Homeनागपूर न्यूजभारत राष्ट्र समिती 'पक्ष 'नव्हे ‘मिशन’:के.चंद्रशेखर राव

भारत राष्ट्र समिती ‘पक्ष ‘नव्हे ‘मिशन’:के.चंद्रशेखर राव

फडणवीसांचा मला ही फोन, तेलंगणा सांभाळा महाराष्ट्रात का येता?

तेलागंणा मॉडल महाराष्ट्रात राबविल्यास मध्यप्रदेशात जाईल:केसीआरचा फडणवीसांना उत्तर

फक्त निवडणूका जिंकणे बीआरएसचे लक्ष्य नाही:केसीआरचा दावा

क्रांतिकारक ‘परिवर्तन’ हेच भारतातील सर्व समस्यांचे समाधान

७५ वर्षात देशातील शेतकरी, दलित,आदिवासींच्या समस्या जश्‍या त्या तश्‍याच

देशात मुबलकपेक्षाही जास्त पाणी उपलब्ध तरी देखील देशवासी तहानलेलेच:पाणी,वीज धोरणामध्ये आमुलाग्र बदलाची आवश्‍यकता

महाराष्ट्रात शेतक-यांचे जीवन सुखी करायचे असेल तर ‘तलाठ्यांना‘हद्दपार करा:तेलांगणात केसीआरचे धोरण यशस्वी

केसीआरच्या गुलाबी रंगाने दिली परिवर्तनाच्या वादळाची नांदी

संपूर्ण देशात परिवर्तन करण्याची संधी महाराष्ट्राला:केसीआर यांचे आव्हान

देशात परिवर्तन ‘नारा’नाही ‘निर्धार’:परिवर्तित भारत हेच आजच्या सर्व समस्यांवरील समाधान

महाराष्ट्राच्या पदाधिका-यांचा कामामुळे मी संतुष्ट:केसीआर यांची पदाधिका-यांना कौतूकाची पावती

भट सभागृह हाऊसफूल:एलईडीवर करावी लागली केसीआर यांच्या भाषणाची व्यवस्था

प्रस्थापित राजकीय पक्ष किती हादरलेत!केसीआर पदाधिका-यांचा मंचावरुन हल्लाबोल

नागपूर,ता.१५ जून २०२३: कर्नाटकामध्ये नुकताच सत्ताबदल झाला मात्र,यामुळे तेथील जनतेच्या जीवनात काही परिवर्तन घडणार आहे का?परिवर्तनाची आशा तरी आहे का?खरी लोकशाही ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी नव्हे तर जनतेसाठी असायला हवी,लोकांच्या विजयातच लोकशाहीचा विजय असतो,जनता विजयी झाल्यास सारं काही बदलून जाईल.आज देशात ४७ टक्के शेतकरी वर्ग आहे तर शेतक-यांवर निर्भर १५ ते २० टक्के शेतमजूरांचा वर्ग आहे.याचा अर्थ आज देशात ६० टक्क्यांचा वर शेतकरी वर्ग आहे.देशातील शेतकरी समृद्ध झाला तर देश शांत होईल,अस्वस्थता संपेल मात्र,आत या ६० टक्क्यांना सोडून देशात काय घडत आहे?देशातील शेतकरी सोन्याची विट मागत नाही आहे,चंद्र-तारकांची मागणी करत नाहीत,ते मागतात आहेत वीज,पाणी आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य दाम.तेच मिळत नसल्यानेच आज संपूर्ण देशातच शेतकरी आत्महत्या करत आहे.महाराष्ट्र हा तर देशात विकास व प्रगतीच्या निर्देशकांमध्ये अव्वल राज्य आहे.या राज्यात बारा माही वाहणा-या नद्यांचा सुकाळ असताना औरंगाबादमध्ये आठ दिवसांतून एकदा जनतेला पाणी मिळतं.अकोलामध्ये दहा दिवसातून एकदा पाणी मिळत आहे.सोलापूरमध्ये ११ दिवसातून एकदा पाणी मिळतं.कृष्णा,गोदावरी,पैनगंगा,पंचगंगा,वर्धा नदी,प्राणहितासारख्या नद्यांचा सुकाळ असताना महाराष्ट्रात हे काय घडत आहे?देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालेत.हा खूप मोठा कालखंड आहे.देशाच्या राजधानीत दिल्लीतच जिथे यमुना आणि गंगा नदी वाहते,जिथे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आज ही टँकरने पाणी पुरवठा होतो,वीज कपात होते याला काय म्हणावे?मला कोणत्याही राजकीय पक्षावर टिका करायची नाही मात्र देशाच्या नागरिकांसमोर मी वास्तविक परिस्थिती समजावण्याचे काम करीत आहे कारण ‘भारत राष्ट्र समित(बीआरएस) हा पक्ष नसून मिशन आहे’असे विधान तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आज रेशिम बाग येथील सुरेश भट सभागृहात केले.

