Homeनागपूर न्यूजकाेविडमध्ये लोकांचा जीव वाचवणे ही माझी पहीली प्राथमिकता:नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी.

काेविडमध्ये लोकांचा जीव वाचवणे ही माझी पहीली प्राथमिकता:नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी.

प्रशासन व जनप्रतिनिधींच्या समन्वयानेच लोकहिताची कामे

नागपूर,ता. २८ ऑगस्ट: शहरातील मनपाद्वारा संचालित अनेक करोना चाचणी केंद्रांची वेळ ही सकाळी १० ते २ वाजेपर्यंत असताना अनेक केंद्रावरुन १ वाजताच नागरिकांना परत पाठवलं जातं,अशी माहिती नवनियुक्त मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना एका पत्रकाराने दिली असता,या पुढे प्रत्येक कोविड चाचणी केंद्रावर डिसप्ले लावला जाईल,कोविडमध्ये लोकांचा जीव वाचवण्याचा माझा पहीला प्रयत्न असणार आहे,असे विधान आयुक्तांनी केले.

मनपा मुख्यालयात दूपारी ३ वा. अनौपचारिक वार्तामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विधान केले. या चाचणी केंद्रांवरील कर्मचारी हे सकाळी ९ वा.पासून पीपीई किट घालून असतात त्यामुळे देखील कर्मचारी वर्गाला शेवटच्या काही तासांमध्ये समस्या उदभवण्याची शक्यता असल्याने काही नागरिकांना परत पाठविले जात असावे,असे समर्थन अति.आयुक्त राम जोशी यांनी याप्रसंगी केले.यावर आयुक्तांनी बोलताना तरीही चाचणी केंद्राची वेळ ही सकाळी फक्त १० ते २ असल्याने पीपीई किट त्रासाचा प्रश्‍न उद् भवायला नको,असे विधान केले.या पुढे प्रत्येक चाचणी केंद्रावर केंद्राची क्ष् मता किती,आज किती चाचण्या झाल्या,काल किती चाचण्या पार पडल्या,असा डिसप्ले बोर्ड लावला जाईल जेणेकरुन चाचणी करण्यासाठी येणा-या नागरिकांना या केंद्राची क्ष् मता आजच्या तारखेत संपली असल्याचे लक्ष्ा त येईल व ते दूस-या चाचणी केंद्रावर चाचणीसाठी त्यांना लगेच जाता येईल.

मी मनपातील आयुक्त पदाचा कार्यभार आजच स्वीकारल्याने मला फार काही सांगता येणार नाही. सकाळीच अधिका-यांसोबत बैठक घेतली. यात जगभरात थैमान घालणा-या कोविडची नागपूरातील स्थिती या संदर्भात माहिती घेतली.संपूर्ण आढावा लवकरच घेणार आहे. कोविडवर नियंत्रण आणने हे माझे पहीले प्राधान्य असणार आहे.जीव वाचवणे हे सर्वात महत्वाचे आहे.मी सकाळच्या बैठकीत हेच सांगितलं,मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणा.प्रयत्न कमी होता कामा नये. कोविडवर पूर्ण नियंत्रण येत नाही तोपर्यंत २४ जास कार्यरत रहा.पुढील दोन-तीन महिन्यात नागपूर शहातील कोविड पूर्णपणे नियंत्रणात आणणार,आढावा चालू आहे,आजपर्यंत कोविड नियंत्रणासाठी

ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांनी माझ्याही कालावधीत पूर्ण मदत करावी,असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी पत्रकारांनी त्यांना करोना बाधितांनी भरती व्हायचे कुठे?शासकीय आणि खासगी दोन्ही ठिकाणी त्यांचे हाल व लृट होत असल्याची माहिती दिली.जवाबदार आरोग्य अधिकारी हे पत्रकारांचे फोन उचलत नाहीत तर सामन्य नागरिकांचे फोन काय उचलणार?ज्येष्ठ नागरिकांना देखील कोविड चाचणीचा अहवाल हा चार-चार दिवसांनंतर मिळत असल्याचे सांगितले.यावर २४ तासात अहवाल देण्याचा शासकीय नियमच असल्याचे आयुक्त म्हणाले.यात नक्कीच सुसंगती आणल्या जाईल.आणखी सुलभता आणता येईल यासाठी दूसरे ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी करोना बाधिताचा जीव वाचवण्यासाठी ‘सुवर्ण तासाला’(गोल्डन अवर)खूप महत्व आहे. तो वाया नाही गेला पाहिजे.बाधितांना मानसिक त्रास होता कामा नये.खासगी रुग्णालयांनी शुल्क हे शासकीय नियमांप्रमाणे घेतले पाहिजे.शासनाचा हा निर्देश तंतोतंत पाळला जाईल.खाटांच्या उपलब्धतेकडे विशेष लक्ष् देणार असल्याचे ते म्हणाले.कोविड संदर्भातील सर्व संभ्रम तातडीने दूर करुन उपचाराला सुरवात करणार.

