Homeराजकारणराज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखं अद्याप काही नाही-शरद पवार

राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखं अद्याप काही नाही-शरद पवार

भाजप-सेनेने महाराष्ट्रात सत्ता स्थापित करावी,जनतेचा कौल त्यांनाच

नागपूर: भारतीय जनता पक्ष् व शिवसेना युतीला महाराष्ट्राच्या जनतेने सरकार स्थापनेसाठी स्पष्ट कौल दिला आहे,त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी,आम्ही विरोधात बसण्यासाठी तयार आहाेत,जनतेने आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष्ाची भूमिका वठवण्यासाठीच काैल दिला आहे,बाकी राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखे अद्याप काही नसल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष् शरद पवार यांनी सांगितले. ते बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले,की दोन्ही पक्ष् निकाल मान्य करतील अशी मला आशा आहे. संजय राऊत हे काही प्रस्ताव घेऊन आले होते का?या प्रश्‍नावर बोलताना,ते नेहमी येतात तसेच आले होते, नेहमीच भेट ही सकारात्मकच होते, राऊत हे प्रस्ताव घेऊन आले नव्हते,राऊत यांनी १७० चा आकडा मलाही दिला अशी कबूलीही पवार यांनी दिली. मात्र युती ही २५ वर्षे जुनी आहे याकडे त्यांनी लक्ष् वेधले. शिवसेना २५ वर्षे युतीत सडली,शिवसेनेच्या या वक्तव्याकडे पवारांचे लक्ष् वेधले असता ‘२५ वर्षे युतीत सडली तरी निवडणूक एकत्रित लढली’अशी कोटी त्यांनी केली. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे सरचिटणीस अहमद पटेल यांच्या भेटीकडे लक्ष् वेधले असता,या भेटीबद्दल मी काहीही सांगू शकणार नसल्याचे ते म्हणाले मात्र सोनिया गांधींना मी पुन्हा भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.बघूया येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात काय घडतं?असे ते म्हणाले.पटेल गडकरींकडे रस्त्याचे काम घेऊन गेले असावे,अशी कोटीही त्यांनी केली आणि एकच हास्य उमटवले.

सत्तास्थापनेत त्यांची भूमिका काय?यावर बोलताना सत्तास्थापनेत माझी कोणतीही भूमिका नसल्याचे ते म्हणाले. मी पुणे, सातारा आणि कऱ्हाडला जाणार असल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे संख्याबळच नाही तसेच दुसऱ्याला सल्ला देण्याचा मला अधिकार नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेसची शिवसेने-भाजपबाबतची भूमिका ही पूर्वीपासूनच तशीच आहे,ती आजची भूमिका नसल्याकडे त्यांनी लक्ष् वेधले,याचा अर्थ शिवसेनेला काँग्रेसचे समर्थन मिळणे शक्य नसल्याचेच अप्रत्यक्ष् पणे त्यांनी अधोरेखित केले. आघाडी ही एकत्रितपणे निवडणूक लढल्यामुळे सत्तास्थापनेबाबतही कोणताही निर्णय हा एकत्रितच घेऊ असे ठामपणे त्यांनी सांगितले. आमच्याकडे संख्याबळ असते तर आम्ही वाट बघितली नसती किंवा पत्र परिषदही घेतली नसती. आम्ही १०० च्या वर गेलो नसल्यामुळे सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.२०१४ ची परिस्थिती ही आज नाही. लोकांनी जो निर्णय दिला आहे त्यावर आता आम्ही वेगळे काहीही करु शकत नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री पवारांनीच व्हावे का?या प्रश्‍नावर बोलताना मला मुख्यमंत्री होण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मी चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहीलो आहे. राष्ट्रपती राजवटबाबत प्रश्‍न विचारले असता त्यांनी सध्या यावर काहीही बोलता येणार नसल्याचे सांगितले.

दिल्लीत पोलिसांना चुकीची वागणूक-
देशाच्या राजधानीत पोलिसांच्या बाबतीत जे घडले त्यामुळे जगात खूप चूकीचा संदेश गेला आहे. पोलिस हे गणवेषात असताना त्यांना मारहाण करण्यात आली. दिल्लीतच नव्हे तर सगळ्याच राज्यात पोलिसांची स्थिती ही गंभीरच आहे. १६ ते १८ तास ते कर्तव्य बजावत असतात, आठवड्याची सुटी देखील त्यांना अनेकदा मिळत नाही. अश्‍या सगळ्या परिस्थितीत ते काम करीत असताना त्यांना झालेली अमानुष मारहाण ही चुकीची वागणूक आहे. मी दिल्लीच्या बार कॉऊंसिलच्या अध्यक्ष्ांची बोलून याकडे जातीने लक्ष् घालण्याची विनंती केली आहे. पोलिसांसोबत जे घडले ते दूर्देवी होते,केंद्राने याकडे लक्ष् लक्ष् देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांबाबत केंद्राला जबाबारी झटकता येणार नाही-
महाराष्ट्रात अतिवृष्टिमुळे शेतकर्यांची स्थिती ही अत्यंत गंभीर झाली असून त्यांच्यावर फार मोठे संकट कोसळले आहे. शेतकर्र्यांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यांना नव्याने कर्ज पुरवठा करावा तसेच विमा कंपनी या जबाबदारी घेत नसल्यास सरकारने त्यांना सूचना करावी.

अयोध्येच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर समाजकंटकांनी आततायी भूमिका घेऊ नये-
संपूर्ण देशाचे लक्ष् लागलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचा निकाल हा येत्या ९ ता.ला लागणार आहे. निर्णय कोणताही लागला तरी समाजाच्या कुठल्याही घटकाने यावर आततायी प्रतिक्रिया देता कामा नये. समाजकंटकांनीही आततायी भूमिका घेऊ नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये.

Latest बातम्या