भट सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी वरील विधान केले.तत्पूर्वी साई मंदिराजवळ,रामकृष्णनगर येथील उपराजधानीतील पहील्या पक्ष कार्यालयाचे त्यांनी विधीवत उद् घाटन केले.यानंतर त्यांनी भट सभागृहात संपूर्ण विदर्भातून आलेल्या व तुडूंब भरलेल्या सभागृहातील कार्यकर्त्यांना संबोधित केले.

(छायाचित्र: पक्ष कार्यालयाचे उद् घाटन करताना केसीआर व इतर पदाधिकारी)

आपल्या भाषणाच्या सुरवातीला त्यांनी भारत या देशाचे लक्ष्य काय आहे? हा प्रश्‍न देशातील बुद्धीजीवी नेहमी विचारत असल्याचे सांगितले.देशाचे लक्ष्य हे भरकटले आहे का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.विचार करा, लक्ष्य असल्याशिवाय समाज आणि देश हा कुठे पोहाेचत असतो?त्याचे परिणाम काय होतात?आज देशाची लोकसंख्या १४० कोटींच्या पल्ल्याड पोहोचली आहे.चीन या देशालाही आपण आता मागे टाकले आहे.मात्र आज ही फक्त ‘निवडणूका जिंकणे’ हेच आज भारताचे मुख्य लक्ष्य झाले असल्याची टिका त्यांनी केली.मारो,काटो,पैसा दो,कुछ भी करो मगर चुनाव जितो,अशी परिस्थिती आपल्याला देशात दिसते.

आंदोलने करुन करुन आता देशातील जनता ही थकून गेली आहे.महाराष्ट्रात शरद जोशी यांनी शेतक-यांच्या प्रश्‍नासाठी किती आंदोलने केली,किती वेळा कारागृहात गेलेत.माणिक कदम हे देखील आंदोलनामुळे जेल मध्ये गेले.कांद्याच्या भावासाठी नाशिक ते मुंबई पायी आंदोलनात अनेकांच्या पायातून रक्त वाहले.अतिशय दुखाची बाब आहे.हेच स्वातंत्र्य अपेक्षित होतं का? जनतेचा विजय,याचा विचार झालाच पाहिजे.ही कठीण बाब असली तरी अशक्य मुळीच नाही,असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्वच पक्षाला सत्ता मिळाली व त्यांनी सत्ता चालवली आहे,तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात परिवर्तन का घडले नाही?लोकशाहीत राजकीय पक्ष आणि त्यांच्यातील टक्कर देखील गरजेची आहे.मात्र,आमचा पक्ष एक मिशन घेऊन संपूर्ण भारतात परिवर्तन घडवून आणनार आहे कारण ‘परिवर्तित भारत हाच आजच्या संपूर्ण समस्यांवरील समाधान‘आहे.जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले त्या देशांच्या घटना देखील बनल्या.आपल्या ही देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वस्पर्शी लोकशाहीची घटना देशाला दिली.घटनेनुसार राज्यकारभार चालला असता तर दोन किवा तीन दशकात देश मार्गक्रमित झाला असता मात्र,आज ७५ वर्षांनंतर ही आपला देश ‘सेटल’ झाला असे आपण म्हणू शकत नाही.या देशात कोण सुखी आहे?दलितांवर आज ही या देशात अन्याय होतो आहे.हा अन्याय जोपर्यंत दूर होणार नाही आपल्या चेह-यावरचा डाग पुसल्या जाणार नाही.

