Homeनागपूर न्यूजजातीवादी प्रचाराला उत्तर म्हणजे फक्त विकासाला मत: गडकरी यांचे मतदार व कार्यकर्त्यांना...

जातीवादी प्रचाराला उत्तर म्हणजे फक्त विकासाला मत: गडकरी यांचे मतदार व कार्यकर्त्यांना आवाहन

पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्यात संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ केले मार्गदर्शन

नागपूर,ता. २९ नोव्हेंबर: पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही इतर निवडणूकीपेक्षा फार वेगळी आहे,येथे विदर्भाचा विकास करणारेच जनप्रतिनिधी विदर्भातून निवडून जाने महत्वाचे आहे,भारतीय जनता पक्षाने कधीही जात-पात,धर्माच्या आधारवर निवडणूक लढवली नाही,नागपूर विभागात मात्र आघाडीच्या मंत्र्यांनी ही निवडणूक पूर्णपणे जात-पातची करुन टाकली आहे,कार्यकर्त्यांनी व मतदारांनी जातीवादी प्रचाराला बळी न पडता फक्त विदर्भाच्या विकासाचा विचार करुन विकासालाच मत द्यावे म्हणजे भाजपच्या उमेदवाराला मत द्यावे,असे आवाहन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ते आज रविवार,दि. २९ नोव्हेंबर रोजी भट सभागृहात भाजप पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्यात बोलत होते.याप्रसंगी मंचावर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस,माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे,भाजपचे अनेक खासदार व आमदार उपस्थित होते.पुढे बोलताना गडकरी म्हणाले,की ही निवडणूक पदवीधर संघाची असली तरी आमदार म्हणून कसे काम करावे,याचा उत्तम अनुभव मी घेतला.संदीप जोशी यांचे वडील दिवाकर जोशी हे शिक्ष् क संघातून आमदार म्हणून निवडून आले तर अमरावती विभागातून सातत्याने अपक्ष् उमेदवार बी.टी.देशमुख तसेच मी आम्ही तिघेही विधान परिषदेत विदर्भावर सातत्याने होणा-या अन्यायाच्या विरोधात सरकारवर तुटून पडायचो.आमच्या या आक्रमक भूमिकेमुळेच तत्कालीन सरकारला त्यांची ईच्छा नसताना विदर्भ वैद्यानिक मंडळाची स्थापना करावी लागली,एवढेच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना फक्त विदर्भाच्या प्रश्‍नावर पुन्हा अधिवेशन घ्यावे लागले, विधान परिषद या वरच्या सभागृहात तर सरकारमधील सिंचन मंत्री हे आमच्या प्रश्‍नांच्या मा-यासमोर येण्यास देखील घाबरायचे,अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.

आज परिस्थिती ही आहे की चौरस पट्ट्यातील पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे.यावर योजनाही तयार झाली मात्र विद्यमान सरकारला या योजनेत काडीचारी रस नाही.विदर्भचा आमदार म्हणून मी विदर्भातील एकेका सिंचन प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला.विधान सभेतील आमदार हे काम करीत नाहीत असे माझे म्हणने नाही मात्र विदर्भातील पदवीधर आणि शिक्ष् क मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदाराला विदर्भाचे प्रश्‍न,विदर्भाच्या समस्या या महत्वाच्या वाटतात.आमची सरकार होती तेव्हा मिहानमध्ये अनेक उद्योजक आले मात्र आमचे सरकार जाताच व पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होताच मिहानमधील उद्योजकांनी काढता पाय घातला व मिहानमध्ये फक्त ओसाड जमीनी उरल्या.

आमची सरकार आल्याबरोबर पुन्हा मिहानमध्ये आम्ही उद्योजक आणले.नुकतेच टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक भेटून गेले त्यांनी त्यांच्या कपंनीत विदर्भातील साढे सात हजार नोक-या दिल्या असल्याचे सांगितले तर येत्या काही महिन्यात आणखी ८ हजार अभियंतांना नोकरीची संधी असल्याचे सांगितले.दिसॉल्ट कंपनीमुळे देखील विदर्भातील तरुणांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. आतापर्यंत मिहानमध्ये ३७ हजार ६२० नोक-या तरुणांना मिळाल्या असल्याचे ते म्हणाले.दिल्लीतील मदर डेअरी नागपूरात आणल्याने २६ हजार ६२० तर मेट्रोमुळे १० हजार ३० तरुणांना काम मिळाले.विदर्भाचा विकास करणारे जनप्रतिनिधीच जर तुम्ही निवडून दिले नाहीत तर विदर्भाचा विकास कसा होणार?असा सवाल त्यांनी उपस्थित केला

