Homeनागपूर न्यूजदिल्लीवरुन आलेल्या दबावामुळेच अर्णव गोस्वामीवर कारवाई:चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

दिल्लीवरुन आलेल्या दबावामुळेच अर्णव गोस्वामीवर कारवाई:चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

सचिन सावंत हे थोर संशोधक: मेट्रोकारशेडवरही घेतले तोंडसुख

नागपूर,ता.३ नोव्हेंबर:आज सकाळीच रिपब्लीकन भारतचे संपादक अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या घरुन पहाटे ६ वा.अटक करण्यात आली,ते ही तीन वर्ष जुन्या गुन्ह्यात,हा प्रकार म्हणजे सरळसरळ ठोकशाही असून सध्या महाराष्ट्रात एकप्रकारची आणिबाणिच लागली असून हे सर्व दिल्लीतून आलेल्या दबावामुळेच घडले असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्ष्ाचे प्रदेशाध्यक्ष् चंद्रकांत पाटील यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केला.दोन दिवसांच्या दौ-यावर ते सध्या नागपूरात आले आहेत.

याप्रसंगी मंचावर आ.कृष्णा खोपडे,माजी उर्जामंत्री चंद्रकांत बावणकुळे,महापौर संदीप जोशी,आ.व भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके,प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम,माजी महापौर अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,जोपर्यंत अर्णव गोस्वामी यांची सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व हे काळी टोपी,काळ्या फिती तसेच जास्तीत जास्त काळा रंग घालून या ठोकशाहीचा निषेध नोंदवणार.या सरकारचा संपूर्ण कारभार बघता त्यांच्या स्तुतीच्या आरत्या व भजने हे नव्याने लिहण्याची वेळ आल्याची टिका त्यांनी केली.

सहा महिन्यापूर्वी एबीपी माझाच्या पत्रकारासोबत असाच दुर्व्यव्हार झाला.आज अर्णव गोस्वामी यांना घरातून उचलून नेण्यात आले.या प्रकरणामागे काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांची सूचना असून अर्णव गोस्वामी यांनी सोनिया आणि राहूल गांधी यांच्या विरोधात सातत्याने वृत्त चालवले याचा त्यांना राग असावा.अचानक कसे तीन वर्षांपूर्वीचे नाईक कुटुंबातील आई-पुत्राच्या आत्महत्येचे प्रकरण या सरकारला आठवले.त्यातही कोणाची चौकशी करायची असल्यास आधी नोटीस दिली जाते.या प्रकरणात अर्णव यांना ना नोटीस देण्यात आली,ना चौकशीसाठी बोलावण्यात आले,सरळ घरातून उचलून नेले. या देशाने १९ महिन्यांची आणिबाणि बघितली आहे.अनेकांना असे घरातून उचलून तुरुंगात डांबले.तोच प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचे ते म्हणाले.

नाईक यांच्या मुलीचे वक्तव्य आहे की न्याय आधी मिळाला असता तर बरे झाले असते,आज हे प्रकरण उकरुन काढणे म्हणजे नुसती राजकीय पोळी भाजत असल्याचा संशय येतो.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या उपाध्यक्ष् सोनिया गांधी यांनी भ्रमात राहू नये,असा इशारा देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला.

समीर ठक्कर या तरुणाला फक्त त्याने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ट्टीट केले म्हणून तुरुंगात डांबले.नागपूरातील न्यायालयातून त्याला जामिन मिळताच मुंंबईच्या प्रकरणात चौकशीसाठी त्वरित हाताला दोरी बांधून घेऊन गेले,समीर ठक्कर हा काय आतंकवादी अाहे का?त्याच्या विरोधात ४० ठिकाणी गुन्हा नोंदवून त्याची सुटका होऊ नये म्हणून ठाेकशाहीनेच हे सरकार वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

चिन सावंत हे थोर संशोधक!
याप्रसंगी काँग्रेसचे सचिन सावंत यांच्यावर टिका करताना ते थोर संशोधक आहेत मीच कांजूरमार्ग हा राज्याच्या अखत्यारित येतो असा अहवाल दिला असल्याचा शोध त्यांनी लावला.मूळात मीठागर ही केंद्र शासनाची जमीन असते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खूप थाेर होते त्यांनी खूप विचारपूर्वक या देशाला संविधान दिला.याच संविधानात केंद्र,राज्य व समवर्ती सूचीतील विषय त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केले.मिठागर हा केंद्राचा विषय असून १९३४ मध्ये या संबंधीचा कायदा देशात लागू झाला होता.१९९४ मध्ये त्यात सुधारणा करुन राज्यामधील ज्या जमिनींचा उपयोग मीठागरसाठी होत नसेल ती जमिन राज्यांना हस्तांतरित केल्या जाऊ शकते.मी महसूल मंत्री असताना माझ्यासमोर ही अपील आली होती तेव्हा मी राज्यासाठी ही अपील बरोबर असल्याचा निर्वाळा दिला होता.मात्र २०१५ साली या ठिकाणी कारशेड करावयाचे असल्यास ३७०० कोटी आधी न्यायालयात भरण्याचा आदेश मिळाला.याच जागेवरी बाफना यांनी दावा सांगितला असून १९९७ सालापासून या प्रकरणात स्टे मिळाला आहे.मीठागर नष्ट करुन भरण भरण्यासच तीन वर्षांचा कालावधी लागेल.यामुळे मेट्रो कारशेडच्या प्रकल्पावर अतिरिक्त बोजा वाढेल.याशिवाय पर्यावरणाचे नुकसान होणार असून आता केंद्र सरकारच या निर्णया विरोधात न्यायालयात गेल्याचे त्यांनी सांगितले.