अमेरिकामध्ये श्‍वेतवर्णियांनी अश्‍वेतांवर केलेला अन्याय बराक ओबामांना राष्ट्रप्रमुख बनवून पुसुन टाकला.आपल्या देशातही जोपर्यंत दलित,शोषित,पिडीत आणि वंचितांना न्याय मिळणार नाही आपण चांगल्यारितीने झोप घेऊ शकत नाही.७५ वर्षांपासून या देशाचा आदिवासी हा व्यवस्थेविरुद्ध लढतोच आहे मात्र त्यांची समस्या सुटता सुटत नाही.या देशात बुद्धीजीवींची कमतरता नाही,युवांची कमतरता नाही त्यामुळेच मी बुद्धीजीवी व युवांना प्रमाण करुन ‘वेळ आली आहे,जागे व्हा,आता जागे होणे खूप गरजेचे झाले आहे,देशाची विचारधारा जोपर्यंत बदलणार नाही देशात परिवर्तन घडणार नाही’असे आवाहन केसीआर यांनी या प्रसंगी उपस्थितांना केले.

या देशात जितक्या पाण्याची गरज आहे त्यापेक्षा दुप्पट प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.दरवर्षी आपल्या देशात एक लाख चाळीस हजार मिलीलीटर पाऊस पडतो.त्यापैकी ७० हजार मिलीलिटर पाण्याचे बाष्पीकरण होतं. ६० ते ६५ हजार मिलीलिटर पाणी नद्यांमध्ये वाहत जातं.मात्र आपल्या देशात फक्त १९ ते २० हजार टीएमसी पाण्याचा उपयोग होतो,बाकीचे सर्व बंगालच्या खाडीत किवा समुद्रात वाहून जातं.७५ वर्षात या पाण्यांचा उपयोग करण्याचे धोरणच देशात राबविण्यात आले नाही,शेतक-यांच्या शेती आणि नागरिकांचा गळा हा आज ही पाण्यासाठी तहानलेले आहे.काय पाप केले आहे या देशाने?अमेरिकेत फक्त साढे बारा टक्के,तर इतर देशात फक्त २९ टक्के भूमि ही कृषि योग्य आहे मात्र भारतात ५० टक्के भूमि ही कृषि योग्य असताना कोणतेही धोरण केंद्र किवा राज्य सरकारांकडे नाही.८३ कोटी एकर कृषि योग्य जमिनीवर शेती करणा-या देशातील ४१ कोटी शेतक-यांना,उद्योजकांना,जनतेला मुबलक पाणी देऊ शकण्यास सक्षम आहे.देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देऊनसुद्धा २५ ते ३० हजार टीएमसी पाण्याची बचत होऊ शकते.देव आणि निसर्गाने आपल्या देशाला नैसर्गिक संसाधनांची खैरात वाटली आहे तरीही देश का मुबलक पाणी आणि वीजेसाठी आजही वंचित आहे?असा सवाल त्यांनी केला.

याला कारण राष्ट्रीय जल धोरणाची अयशस्वीता असून, राष्ट्रीय जल धोरण हे बंगालच्या खाडीत नेऊन फेकून दिले पाहिजे व त्या जागी नवीन योजना लागू केली पाहिजे.देशात वीजेची देखील हिच स्थिती आहे.देशात सोलार,कोळश्‍याद्वारे उत्पन्न होणारी,पवन उर्जा,जलविद्युत उर्जा,अणू उर्जा अशा विविध प्रकारचे उर्जास्त्रोत आहेत.महाराष्ट्रात तर कोळशाचे वरदानच राज्याला लाभले आहे.देशात ३६१ बिलियन टन कोळसा सापडला आहे.देशातील सोलार,विद्यूत व कोळशाच्या वीजनिर्मितीतून देशाला पुढील १५० वर्ष पुरतील एवढी वीज उपलब्ध होऊ शकते.हे आकडे माझे नसून केंद्रिय कोळसा मंत्रालयाचे आहेत.मग का देशातील जनतेला वीजेसाठी रडविल्या जात आहे?शेतक-यांना साप चावून मरण्यासाठी मध्यरात्री वीज उपलब्ध होते?या देशातील शेतकरी हा भिकारी आहे का?