यावेळी मनपाने संलग्नित केलेल्या खासगी रुग्णालयांची व्यवस्था सुधारणार का?असे विचारले असता,सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे रुग्णांनी तातडीने उपचाराला सुरवात करण्याची.आज सकाळच्या बैठकीत मी आज झालेल्या १६ बाधितांच्या मृत्यूचा अहवाल तपासला असता ते वेळेवर उपचारासाठी दाखल झाले होते. शेवटच्या ४८ तासात त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्ष्ात आले.यात सुधारणा करावी लागेल,सुसंगती आणावी लागेल.रुग्णांना जास्त दूर प्रवास न करता जवळच्या जवळ उपचार मिळावे,यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नागरिकांमध्ये असणारी विलगीकरणासंबधीची भीती याविषयी विचारले असता,शासकीय नियमानुसार‘ अबक’ च्या आत लक्ष् णे असणा-यांनाच गृहविलगीकरणात राहण्याची गरज आहे.यापेक्ष्ा तीव्र लक्ष् णे असल्यास फोनवर संपूर्ण माहिती घेतली जाते,प्रश्‍ने विचारली जातात, खात्री केली जाते.अश्‍या वेळी वेळ वाया घालवता येत नाही. जरी गृह विलगीकरणात असले तरी वय हे पन्नास-साठच्या वर असल्यास विशेष लक्ष् देण्याची सूचना केली जाते. नागरिकांनी आपली खरी ओळख नोंदवावी.खरे पत्ते द्यावे व खरे मोबाईल नंबर करोना चाचणी केंद्राला द्यावे,खोटे पत्ते व खोटे नंबर दिल्यानेच उशिरा बाधितांचे घर ट्रेस होतात,असे ते म्हणाले.

पॉझिटीव्ह-निगेटीव्ह अहवालांचा घोळ यावर बोलताना आयुक्त म्हणाले की ॲण्टीजन तसेच आरटी-पीटीएस चाचण्यांमुळे असे होणे शक्य आहे,यावर देखील लक्ष् दिले जाईल.खासगी रुग्णालयांची लृट यावर बोलताना नेमकी तक्रार मिळाल्यास नक्कीच कारवाई केली जाईल.
माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘जनता दरबार’ सुरु केला होता, तुम्ही पण लोकाभिमूख प्रशासनांतर्गत दरबार घेणार का?यावर बोलताना आयुक्त म्हणाले की,लोकांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करील.मनपातील गंभीर आर्थिक संकट याविषयी बोलताना केवळ मनपातच नव्हे तर देशातील प्रत्येक क्ष्ेत्रावर आर्थिक संकट कोसळलं आहे.प्राधान्यक्रम ठरवू, आर्थिक उत्पन्नात वाढ कशी करता येईल,याचा प्रयत्न करु. अनेक प्रकल्प बंद असल्याकडे लक्ष् वेधले असता,यासाठी निधीही पाहीजे असतो, असे ते म्हणाले.

मालमत्ता करात झालेली ५० टक्के करवाढ याविषयी विचारले असता,यावर मी अभ्यास करुन बोलेल.मुंबईच्या धर्तीवर नागपूरात नागरिकांसाठी आपली बस सुरु करणार का?यावर बोलताना मुंबईत फक्त कर्मचा-यांसाठीच बससेवा सुरु करण्यात आली होती,असे त्यांनी सांगितले,माझा स्वत:चा वाहन चालक येऊ शकत नव्हता.यावर देखील नंतर भाष्य करील असे ते म्हणाले. शहरातील दूकाने हे सम-विषमप्रमाणे सुरु आहेत,दूकानदारांचा याला विरोध आहे याविषयी काय निर्णय घेणार?या प्रश्‍नावर बोलताना,यावर नक्की विचार करु,शहरात दररोज करोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे,या सर्व बाबी लक्ष्ात घेऊनच निर्णय घेऊ.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही दोन चाके-
माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे नागरिकांचे जास्त ऐकायचे सत्ताधा-यांचे कमी ऐकायचे,तुम्ही देखील असे करणार का?असे विचारले असता ’सभी की सुनना पडेगा,ज्यांचा पॉईंट खरा आहे,सत्य आहे, ते ऐकावे लागेल.प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल.सत्ताधारी व नागरिक या दोघांचेही ऐकले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही विकासाची दोन चाके असतात.समन्वयाने कामे केली तरच लोकहिताची कामे होऊ शकतात. शहरात दोन मोठे नेते असल्याने दडपण आहे का?याप्रश्‍नावर बोलताना,ते त्यांचे काम पाहतील,प्रशासनाच्यावतीने आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू,असे ते
म्हणाले.

Latest बातम्या