फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजदयाशंकर तिवारी-दटके यांच्यात सत्तासंघर्ष उद् भवणार!

दयाशंकर तिवारी-दटके यांच्यात सत्तासंघर्ष उद् भवणार!

Advertisements

महापौर पदाच्या ‘फिफ्टी-फिफ्टी’फॉर्म्यूलाकडे कर्मचा-यांचे लक्ष्

नागपूर,ता. ६ नोव्हेंबर: मागील वर्षी १८ नोव्हेंबर रोजी महापौर नंदा जिचकार यांचा महापौर पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या ठिकाणी नवीन महापौर म्हणून पक्ष्ात कोणताही वाद न ओढवता ‘फिफ्टी-फिफ्टी‘ फॉर्म्यूला शहरातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ठरवला व त्यानुसार पहीले सव्वा वर्ष संदीप जोशी तर नंतरचे सव्वा वर्ष भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांना महापौर पदी विराजमान करावे असा निर्णय झाला.येत्या १८ नोव्हेंबरला या निर्णयाला संपूर्ण एक वर्षाचा कालावधी उलटणार असून २२ नोव्हेंबर रोजी जोशी यांनी सभागृहात १०४ मते मिळवून ५३ वे महापौर म्हणून शपथ घेतली.

या फॉर्म्यूल्यानुसार येत्या काही दिवसातच महापौर संदीप जोशी यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार असून त्यांच्या ठिकाणी आता दयाशंकर तिवारी यांची वर्णी लागणार आहे,मनपातील अनेक कर्मचारी मात्र खासगीत बोलताना भारतीय जनता पक्ष्ाची पुढील एका वर्षाची कारर्कीद ही चांगलीच ‘वादळी’राहणार असल्याचे भाकीत वर्तवित आहेत!सध्या मनपातील प्रत्येक निर्णयाची फाईल ही आ.व माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय एक ही फाईल ‘ओके’हाेत नसल्याचे सांगितले जाते.मात्र दयाशंकर तिवारी यांचा एकंदरित स्वभाव बघता ते न्याय बाजूसमोर कोणालाही बधत नाही मग समाेर कितीही मोठा नेता असू देत,परिणामी ऐन निवडणूकीच्या वर्षात पक्ष्ामध्ये बरीच‘हलचल’दिसून येणार असल्याची चर्चा रंगली आहे.महापौर पदी रुजू झाल्यानंतर दयाशंकर तिवारी हे दटके यांच्या ‘नियंत्रणात‘राहणार नसल्याचा कयास लावला जात आहे.

तर संदीप जोशी हेच महापौर पदी असायला पाहिजे,असाही मानणारा एक वर्ग मनपात असून पदवीधर मतदार संघासाठी प्रा. अनिल सोले यांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता नसून निदान संदीप जोशी यांच्याकडून महापौर पद हिरावून घेण्यात घेऊ नये,असे देखील आत्मीयतेने बोलले जात आहे.जरी महापौर पदाचा ‘फिफ्टी-फिफ्टी‘चा फॉर्म्यूला पक्ष्ाने ठरवला असला तरी वेळ निभावून नेण्यासाठी देखील अनेकदा अश्‍या लोकप्रिय घोषणा कराव्या लागतात,शेवटी परिस्थिती बघूनच निर्णय घ्यायचे असतात,असे देखील उघडपणे बोलले जात आहे.मात्र असे घडल्यास शहरातील उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची शक्यता असल्याने पक्ष् स्वत:वर असे गंडांतर आणणार नाही व निवडणूकीच्या वर्षांत हिंदी-भाषिक मतदरांना दुखावणार नाही,असा कयास लावला जात आहे.