तेलागंणामध्ये तर महाराष्ट्रापेक्षाही भयंकर परिस्थिती होती.मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतक-यांना हात जोडून आत्महत्या करु नका अशी आर्त साद घातली.मला फक्ती दोन ते तीन वर्ष द्या मी सगळं काही सांभाळून घेईल असे आश्‍वासन तेलांगणातील जनतेला दिले.यासाठी मी सर्वात आधी ग्रामीण भागातील ‘तलाठ्यांना‘शासकीय प्रक्रियेतून हद्दपार केले.विधान सभेत सर्वात पहीले विधेयक हेच आणले.तलाठ्यांना विविध शासकीय विभागात सामावून घेतले.शेतीविषयीचा संपूर्ण कारभार हा डिजिटल केला.यासाठी ‘किसान पास बूक’योजना आणली.आता आपली शेती विकण्या वा खरेदीसाठी तेलांगणातील शेतकरी हा तहसीलमध्ये जातच नाही.भ्रष्टाचाराला कुठे ही वाव न ठेवता डिजिटल माध्यमातूनच सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात.यासाठी दर पाच हजार हेक्टरचे आम्ही एक क्लसटर बनवले.तितक्याच भागासाठी संबंधित अधिकारी नियुक्त केले.पाच मिनिटात शेतक-यांच्या पास बूकवर मोहोर उमटते.सर्व शेतीचे व्यवहार डिजिटल केल्याने रेकॉर्डही सेव्ह झालेत.

याशिवाय दर एकेरीला दहा हजार रुपये किसान योजनेअंतर्गत दिले.ते ही सरकारी नोकरीशाहीच्या हातात लागू न देता आमचे वित्त मंत्री तेवढी रक्कम सरळ बँकेत टाकतात आणि तेलांगणाचा शेतकरी त्या रकमेची उचल करतो.आमचा फोन शेतक-यांना जात असतो रक्कम घेऊन जा,देशात असे कुठेही घडत नाही.त्यामुळेच तेलागंणात ‘आ गया रयतू बन’वाक्य प्रसिद्ध झाले.याशिवाय शेतक-यांचे विमे काढण्यात आले.त्यांचा नैसर्गिक मृत्यू जरी झाला तरी त्यांच्या कुटूंबियांना पाच लाखांचे अनुदान ८ दिवसांच्या आत मिळते.शेतक-यांचे धान्य सरकार स्वत: विकत घेते.तेलांगणात ७ हजारच्या वर धान्य खरेदी केंद्र आहेत.धान्य विकल्यानंतर तेलांगणातील शेतक-यांना पैश्‍यांसाठी भटकावे लागत नाही.पैशे सरळ त्यांच्या बॅक खात्यात जमा होतात.आमच्या राज्यात पाणी आणि वीज मोफत दिली जाते.एक रुपया देखील रयतेकडून सरकार घेत नाही.

पंजाबला हरित क्रांतीचे राज्य म्हणून दर्जा दिला जातो मात्र यावेळी तेलांगणाने ५६ लाख एकरी धान उत्पन्न केले आहे.संपूर्ण भारतात ९६ लाख एकर धानाचे उत्पन्न झाले त्यात तेलांगणाचा वाटा ५६ लाख एकर असून आम्ही पंजाबला देखील धान उत्पादनामध्ये मागे टाकले आहे.आमच्या राज्यात महिला या खांद्यावर मटका ठेऊन शेकडो मील पाण्यासाठी भटकंती करीत नाही.प्रत्येक ग्रामीण भागातील घरातही आम्ही नळ पोहोचवला आहे.अगदी राज्याच्या डोंगराळ भागातही नळ योजना पोहोचवली.नांदेड व औरंगाबादच्या सभेतही मी हेच बोललो.तेलांगणासारखे छोटेसे राज्य ही किमया साधू शकतो तर महाराष्ट्रासारखे मोठे राज्य का तहानलेले आहे?

काही बुद्धीजीवी हे अश्‍या योजना या महाराष्ट्रात राबविल्यास राज्याचे दिवाळे निघून जाईल असे सांगतात.मात्र या योजना राबविल्याने दिवाळे हे स्वार्थी नेत्यांचे निघेल राज्यातील जनतेच्या जीवनात मात्र दिवाळी उजळेल,असा टोमणा त्यांनी हाणला.

