फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजजीवघेण्या खड्डयांना आता जनप्रतिनिंधीचे नाव!!

जीवघेण्या खड्डयांना आता जनप्रतिनिंधीचे नाव!!

Advertisements

नागपूर सिटिझन्स फोरमचे “खड्डेमुक्त शहर” अभियान

नागपूर,ता. ३० ऑक्टोबर: शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावे यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने अभियान सुरु केले आहे. फोरमने शहरातील नागरीकांना त्यांच्या परिसरातील खराब रस्त्यांचे व खड्ड्यांचे फोटो नागपूर सिटिजन्स फोरम च्या हेल्पलाइन नंबर 9730196885 वर ,रस्त्याच्या संपूर्ण माहितीसह whataap वर पाठविण्याचे आवाहन केले आहे.

नागपूर सिटिझन्स फोरमच्या अभियानाला पहिल्याच दिवशी नागरीकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. १५० च्या जवळपास नागरीकांनी आपापल्या क्षेत्रातील खड्ड्यांचे व खराब रस्त्यांचे फोटो फोरमकडे पाठवले. सुरुवातीला फोरमच्या माध्यमातून हे फोटो सोशल मिडीयावरुन वायरल केले जातील. त्यानंतर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. व महापौर संदीप जोशी व सार्वजनीक बांधकाम विभागातील अधिका-यांना निवेदन देऊन रस्त्यांची स्थिती सुधारण्याची विनंती केली जाईल.

यानंतरही रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही तर महापालिका व पीडब्लूडी मुख्यालयाबाहेर खड्ड्यांच्या फ्लॅक्सचे प्रदर्शन भरवण्याचा इशारा फोरमने दिला आहे. याशिवाय शहरातील जीवघेण्या खड्ड्यांना आमदार, नगरसेवक जनप्रतिनिधी व प्रशासनातील अधिका-यांची नावे देऊन नामकरण करण्याचा इशारा नागपूर सिटिझन्स फोरमने दिला आहे.

शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी हे अभियान हाती घेतल्याचे फोरमने म्हटले आहे. शहरात महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अथाॅरिटीचे रस्ते आहेत. मात्र देखभाल दुरुस्ती नसल्याने ”रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते” हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूर महानगरपालिकेने कुठलेही नियोजन न करता गेल्या दहा वर्षात सिमेंटच्या रस्त्यांची
निर्मितीचा सपाटा लावला. यामुळे पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मजबूत डांबरी रस्त्यांचा सत्यानाश झाला.

सिमेंट रस्त्यांची उंची वाढली मात्र यामुळे अनेक घरांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरल्याचे प्रकार पुढे आले. महापालिकेने अर्धवट सिमेंट रस्ते बनवून बाजूला गट्टू लावल्याने यांना सिमेंट रस्ते म्हणावे कि ‘गट्टू रस्ते’ हा प्रश्न पडला आहे. गट्टू व सिमेंट रस्त्यांच्या निर्मितीत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे काही रस्त्यांना भेगा तर काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. डांबरी रस्ते बनवितांना हाॅटमिक्सचा वापर न केल्यामुळे या रस्त्यांवरची गिट्टी निघून गेली आहे. रस्त्यांवर गिट्टी पसरल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्ते अपघातांचेही प्रमाण वाढले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेने रस्ते निर्मितीसाठी तब्बल ३११ कोटी रुपयांचा निधी ठेवला आहे.हा संपूर्ण निधी नागपूरकर नागरिकांच्या सुविधेसाठी चांगल्या व दर्जेदार रस्त्यांवरच खर्च झाला पाहिजे हा फोरमचा प्रयत्न असणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या