
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ९ नोव्हेंबर: आश्चर्यकारकरित्या आज सोमवारी भारतीय जनता पक्ष्ातर्फे महापौर संदीप जोशी यांचे नाव पदवीधर मतदारसंघासाठी पक्षातर्फे जाहीर झाले आणि अनेकांना केंद्रिय नेतृत्वाच्या या निर्णयामुळे धक्का बसला!अगदी काल-परवापर्यंत माजी आमदार प्रा.अनिल सोले हे लवकरच अर्ज भरणार असल्याची तारीख सांगतो म्हणून माध्यमांना प्रतिक्रिया देत होते,याचा अर्थ त्यांनाही पक्ष् यावेळी देखील त्यांनाच उमेदवारी देणार याची शंभर नव्हे तर दोनशे टक्के खात्री होती मात्र आज दुपारी भाजपच्या केंद्रिय नेतृत्वातर्फे यादी जाहीर झाली अन् …..त्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी यांचे नाव झळकले,याचा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात सध्यातरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शब्द अंतिम मानला जातो,यावर शिक्कामोर्तब झाले.

प्रा.सोले यांच्यासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे आग्रही होते हे कोणापासून लपून राहीले नाही.यंदा देखील त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी गडकरी यांनी शब्द टाकला होता,अशी माहिती आहे मात्र संदीप जोशी हे फडणवीस यांचा उजवा हात मानले जात असल्याने व गेल्या दोन निवडणूकीत जोशी यांनीच फडणवीस यांच्या मतदारसंघाची संपूर्ण जबावदारी एकहाती सांभाळली असल्याने त्याची परतफेड कधी ना कधी होणारच होती,अशी चर्चा आहे.
२० ऑगस्ट रोजी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून नागपूरकरांसोबत संवाद साधताना महानगरपालिकेची ही त्यांची शेवटची निवडणूक असणार आहे,असे विधान केले होते. हे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा सूतोवाच होती,हे तेव्हाच लक्ष्ात आले होते.महापौर पद भूषवल्यानंतर पुन्हा नगरसेवक म्हणून मनपात येणे रास्त वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले होते,याचा अर्थ महापौर पदानंतर आमदारकीकडे त्यांचे डोळे लागले होते,हे तेव्हाच स्पष्ट झाले होते.
याचा अर्थ तीन महिन्यापूर्वीच त्यांना पदवीधर मतदारसंघाची पक्षातर्फे उमेदवारी मिळणार हे माहिती असणे शक्य आहे.मात्र आ.सोले हे गाफिल राहीले असेच आता म्हणावे लागेल. आश्चर्यकारक बाब म्हणजे नुकतेच एका सभेत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील ‘आमचा उमेदवार ठरला आहे,उमेदवार बदलणार नाही’असा सूतोवाच केला होता.यानंतर प्रा.सोले यांचे तिकीट कापले जाणार नाही यावर जणू शिक्कामोतर्बच झाले होते.
प्रा.सोले हे राजकीयपेक्ष्ा ही त्यांच्या शैक्ष् णिक तसेच सामाजिक उपक्रमांमुळेच ओळखल्या जातात. पक्षाचे शिस्तप्रिय कायकर्ते म्हणूनच त्यांची ओळख आहे.तिकीट कापले तरी ते बंडविंड करणार नाही किवा पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार नाही,याची पक्षाला देखील खात्री होती.ते ‘ऐकणारे’ कार्यकर्ता आहेत म्हणूनच त्यांची तिकीट जरी कापली तरी पक्षाला फारसा फरक पडणार नाही,असे गृहीतच धरण्यात आले.
चंद्रकात पाटील यांच्या दोन दिवसीय दौ-याचे फलित!
आज भाजपतर्फे महापौर संदीप जोशी यांची उमेदवारी जाहीर होताच याचा सरळ संबंध पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष् चंद्रकांत पाटील यांच्या नागपूर दौ-याशी जोडण्यात आला. अचानक ३ नोव्हेंबर रोजी चंद्रकांत दादा यांनी दोन दिवसीय नागपूरचा दौरा काढला,या दरम्यान ते गडकरी यांना देखील भेटले.या भेटीतच पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत केंद्रिय नेतृत्वाने नाव निश्चित केले असल्याची माहिती गडकरी यांना देण्यात आली व गडकरी यांना हा निर्णय स्वीकारण्याबाबत विनंती करण्यात आली,अशी माहिती चर्चा आहे.अर्थात एखाद्या आमदारकीसाठी गडकरींसारखा नेता हा पक्ष् शिस्त मोडण्याचा प्रश्नच उद् भवत नाही मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरी यांना पद्धतशीरपणे डावलले जात असल्याच्या चर्चेला या निर्णयामुळे बळ मिळाले,असेच म्हणावे लागेल.
बिहार निवडणूकीच्या प्रचारातून गडकरी गायब-
नुकतीच बिहारची निवडणूक आटोपली मात्र महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये होते.आश्चर्य म्हणजे बिहारमध्ये अनेक महत्वाचे रस्ते हे गडकरी यांच्या मंत्रालयातर्फे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आले आहे त्यामुळे बिहारच्या जनतेला फडणवीसपेक्ष्ाही गडकरी यांचे नाव जास्त ओळखीचे होते.गडकरी यांच्याविषयी आदरही व्यक्त केला जात होता,असे असताना बिहारच्या निवडणूकीत गडकरी यांच्यासारखा लोकप्रिय नेत्यालाच दूर ठेवणे,यामागील देखील गौडबंगाल महाराष्ट्राच्या जनतेला समजले नाही.