देशात तेलांगणा मॉडल राबविण्साठीच आता बीआरएस संसदेचे तसेच विधान सभेच्या संपूर्ण जागा लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.आतापर्यंत अनेक पक्षांना देशाची,राज्यांची सत्ता दिली आता बीआरएसला संधी द्या.ध्येय हे जरी खूप दूरवरचे असले तरी पहीले पाऊल उचलले आहे.‘संपूर्ण भारतात परिवर्तन करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे’.

नांदेडच्या सभेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला,तुम्ही तेलंगणा सांभाळा महाराष्ट्रात का येता?फडणवीस हे माझे खूप चांगले मित्र आहेत,त्यांना मी हेच सांगितले,तुम्ही तेलांगणा मॉडेल राज्यात राबवा,मी मध्यप्रदेशला चालला जाईल!मी भारताचा नागरिक असून मी कुठेही जाऊ शकतो.तुम्ही याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात तेलंगणा मॉडेल लागू करा,माझे काम संपून जाईल मात्र,असे झाले नाही त्यामुळे जोपर्यंत असे घडणार नाही तोपर्यंत बीआरएस त्यासाठी सज्ज असणार आहे,असा इशारा त्यांनी आपल्या भाषणात दिला.

चरण वाघमारे यांनी जरी मंचावरुन मराठीत भाषण केले आणि मी मराठी बोलू शकत नसलो तरी मला मराठी समजते.त्यांनी मुंबईच्या मतदारांना ’अब की बार किसान सरकारचे’स्लाेगन कसे सांगावे?असा प्रश्‍न उपस्थित केला होता कारण मुंबईकर हे काही शेतकरी नाहीत,ते का म्हणून बीआरएसला मते देतील?मुंबईकर व मुंबईतील उद्योगपती हे शेवटी आपल्या ताटात खातात तर शेतक-यांनी पिकवलेलेच अन्न ना?मग का हा नारा तिथे चालणार नाही?

कनार्टकच्या मुख्यमंत्र्यांनी तेलंगणाला २७ लाख टन तांदूळची मागणी केली आहे.ही किमया अन्नधान्याच्या बाबतीत तेलांगणाने साधली आहे.फक्त दलित,पिडीतच नव्हे तर उच्च वर्णियांमधील गरीबांना देखील संतुलित अन्न मिळत नाही.कार्बोदक,प्रर्थिने ही तर बाब दूरच राहीली.

स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षातही  ४२ कोटी एकर भूमि ही अन्नधान्य पिकवणारी असली व कुठेही नाही असा सूर्यप्रकाश,पाण्याची उपलब्धता असली तरी र्निलज्जासारखे इतर देशातून मॅकडोनल्डच्या माध्यमातून पिझ्झा,बर्गर आयात करतो!आता पर्यंत प्रत्येक तहसीलात दोन ते तीन अन्नधान्यापासून निर्मित वस्तूंचे उद्योग लागायला हवे होते.यामुळे देशातील युवांना काम मिळाले असते,बेरोजगारी दूर झाली असती व देश आर्थिक सुबत्तेत आला असता.येथे तर केंद्राने इंडोनेशियाचा कोळसा विकत घेण्याची सक्ती राज्यांना केली आहे.देशातला कोळसा चार हजार रुपये टन मिळत असताना इंडोनेशियातील कोळसा २२ हजार रुपये टन राज्यांनी का म्हणून विकत घ्यावा?केंद्र सरकारचे तर धोरणच आहे जास्त धान्य पिकवू नका!केंद्रातील सरकारमध्ये शेतक-यांच्या प्रति संवेदशनशीलता नाही,असा आरोप करीत यांना कोण जागवेल?असा सवाल त्यांनी केला.

