
फूटण्याची गोष्ट सोडा, आमदारांना फाेडण्याची भाजपची हिंमत नाही
नागपूर: महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष् म्हणून भारतीय जनता पक्ष्ाला बहूमत सिद्ध करण्यासाठी संधी देणे हे कायद्याला धरुनच आहे. ११ ता.ला रात्री ८ वाजेपर्यंत भाजपला त्यांचा निर्णय राज्यपालांना कळवायचा आहे. महाराष्ट्राची अस्थिरता संपवायची असेल तर १०५ आमदार असणाऱ्या भाजपला त्यांनी बहूमत सिद्ध करण्यासाठी पहीली संधी देणे योग्य आहे,शिवसेनेची देखील हीच भूमिका होती.खरे तर निकाल लागल्याबरोबर पुढल्या २४ तासात भाजपने हा दावा करायला हवा होता. अनेक राज्यात त्यांनी बहूमत नसतानाही तातडीने सत्ता स्थापनेचा दावाही केला आहे. राज्यपालांच्या भूमिकेचे शिवसेना स्वागत करते. मात्र आपण बहूमत सिद्ध करु शकतो,बहूमत विकत घेऊ शकतो असे चित्र केंद्रात आणि अनेक राज्यात निर्माण झाले होते ते महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकले नाही, बहूमत विकत घेण्याचा भाजपचा भ्रमाचा भोपळा हा फूटला असल्याचे विधान शिवसेने नेते संजय राऊत यांनी रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी मुंबई येथे सकाळी १० वा. घेतलेल्या पत्र परिषदेत केले.
भाजप हा सत्ताधारी पक्ष् असताना त्यांनी महाराष्ट्रात देखील तातडीने सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता मात्र पंधरा दिवस भाजपने कोणताच दावा केला नाही आणि राज्यात अस्थिरता निर्माण झाली याची दखल घेऊन राज्यपालांनी राजकीय प्रक्रिया सुरु केली,असे ते म्हणाले.भाजप महाराष्ट्रात बहूमत विकत घेऊ शकत नसल्यामुळे सगळेच शांत झालेत. भाजप कोणालाही विकत घेऊ शकत नाही.पूर्वी राज्यात भीतीचे वातावरण होते. भीती दाखवून आमदार फोडण्याची रणनीती महाराष्ट्रात अयशस्वी झाली.आमदार फूटण्याची गोष्ट सोडा भाजपमध्ये आमदार फाेडण्याची हिंमत नसल्याचे ते म्हणाले. फाटाफूट होईल,काँग्रेसचे आमदार फूटतील अश्या अफवांचा पुड्या कितीही सोडल्या तरी काँग्रेस फूटणार नाही. आमचे नेता ही ‘व्यापारी’नसल्याचा टोला त्यांनी हाणला.डील शब्द हा व्यापाराशी जुळला आहे. शिवसेनेने कधीही व्यापार केला नाही. लाभ-हानि,बॅलेंस शिट हे शिवसेनेत नाही.
कश्मीरात मेहबूबा मुफ्ती,बिहारचे नीतीश कुमार यांचे भाजपविरोधी विधानांचे व्हीडीयो व्हायरल झालेत त्याचप्रमाणे सेनेने राज्यात काँग्रेसच्या विरोधात केलेल्या विधानांचे व्हीडीयो व्हायरल होणे हा काही मुद्दा नसल्याचे राऊत हे म्हणाले. राजकारणात अश्या गोष्टींचा विचार करुनच पुढे जायचं असतं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहमंत्री पदाबाबत केलेल्या विधानाकडे संजय राऊत यांचे लक्ष् वेधले असता दिल्लीमधील स्थिती ही बरोबर नसल्याने ते विधान केले मात्र काश्मीरमध्ये स्थिती ही नियंत्रित असल्याने गृहमंत्री म्हणून ते मजबूत,सक्ष् म नेता असल्याचे मी मानतो,असे ते म्हणाले.
‘खानदानी रईस हा दिलदार असतो’राऊत यांच्या या ट्वीटकडे माध्यम प्रतिनिधींनी लक्ष् वेधले असता,खानदानी रईस हा दिलदारच असतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावली होती, खानदानी माणूस हा मागे हटत नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्ष्ाविषयी बोलताना काँग्रेस हा काही महाराष्ट्राचा शत्रू नाही, आम्ही केंद्रातही भाजपच्या अनेक धोरणांना विरोध केलाच होता,जीएसटीसारख्या धोरणाला शिवसेनेने विरोध केला असल्याची आठवण त्यांनी अधोरेखित केली. काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण ते शरद पवार,आबा पाटील ते जयंत पाटील प्रत्येकाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या हिताशी कोणी तडजोड केली नाही. उलट बेळगाव,कारवार,निपाणी विषयी भाजपनेच तडफ दाखवावी असे आव्हान त्यांनी केले. काँग्रेसने स्थिर सरकारसाठी पाठींबा देण्याची भूमिका घेतली तरी राज्याची जनता या निर्णयाचे स्वागतच करेल.
राममंदिराच्या मुद्दाबाबत बोलताना राममंदिराचा मुद्दा हा काही एका पक्ष्ाचा नाही तो देशाचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले. राम मंदिर निर्माणात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. कारसेवेतअनेक शिवसैनिक शहीद झालेत. एकमेव बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी ‘बाबरी तोडण्यात जर शिवसैनिकांचा हात असेल तर शिवसैनिकांचा मला गर्व आहे’,असे अभिमानाने सांगितले होते.सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० हे मुद्दे देशाचे आहेत पक्ष्ाचे नाही,असा टोला त्यांनी भाजपला लगावला. राममंदिर आंदोलनात बजरंग दल,कराेडो साधू संत,असंख्य लाेकांचा,असंख्य संघटनांचा हातभार लागला असल्याकडे त्यांनी लक्ष् वेधले.
शिवसेनेतर्फे आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत का?या प्रश्नाबाबत बोलताना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल ही आमची स्पष्ट भूमिका अाहे.

आमचे चॅनल subscribe करा