माणूस हा जन्माने नाही तर गुणांनी मोठा होत असतो. विरोधकांनी संदीप जोशी यांची जात काढून तेल काढू नये,असा टोला त्यांनी हाणला.भाजप हा आपल्या कार्यकर्त्यांलाच आपले कुटुंबिय मानणारा पक्ष् आहे.भाजपचा कार्यकर्ता हा जात-पात-धर्मापलीकडे तन-मन-धन पक्षासाठी काम करतो.हीच भाजपची विशेषता आहे,कार्यपद्धती आहे. आतापर्यंत माझ्या सामाजिक उपक्रमात १२ हजार रुग्णांची ह्दय शस्त्रक्रिया झाली मात्र ती करताना आम्ही ‘जात‘नाही विचारली,१५० दिव्यांगाना कृत्रिम पाय लावण्यात आले,अंथरुणावर खिळलेले ते रुग्ण बुलेट चालवत मला भेटायला आले,६ हजार दिव्यांगाना साहित्य वाटले, नुकतेच रेल्वेने शेतकक-यांकडून संत्रा विदेशात पाठवला,शेतक-यांनी डॉलरने पैसे कमावले,ही समाजसेवा करताना आम्ही कोणत्या ‘जातीच्या’ दिव्यांगाना मदत मिळतेय,हे नाही विचारले!आम्हाला ‘जातीचे राजकारण करायचे नाही,केलेही नाही‘,असे विधान त्यांनी केले.

जात फक्त नेत्यांनाच!
आज गडकरी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत संदीप जोशी यांच्या जातीचा दाखला घेत आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष् ज्या पद्धतीने एकवटले व तेली,कुणबी,माळी,ओबीसी इ.च्या नावावर प्रचार करुन मत मागत आहे त्यावर तीव्र नापसंदी दर्शवली. जात ही फक्त नेत्यांनाच असते,कार्यकर्त्यांना किवा मतदारांच्या मनता ‘जात‘नाही,असा टोला त्यांनी हाणला.आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जातीमध्येच विभाजून घेतले. शिवाजी महाराजांवर एकाच जातीचे वर्चस्व निर्माण केले,टिळक,आगरकर,सावरकर यांनाही विशिष्ट जातीचे  असल्याने टिकेचे धनी बनवले.आता देखील ‘जातीयवादी’प्रचारातूनच त्यांना ही निवडणूक जिंकायची आहे.

एकीकडे भाजप असा पक्ष् आहे की जेथे जात-पात पलीकडे महीला,पुरुष यांच्यासाेबतच तृतीयपंथीयांना देखील सामावून घेतले. करोनाच्या काळात भाजपमधील तृतीयपंथीयांच्या संघटनेने जे मदत कार्य केले ते कौतुकास्पद आहे.हाच पक्षाचा आदर्श आहे,असे ते म्हणाले.करोनाच्या काळात आम्ही दीड कोटींचे अन्नधान्य वाटप केले,दटके यांना कामाला लावले,त्यांना सांगितले गरिब,गरजूंना तेल,तिखट,मीठ,कडधान्य,साखर काय लागतं ते सांगा,दीड कोटींची मदत करुन देखील आम्ही कुठे पोस्टर नाही लावले,जाहीरात छापून नाही आणली किवा फोटो नाही झळकवले.हे सर्व साहित्य आम्ही फूकट दिलं,व ती देताना आम्ही व आमच्या पक्षाने ‘जात’नाही पाहीली!

डॉ.महात्मे यांनी मेयो-मेडीकलमधील डॉक्टर्स व स्टाफकडे पीपीई किटच नसल्याची अडचण मला सांगताच आम्ही एका खासगी कारखान्यातून १५ हजार पीपीई किट बनवून घेतले व नागपूरच नव्हे तर वर्धा,यवतमाळ,चंद्रपूर इ.शहरातील वैद्यकीय रुग्णालयात फूकट वाटले,हे वाटप करताना ती कोणत्या जातीचा माणूस परिधान करतोय,हे नाही बघितले.आम्ही निरपेक्ष्, निस्वार्थ भावनेने काम केले.आम्ही मानवतेचे व विकासाचे राजकाणार करतो,जातीवादाची नाही,हीच मानवसेवा व विकास आमच्या पक्ष्ाची पुंजी असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या पक्ष्ाचा जो विचार आहे तोच विचार आम्ही जनतेला देतो,देत राहू,म्हणूनच आपल्या कार्यकर्त्यांनी प्रखरपणे विरोधकांच्या जाती-पातीच्या राजकारणाला उत्तर देण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.मोमिनपु-यातून भाजपला फक्त २००-४०० मते मिळाली तरी देखील मोमिनपु-यात पक्ष्ातर्फे चार हजार धान्याच्या किट वाटण्यात आल्या.आम्ही कधी सत्तेचं राजकारण नाही केलं.आघाडीच्या मंत्र्यांना, जातीच्या नावावर राजकारण करणा-यांना, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता या निवडणूकीत चोखपणे उत्तर देईल,असा विश्‍वास गडकरी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