धर्म,जातीच्या नावावर फूट पाडा आणि निवडणूक जिंका हे धोरण ते राबवतात.विजय कोणाचा असतो तर प्रत्येक निवडणूकीनंतर तो जनतेचा असतो,हे गावागावात जाऊन लोकांना सांगा,असे आवाहन यावेळी केसीआर यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी महाराष्ट्रातील पदाधिका-यांच्या कामामुळे मी फार संतुष्ट आहे,असे गौरवोद्गार देखील काढले.आज बीआरएसचे महाराष्ट्रात ४ लाख ३४ हजार सदस्य आहेत लवकरच २५ ते ३० लाख सदस्यांचे टार्गेट आम्ही पूर्ण करु.मला कोणत्याही राजकीय पक्षावर किवा नेत्यावर टिका टिपण्णी करायची नसून मी फक्त माझे काम सांगण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्रात तर ‘तू कुत्ता तू बिल्ली’अश्‍या शिवराळ भाषेत शिव्यांचा खेळ सुरु आहे,आम्हाला त्यात रस नाही.आम्हाला भारत देश बदलायचा आहे.याची सुरवात आम्ही महाराष्ट्रातून करीत आहोत.महाराष्ट्र हा बुद्धूंचा नव्हे बुद्धीवानांचा देश आहे.कॉमन मॅन के पास ही कॉमन सेंस का भंडार है,देशाची आणिबाणि याच देशातील जनतेने नाकारली व इंदिरा गांधी यांना पराभूत केले.जनता दलाच्या सरकारने इंदिरा गांधी यांच्या छळ केल्याने जनता सरकारलाच पुन्हा याच जनतेने घरी बसवले.

आजचा भारत ही तसाच बेजार झाला आहे.वाट पाहतो आहे.‘हम नई उमंग से नये परिवर्तन की तरफ कदम बढायेंगे’.नागपूरात आज पक्षाचे कार्यालय उघडले,औरंगाबादमध्ये तर पूर्ण इमारतच पक्षाच्या कार्यालयासाठी विकत घेतली.मुंबई,पुणे येथे ही पक्षाचे कार्यालय उघडू,विशेष म्हणजे प्रत्येक कार्यालयात जेवणाचे लंगर चालतील.कोणीही उपाशी जाणार नाही.ही संतांची कर्मभूमी आहे.ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे.ही फूले,शाहू यांची भूमी आहे.याच भूमितून आम्ही परिवर्तनाचा ‘नारा ’नव्हे तर .‘निर्धार’केला आहे,असे याप्रसंगी केसीआर म्हणाले.

केसीआर यांचा मार्ग गुलाबी रंगाने उजळला-
केसीआर यांचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.यानंतर त्यांनी साई मंदिराजवळील रामकृष्ण नगर येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद् घाटन केले.दुपारी ४ वाजता त्यांचे आगमन भट सभागृहात झाले.यावेळी भरगच्च सभागृहातून जोरदार घोषणाबाजी होत होती.मंचावर भव्य अश्‍या एलईडी स्क्रीनवर तेलांगणा राज्याची प्रगती,धोरण व योजनांची चलचित्रफित वारंवार दाखविली जात होती.या चलचित्रफितीत सुप्रसिद्ध कवि ज्ञानेश वाकूडकर लिखित गीत दिमाखाने ऐकू येत होते.

माजी आमदार बाळूभाऊ राठोड यांनी सुरवातीला विदर्भ वेगळा झालाच पाहिजे असे आपल्या मनोगतात सांगितले.केसीआर हा जरी महाराष्ट्रात नवीन पक्ष असला तरी देशात एकेकाळी जनता पक्ष हा देखील नवाच होता तरी देखील देशाच्या जनतेने त्यांच्या हाती सत्ता सोपविली असल्याची आठवण सांगितली.जनता दलाची कुठे शाखा होती?अशी विचारणा त्यांनी केली.देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी देशात शेतक-यांच्या आंदोलनात ३५० शेतक-यांचा मृत्यू होतो व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘क्या मेरे लिये मरे!‘असे उद् गार काढतात तेव्हा त्यांना २०१४ मध्ये मत देऊन निवडून देण्याची चूक मला उमजते,असा त्रागा व्यक्त केला.माझ्यासारख्या संपादकाचा बुद्धीभ्रंश झाला तर सामान्य नागरिकांचे काय?महाराष्ट्रात २७०० गाव हे पूर्णपणे ओसाड आहेत त्यापैकी २३०० गाव हे एकट्या विदर्भात असल्याचे सांगितले.नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु होते.सलग ६ दिवस यावर विशेष बातम्या प्रसिद्ध केल्या.वाटलं या बातमीमुळे विधी मंडळात आमदार तुटून पडतील मात्र एक ही प्रश्‍न यावर विचारला गेला नाही.सत्ताधारी तर सोडा नालायक विराेधकांनी देखील यावर प्रश्‍न विचारण्याची तसदी घेतली नाही.विरोधी आमदारांना मी उघडपणे नालायक ठरवतोय यासाठी माझ्यावर हक्कभंग आणला तरी हरकत नाही,असे आव्हान त्यांनी केले.