दयाशंकर तिवारी हे सत्ता पक्ष् नेते होते तेव्हा त्यांनी मनपातील अनेक विषयांना वाचा फोडली.बँकेच्या निवडणूका असाेत किवा त्यामधील अध्यक्ष् पदाचा वाद,निर्भिडपणे ते विषयाला भिडतात,असा कर्मचा-यांना अनुभव आहे.त्याचसोबत मुंढे-दयाशंकर तिवारी यांच्यातील सभागृहातील पराकोटीचा वाद संपूर्ण नागपूरकरांनी अनुभवला आहे,मुंढे यांच्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल झाली.आता महापौर पदी विराजमान झाल्यावर या तक्रारीचे नेमके पुढे काही होणार आहे का?मनपातील सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार,सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त महेश धामेचा आदी यांच्यावर काही प्रभावी कारवाई होईल का?याकडे सर्वांचे लक्ष् लागणार आहे,कारण या प्रशासनकीय अधिका-यांच्या कार्यशैलीचा सर्वाधिक विरोध दयाशंकर तिवारी यांनीच केला असल्याने याबाबींचा पूर्ण मागोवा ते घेतील व नागपूरच्या झालेल्या बदनामीचा वचपा काढतील अशी आशा देखील त्यांच्याप्रति व्यक्त केली जात आहे.

नागपूरच्या इतिहासात अनेक महापौरांनी अापली कारर्कीद सांभाळली मात्र महापौर म्हणून कारर्कीद गाजवली ती दोनच नावे नागपूरकरांच्या स्मरणात आहेत,एक म्हणजे अटलबहादूर सिंग तसेच दुसरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.यानंतर प्रा.अनिल सोले यांनी देखील काही कल्पक संकल्पना शहरात राबवल्या.महापौर संदीप जोशी यांनीही पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धर्तीवर ‘महापौर सहाय्यता निधी’ उपक्रम राबवला.कचरा संकलन सुरळीत करण्यासाठी कंपन्यांना अल्टीमेटम दिले.फूटपाथ अतिक्रमणाबाबत तिवारी समितीची स्थापना केली. शहराचा कायापलट करण्यासाठी ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ उपक्रम राबवला,ज्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.मात्र यानंतर त्यांच्या दूर्देवाने महाराष्ट्रात कर्तव्यकठोर,शिस्तप्रिय सनदी अधिकारी म्हणून गाजलेले तुकाराम मुंढे यांची आयुक्त पदी वर्णी लागली आणि महापौर यांना २३ नोव्हेंबर ते २७ जानेवारी एवढाच कार्यकाळ ख-या अर्थाने मिळाल्याचे वास्तव सांगितले जात आहे.कारण मुंढे यांनी २८ जानेवारी २०२० रोजी पदभार स्वीकारला व पदभार स्वीकारताच पदाधिका-यांचे सर्व प्रकल्प हे मनपाकडे पैसाच नाही या सबबीखाली रोखून धरले.यासोबतच २३ मार्च पासून शहरात ‘करोना’चा कहर कोसळला त्या समोर मनपाच काय तर राज्य सरकार ते केंद्र सरकारही हतबलच ठरली.

परिणामी दयाशंकर तिवारी हे ऐन निवडणूकीच्या वर्षातच महापौर पदी पदारुढ होत असल्याने तेच व त्यांची कार्यशैली हीच मतदारांसमोर जाणार आहे.त्यांच्या निर्णयांचा निवडणूकीवर प्रभाव पडणार असून आता जनतेचे लक्ष् नोव्हेंबर महिन्यात दिवाळी नंतर घडणा-या या शहरातील महत्वपूर्ण घडामोडीकडे म्हजणे ‘फिफ्टी-फिफ्टी’फॉम्यूर्लाकडे लागले आहे.

प्रथमच झाली होती ‘महाशिवआघाडी’-
महापौर संदीप जोशी यांच्या निवडीला आव्हान देताना प्रथमच मनपात ‘महाशिवआघाडी’ झाली होती.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने प्रथमच एकत्र येत भाजप पुढे आव्हान उभे केले होते.काँग्रेसतर्फे हर्षदा साबळे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्‍वर पेठे यांनी नामांकन दाखल केले होते.सेनेचे दोन नगरसेवकही सोबत असल्याचा दावा विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी केला होता त्यामुळे प्रथमच तुल्यबळ भाजपाविरोधात महापालिकेत ‘महाशिवआघाडी’दिसून पडली होती,पुढे हीच आघाडी राज्यात सत्ता प्राप्त करण्यासाठी देखील नांदी ठरली,असेच आता म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या