संदीप जोशी यांनी पं.दिनदयाल थालीचा उपक्रम सुरु केला,आरोग्य शिविरे घेतली,हा लाभ कोणत्या जातीच्या लोकांच्या पोटात गेला?असा प्रश्‍न गडकरी यांनी उपस्थित केला.आज संदीप जोशी यांची जात विरोधकांना सलतेय?असा आचार-विचार गमावून राजकारण करण्यात काहीही अर्थ नसल्याची उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.आम्ही राजकारणात आलो ती समाज बलण्यासाठी,सुशील कुमार शिंदे यांना परत अधिवेशन घ्यावं लागलं,शिवशाहीत माेगलांना ज्याप्रमाणे संताजी-धनाजी पाण्यातही दिसायचे त्याप्रमाणे काँगेसच्या सरकारला आम्ही विदर्भाच्या प्रश्‍नावरुन हैरान केले होते,असे ते म्हणाले.

नागपूर विमानतळाचा करार रद्द-मिडीया गप्पच!
याप्रसंगी बोलताना नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कराराच आघाडी सरकारने सत्तेवर येताच रद्द केला मात्र विदर्भाच्या प्रश्‍नावर एकाही प्रसार-प्रचार माध्यमात या एवढ्या मोठ्या बाबीची दखलच घेतली गेली नसल्याची खंत याप्रसंगी गडकरी यांनी व्यक्त केली.गुराढोरांना पुढे ढकलण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांना टोचणी दयावी लागते त्याप्रमाणे माध्यमांना देखील तुतारीने टोलण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.महामेट्रोच्या ब्राॅडगेजच्या परवानगीसाठी गेल्या एका वर्षात १०० फोन मी केले.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,संबंधित मंत्री मात्र एक वर्ष मंजुरीच मिळाली नाही,अखेर आता कुठे या सरकारकडून ब्रॉडगेज मेट्रोला मंजूरी प्रदान झाली.आपले देवेंद्र व सुधीर मुनगंटीवार असते तर एका महिन्यात विदर्भाच्या विकासासी संबधित हा प्रकल्प मार्गी लागला असता,अशी खंत देखील गडकरी यांनी व्यक्त केली.शेवटी आपले सरकार असले तर काय फायदा होतो,हे या निमित्ताने लक्षात आले.भारत सरकारतर्फे पशु वैद्यकीय महाविद्यालयात नवीन संशोधनासाठीद २ कोटींची मंजुरी देण्यात आली आहे.यासाठी देखील या सराकरला २५ पत्र लिहल्याचे गडकरी म्हणाले.

विदर्भाच्या प्रश्‍नावर याेग्य कल्पकता,योग्य नेतृत्व संदीप जोशी हे देखील आमदार झाल्यावर देऊ शकतील,परिषदेत विदर्भाचा आवाज बुलंद करतील,मिहानचा पाठपुरावा करतील असा मला विश्‍वास आहे,मी देखील आजपर्यंत जी काही विकास कामे विदर्भात करु शकलो त्याचे श्रेय ना मला आहे ना माझ्या पक्ष्ाला त्याचे सर्वस्वी श्रेय हे पक्ष्ाच्या कार्यकर्त्यांना व मला निवडून देणा-या मतदारांचा,येथील जनतेचा आहे,असे ते म्हणाले.पाच वर्षात ८० हजार कोटींची कामे मी करु शकलो,याचे श्रेय मला एकट्याला दिलेच जाऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.

कार्यकर्त्यांची ताकद व जनतेचा विश्‍वास म्हणून हे घडलं. अहंकार व उन्माद जर आला तर जनताच माज उतरवते,भाजप या पक्षावर जनतेने जात,पात,धर्म,भाषा यापलीकडे जाऊन प्रेम केले,जनता ही विकासाच्या मागे उभी राहत असते,जातीच्या नाही,असे सांगून परवा १ ता.ला संदीप जोशी यांच्या नावासमोर निवडणूक आयोगातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पेन ने आकड्यात(शब्दात नाही)इंग्रजी किवा मराठीती १ लिहा,असे आवाहन करीत पदवीधर मतदारा संघ हा विद्वान लोकांचा मतदारसंघ समजला जात असला तरी माझ्या व ना.गो.गाणार यांच्या उमेदवारीच्या वेळी सर्वाधिक अवैध मते ठरली,अशी सूचक माहिती देखील याप्रसंगी गडकरी यांनी दिली.

Latest बातम्या