मंचावरील खूर्चीचा.प्रसंग आहे भारतीय जनता पक्ष्ाचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्याचा.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचे आगमन व्हायचेचे होते. महापौर संदीप जोशी यांचे आगमन झाले आणि ते उजव्या बाजूची एक खूर्ची सोडून दुस-या खूर्चीवर आसनस्थ झाले.अवघ्या काही सेकंदात पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे माजी उमेदवार व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांचे मंचावर आगमन होताच संदीप जोशी हे आपल्या खूर्चीवरुन उठले  व त्यांना आपली खूर्ची देऊ केली!

मात्र सोले यांनी त्या खूर्चीवर तुम्हीच बसा असा इशारा केला व त्याच बाजूच्या शेवटच्या एकमेव रिकाम्या खूर्चीकडे जाण्यास ईच्छा दर्शवली मात्र संदीप जोशी यांनी अत्यंत आग्रहाने सोले यांना तुम्ही माझ्याच खूर्चीवर,माझ्या आधीच बसा,मी त्या शेवटच्या खूर्चीवर बसतो अशी आग्रहाची विनंती केली व सोले यांच्या प्रतिक्रियेची वाट न बघता शेवटच्या खूर्चीवर बसले.अखेर सोले यांना जोशी यांनी अत्यंत आदराने रिकामी करुन दिलेल्या खूर्चीवर आसनस्थ व्हावेच लागले.

सभागृहातील अनेक प्रेक्ष् कांच्या चाणाक्ष् नजरेतून या दोन्ही प्रतिस्पर्धींचा एकमेकांसाठी खूर्चीच्या ‘त्यागाचा’हा खेळ सुटला नाही.जोशी यांनी अखेर स्वत: साठी असलेली खूर्ची सोले यांच्यासाठी खाली करुन दिली मात्र पदवीधर मतदार संघाच्या खूर्चीबाबतही हाच त्याग त्यांनी एकमेकांविषयी दाखवला असता तर…मंचावरील चित्रही काहीसे वेगळे राहीले असते,अशी कुजबुज सभागृहात ऐकू आली.

खरा किस्सा त्या पुढेही घडला.सूत्र संचालकाने प्रा.अनिल सोले यांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली.सोले यांनी त्यांनी गेल्या ६ वर्षांत पदवीधरांसाठी काय-काय केले याचा पाढाच वाचायला सुरवात केली. ‘मी या मतदार संघाचा प्रतिनिधी असताना भंडारा,गाेंदिया,गडचिरोली आदी विदर्भाच्या सहाच्या सहा जिल्ह्यात किमान ५०-५० ते १००-१०० वेळा जाऊन आलो,कधी बेरोजगारांच्या प्रश्‍नासाठी कधी स्पर्धा परिक्ष्ेच्या मार्गदर्शनासाठी,कधी वृक्ष् दिंडीच्या उपक्रमासाठी इ.भारतीय जनता पक्ष्ाने जी-जी जवाबदारी माझ्यावर टाकली ती-ती अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला.

एवढेच नव्हे तर या सर्व जिल्यांमधील ग्राम पंचायतीची निवडणूक असो किवा जि.परिषदांची,विद्यापीठांची निवडणूक असो किवा नगरपालिकांची मी प्रत्येक वेळी मुक्कामी राहण्याचा प्रयत्न केला.शिक्षकांच्या समस्या,दिव्यांगाच्या समस्या या केवळ मी सभागृहा बाहेरच नाही मांडल्या तर सभागृहात शेकडो लक्ष् वेधी आणि औचित्याचे मुद्दे मांडले.मी माझ्या मुद्दांवर सभागृह देखील बंद पाडण्यास बाध्य केले.जीएसटी बिल जे विधान सभेत मंजूर झाले ते विधान परिषदेत मंजूरीसाठी माझ्यावर जवाबदारी देण्यात आली ती देखील मी समर्थपणे निभावली.

मी एकमेव असा आमदार आहे जे एकात्म मानवतावादाची संकल्पना ज्यांनी जगाला दिली त्या पं.दिनदयाल उपाध्याय यांच्याविषयी सभागृहात भरभरुन बोललो. एका बोर्डाच्या सचिवपासून कोणकोणते पद त्यांनी भूषवले…याची जंत्रीच त्यांनी प्रेक्ष् कांना सांगितली. प्रभारी म्हणून अगदी कल्याण-डोंबवलीसारख्या भागात ही दुष्काळग्रस्त भागांच्या दौ-यानिमित्त गेलो.भाजपचे कार्य मजबूत करण्याचे मी कार्य केले.

१९९२ साली मी महानगरपालिकेत नगरसेवक झालो त्यानंतर महापौर पदापर्यंतची कारर्कीदीची माहती त्यांनी सभागृहात दिली.महापौर पदी असताना मी मनपाचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असे त्यांनी सांगितले.२०१४ मध्ये अचानक मला उमेदवारी जाहीर झाली.जो मतदार संघ गंगाधरराव फडणवीस व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यासारख्या मातब्बरांनी गाजवला,तया मतदार संघात माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला संधी मिळाली.

सुधीर मुनगंटीवर,चंद्रशेखर बावणकुळे यांचेही माझ्यावर अतोनात प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले.माझ्या आमदारकीच्या काळात वृक्ष् दिंडी व फॉरच्यून फाऊंडेशनसारखे उपक्रमांत स्वत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्वाजून उपस्थिती दर्शवायचे,अशी पुस्तीही त्यांनी जोडली.पक्ष्ाने दिलेली संधी मी माझ्या क्ष् मतेनुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

एका महाविद्यालयात प्राध्यापक असणारा कार्यकर्ता ज्याच्या घरात किवा जीवनात कोणतेही राजकारण नव्हते,महाविद्यालयात युवा मोर्च्याचे काम करताना गडकरी यांच्या संपर्कात आलो आणि पक्ष्ाने माझ्यावर फार मोठी जवाबदारी टाकली.२०१४ साली माझ्यावर विश्‍वास टाकला त्या विश्‍वासाला मी गेल्या सहा वर्षात कुठेही तडा पोहोचू दिला नाही किवा तसे कोणतेही काम माझ्याकडून झाले नसल्याचे सोले यांनी ठासून सभागृहात सांगितले.

चिठ्ठीचे गौडबंगाल……
एवढ्यात एक चिठ्ठी त्यांच्या पोडियमवर येऊन पाेहोचली आणि… सोले यांनी संदीप जोशी यांच्यासारख्या कल्पक आणि उद्यमशील उमेदवाराला मोठ्या मतांनी जिंकून द्या,असे आवाहन केले…या परफेक्ट टाईमिंगवर देखील सभागृहात चांगलीच चर्चा रंगली.

अखेर सोशल मिडीयावर सोले यांच्या नावाने जी फेक न्यूज व्हायरल झाली त्याबाबत त्यांनी बजाज नगर पोलीस ठाण्यात व सायबर क्राईम विभागात रितसर तक्रार केल्याची माहिती सभागृहातील प्रेक्ष् कांना दिली.

मात्र अखेर पर्यंत त्यांच्या चेह-यावरील औदासिन्य हे चाणाक्ष् प्रेक्ष् कांच्याही नजरेतून सुटले नाही.संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ काहीच न बोलता सहा वर्षात ते आमदार असताना काय-काय केले,यावरच त्यांच्या भाषणाचा भर राहील्याने नेमके त्यांना त्यांच्या व्यथाही नीटपणे पक्ष्ाच्याच मंचावर मांडता आल्या नाहीत,अशीच चर्चा नंतर रंगली.

Latest बातम्या