
रोहित पवार यांचं भाकीत:महसूल विभागाच्या अधिका-यांना ईव्हीएम मशीन्सच्या रिर्पोटींगचे केंद्राचे निर्देश!
नागपूर,ता.९ जुलै २०२३: हरियाणा,मध्यप्रदेश,तेलंगणा,छत्तीगढ आणि राजस्थान यांच्याबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेचे आणि देशात लोकसभेच्या निवडणूका होणार असल्याचे भाकीत शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादीचे कर्जत-जामचेडचे आमदार रोहीत पवार यांनी वर्तवले आहे. एका खासगी वृत्त वाहीनीला मुलाखत देताना त्यांनी वरील भाकीत केले.केंद्राने महसूल विभागातील अधिका-यांना ईव्हीएम मशीन्सच्या रिर्पोटींगचे आदेश देण्यात आले असल्याचे व गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रात यावर काम सुरु झाले असल्याचे रोहीत पवार यांनी सांगितले.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकांच्या पाच महिन्यांआधी महसूल विभागाच्या अधिका-यांना सांगितलं जातं ईव्हीएम मशीन्सचा एक रिपोर्ट असतो.रिकॅबलीनेशन किवा तत्सम एक लायसिंग असा कोणता तरी तो अहवाल असताे.ते सहा दिवसांपूर्वीपासून महाराष्ट्रात सुरु झाले आहे.ओपनली कोणी नाही सांगणार पण खासगीत अधिकारी वर्ग हे सांगू शकतील,असे ते म्हणाले.
.महाराष्ट्रात विधान सभा निवडणूका तर नाहीत,याचाच अर्थ हे सगळं लोकसभेसाठी सुरु आहे.राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवायची तयारी यासाठीच सुरु आहे असं समजायचं का? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका मात्र डिसेंबर महिन्यातच होईल,असा दावा ही त्यांनी केला.भाजपला कळलंय त्यांच्या जागा कमी होणार आहेत.कनार्टकमध्ये जे घडले त्यावरुन त्यांनी बोध घेतला आहे.डॅमेज अजून होण्यापेक्षा वाचणं हीच भाजपची नीती आहे.राष्ट्रवादीचं चिन्ह गोठणं वगैरे ही त्याचीच रणनीती आहे,असा दावा त्यांनी प्रस्तुत मुलाखतीत केला आहे.
महाराष्ट्रात सगळी गडबड जी केली आहे, जो काही अर्थव्यवहार झाला असेल,मत परिवर्तन झालं असेल,दबावतंत्र झालं असेल हे सगळं निवडणूकीसाठीच केलं असल्याचा सरळ सरळ आरोप त्यांनी केला.
तीस पसतीस वर्ष विचारधारा जी जपली ती सोडून कसे गेलेत?अजून ६ महिन्यांनी जनतेने कौल दिलाच असता,विरोधी पक्ष नेता हा मुख्यमंत्री बनू शकतो हे महाराष्ट्रात सिद्ध झालंच आहे.शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात खूप रोष आहे,असा दावा ही त्यांनी केला.
अजित पवार यांच्या भूमिकेविषयी बोलताना,दबाव असल्याशिवाय जाणार नाहीत हेच सगळ्यांचं मत झालं असल्याचे ते म्हणाले.
भाजपला कधीही लोकनेते चालत नाही.शिंदे यांचा एका वर्षातच गेम होईल असं वाटायला लागलं आहे.भाजपला त्यांच्याही पक्षातील लोकनेते आवडत नाही आणि बाहेरचेही आवडत नाही, त्यामुळे ते अश्या नेत्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात.मधल्या पिढीतला एक लोकनेता जो घडत होता तो भाजपमुळे संपेल का?अशी भीती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
अजित पवारच सांगतात गेल्या चार वर्षांपासून ते भाजपसोबत बोलत होते.सुप्रिया सुळे या आता राष्ट्रीय कार्याध्यक्ष झाल्या त्यामुळे सुळे या फुटीला कारणीभूत ठरु शकत नाही,असं ही मत त्यांनी व्यक्त केलं
अडीच जिल्हयाचा नेता असे शरद पवार यांना हिणवतात,पण चार वर्ष शरद पवारांनी केंद्रिय नेत्यांना खेळवत ठेवलं असा अर्थ होत नाही का?सोनिया गांधींच्या संदर्भात बोलताना,मुद्दावर वाद असू शकतो पण विचाराच्या बाबतीत नव्हता,असे ते म्हणाले.
शिंदे गट फूटला तेव्हा त्यांना स्क्रीप्ट लिहून देण्यात आली होती की सुरवातीला तुम्ही राऊतांविरोधात बोला.मग आदित्य नंतर उद्धव ठाकरेंबद्दल बोला.हे करताना टप्प्या टप्प्याने बोला,पाच-सहा महिने जाऊ द्या आणि नंतर तेच घडलं.
दिलीप वळसे पाटीलने मंत्री पद कशी मिळवली हे बाहेर सांगता येत नाही कारण सगळ्यांची कुंडली काढली तर भाजपला याचा फायदा होईल.प्रफूल्ल पटेल म्हणतात त्यांनी पुस्तक लिहलं तर खूप गोष्टी बाहेर येतील.पटेल यांचं स्वत:चं कर्तृत्व काय आहे?खासदारकी आणि मंत्री पद हे शरद पवारांच्या नावावर आणि चेह-यावरच मिळवलं ना?त्यांच्या कर्तृत्वामुळेच निवडून येत होता ना?असा जळजळीत प्रश्न करीत,एकीकडे शरद पवारांचे फोटो लावायचे,अध्यक्ष आमचे पवार हेच सांगायचं दूसरीकडे त्यांना अध्यक्ष पदावरुन काढायचं,हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत आहे.महाराष्ट्राची जनता ही सुजाण असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले.
चेतन तुपे यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही,दत्ता भरणे अजित पवार यांच्यासोबत निघून गेलेत बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे नाही त्यामुळे बारामतीत पहील्यांदा पवार घराण्याचा पराभव होणार का?यावर बोलताना,ते संपूर्ण ताकद यासाठी लावतीलच पण सगळ्या गोष्टी नेत्यांच्या हातात नसतात मतदारांच्या हातात असतात,अशी पुश्ती त्यांनी जोडली.
मार्च २०२४ पर्यंत लोकसभेसाठी थांबायची गरज नाही,ऑक्टोबर २०२४ पर्यंत विधानसभेसाठी थांबायची गरज नाही असे सांगून. डिसेंबर २०२३ मध्येच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका लागतील.हे जे स्पीड वाढलं आहे ना भाषणांचं,हॉटेलला आमदारांना घेऊन जाण्याचं,ती घाई यासाठीच असल्याचा दावा त्यांनी केला.
कर्नाटकमध्ये जे झालं,मध्यप्रदेशचं वातावरण वेगळंच काही सांगतं,तेलंगणाच्या बीआरएसमध्ये आग लागली आहे तिकडे,ते इकडे महाराष्ट्रात येत आहे.त्यांची पाच-पाच लाखांची सभा होत आहे,हे सर्व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी नावाच्या सबळ प्रादेशिक पक्षाचं संख्याबळ कमी करण्यासाठीच,असा आरोप ही त्यांनी केला.
……………………………………….

आमचे चॅनल subscribe करा