Advertisements

(एपस्टीन फाईल्स भाग-४)
भारताचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी ,उद्योगपती अनिल अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही नावे जगभरात गाजलेल्या एपस्टीन फाईल्स मध्ये आहे.भारत सरकारने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाईल्समध्ये ३० वर्षांची माहिती असल्याचा दावा केला आहे,परिणामी ३० लाखाहून अधिक दस्तावेज दररोज उघड करण्याची प्रक्रिया सुरु आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ही नाव दोन इमेल्समध्ये आले असल्याने देशात विरोधकांनी यावर राळ उठवली आहे.
एपस्टीनकडून मोदींनी सल्ला घेतला असल्याचा उल्लेख या ईमेल्स मध्ये आढळतो.२०१७ मध्ये मोदी हे इस्त्राईलला गेले असता,अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना खुश करण्यासाठी नेमकं काय करावं?अशी विचारणा मोदी यांनी एपस्टीनला केली.यावर ट्रम्पला खुश करण्यासाठी तुम्ही गाणं म्हणा व नृत्य करा,असा सल्ला एपस्टीपने मोदींना दिला असल्याचा उल्लेख एपस्टिीच्या ईमेलमध्ये सापडतो.ट्रम्पसाठी मोदी हे नाचले व गायले,असा याचा शब्दश: अर्थ होत नसला, तरी देशाच्या पंतप्रधानाचे हे कृत्य गंभीरच असल्याचा आरोप करीत, लोकसभेचे विरोधी पक्षाचे नेते राहूल गांधी वारंवार हा मुद्दा घेऊन मोदी व त्यांच्या सरकारवर प्रहार करीत आहेत.
एपस्टीनने एका ईमेलमध्ये पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करीत ‘ Modi on Board’असा मेल केला आहे!
यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जुलै २०१७ मध्ये मोदींच्या इस्त्राईलच्या दौ-यामध्ये अधिकृत भेटीशिवाय उर्वरित इमेल्स हे एका दोषी गुन्हेगाराच्या निरर्थक बडबडीशिवाय इतर काहीही नाही,असा खुलासा केला.महत्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी हे एपस्टीनला अनेक वेळा भेटले हे ईमेल्सवरुन सिद्ध झाले आहे.
यावर खुलासा करताना देशाचा हा मंत्री सांगतो की जेव्हा ते पहील्यांदा एपस्टीनसोबत भेटायला गेले होते तेव्हा हे त्यांना माहितीच नव्हते ते कुठे चालले आहेत!त्यांना सांगण्यात आलं की ड्रायव्हर तुम्हाला गंतव्य ठिकाणी पोहोचवून देईल.हरदिप सिंह पुरी हे विदेश मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारी राहीले आहेत, ते मुत्सद्दी आणि राजदूत राहीले आहेत.त्यांना हे माहितीच नव्हते की त्यांचे वाहन त्यांना नेमके कुठे घेऊन चालले आहे,ते काय इतके लहान होते की लॉलिपॉप बघून गाडीत बसले?असा प्रश्न काँग्रेसने केला.
यानंतर हरदिपसिंह पुरी सांगतात की गाडीत बसल्यानंतर मी गुगलमध्ये शोध घेतला.मग मला खूप बेचैनी वाटली की मी नेमका कुठे चाललो आहे,यानंतर माझ्यासोबतच्या सहका-याला विचारले की काय आपल्याला तिथे भेटायला गेलं पाहिजे,जिथे आपण जात आहोत?यावर काँग्रेस म्हणते,इतका मोठा मुत्सद्दी राहीलेला व्यक्ति दुस-या वर्गातील विद्यार्थ्यासारखा असा खुलासा करतो!काय शोकांतिका आहे.
यानंतर हरदीपसिंह पुरी सांगतात की आमच्यापैकी काहींना एपस्टीनच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर शंका होती!याचा अर्थ हरदिपसिंह पुरीच एपस्टीनला क्लिनचिट देण्यासारखा प्रकार नाही का?जेव्हा २००८ मध्ये फ्लोरिडाच्या कोर्टात एपस्टीनने लैंगिक शोषणासारखा आपला गुन्हा कबूल केला होता,त्याला शिक्षा ही भोगावी लागली होती, हे इतक्या मोठ्या मुत्सद्दीला माहिती नव्हते का?आता काय साक्षात ब्रम्हदेवाने येऊन हरदीपसिंह पुरीला येऊन सांगावे का, की एपस्टीन हा गुन्हेगार आहे, की तुमचा देव मोदी सांगतील तेव्हाच पुरी साहेबांना विश्वास होईल,असा टोला काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा हाणतात.
