Homeराजकारणपदवीधर निवडणूकीत भाजपचाच उमेदवार निवडून येईल:चंद्रशेखर बावणकुळे यांचा दावा

पदवीधर निवडणूकीत भाजपचाच उमेदवार निवडून येईल:चंद्रशेखर बावणकुळे यांचा दावा

आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर विदर्भाच्या जनतेला विश्‍वास नाही

नागपूर,ता. १९ नोव्हेंबर: नागपूर विभागातील पदवीधर निवडणूकीत भारतीय जनता पक्ष्ाचे उमेदवार संदीप जोशी हेच निवडून येतील,अशी रचनाच आम्ही उभी केली आहे.काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीचे  खासदार,मंत्री आमच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करीत आहेत,विधान सभा अध्यक्ष् नाना पटोले,प्रफूल्ल पटेल, क्रिडा मंत्री सुनील केदार,गृहमंत्री अनिल देशमुख आदींनी भाजपच्या उमेदवाराला या निवडणूकीत परास्त करण्याची  शपथ घेतली आहे मात्र आघाडी सरकारचा १२ महिन्यांच्या एकंदरित कारभार बघता या मंत्र्यांवर जनतेचाच विश्‍वास उरला नसल्याचा दावा माजी उर्जामंत्री व भाजप पदवीधर निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज दि. १९ नोव्हेंबर रोजी प्रेस क्लब येथे आयाेजित पत्र परिषदेत केला.

याप्रसंगी मंचावर खा.विकास महात्मे,आ.कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा कोठे, भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके,आ.टेकचंद सावरकर, प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना बावणकुळे म्हणाले की,१ डिसेंबर रोजी मतदान आहे.निवडणूकीत एकूण ३२० बूथ व ३०४ केंद्रावर २ लाख ६ हजार ४५४ पदवीधर मतदार आहेत.गेल्या २२ वर्षांपासून भाजपचे पदवीधरचे उमेदवार संदीप जोशी यांनी सामाजिक,सांस्कृतिक उपक्रमात आपला ठसा उमटवला आहे.४ वेळा नगरसेवक तर महापौर पद त्यांनी भूषवले.विविध सेवाभावी संस्थांचे ते प्रमुख आहेत. त्यांना संघटनात्मक अनुभव आहे.सहा जिल्ह्यांमध्ये आम्ही त्यांच्या प्रचार-प्रसाराचे नियोजन पूर्ण केले असून संपूर्ण मतदारांपर्यंत आमचा उमेदवार जरी नाही पोहोचू शकला तरी कोणत्या ना कोणत्या माध्यमांनी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत.नागपूर शहरात दटके यांच्या मार्गदर्शनाखाली तर चंद्रपूर,वर्धा, गडचिरोली,गाेंदिया,भंडारा,नागपूर ग्रामीण अश्‍या जिल्ह्यात भाजपचे निवडणूक प्रमुख हे संपूर्ण धुरा सांभाळणार आहेत. संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ येत्या २० व २१ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरात येणार असून विधान परिषद विरोधी पक्ष् नेते प्रवीण दरेकर तसेच भाजप नेते आशिष शेलार,२२ नोव्हेंबर नंतर स्वत: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी प्रचारासाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.संदीप जोशी हे ७० टक्के मते घेऊन निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

आघाडीच्या मंत्र्यांवर विदर्भाच्या मतदारांचा विश्‍वास नाही-
आघाडी सरकारचे सर्व प्रमुख मंत्री भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात जरी प्रचारात उतरले असले तरी गेल्या १२ महिन्यांचा आघाडी सरकारचा भोंगळ आणि खोटारडा कारभार बघता विदर्भाच्या मतदारांना आता आघाडीच्या मंत्र्यांवर विश्‍वास उरला नसल्याची टिका बावणकुळे यांनी केली.सरकारच्या नेत्यांवर महाराष्ट्रातील जनतेचा विश्‍वासच उडाला असल्याचे ते म्हणाले. विदर्भाच्या अनुशेषाची माहिती देणारे व त्या अनुसार निधीचा प्रावधान करुन घेणारे ‘विदर्भ वैधानिक मंडळच’या सरकारने गुंडाळले!.हे फार मोठे पाप या सरकारने केले आहे.यामुळे विदर्भाचे मतदार हे नाराज आहेत.आता विदर्भातील कुठल्याच सेक्टरचा बॅकलॉक  सरकारला कळणार नाही तर विदर्भासाठी बजेट कसे काढतील?

नागपूरात हिवाळी अधिवेशन टाळून १९५६ चा नागपूर करार देखील ठाकरे सरकारने पायदळी तुडवला असल्याचा आरोप बावणकुळे यांनी केला. करोना संक्रमणाचे नाटक करुन जणू मुंबईत कराेना संपला,मात्र नागपूरात करोना आहे,असे ठाकरे यांना अधोरेखित करायचे आहे का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मुंबई एवढ्याच अधिवेशनाच्या व्यवस्था नागपूरात असताना करोनाचे कारण सांगून अधिवेशनच मुंबईला पळवले,या निर्णयावर तर ठाकरे सरकारला पुरस्कार दिला पाहिजे,अशी कोपरखळी त्यांनी केली.