जाेशी वर्सेस वंजारी:काय असणार आहे नवमतदारांचा कौल?
काँग्रसने चार महिन्यांपूर्वीच ॲड.अभिजित वंजारी यांची उमेदवारी घोषित केली होती त्यामुळे त्यांना सहाही मतदारसंघात प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला.भाजपने आज संदीप जोशी यांची उमेदवारी जारी केली असली तरी मध्ये ‘दिवाळी’सारखा मोठा सण आहे व १ डिसेंबरला मतदान आहे.जोशी यांना सहाही मतदारसंघापर्यंत पोहोचण्यास पुरेसा वेळ असणार नाही,विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाचा मतदार हा सर्वसामान्य मतदारांपेक्ष्ा वेगळा व सुजाण असतो.यावेळी भाजपची मक्तेदारी असणारी मतदार यादीच रद्द झाली असून नव्याने मतदारांची नोंदणी झाली आहे. नागपूर जिल्याच्या निवडणूकीत एकूण ८७ हजार ६५ मतदार असून यापैकी अनेक मतदार हे नवमतदार आहेत,हे विशेष!
नुकतीच बिहारची निवडणूक संपली यात लालू पूत्र तेजस्वी यादव हे निवडणूक स्टार होते.मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकीर्दीला १५ वर्षे झाली असून ही त्यांची चौथी टर्म आहे.परिणामी पंधरा वर्षापूर्वी ४-५ वर्ष वय असणारा मतदार हा आता वीशीत पाहोचला आहे व हाच नवमतदार तेजस्वी यादवच्या प्रचाराला प्रतिसाद देणारा असून पंधरा वर्षापूर्वी झालेला ‘चारा-घोटाळा’हे त्यांच्या स्मरणातही नाही,त्यांनी बघितली ती फक्त नितीश कुमार यांची कारर्कीद,उद्या मंगळवार १० नोव्हेंबर रोजी बिहारच्या निवडणूक निकालाची उत्सुक्ता शिगेला पोहोचली असताना नागपूरातील नवमतदार हा देखील काय विचार करतोय?हे उद्याच्या निकालानंतर जास्त स्पष्ट होऊ शकेल.
महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊन फक्त एक वर्षाचा काळखंड उलटला आहे.ते ही या सरकारला नवमतदारांनी फक्त कोविडशी लढताना पाहीले आहे. शिक्ष् णाचा तर संपूर्ण खेळखंडोबा करुन ठेवला असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी वर्ग करीत आहे. परिक्ष्ांमध्ये घोळ,११ वीच्या प्रवेश प्रक्रियेत घोळ,ऑन-लाईन शिक्ष् ण इ.अनेक निर्णयांचे पडसाद विद्यार्थी वर्गावरच जास्त उमटले असून हाच वर्ग पदवीधर मतदार संघाचा मतदार आहे,हे विसरुन चालणार नाही.महाराष्ट्र सरकारने युजीसीच्या तसेच कोर्टाच्या सूचनाही धुडकावून लावल्या परिणामी विद्यार्थ्यांपुढे तब्बल एका वर्षाच्या शैक्ष् णिक वर्षाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ऑफ लाईन परिक्ष्ा घेण्यास महाराष्ट्राचा विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने अनुकूल होता,यात वाद नाही.
शेवटी काँग्रेस पक्षाने किती पदवीधर मतदारांना बांधून ठेवले,यावरच नागपूर विभागाच्या निवडणूकीचा निकाल ठरणार आहे.धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य व ओबीसीचे मोठे नेते बबनराव तायवाडे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला गेल्या निवडणूकीत भाजपने पराभूत केले,हे ही विसरता येत नाही.संघटनाचा प्रश्न येतो तेव्हा निश्चितच पदवीधरमध्येही भाजपचे संघटन हे जास्त मजबूत मानलं जातं. प्रा. अनिल सोले यांनी मागील वर्षापासूनच पदवीधर मतदारांच्या नोंदणीमध्ये बराच पुढाकार घेऊन मतदारांची नोंदणी करुन घेतली होती.त्यांचे व त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे हे संपूर्ण ‘परिश्रम ’आता पक्षाचे उमेदावार महापौर संदीप जोशी यांच्या मागे त्यांना उभे करणे भाग आहे.
तूर्तास भाजपतर्फे कोण?याची उत्सूकता संपुष्टात आली असून भाजपतर्फे प्रा.अनिल सोले यांचा पत्ता कटला व महापौर संदीप जोशी ही निवडणूक लढण्यास सज्ज झाले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.भाजपसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची ठरणार आहे कारण या निवडणूकीच्या निकालावरच महापौर संदीप जोशी यांची पुढील राजकीय कारर्कीद निर्भर असणार आहे.
विजय महाविकासआघाडीचाच: ॲड.अभिजित वंजारी
भारतीय जनता पक्ष्ाने आज प्रा.अनिल सोले यांच्या ऐवजी जरी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली असली तरी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकासआघाडीचाच उमेदवार जिंकणार असून आघाडीला कोणताही फरक पडणार नाही.तिन्ही पक्ष् आघाडी म्हणून कामाला लागले आहे.विजय निश्चितच आघाडीच्या उमेदवाराचाच होईल.

आमचे चॅनल subscribe करा