माणिकराव कापसे यांनी एकट्या महाराष्ट्रात ३४ टक्के शेतकरी आत्महत्या घडत असल्याचे सांगितले.शंकर अण्णा धोंडगे यांनी विदर्भाच्या पवित्र भूमिवर छोटसं पाऊल आज केसीआर यांनी ठेवले असल्याचे सांगितले.नील आर्मस्ट्रांग यांनी चंद्रावर पहीले पाऊल ठेवले तेव्हा ते पाऊल संपूर्ण मानव जातीच्या उन्नतीचे व प्रगतीचे असल्याचे सांगितले होते.महाराष्ट्रात येऊन बीआरएसला तीनच महिने झाले तरी किती हादरलात?असा टोमणा त्यांनी हाणला. कृषि मंत्री अब्दुल सत्तारच म्हणाले की तेलंगणासाखा कृषि कायदा महाराष्ट्रात आला पाहिजे,हे कशाचे द्योतक आहे?खूप साेसलं,खूप भोगलं,आता नाही सोसणार.महाराष्ट्रात बीआरएसची सत्ता आणल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार.गोड शब्दांना आता भूलणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदार चरण वाघमारे यांनी,मी स्वत: तेलंगणाची प्रगती,धाेरणे बघून आल्याचे सांगितले.जानेवारीत माझी केसीआरसोबत पहीली भेट झाली.त्यांची धोरणे मी समजून घेतली.८ वर्षात त्यांनी शेतक-यांच्या आत्महत्या कश्‍या थांबवल्या?सरकारी प्रशासनाकडू कशी व्यवस्था करुन घेतली हे बघून वाटलं आपल्या महाराष्ट्रात देखील हे घडलं पाहिजे.बदल झाला पाहिजे.आपण गुजरात मॉडल बघितलं.तोच देशात लागू होईल असं वाटलं मात्र आज ही महाराष्ट्रात ६ तास वीज शेतक-यांना मिळत आहे.माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ‘जय जवान जय किसान’स्लाेगन ख-या अर्थाने केसीआर यांनी त्यांच्या राज्यात सार्थक केले.त्या राज्यात २४ तास वीज आणि पाणी जनतेला मिळत आहे ते ही बिल्कूल मोफत.विना परतावा दहा हजार रुपये प्रति ऐकरी शेतक-यांन मिळत आहे.१२ महिने धान खरेदी केंद्र सुरु असतात.५ लाख रुपयांचा विमा सुरक्षा शेतक-यांना मिळतेय.महाराष्ट्रातही शेतक-यांसाठी चांगल्या योजना आहेत मात्र त्यांची फक्त कागदांवरच अंमलबजावणी होते.त्यामुळेच ‘तेलंगणा मॉडेल’स्वीकारण्याची वेळ आली आहे.राज्यातील खोके सरकार घालवण्यासाठी गुलाबी वादळ धडकलं आहे.बीआएसची सत्ता आल्यास शेतक-यांना मोफत वीज आणि पाणी देऊ,असे आश्‍वासन त्यांनी दिले.

यावेळी सभागृहात ‘लढेंगे..जितेंगे’,देश का नेता कैसा हो,केसीआर जैसा हो’‘केसीआर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’च्या ना-यांनी संपूर्ण सभागृह गाजत राहीले.

याप्रसंगी त्यांच्या मार्गक्रमणाच्या संपूर्ण मार्गावर गुलाबी रंगाच्या पताका व मोठमोठे लक्षवेधी कट्आउट्स,ज्यावर तेलंगणातील शेतकरी,युवा वर्ग,महिला वर्ग,दलित,उद्योजक हे कसे सुखी झालेत हे दाखविणा-या योजनांचे कट्आउट्स,, केसीआर यांच्या अभिवादन करणारे छायाचित्र, चौकाचौकातील गुलाबी फलकांनी नागपूरकरांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले..

Latest बातम्या