रामभक्तांवर पोलीसांकडून आकसाने कारवाईचा आरोप
नागपूर,ता. ६ ऑगस्ट: भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महराष्ट्राचे पक्षाध्यक्ष् चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रीरामाच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त आधीच आवाहन केले होते कोविड संदर्भातील सर्व नियम,निकष पाळूनच हा उत्साह साजरा करावा मात्र परवा रात्रीपासूनच,शुभेच्छा पत्रक लावू शकत नाही,फलक लावू शकत नाही,झेंडे लावू शकत नाही असा पोलिसांनी व्यवहार केला असल्याचा आरोप भाजपचे आमदार व शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांनी आज बडकस चाैक येथील आ.गिरीश व्यास यांच्या कार्यालयासमोर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत केला.
यावेळी आ.प्रा.अनिल सोले,आ.गिरीश व्यास,आ.कृष्णा खोपडे,आ. विकास कुंभारे,आ. मोहन मते,मनपा सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव व अनेक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. दटके यांनी याप्रसंगी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शरसंधान करताना,गृहमंत्री हे नागपूरचे आहे,पोलीस खाते त्यांच्यात अख्यारितित आहे,तरी देखील शहराच्या जनतेसोबत व भाजच्या कार्यकर्त्यांसाेबत पोलीसांनी असा अक्ष्म्य व्यवहार केला असल्याचा आरोप केला.
विश्व हिंदू परिषदेतर्फे आधीच पोलीस विभागाला शिष्टमंडळाने भेटून हा सोहळा कोविड-१९ चे नियम पाळून साजरा करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र तुम्ही ध्वनिक्ष्ेपक वापरु शकत नाही,तुम्ही श्रीरामाचे गाणे वाजवू शकत नाही इथपासून तर काल अनेक मोठ्या चौकांमध्ये श्रीरामाचा उत्सव साजरा करताना पोलीसांनी त्रास दिला असल्याचा आरोप दटके यांनी केला.त्यांना कोणाचे आदेश होते, या मागे कोण होते,स्वत:गृहमंत्री नागपूरातील आहेत तरीदेखील असे घडले. कोराडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते वझीर शेख यांनाही फलके लावू दिले नाहीत.
याशिवाय एनआयटी चौक, बडकस चौक, शहीद चौक असेल,आ.गिरीश व्यास यांच्यासह आम्ही शहीद चौकात गेलो, तिथेही गाणे वाजवायचे नाही,सुरक्षित अंतर राखूनही, बॅण्ड वाजावयचा नाही त्यांनी सांगितले, वाजवल्यास आम्ही कारवाई करु असा दम दिला. संजय भेंडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.हेडगेवार चौक नागपूर नागरिक बँकेच्या मार्फत सजवला गेला होता, तो सजवायचा नाही,इथपासून तर शहरातील अनेक मोठे चौक मग तो गिट्टीखदान असेल,पश्चिम नागपूर असेल,दक्ष्णि-पश्चिम असेल,सक्कदरा चौक असेल,कोणत्याही ठिकाणी योग्य आनंद साजरा करण्यास पोलीसांनी काल परवानगी दिली नाही.
आमची पोलिसांना अशी विचारणा आहे की हिंदू समाजाला धार्मिक उत्साह साजरा करण्यची परवानगी नाही मग इतर समाजाला अशी परवानगी कशी मिळते? त्यांना अशी परवानगी कोण देंत? याचा ही विचार झाला पाहिजे.जिथे शिस्त मोडली असेल तिथे कारवाई केलीच पाहिजे.पण जिथे शिस्तीत कार्यक्रम होता,जिथे सुरक्षित अंतर पाळल्या गेलं,नियम पाळल्या गेलेत,तरीही चुकीची कारवाई करण्यात आली.सरकारच्या या कृत्याचा आणि पोलीसांचा या कृत्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे दटके हे म्हणाले.
कालचं जे नागपूरातलं चांगल वातावरण होंत ते जाणूनबजून खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे,याचा मी तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे ते म्हणाले.या देशात श्रीरामाचे नाव घ्यायला जर परवानगी लागत असते, जर गुन्हे दाखल होत असतील तर यापेक्षा दूसरे दूर्देव महाराष्ट्राचे नसल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात रामभक्तांवर आकसातून कारवाई-आ.गिरीश व्यास
अयोध्येला जाऊ शकत नसल्यामुळे नागपूर,महाराष्ट्र किवा देशालाच सजवण्याचे काम हे जनतेने केले. मात्र लाऊडस्पीकरवर देवाची गाणी वाजवताना,नागरिक एकत्र येऊन आरत्या करताना,मिठाई वाटताना राज्यातील पोलिसांनी अतिरेकपणा केला अश्या घटना सर्वदूर राज्यात घडल्या आहेत. देशामध्ये देखील बंगालमध्ये लाठीचार्ज झाला.केरळमध्ये देखील अश्या पद्धतीची वागणूक रामभक्तांना मिळाली. ज्या ज्या राज्यात अश्या प्रकारची विचारप्रवृत्ती आहे त्या त्या ठिकाणी त्या विचारप्रवृत्तींनी अश्या प्रकारचा विरोध श्रीरामाच्या उत्साह साजरा करण्या-यांवर केला आणि जनतेवर एकप्रकारचा अतिरेक लादला,याचा आम्ही निषेध करतो.
या राज्यामध्ये आम्हाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काही बोलायचे नाही मात्र जो शिवसेना पक्ष् आहे ज्या पक्षाने बाबरी ढाचा पाडण्यामध्ये किवा राम मंदिर निर्माणाचे श्रेय केवळ इथे बसून घेतले त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राच्या जनतेला या शुभ प्रसंगी काय दिलं हे त्यांनी आठवंल तर त्यांचा या राम मंदिर निर्माणामध्ये कुठेही सहयोग नव्हता हे सिद्ध होतं.
नाशिक,मुंबई,औरंगाबाद असेल किवा नागपूर असेल ज्या ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिली ही वागणूक त्यांच्या नेतृत्वात झाली आहे,याचा देखील आम्ही निषेध करतो.

आमचे चॅनल subscribe करा