फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजदूध,सेवई,ड्राय फ्रूट,डालड्याचेही वांदे...तरीही साजरी झाली मुस्लिम बांधवाची अनोखी ‘ ईद’

दूध,सेवई,ड्राय फ्रूट,डालड्याचेही वांदे…तरीही साजरी झाली मुस्लिम बांधवाची अनोखी ‘ ईद’

Advertisements

मुस्लिम बांधवांनी गरजूंना दिला जकात

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,२५ मे:ऐ रुठे हूये देश मुझे इतना बता दे क्या मुझसे मिलने का अब मन नही होता…बच्चो की तरह दौड के आ..सीने से लग जा..ये ईद का दिन है…कोई दुश्‍मन नही होता ’ईदचा सण मात्र…आज गले लग के ‘ईद मुबारक’म्हणून शकत नव्हते. मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे ‘ईद’मात्र लॉक डाऊनमुळे अनेकांच्या घरी दूधाचे पाकीटं,सेवई,डालडा,ड्राय फ्रूटही पोहोचले नाहीत…अनेकांनी खोब-याच्या किसमध्येच सारखर टाकून केला अनोखा ‘शिरखूरमा’आणि गोड मानून घेतले अल्लाहच्या या मेहरबानीलासुद्धा!

रमजानचा महिना संपल्याबरोबर गोडधोड खाऊन,नवे कपडे घालून ‘शिरखूरमा’ची लज्जत तोंडात विरघळून साजरी होणारी ईद आज नागपूरात नेहमीसारखी साजरी झालीच नाही मात्र त्यापेक्ष्ाही जास्त प्रेमाने…जवाबदारीने साजरी करण्यात आली,हे विशेष! मोठ्या ताजबाग भागाला सध्या प्रतिबंधित क्ष्ेत्र घोषित करण्यात आल्यामुळे गेल्या ८ मे पासून हा भाग टिन आणि बल्ल्या लावून सील करण्यात आला आहे. या भागात तर मुस्लिम बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या भागातील एका डॉक्टर महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता.यानंतर हा संपूर्ण भाग मनपा प्रशासनाने सील केला. ‘ईद‘असल्यामुळे या भागातील बांधवांना अपेक्ष्ा होती,लहान किराणा दूकाने उघडतील,दूध,सेवई,ड्राय फ्रूट विकत घेता येईल मात्र….!दिवसभर मोमिनपुरा,महेंद्र नगर, सतरंजीपुरा,मोठा ताजबाग या भागातील मुस्लिम बांधव हे या जिन्नससाठी वणवण भटकले मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडली.

रमजान महिन्याची ईदची नमाज ही मज्सिद किवा ईदगाहमध्ये अता केली जाते.याच ठिकाणी नमाज अता करण्याला कुराणमध्ये अत्यंत महत्व आहे.मात्र आयुष्यात पहील्यांदा लॉक डाऊनमुळे असे घडले,नागपूरातील सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरीच ईदची नमाज अता केली. एकदुस-यांची गळा भेट घेऊन ‘ईद मुबारक’म्हणन आनंद द्विगुणित करु शकत नसल्यामुळे सोशल मिडीया व व्हॉट्स ॲपवरच एकदुस-यांना ‘ईद मुबारक’ च्या शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ समाजसेविका व मुस्लिम महिला मंचाच्या संचालिका रुबिना पटेल यांनी सांगितले की,शासनाचा नियम आहे १४ दिवस ज्या भागात एकही कोराेना बाधित सापडला नाही त्या क्ष्ेत्रातील प्रतिबंध हे हटवले जाते. आमचा भाग तर गेल्या ८ मे पासून बंद आहे.जी डॉक्टर महिला कोरोना बाधित आढळली तिचा पहीला अहवाल निगेटीव्ह दूसरा पॉझिटीव्ह तर तिसरा पुन्हा निगेटीव्ह आल्याचे सांगितले जाते. ती डॉक्टर महिला पूर्णपणे बरी होऊन घरी आली. तिचा होम क्वारंटाईनचा कार्यकाळही संपला,तिच्या सपंर्कात आलेले कुटुंबिय,शेजारी आदींना विलगीकरणात नेण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले व ते देखील घरी परत आले मात्र मनपा प्रशासनातर्फे अद्याप या भागातील प्रतिबंध उठवण्यात आलेच नाही.