हे हरदिपसिंह पुरी यांच्या बुद्धिमत्तेची,नैतिकतेची पात्रता सिद्ध करतात, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्री बनवले,ते ही, ते खासदार म्हणून निवडून आलेले नसताना.पुरी यांना मोदी यांनी राज्यसभेत फक्त मंत्री बनवण्यासाठी मागच्या दाराने संसदेत आणले,अशी काय पात्रता होती पुरींमध्ये?एपस्टीनसोबतचे त्यांचे प्रगाढ संबंध हीच पात्रता होती का पुरी यांना मंत्री करण्यामागे?असा बोचणारा सवाल पवन खेडा यांनी केला.
एका मुलाखतीत हरदिपसिंह पुरी खुलासा करतात की माझी फार जास्त चर्चा एपस्टीनसोबत झाली नाही.एक दोन ईमेल्स आणि तीन चार वेळा प्रत्यक्ष भेट,एवढंच.पण,यातही ते खोटे बोलत आहेत.एका इंग्रजी वृत्तवाहीनीला हरदिपसिंह पुरी सांगतात की एपस्टीनला मी कधीही भेटीसाठी वेळ मागितला नाही,मात्र,एपस्टीनच्या खुल्या झालेल्या ईमेल्समध्ये हरदिपसिंह पुरींचा मेल आहे,‘Jef can i see you’,‘ Jef are you in Down’,मग या ४६ पानांमधील तुमच्या मेलमध्ये एपस्टीनसोबतचे तुमचे संभाषण काय सिद्ध करतात?तुम्हीच भेटीसाठी भीक मागत होता ना?असा आरोप पुरी यांच्यावर विरोधक करतात.
हरदिपसिंह पुरीवर मोदींचा दबाव होता का,जा आणि एपस्टीनची भेट घ्या?२०१४-१६ मध्ये तीन राजदूत होते अमेरिकेत भारताचे.त्यातील एक होते एस.जयशंकर,दूसरे अरुण सिंह आणि तिसरे नवतेज सरणा,ते तिघेही काय,हरदीपसिंह पुरीसारख्या निवृत्त नोकरशहापेक्षा नालायक होते का?हे काम मोदींनी भारताच्या या राजदूतांना का सांगितलं नाही?२०१४ ते २०१६ दरम्यान हरदिपसिंह पुरी कोणत्याही पदावर नव्हते,मग हे कोणाच्या आदेशावर एपस्टीनसोबत भेटायला जात होते?त्याच्यासोबत ईमेलने संवाद साधत होते?
सर्वात महत्वाचे म्हणजे १३ नोव्हेंबर २०१४ रोजी रिड हाफमॅनला एपस्टीनने एक मेल केला ज्यामध्ये तो ‘डिजिटल इंडिया’विषयी माहिती देत होता.भारतात डिजिटल इंडियाची घोषणा जुलै २०१५ मध्ये झाली.याचा अर्थ एपस्टीनला भारताच्या नागरिकांच्या आधी डिजिटल इंडियाची माहिती झाली,की अशी योजना भारतात सुरु होणार आहे.याची माहिती हरदिप सिंह पुरी यांना देशाच्या नागरिकां आधी एपस्टीनला देणे गरजेचे का वाटले? याचाच अर्थ या देशाची सरकार एपस्टीन सारखा एक दलाल अमेरिकेतून चालवत होता का?
यूपीएससी उत्तीर्ण झालेले हरदिपसिंह पुरी वृत्त माध्यमांकडे एपस्टीनसोबतच्या भेटींबाबत खुलासा करतात की मी तर डिजिटल इंडियाची माहिती त्याला देत होतो,मूळात हरदीपसिंह पुरींना हा अधिकार होता का?ते तर सरकारमध्ये ही नव्हते!मोदींनी आता हरदिप सिंह पुरी यांच्या या खुलाशानंतर ,देशासमोर हे स्पष्ट करावे की त्यांचा आणि हरदीप यांचा व मोदी व एपस्टीन यांच्यात काय नातं आहे?अशी मागणी विरोधक करतात.
२०१७ मध्ये आरआयएसचे हरदिपसिंह अध्यक्ष होते.त्यावेळी हरदिप सिंह पुरी हे भारत सरकारचे नोकरशहा होते.अश्यावेळी ते एपस्टीनला मेल का करत होते?ते ही एका लैंगिक गुन्हेगाराला!
यावरही हरदिपसिंह माध्यमांना सांगतात की ’अरे काही झालं असतं तर मी सांगितलं असतं,मै तो इसी पे रह गया’हरदिप सिंह पुरी यांचे हे शब्द त्यांची प्रवृत्ती स्पष्ट करतात.हरदिप सिंह पुरी यांना हे सांगायचं आहे का,की मी सेक्स क्राईमचा हिस्सा झालो असतो तर मी तुम्हाला काही सांगू शकलो असतो,ही हरिदिपसिंह पुरी यांची पश्चाताप बुद्धी आहे का?अश्या मंत्र्याला एक मिनिट देखील मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का?
