-मास्क न वापर-यांवर आता ५०० रु.दंड
नागपूर,ता. १३ सप्टेंबर: शहरातील रुग्णालयात खाटांची कमतरता ऑक्सीजनचा पुरवठा तसेच कॉन्टेक्ट ट्रेसिंग या ती न विषयांवर जवळपास दोन तास आज विभागीय आयुक्तांच्या कक्ष्ात बैठक चालल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. चौथा विषय हा लॉकडाऊच्या संदर्भात होता. मात्र लॉक डाऊन नाहीच,असा निर्णय घेण्यात आला असून,लॉक डाऊन अजिबात करायचे नाही कारण लॉक डाऊन केल्याने प्रेशर वाढेल आणि उलट मोठ्या प्रमाणात कोव्हिडचे रुग्ण समोर येतील असं मत तज्ज्ञांनी बैठकीत मांडले असल्याचे त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
आजच्या बैठकीत आम्ही प्रशासकीय अधिका-यांवर जवाबदारी निश्चित केली आहे की जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी जवाबदारी स्वीकारली पाहीजे.लोकांमध्ये जागरुकता वाढली पाहीजे.कोविडवर अद्याप कोणतेच वॅक्सीन नाही. त्यामुळे जोपर्यंत वॅक्सीन येत नाही तोपर्यंत एकच वॅक्सीन कोविडवर काम करेल ते म्हणजे मास्कचा वापर,हात वारंवार सेनिटाईझ करणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करने,असे ते म्हणाले.
आणि त्यामुळे यावर काम करावे लागेल. प्रशासनाला मी सांगितले मला खाटांचं नियोजन करुन पाहीजे कारण तीन प्रकारचे कोव्हिडचे रुग्ण असतात एक अत्यंत गंभीर असतो,एक मध्यम स्वरुपाची लक्ष् णे असलेला रुग्ण असतो तर लक्ष् णे नसलेला रुग्ण ही असतो,आधी त्यांची त्यांची क्रमवारी निश्चित करा,यानंतर खाटा कोणाला द्यायचे नाही द्यायचे याची आखणी करा.
डॅशबोर्ड तयार करण्या संबधी बोलताना डॅशबोर्ड हे येत्या दोन दिवसात येऊन जाईल. आजच्या बैठकीत ऑक्सीजन पुरेसं असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आज काळजी नाही मात्र केंद्र सरकारने जी माहिती कोव्हिडच्या संदर्भात राज्य सरकारकडे पाठवली आहे की ३१ ऑक्टोबर पर्यंत नागपूरात ६३ हजार करोनाचे रुग्ण होतील त्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी करुन ठेवावी,सतर्क रहावं,जर रुग्ण वाढले तर ऑक्सीजनची मागणी वाढणार आहे,हे ऑक्सीजन कुठून आणायचे, यावर निर्णय देण्यात आलेला असल्याचे ते म्हणाले.
कोव्हिडसाठी जंबो फॅसिलिटी रुग्णालयाच्या संदर्भात जो प्रस्ताव सरकारल दिला आहे त्यावर परवा आपत्ती व्यवस्थापनाची मुंबईत बैठक झाली,यात तो प्रस्ताव मान्य करण्यात आला असून पत्र आलं त्यावर त्वरित काम सुरु करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आजच्या बैठकीत मृत्यू दर कमी करणे,डबलिंग वाढवणे, रिकव्हरी रेट वाढवणे यासाठी प्रशासकीय आधिका-यांची जबावदारी निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जंबो रुग्णालय सुरु करण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणारच आहे. तोपर्यंत तर प्रशासनाला युद्ध पातळीवर संक्रमण रोखण्याचे काम करावेच लागणार आहे. आज कॉन्टेक्ट ट्रेसिंग करणे सर्वाधिक गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
नागपूरात रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत का?या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री यांनी सांगितले की खाटा उपलब्ध आहेत मात्र खूप जास्त संभ्रम आहे. व्यवस्थापनमध्ये योग्य तारतम्य नाही कारण कंट्रोल रुम आणि वॉर रुम मध्ये जे तारतम्य पाहीजे होतं ते झालेलं नाही,उद्या,परवा डॅश बोर्ड लागून जातील आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लोकांना खाटांची संख्या ही माहिती होईल.गृह विलगीकरणातील बाधितांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना शहरात आतापर्यंत मास्क न वापरण्यांवर २०० रु.दंड होता तो आता ५०० रु.करण्यात आल्याची माहिती दिली.वारंवार सूचना करूनही जनता नियमाचे पालन करताना दिसत नाही . सध्या नागपूर ची परिस्थिती गंभीर आहे त्यात लोक सर्रास नियंमानच उल्लंघन करताना दिसत आहे त्यामुळं उद्यापासून नागपुरात मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कडक कारवाही कऱण्यात येणार असून २०० रुपयां ऐवजी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. सोबतच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या साठी बेड रिजर्व करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

आमचे चॅनल subscribe करा