आमच्या मोर्च्यांना घाबरले-
७ डिसेंबर रोजी नागपूरात हिवाळी अधिवेशन झाले असते तर इतिहासात घडले नाही असे मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्च काढणार आहोत अशी माहिती ठाकरे सरकारला मिळाली त्यामुळे त्यांनी आमच्या मोर्चे व आंदोलनांच्या भीतीमुळे नागपूरातील अधिवेशनच रद्द केले,असा आरोप बावणकुळे यांनी केला.हे सरकार आम्हाला घाबरले असा सणसणीत आरोप यावेळी त्यांनी केला.या सरकारने संजय गांधी निराधार योजना,विधवांना अनुदान,रेशनवरील जिन्नस,पालकमंत्री योजना,डीसीपी योजना अश्‍या अनेक जनकल्याणकारी योजना या सरकारने बंद करुन विदर्भावर अन्याय केला,असा आरोप त्यांनी केला.

विज ग्राहकांवर भुर्दंड लादणारे सरकार-
या सरकारने राज्यातील लाखो वीज ग्राहकांवर लॉक डाऊनच्या काळातले वीज देयके लादून अन्याय केला.लॉक डाऊनमध्ये न्हावी,शिंपी व इतर दूकाने उघडलीच नाही तरी देखील त्यांना वीज बिल पाठवण्यात आले.यासाठी महावितरणने जानेवरी,फेब्रुवरी व मार्चची ग्राहकांची देयके गृहीत धरली व सरसकट एप्रिल,मे,जून,जुलै महिन्यात या गृहीतकावर देयके पाठवण्यात आले,वास्तवतेत एवढी विज ग्राहकांनी वापरलीच नाही.याच सरकारने कबूल केले १०० युनिटपर्यंतची देयके एक नव्हे तर पूर्ण ५ वर्षांसाठी माफ करण्यात येईल,भाजपचा कार्यकर्ता सरकारला असे करा म्हणून विचारायला गेला नव्हता,त्यांनीच घोषणा केली.मात्र महावितरण ही सरकारची प्रायव्हेट प्रापर्टी आहे का?असा संताप त्यांनी व्यक्त केला.त्यांच्या फसव्या घोषणेला बळी पडून राज्यातील ९६ लाख वीज ग्राहकांनी वीज बिल भरलेच नाही,आता त्यांना वीज कापण्यात येईल असा मॅसेज पाठवण्यात आला आहे,हा वीज ग्राहकांवर सरासर अन्याय असल्याचे ते म्हणाले.

उर्जामंत्री नितीन राऊत हतबल!
हे सरकार आघाडीचे असले तरी काँग्रेस पक्ष्ाचे नाव कसे खराब होईल हे ठाकरे सरकार पाहत आहे,असा आरोप त्यांनी केला.मागील सरकारने २००५ ते २०१५ दरम्यान साढे सतरा लाख वीज कनेक्शन मराठवाड्यात दिले.यासाठी ५ हजार कोटीं खर्च आला.४५ लाख शेतक-यांचे २८ हजार कोटी वीज देयके माफ केली,मग हे सरकार लॉक डाऊन काळातील चार महिन्यांचे ग्राहकांचे विज बिल का माफ नाही करु शकत?वरुन ग्राहकांचे कनेक्शन कापले जाईल,असा मॅसेज पाठवते,मोगलाई आहे का?असा संताप त्यांनी व्यक्त केला.परिवहन मंत्री अनिल परब यांना १ हजार कोटींची रक्कम एका मिनिटात मंजूर केली मात्र उर्जामंत्री यांनी सात वेळा निवेदन पाठवून देखील वीज ग्राहकांच्या हितासाठी ७ हजार कोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केले नाही,यावरुन उर्जामंत्री नितीन राऊत यांची हतबलता दिसून पडते,असा आरोप त्यांनी केला.राऊत हे सामाजिक चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत,त्यांना हतबल करण्याचे काम ठाकरे यांनी केले.

पदवीधर निवडणूकीत विरोधकांचे जात-पात कार्ड!
कापूस,सोयाबिन,धान शेतक-यांच्या नुकसानीबाबत आपले अपयश झाकण्यासाठी आता पदवीधर निवडणूकीत आघाडी सरकारचे मंत्री हे जात-पात,धर्म याचा कार्ड खेळत असल्याचा आरोप बावणकुळे यांनी यावेळी पत्र परिषदेत केला.हे सरकार शेतकरी,विदर्भाला न्याय देऊ शकले नाही,विदर्भाला फक्त गडकरी,फडणवीस व भाजपाच देऊ शकते,हे पाच वर्षाच्या आमच्या सरकारच्या काळात सिद्ध झालं.आघाडीचा उमेदवार न्याय देऊ शकणार नाही.वीज,पाणी,शेतकरी हे मुद्दे सोडून आघाडीचे मंत्री हे जाती-पातीचे राजकारण करुन मतदारांमध्ये दूफळी निर्माण करीत आहेत.काँग्रेसमध्ये विकासाचे नेतृत्वच नाही,अशी टिका त्यांनी केली.