हरदिपसिंह पुरी एपस्टीनला मेल करतो,जेफ मी तुला भेटू शकतो का आणि एपस्टीनचे त्यांना उत्तर येतं की ‘मध्य पूर्वमध्ये जे होत आहे मला ते अजिबात रुचलेलं नाही,माझं या बाबत खूप ठाम मत आहे’.हा जून मध्ये झालेला संवाद आहे आणि त्याच वर्षी मे महिन्यात पेलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास भारतात आले होते.याचा अर्थ एपस्टीन इस्त्राईलच्या वतीने भारताला धमकावत होता का?२०१७ मध्ये पुढल्याच वर्षी मोदी हे इस्त्राईलला गेले पण त्यांनी पेलेस्टाईनची भेट टाळली,ही एपस्टीनची भीती होती का?परराष्ट्र धोरण कोण चालवत होता या देशाचे?मोदी की एपस्टीन?तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या नावाने तर एक ही मेल नाही आहे,मग परराष्ट्र धाेरण निश्चित कोण करत होते?एस.जयशंकर,अरुण सिंह,नवतेज सरणा यांचेही कोणत्याच मेलमध्ये नाव नाहीत, जे याच काळात अमेरिकेत भारताचे राजदूत होते तर परराष्ट्र धोरण कोण राबवत होतं?हरदिपसिंह पुरी?
हरदिपसिंह पुरी ही तर कठपुतली आहेत.पण देशाचे पंतप्रधान मोदी इस्त्राईलमध्ये ट्रम्प यांना खुश करण्यासाठी २०१७ मध्ये नृत्य आणि गाणे गात असल्याचा अजब खुलासा एपस्टीने आपल्या ईमेलमध्ये केला आहे.अमेरिकेच्या न्याय विभागाकडून खुले करण्यात आलेल्या एपस्टीन फाईल्समधील हे मेल एपस्टीनने कोणाला पाठवले होते,यावर काळी पट्टी आहे. ही घटना सिद्ध करते की भारताचे परराष्ट्र धोरण हा एपस्टीन चालवित होता आणि,ही कोणत्याही सरकारसाठी खूप शरमेची बाब आहे,असा प्रहार विरोधक करतात.
हरदिपसिंह पुरींनी एपस्टीनला पाठवलेल्या ईमेलमध्ये त्याच्या बेटावरील ‘Fun’म्हणजे आनंदाचाही उल्लेख केला आहे,याचा अर्थ हरदिपसिंह पुरीला त्या बेटावर काय घडत होतं,याची माहिती नव्हती का? हरदिपसिंह पुरी तर त्याही पुढे जाऊन माध्यमांमध्ये जेफ्री एपस्टीनला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.ते लहान लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचा उल्लेख चक्क ‘They are under age Women,that’it !हरदिपसिंह पुरींसाठी ही इतकी लहानशी गोष्ट आहे?चक्क ते ‘ that’s it’ म्हणतात.त्या चिमुकल्या ज्यांचे इतके क्रूरपणाने शोषण झाले ,हत्या झाली,त्यांना भारतातील एक केंद्रीय मंत्री फक्त ‘ under age Women’समजतो.मग बाललैंगिक अपराधाची हरदिपसिंह पुरींच्या लेखी काय व्याख्या आहे?

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी लोकसभेत बोलताना,मला पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात भीती दिसत असल्याचे सांगितले.त्याची दोन कारणे आहेत,एक कारण म्हणजे एपस्टीन फाईल्स.केंद्राच्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पावर काेणाचं तरी नियंत्रण दिसतंय,असा गंभीर आरोप त्यांनी केला.उद्योगपती गौतम अदानीचे नाव घेत ,अदानी हे सर्वसामान्य उद्याेगपती नसून त्यांचा अदानी ग्रूप्स ही देखील सर्वसामान्य कंपनी नाही.त्यांच्या कंपनीवर अमेरिकेत तेथील अधिका-यांना कंत्राट मिळवण्यासाठी लाच देण्यासबंधीचे गंभीर खटले दाखल आहेत.मात्र,अमेरिकेचे लक्ष हे अदानी नव्हे तर मोदी आहेत.अदानी कपंनी भाजपची आर्थिक नाडी आहे.अदानीच्या आढून ते भारताच्या सार्वभौमत्वावर प्रहार करीत आहेत.
