

अभ्यंकर नगर दूर्गा उत्सव मंडळ यांचे सहकार्य:अकरा दिवस सातत्याने केले गरिबांना अन्नदान
नागपूर,३० मे: पूर्व पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागील दहा दिवसांपासून महालक्ष्मी फाऊंडेशनतर्फे शहरातील निरनिराळ्या गरीब वस्त्यांमध्ये अन्नदानाचा उपक्रम राबविला जात आहे. उद्या रविवार दि. ३१ मे रोजी या उपक्रमाचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत दररोज ६ हजारच्या वर गरीब,गरजू कुटुंबियांना ही ‘महालक्ष्मी थाली’वितरीत करण्यात आली.
एका कुटुंबात साधारणत: ६ माणसे गृहीत धरली तरी पुरेसं आणि पोटभर सात्विक जेवण त्यांना उपलब्ध व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

वरण,भात,भाजी आणि पोळी असे पोषक व सात्विक आहाराचे शहरातील काछीपूरा,दक्ष्णि-पश्चिम भागातील अनेक वसत्यांमध्ये अन्नदान करण्यात आले.महालक्ष्मी फाऊंडेशनची संपूर्ण स्वयंसेवी चमू यांनी स्वच्छता व आरोग्य याची संपूर्ण काळजी घेऊन अहोरात्र या थाळीच्या वेष्टणाचे काम चोखपणे सांभाळले.या संपूर्ण उपक्रमासाठी फाऊंडेशनला अभ्यंकरनगर दूर्गा उत्सव मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.
शहरात २१ मार्च रोजी ’जनता कफ्यू’लागला तर २३ मार्चपासून लॉक डाऊन सुरु झाला.यामुळे गोरगरीब व कष्टकरी जनता ही भयभीत झाली. रोजगार बंद झाले,उद्योग धंधे,बांध काम व्यवसाय,दूकाने,फूटकळ विक्री सर्वच बंद झाल्यामुळे हातावर पोट असणा-या गोरगरीब जनता हवालदिल झाली. जवळचा पैसाही लवकरच संपला.अश्यावेळी दोन वेळा जेवणाची भ्रांत या नागरिकांना पडली. महालक्ष्मी फाऊंडेशनने तेव्हापासूनच १८ हजार जनतेच्या दररोजच्या जेवणाचा खर्च उचलण्यास सुरवात केली.
यासाठी भव्य असे ‘कम्यूनिटी किचन’ उभारण्यात आले. हळूहळू ६० हजारपर्यंत लोकांना अन्नदान व धान्याचे किट हे महालक्ष्मी फाऊंडेशनतर्फे पोहोचविण्यात आले.एवढंच नव्हे तर प्रतिबंधित क्ष्ेत्रातही या फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गरिबांना अन्न व धान्याची मदत सातत्याने पोहोचवली.६० हजार नागरिकांपर्यंत नि:शुल्क सेनिटायझर,मास्कचे वाटप करण्यात आले.कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली.प्रतिबंधित क्ष्ेत्रात अनेक नागरिकांपर्यंत दैनदिन व जिवनावश्यक गरजेच्या वस्तूंचा अभाव निर्माण झाला.महालक्ष्मी फाऊंडेशनतर्फे या भागातील मोलकरणी,घर कामगार,भाजी विक्रेते,फूल विक्रेते,चहा टपरीवाले, ऑटारिक्शा चालक इ.ना भरीव मदत पोहोचवण्यात आली.
या शहरात लॉक डाऊनच्या गेल्या ७० दिवसात एकही भूकबळी गेला नाही,याचे श्रेय भारतीय संस्कृतीतील ‘अन्नदान हे श्रेष्ठ दान’या संकल्पनेलाच जात असल्याचे काँग्रेसचे आमदार व महालक्ष्मी फाऊंडेशनचे अध्यक्ष् आ.विकास ठाकरे यांनी सांगितले. फाऊडेंशनतर्फे आता पर्यंत अनेक गरीब मुलींचा विवाह,रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर इ.विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे.या पुढे देखील लॉक डाऊन वाढले तरी महालक्ष्मी फाऊंडेशन हे समाजाचे ऋण असेच निरंतर फेडत राहील. आपली सामाजिक बांधिलकी जपत राहील असे आ.विकास ठाकरे म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