संदीप जोशी हे विधान परिषदेत विदर्भाचा आवाज होतील.विधी मंडळात विदर्भाचा आवाज जोशी हेच बुलंद करु शकतील,त्यांच्याच नेतृत्वात विदर्भाचे प्रश्‍न हे विधी मंडळात जाऊ शकतील,असे समर्थन बावणकुळे यांनी केले.

याप्रसंगी भाजपच्या आजपर्यंतच्या उमेदवारांनी अंशकालीन पदवीधरांच्या प्रश्‍नाला न्याय का दिला नाही?या प्रश्‍नाचे उत्तर देताना आजवर अंशकालीन पदवीधरांबाबत अनेक प्रश्‍न भाजपच्या उमेदवारांनी सभागृहात उपस्थित केल्याचे सांगून वाटल्यास या प्रश्‍नांची यादी देखील देण्यात येईल,असे ते म्हणाले.याशिवाय आम्ही ५० वर्षे सरकारमध्ये नसून फक्त ५ वर्ष सरकार चालवली आहे,याकडे त्यांनी लक्ष् वेधले.

मंत्री वडेट्टीवार यांनी पदवीधर निवडणूकीच्या प्रचारादरम्यान बावणकुळे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप केले,या विषयी बोलताना,मला या विषयावर बोलायचे नाही,मी फक्त आघाडी सरकारच्या कामगिरीवर बोलणार असे ते म्हणाले.भंडारा जिल्ह्यात दारुबंदीमागे प्रत्येक पेटीवर कमिशनचे रेट ठरले आहे,असे देखील अप्रत्यक्ष् पणे त्यांनी सूचित केले.वडेट्टीवार हे सरकारमध्ये असून सरकार त्यांचे आहे त्यामुळे माझे हे आव्हान आहे त्यांनी माझी चौकशी करावी,असे आव्हान त्यांनी केले.

करोनापेक्ष्ा भाजप वीज बिल थकबाकीसाठी जास्त जवाबदार,उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या वक्तव्याकडे लक्ष् वेधले असता,आम्ही आमच्या घरासाठी विज बिल माफ केले नव्हते,असे ते म्हणाले.आम्ही २८ हजार कोटी शेतक-यांची ५० हजार कोटी थकबाकी माफ केली होती.मात्र आताचे उर्जामंत्री हे लॉक डाऊन काळातील फक्त ७ हजार कोटी माफ करु शकत नाही,२०१८-१९ ची बॅलेंस शीट तपासली तर एवढी मोठी रक्कम माफ करुनसुद्धा वीज कंपनी ही तोट्यात आली नव्हती,असा दावा त्यांनी केला.म्हणूनच नितीन राऊत यांच्या वीज माफीच्या निवेदनावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आजच्या आज सही करावी,व ९५ लाख ग्राहकांना दिलासा द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.

वडेट्टीवर यांनी नुकतेच केंद्राकडे जीएसटीची थकीत रक्कम याविषयी वक्तव्य केले होते,या विषयी छेडले असता उद्धव ठाकरे,अजित पवार हे दिल्लीला कधी गेले ही मागणी घेऊन?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ठाकरे हे नागपूरला अधिवेशनासाठी येत नाही ते दिल्लीला काय जाणार?अशी कोपरखळीही त्यांनी मारली.फडणवीस,दरेकर यांना सोबत दिल्लीला का घेऊन नाही गेले?तुम्ही स्वत:ची जवाबदारी पार पाडणार नाही,मुंबई,पुण्याच्या बाहेर पडणार नाही आणि केंद्रावर आरोप करीत सुटले असे ते म्हणाले.महावितरणसाठी कमी व्याजेवर ९० हजार कोटींचे कर्ज देण्यास केंद्र सरकार तयार असताना तुम्हीच ते स्वीकारले नाही.

पदीवधर मतदारच या संपूर्ण कारभाराविषयी यांना धडा शिकवतील,राऊत यांच्या बोलण्याला वीज निर्मितीचे अधिकारीच गांर्भीयाने घेत नाही कारण मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी नाहीत,हे अधिका-यांनाही माहिती आहे,असे ते म्हणाले.

मनसेला समर्थन-
मनसेने वीज प्रश्‍नावर ५ कोटी ग्राहकांसाठी पवित्रा घेतला असल्याने भाजपचे मनसेला समर्थन असल्याचे ते म्हणाले.लॉक डाऊनमुळे पदवीधर मतदार नोंदणी ही कमी झाली असली तरी यामुळे काही फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले.शिक्ष् क भारती तसेच बहूजन समाज पक्ष्ाचे उमेदवार निवडणूकीतून बाद केले असले तरी अभिमन्यू होऊन विरोधकांच्या या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची योजना आमची तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest बातम्या