हेच इतर कोणत्याही सरकारच्या काळात घडलं असतं तर पत्रकारांनीच आमच्या पत्रकार परिषदांवर बहीष्कार घातला असता,इतकं घृणित काम एपस्टीनचं होतं.रस्यांवर आंदोलने झाली असती पण,हे मोदी सरकारचं आंतक आहे की भारतातील नागरिक गप्प आहेत.ते संतापही व्यक्त करु शकत नाही आहेत.भारतातील नागरिकांमध्येही एपस्टीनला घेऊन प्रचंड संताप आहे पण,तो दाबला जात आहे….!असा आरोप राहूल गांधी करतात.
एपस्टीन आणि अनिल अंबानी-
एपस्टीन फाईल्समध्ये उद्योगपती अनिल अंबानीचेही नाव पुढे आले आहे.अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये २०१७ ते २०१९ दरम्यान अनिल अंबानी आणि एपस्टीन यांच्यातील ईमेल्स जगाच्या पुढे आले आहेत.मात्र,या मेल्समध्ये एपस्टीनला अनिल अंबानीने इस्त्राईलकडून संरक्षण क्षेत्रातील खरेदी संदर्भात मदत मिळवून देण्याची विनंती केली आहे.याशिवाय या मेल्समध्ये व्यवसाय,जागतिक घडमोडी आणि महिलांबाबतही संवाद झालेला असल्याचा आरोप होत आहे.
एका ईमेलमध्ये एपस्टीने अनिल अंबानीला त्यांची भेट ‘मजेदार’बनवण्यासाठी एका स्वीडीश चिमुकलीची ऑफर दिली होती आणि यावर अनिल अंबानीने या मेलला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे अहवालात म्हटले आहे.याशिवाय अनिल अंबानींनी कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फौजधारी अवमानप्रकरणी दोषी धरले असून यात एपस्टीने अनिल अंबानीला मदत देऊ केली आहे.
एपस्टीन फाईल्समध्ये नाव येणे म्हणजे ती व्यक्ति प्रत्यक्षरित्या त्या घृणित कृत्यात सहभागी झाली होती,हे मात्र सिद्ध होत नाही.
याशिवाय अमेरिकन न्याय विभागाने खुले केलेल्या एपस्टीन फाईल्समधील इमेल नुसार २०१९ मध्ये न्यूयार्कमध्ये एपस्टीन व अनिल अंबानी यांच्या भेटीबाबत चर्चा झाली होती.त्यांच्यातील अनेक इमेल्समध्ये जगभरातील आर्थिक बाबी,घडोमोडी,अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तींशी ओळख आणि भारतातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं दिसून पडतं मात्र,यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचा उल्लेख नाही.
यानंतर दूसरं नाव आहे प्रसिद्ध लेखक दिपक चोप्रा यांचं.एपस्टीनला २०१८ मध्ये शिक्षा झाल्यानंतरही हे दोघे संपर्कात होते.२०१८ पर्यंत या दोघांमध्ये काही कायदेशीर बाबी आणि काही प्रभावशाली व्यक्तिंविषयी चर्चा झाली असल्याचे उघड झालं.मात्र,या दोघांमध्येही कोणत्याही गुन्हेगारी बाबींवर बोलणं झाल्याचं आढळून आलं नाही.याशिवाय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायरचं देखील नाव एपस्टीन फाईल्समध्ये दिसून पडलं.२००९ मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात ते एकत्रित दिसले.या कार्यक्रमाच्या समितीची सदस्य म्हणून आमंत्रिकांची नावे निश्चित करणे इतकाच सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर त्यांचा एपस्टीनसोबत कोणताही संबंध आल्याचे दिसून पडले नाही.यानंतर सुप्रसिद्धी अभिनेत्री व दिग्दर्शिका नंदिता दास यांचं ही नाव एका कार्यक्रमाच्या निमंत्रणाविषयी एपस्टीन फाईल्समध्ये आलेलं दिसून पडलं.इंग्लंडमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात नंदिता दास व एपस्टीन या कार्यक्रमात निमंत्रित होते.
याशिवाय बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याचे ही नाव एपस्टीन फाईल्समध्ये आढळून आलं.शांघायमध्ये एका नियोजित बैठकीची चर्चा सुरु असताना कश्यप यांचा एक प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक असा उल्लेख करण्यात आला होता.हा उल्लेख अत्यंत त्रोटक आणि एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमापुरते मर्यादित आहे.या फाईल्समध्ये त्यांचं नाव आल्यामुळे कश्यपवर अनेक आरोप झाले मात्र,कश्यप यांनी याचं खंडण केलं आहे.
थोडक्यात,एपस्टीन फाईल्समध्ये काही भारतीय नावे आली असली तरी अद्याप त्यांच्यावर बेकायदेशीर किंवा ,गुन्हेगारी कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला नाही.
(भारतातही किती एपस्टीन?वाचा एपस्टीन आणी भारत-भाग २ मध्ये)
……………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