महिलांनी ३ किलोमीटरचा फेरा मारुन लांबवरच्या भागातून शिरखूरमासाठीचे साहित्य आणण्याचा प्रयत्न केला मात्र अनेकांच्या दूकानातले जिन्नस हे संपले होते. महिला पहाटे ४ वाजता उठून स्वयंपाक करतात,पाणी भरतात,उपवासातच आधी कुटुंबिय,लहान मुले यांच्यासाठी गोड-धोड बनवतात. आजची ईद त्यांना आणखी जास्त परिश्रम करायला लावणारी होती.अनेक घरातील पुरुष मंडली ही देखील दूपारच्या रणरणत्या उन्हात शिरखुरमाच्या जिन्नसांसाठी भटकत होती.मात्र प्रशासनातर्फे ‘ईद’निमित्त दूध,सेवई,मिठाई,ड्राय फ्रूट,डालड्याची साधी तीन-चार दूकानेसुद्धा या भागात सुरु ठेवण्यात आली नसल्याची खंत रुबिना पटेल यांनी व्यक्त केली.

पूर्ण एक महिन्याचे रोजे ठेवल्यानंतर ‘ईद के चांद’चा दीदार झाल्यानंतर ईद साजरी केली जाते.यानंतर जकात दिला जातो. शहरातील मुस्लिम बांधवांनी तर लॉक डाऊन सुरु झाल्यावरच असा जकात शहरातील गरीब,गरजूंना देण्यास सुरुवात केली होती.अनेक स्वयंसेवी संस्थांनी यात सहभाग नोंदवला. आजही ईदची नमाज अता केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आपापल्या परिने हा जकात देण्याचा प्रयत्न केला. गरिबांना भोजन दिले.पुढील ईद मात्र जोरदार रोशनाई करुन दुप्पट आनंदाने साजरी करण्याचे अभिवनचन ही मुस्लिम बांधवांनी स्वत:लाच दिले हे विशेष!

मोमिनपुरा,महेंद्र नगर येथील तर किराणा दूकाने देखील संपूर्णत: बंद होती,याचे खूप आश्‍चर्य वाटले,अशी खंत मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संयोजक मोहम्मद फारुख शेख यांनी व्यक्त केली.या भागातील लोकांना आज दूधासाठीसुद्धा अनेक किलोमीटरची भटकंती करावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले.दूधाशिवाय शिरखूरमा बनणार तरी कसा?प्रशासनाचे किमान ‘ईद‘निमित्ततरी या भागातील किराणा दूकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यायला हवी होती,अशी खंत त्यांनी व्यक्त केली. घरातील मुलांचे तोंड गोड करायला आज खूप जास्त कष्ट पडले असल्याचे त्यांनी सांगितले.घरीच नमाज अता केला. घराबाहेर जिन्नस आणण्यासाठी गेले असता अनेकांना पोलीसांनी दरडावून घरी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

घरीच केला नमाज अता-
देशात चौथा लॉक डाऊन सुरु आहे. शासनाचे सर्व नियम आणि सूचनांचे पालन मुस्लिम बांधवांनी केले. घरीच राहून ईद साजरी केली. सोशल डिस्टंसिंगचे अंतर राखून एकमेकांची गळा-भेटही घेतली नाही. जेवढे शक्य होते,तसा गरीबांना जकात देऊन दान-धर्मही केला.
आम्ही या देशाचे नागरिक म्हणून या देशाच्या संविधानाला मानतो. देशातील सरकारनी दिलेल्या आदेशांचे आम्ही पालन ही केले. घरातच नमाज अता केली.कोणताही अवाजवी अट्टहास केला नाही.प्रशासनाचे संपूर्ण नियम पाळले.आयुष्यात पहील्यांदा हे घडले. अशी ही ईद आयुष्यभर लक्ष्ात राहील,असे अनेक मुस्लिम बांधवांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितले. समाजात आधीपासूनच जागरुकता होती.गळा-भेट घेऊन कोणीही आलिंगन केले नाही.ईदसोबतच या देशाचे एक जवाबदार नागरिक म्हणूनही आम्ही आज अापले कर्तव्य चोखपणे बजावले असे समाधानही अनेकांनी व्यक्त केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या