Homeराजकारणकुठलाही मुद्दा राजकीय करु नये: प्रवीण दटके

कुठलाही मुद्दा राजकीय करु नये: प्रवीण दटके


पंतप्रधानांनी तांत्रिकबाबींचा पूर्वीच विचार करुन घेतलेला निर्णय

नागपूर: उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वा. घरातील,अंगणातील किवा बालकनी,गॅलरीत येऊन टॉर्च, मेणबत्तया,दिवे,पणत्या लावण्याचे केलेले आवाहन हे ‘साठी बुद्धी नाठी’ अशी टिका करुन ५ एप्रिल रोजी रात्री ९ वा. कोणीही घरातील लाईट्स बंद करु नये व पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद देऊ नये,असे विधान केले होते. यावर देश आणि देशवासियांच्या भल्यासाठी उचलण्यात येणारा कुठलाही मुद्दा राजकीय करु नये,असे आवाहन भारतीय जनता पक्ष्ाचे शहर अध्यक्ष् प्रवीण दटके यांनी व्हीडीयोच्या माध्यमातून केले आहे.

जर एकाच वेळी सगळ्यांनी विजेचे दिवे व पंखे बंद केले तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊन देशातील सर्व निर्मिती केंद्रे बंद पडून अतिशय मोठे नुकसान होईल. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कित्येक तास लागतील,यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले रुग्ण तडफडून मरतील याची मोदींना चिंता नसल्याची परखड टिका नितीन राऊत यांनी केली होती.या पार्श्वभूमीवर दटके यांनी पंतप्रधानांनी या सर्व गोष्टींचा आधीच योग्य तो तसेच सर्व तांत्रिक व शास्त्रीय बाबींचा विचार करुनच हा निर्णय जाहीर केला असल्याचे सांगितले. त्यामुळेच कुठलाही मुद्दाही हा राजकीय करु नये,भाजपसह सर्वच राजकीय पक्ष्ांना मी अशी विनंती करतो.

पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्यामागील सर्व तांत्रिक व शास्त्रीय बाजू त्यांनी तपासून घेतल्या असतील व त्यानंतरच त्यांनी देशवासीयांना हे आवाहन केल्याचे ते म्हणाले. परिणामी ज्येष्ठ राजकीय नेते व शहराचे पालकमंत्री नितीन राऊत यांना एवढेच सांगू इच्छितो कि पंतप्रधानांनी लाईट,पंखे बंद करणे किवा फ्रिज बंद करण्याचे आवाहन केले नाही,केवळ ९ मिनिटांसाठी लाईट्स बंद करण्यास सांगितले आहे त्यामुळे घरातील इतर इलेक्ट्रॉनिक्स बाबी या सुरुच राहणार आहेत. अगदीच थोडा दवाब त्यामुळे ग्रीडवर निर्माण झाला तरी त्याही बाबींचा विचार पंतप्रधानांनी घोषणा करण्यापूर्वीच केला असेल.त्यामुळेच यात उगाच राजकारण आणू नये.

पंतप्रधानांनी हे देशाच्या एकात्मेसाठी,समसरतेसाठी आवाहन केले असून अश्‍याच उपक्रमांच्या माध्यमातून ठलकपणे एकात्मक्ता दिसून पडू शकते. त्यामुळेच कोणी मेणबत्ती लावावी,कोणी दिवे लावावे,कोणी टॉर्च लावावा,कोणी मोबाईलचा लाईट लावावा पण पंतप्रधानांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.

पंतप्रधान हे संपूर्ण राष्ट्राचे असतात,ते काही एका राजकीय पक्ष्ाचे प्रमुख नसतात.त्यामुळे माझी माझ्या पक्ष्ासह संपूर्ण नागपूरकरांनाच अशी विनंती आहे पंतप्रधान असतील किवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एखादी घोषणा केली असेल त्याचेही पालन करावे,त्यात कोणतेही राजकारण आणू नये,अशी अपेक्ष्ा त्यांनी व्यक्त केली.

Latest बातम्या