Homeनागपूर न्यूजकोेविड परिस्थिती हाताळण्यास मनपा सपशेल अपयशी :महापौरांनी राजीनामा द्यावा:प्रशांत पवार

कोेविड परिस्थिती हाताळण्यास मनपा सपशेल अपयशी :महापौरांनी राजीनामा द्यावा:प्रशांत पवार



नागपूर,ता. १६ सप्टेंबर: महापौर संदीप जोशी
यांनी नुकतेच जे वक्तव्य केले की नागपूर शहराची कोविड संदर्भातील परिस्थिती ही पुढील काळात आणखी जास्त कोलमडणार आहे, हे त्यांचे विधान निषेधार्ह्य असून आणि महापौर पदाचे अपयश असून या पदावरुनच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी केली.

पवार पुढे म्हणाले की,मनपा एकीकडे दावा करते की ६१ खासगी रुग्णालयांना कोविडवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली तरीही रुग्णांना या शहरात खाटाच उपलब्ध होत नाही.गरजू रुग्णांना श्‍वास घेण्यास तात्र होत असताना अश्‍या अवस्थेत एका-एका खाटेसाठी आठ-आठ रुग्णालयात भटकंती करावी लागते.अनेक रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळेच दगावलेत.त्यांच्या कुटुंबियांची कधीही न भरुन निघणारी हानि झाली आहे.मनपाच्या किती अधिका-यांनी प्रामाणिकपणे या खासगी रुग्णालयात जाऊन नियमांचे पालन होत आहे की नाही,याची पाहणी केली आहे?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

या रुग्णालयांचे ऑडिट केले आहे का?रुग्णांना कोणती औषधी दिली जात आहे?दोन-दाेन लाख रुपये उपचाराचे ही खासगी रुग्णालये रुग्णांकडून कशाची घेत आहेत?याचे उत्तर महापौरांनीच द्यावे.कारण ते या शहराचे प्रथम नागरिक आहेत,बैठकांवर बैठका घेतात मात्र त्या वांझोट््या बैठकांमधून नागपूर शहरातील नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पांढरा हत्ती ठरलेली मेट्रो जरुरी होती की आरोग्य व्यवस्था?

या शहरात आठ हजार कोटींची मेट्रो आणण्यात आली, हजारो कोटी सिमेंट रस्ते बनवण्यावर खर्च करण्यात आले,शहरातील नागरिकांना मेट्रो नावाचा पांढरा हत्ती जरुरी होता की आरोग्य व्यवस्था?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आता नागरिकांसाठी खाटाही नाहीत वरुन मनपाचे पूर्णच्या पूर्ण प्रशासनच स्वत: करोनाग्रस्त झाले,याला जवाबदार कोण?यामुळेच ‘जय जवान जय किसान’संघटनेने लॉक डाऊनची मागणी केली होती मात्र ती फेटाळून लावण्यात आली. करोनाची साखळी खंडीत होण्यासाठीच आमच्या संघटनेने लॉक डाऊनची मागणी केली मात्र महापौरांनी पुन्हा दोन दिवसांचा ’जनता कर्फ्यू’घोषित केला,याने काय साध्य होणार?दोन दिवस दूधाचे,भाजीचे आणि फळांची दूकानेही बंद राहतील यामुळे या नाशवंत वस्तूंना नागपूर महानगरपालिका कोल्ड स्टोरेज़ उपलब्ध करुन देणार आहे का?या गरीब व्यवसायिकांची नुकसान भरपाई कोण करुन देणार?मनपा आपल्या रिकाम्या झालेल्या खजिन्यामधून देणार का?

बोगस हेल्पलाईन-

मनपातर्फे वारंवार बोगस हेल्पलाईन नागरिकांना दिली जाते,याचा कोणताही उपयोग नागरिकांना होत नाही,या हेल्प लाईन केंद्रातले फोन ऑपरेटर चक्क रिसीवरच्या बाजूला काढून ठेवतात.खाटा,आॅक्सीजन,एम्ब्यूलेंस,डॉक्टर,नर्सिंग,रुग्णालये कशाचीही माहिती वेळेवर या बोगस हेल्पलाईनवरुन मिळत नाही, नागरिकांच्या वाढत्या मृत्यूचा आकडा उघड्या डोळ्याने मनपा पहात असूनसुद्धा मनपा प्रशासन फक्त वेळ मारुन नेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

एम्ब्यूलेंसवाल्यांनी शहरात अक्ष् रश: रुग्णांची आर्थिक लृट चालवली आहे. मनपाने ६५ एम्ब्यूलेंस वाढवल्याचा दावा केला मात्र त्यांची सेवा घेण्यासाठी नागरिक फोन करतात तेव्हा डीझल नाही,चालक नाही,ऑक्सीजन नाही अशी कारणे रुग्णांना सांगितली जातात.दूसरीकडे ३८ कोटींची सिवरेज लाईनसाठी निधी मंजूर केला जातो,मग १३ वर्षांच्या सत्ताकाळात मनपातील भाजप सत्ताधा-यांनी शहरात केले काय?कोणती विकासकामे केली?एकाच गडरच्या चेंबरसाठी वारंवार निधी मंजूर केला जातो,नागरिकांना हे सर्व गौडबंगाल चांगल्याने कळले आहे.

अंबाझरीच्या पाण्यावर जहाज चालवण्याऐवजी त्याचे ऑक्सीजन तयार करा-

प्रशांत पवार यांनी यावेळी अंबाझरीच्या पाण्यावर जहाज चालवण्याच्या ड्रीम प्रोजेक्टचा चांगलाच समाचार घेत,या पाण्यावर जहाज़ चालवण्याऐवजी त्या पाण्याचे ऑक्सीजन तयार करण्याची योजना राबवली असती तर आज कोविडसारख्या महामारीच्या काळात अनेकांचे प्राण वाचले असते,अशी खरमरीत टिका केली.

आयुक्तांनी संपूर्ण कारभार हातात घ्यावा-

राधाकृष्णन बी. या नवनियुक्त आयुक्तांनी संपूर्ण प्रशासन हातात घेऊन नागरिकांची सुरक्ष्ा करावी,अशी आमची मागणी असल्याचे सांगितले. ६०० रुग्णालयांत दहा-दहा खाटा नागरिकांसाठी राखीव ठेवल्याचा जो दावा केल्या जात आहे,त्यावर नियंत्रण कोणाचे आहे?याचाही तपास करावा. महापौर संदीप जोशी यांनीही स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या ऐवजी नागरिकांसाठी गरजेची असलेल्या आरोग्य व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष् दिले असते तर अशी गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती नागरिकांवर ओढवलीच नसती,असा अरोप करीत, आज शहरात जो काही अनागोंदी कारभार सुरु आहे,त्याला सर्वस्वी महापौर जवाबदार असून त्यांनी त्वरित याची जवाबदारी स्वीकारत आपला राजीनामा द्यावा व आयुक्तांनी मनपात एक चांगला,योग्य व अनुभवी प्रशासक नेमण्यात यावा अशी आमची मागणी आहे,असे ते म्हहणाले.

 

Latest बातम्या