शेतक-यांचे प्रचंड हाल:जनतेचे लक्ष् भटकवण्यासाठी उपदव्याप
महाआघाडी सरकारच्या काळात शेतक-यांचे प्रचंड हाल सुरु आहे.सोयाबिन,कापूस उत्पादक शेतक-यांचे अतिवृष्टिमुळे अतोनात नुकसान झाले अद्याप त्यांची नुकसान भरपाई झाली नाही.करोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात देखील या सरकारचे अपयश ठलकपणे पुढे आले.राज्यात शिक्ष् णाचा संपूर्ण खेळखंडोबा करुन ठेवला,अद्याप ११ वीची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही,पदवीधरांच्या अंतिम वर्षाच्या परिक्ष्ेचा घोळ विद्यार्थी विसरु शकणार नाही,महिलांवर अतोनात अत्याचार वाढलेत,या संपूर्ण अपयशाकडे जनतेनी डोळेझाक करावी,यासाठीच जनतेचे लक्ष् भटकविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र येत्या ७ डिसेंबर पासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण बाबींवर आम्ही जाब विचारणार व सरकारवर दबाव निर्माण करणार असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी नाईक कुटंबियांना न्याय मिळाला पाहीजे किवा नाही?या प्रश्‍नावर बोलताना न्याय निश्‍चित मिळाला पाहीजे मात्र राजकारण व्हायला नको,भाजपच्या सत्ताकाळात तसेच इतर राज्यातही अश्‍याच स्वरुपाची मुस्कटदाबी सुरु असल्याकडे लक्ष् वेधले असता चंद्रकांत पाटील यांनी अन्याय,अत्याचाराचे विषय हे राजकीय पक्ष्ाशी जोडणे योग्य नसल्याचे सांगून आज तुम्ही सूपात आहात उद्या तुम्ही पण जात्यात येऊ शकता,असा इशारा पत्रकारांना दिला!

गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आणिबाणिची आठवण काढून दिली यामागे कोणता इशारा आहे?तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्र महाराष्ट्रात आणिबाणि लावण्याच्या प्रयत्न करीत आहे,असे विधान केले होते,या प्रश्‍नावर बोलताना आम्हाला वाटतं महाराष्ट्रात स्थिती ही भयावह आहे,महिलांवर अन्याय व अत्याचार वाढले आहे.भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनीही डिसेंबरपर्यंत सरकार कोसळेल,असे भाकीत केले याविषयी विचारले असता ज्या प्रमाणे विरोधकांना त्रास देणे सुरु आहे हे बघता त्यांनी असे वक्तव्य केल्याची सारवासारव पाटील यांनी केली.हे सरकार ‘बहीरं’झालं आहे,ग्रामपंचायतीमधला निर्णय बदलला,जिल्हा परिषदेत केंद्राच्या पैश्‍यांचे असमान वाटत झाले,सगळेच प्रश्‍न घेऊन न्यायालयाची दारे नाही ठोठावता येणार नसल्याचे ते म्हणाले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी अर्णव गोस्वामीला अटक झाली का?यावर बोलताना मी फक्त वस्तूस्थितीवर विश्‍लेषण केले,राज्यात फक्त ठोकशाही सुरु आहे, ही कोणाला वाचवण्यासाठी सुरु आहे हे मात्र माहिती नाही,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली!

पदवीधर मतदारसंघातील उमेदवार लगेचच घोषित करुन टाका,असा इशारा महापौर संदीप जोशी यांच्याकडे हात दाखवत पत्रकारानी करताच मूळात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ४५ दिवस आधी घोषित करण्याचा नियम आहे मात्र अजून मतदारांची पहीली यादी ही जाहीर झाली नसताना तातडीने निवडणूकीची घोषणा करण्यात आली,आज, उद्या उमेदवार घोषित करु,असे बोलून पाटील यांनी प्रश्‍न टोलवून लावला.

Latest बातम्या