
आ.विकास ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर,ता. १० नोव्हेंबर: करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियोजित ७ डिसेंबर रोजी उपराजधानी नागपूरात होणारे हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिली परिणामी जवळपास ५० कोटींचा खर्च वाचला तसेच अधिवेशनामुळे होणारी गर्दी लक्षात घेता करोना संसर्गाची भीती देखील टळली.यासाठी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आभाराचे पत्र लिहले तसेच आता या निधीचा उपयोग उपराजधानी व विदर्भाची आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी खर्च करण्यात यावी अशी मागणी केली.
ठाकरे यांनी १० सप्टेंबर रोजीच पत्र लिहून उपराजधानी नागपूरात ७ डिसेंबरपासून प्रस्तावित हिवाळी अधिवेशन हे शहरात कोविड-१९ ची सप्टेंबर महिन्यातील अतिशय भीषण परिस्थिती पाहता रद्द करण्याची मागणी केली होती.शहरातील करोनाची परिस्थिती बघता अद्याप देखील विदर्भ तसेच उपराजधानीत करोना महामारीचे प्रमाण हे चिंताजनकच असून जगभरातच करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना शोधता आली नाही.करोनाचे संक्रमण अद्यापही कायम असून काल ९ नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात सात बळींसह २०२ करोनाबाधित आढळले.दररोज करोनाबळी व बाधितांच्या संख्येत फारसी घट होताना दिसत नसून दिवाळीनिमित्त नागरिकांची गर्दी बघता उलट यात आणखी वाढ होण्याचीच संभावना अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर उपराजधानीत जर अधिवेशन पार पडले असते तर अनेक पक्ष्ांचे राजकीय नेते,मंत्री,त्यांचे स्वीय सचिव,मंत्रालयातील शेकडो कर्मचारी,वाहने,वाहनांचा ताफा,वाहन चालक,सुरक्षाकर्मी,वेगवेवगळ्या भागातून सुरक्ष्ेसाठी येणारे पोलिसकर्मी यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचीच दाट शक्यता होती.करोनाच्या काळातच दिल्ली येथे घेण्यात आलेले पावसाळी अधिवेशन देखील दोन मंत्री तसेच ३० खासदार बाधित झाल्याने अचानक गुंडाळावे लागले होते.महाराष्ट्रात देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान सभा अध्यक्ष् नाना पटोले यांना करोनाचा संसर्ग झाला.अनेक आमदार हे करोनाच्या संसर्गातून सुखरुप बाहेर पडले आहेत.अधिवेशनामुळे एकमेकांच्या संपर्कात येणे क्रमप्राप्त होते,तसेच प्रसार-प्रचार माध्यमांची गर्दी, इतर शहरातून निवेदन घेऊन येणारे नागरिक,मोर्चे, यामुळे करोनाबाबत उपाययोजना करणा-या यंत्रणेवर ताण पडला असता तसेच करोनाची भीती ही कायमच असती,अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
यामुळे मुख्यमंत्री यांनी हे अधिवेशन रद्द करुन ते मुंबईत घेण्याचे दिलेले निर्देश उपराजधानीतील करोनाचा धोका कमी करणारेच ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.याशिवाय प्रशासनाने हिवाळी अधिवेशनावर ५० कोटींचा खर्च प्रस्तावित केला होता.पावसाळी अधिवेशन हे तीनच दिवस चालले होते परिणामी उपराजधानीत हिवाळी अधिवेशन हे किमान दोन आठवडे चालणार असा अंदाज बांधून ५० कोटींचा खर्च प्रस्तावित केला.परिणामी ७ डिसेंबर ते १८ डिसेंबरपर्यंत होणारे हे अधिवेशन आता उपराजधानीत होणान नसल्याने प्रशासनाचा ५० कोटींचा खर्च वाचला आहे. तो संपूर्ण पैसा आता नागपूर तसेच विदर्भातील रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थापनावर खर्च करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली.
करोनाचा उद्रेग अद्याप पूर्णपणे थांबला नसून नुकतेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद(आयसीएमआर)ने देखील हिवाळी वातावरण हे कोणत्याही विषाणूसाठी पोषक असल्याचा निर्वाळा दिला आहे. दिवाळीसारख्या सणामुळे शहरातील सर्वच बाजारपेठा या गर्दीने फूलून गेल्या.परिणामी या विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट येत्या जानेवरीमध्ये येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.ही शक्यता लक्ष्ात घेऊन हिवाळी अधिवेशनावर खर्च होणारे जवळपास ५० कोटी, हे आता उपराजधानी तसेच विदर्भाच्या नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सक्ष् म करण्यासाठी खर्च करण्यात यावे,अशी विनंती त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या उपजराजधानीत जून तसेच सप्टेंबर महिन्यात जेव्हा करोनाच्या उद्रेगाने उच्चांक गाठला होता तेव्हा एका-एका वेंटिलेटरसाठी तसेच ऑक्सीजन यंत्रणे अभावी शेकडो बाधितांना रस्यावरच जीव गमवावा लागला आहे.नागपूरवर संपूर्ण विदर्भाचा भार पडत असतो.नागपूरातील आरोग्य यंत्रणा ही तातडीने व आधीच सुसज्ज करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. नागपूरात करोना बाधितांच्या पार्थिवांवरील अंत्यसंस्कारासाठी, श्मशानघाटांवर पार्थिवांना देखील‘वेटिंगवर’ठेवावे लागले असल्याचे ह्दयद्रावक चित्र उमटले हाेते,अशी माहिती त्यांनी नमूद केली.
महाराष्ट्रात तसेच उपराजधानीत करोनाची तिसरी लाट आलीच तर पुन्हा शासकीय आरोग्य यंत्रणा या ढासळू शकतात व शेकडो जीवांना आपल्या प्राणाला मुकावं लागू शकतं.ही परिस्थिती वेळीच ओटोक्यात आणण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर खर्च होणारी अंदाजित ५० कोटींची रक्कम ही आता उपराजधानीत नवे अद्यावत रुग्णालये तसेच आरोग्य यंत्रांवर खर्च करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.

आमचे चॅनल subscribe करा