
नागपूर मेट्रोचा ९ वा वर्धापन दिन साजरा
नागपूर १७ फेब्रुवरी २०२३ : नागपूर मेट्रोने अनेक रेकॉर्ड स्थापित करत अनेक चांगले कार्य केले परंतु, या व्यतिरिक्त नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणली याचा आम्हाला अभिमान आहे याचाच सर्वात जास्त आनंद आहे. आम्ही आणखी चांगले कार्य एक चमू म्हणून पूर्ण करू असा विश्वास असल्याचे मत, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रोच्या ९ व्या स्थापना दिन निमित्त मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केले. माझी मेट्रो नावा प्रमाणेच नागपूरकरांच्या वाहतुकीची प्रथम पसंती असून आम्ही ‘माझी मेट्रो’ नागपूरकरांकरता बनविण्यात यशस्वी झालो. आजचा दिवस नागपूरकरांचा आमच्या प्रति विश्वास आणि शुभेच्छामुळे अधिक महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.
२०१५ कडे बघितले तर त्यावेळेस नागपूर मेट्रोच्या डीपीआर व्यतिरिक्त काहीच नव्हते. मेट्रो कशी बनणार, कधी पर्यंत तयार होणार, कसा प्रवास असणार सर्व बाबी आव्हानासारख्या समोर होत्या आणि हे कार्य आम्ही ८ वर्षाच्या अल्पावधीत पूर्ण करू शकलो. टीम वर्क, मेहनत आणि नागरिकांच्या शुभेच्छांमुळे आम्ही हे आव्हानात्मक कार्य पूर्ण करू शकलो. नागपूरच्या वाहतुकीच्या साधनांमध्ये तसेच जीवनाच्या मार्गामध्ये आम्ही परिवर्तन आणू शकलो याचा आज आनंद आहे.
नागपूर मेट्रो फेज – २ नागरिकांमध्ये आणखी बदल घडविणार, कामठी – कन्हान, बुटीबोरी, कापसी- ट्रान्सपोर्ट नगर, हिंगणा या भागातील नागरिकांना मदत करेल. नागरिक कश्या प्रकारे याला बघतात हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
महा मेट्रो एक टीम म्हणून मेट्रो नियो या नवीन वाहतूक प्रणालीच्या क्षेत्रात परिवर्तनाकडे बघत आहे. महा मेट्रोने या प्रकल्पाचा पुढाकार घेतला असून, नाशिक या शहराकरता ज्या ठिकाणी २० लाख लोकसंख्या आहे या शहराकरता मेट्रो नियो राबविणार आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने या नवीन इनोव्हेशनकडे सकारात्मकतेने बघत आहे. आम्ही या कार्यात देखील यशस्वी होऊ याचा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन दीक्षीत यांनी केले.
नागपूर मेट्रोने आजच्या वर्धापन दिना निमित्य २ चर्चा सत्राचे आयोजन केले होते ज्यामधील पहिले सत्र हे ‘नागपूर मेट्रो: सार्वजनिक वाहतूक आणि जीवनाचा मार्ग बदलत आहे’ आणि दुसरे सत्र हा ‘नागपूर मेट्रो फेज – २ ’असा होता. ज्यामध्ये नागपूर शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, नियमित मेट्रो प्रवासी, मेट्रो मित्र यांचा समावेश होता.
मेट्रोविषयी मान्यवरांचे मत….
विलास काळे : नागपूर मेट्रोने शिस्त ठेवून निर्माण कार्य पूर्ण केले. मी माझ्या आयुष्यात नागपूर शहर बदलतांना बघितले असून मेट्रोच्या रूपात यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. जे की स्वस्त, सोईस्कर आणि विश्वासार्ह आहे. नागपूर मेट्रोने शहरात अनेक नाविन्यपूर्ण कार्य केले आहे ज्यामध्ये क्रिकेट मॅच दरम्यान केलेली व्यवस्था असो किंवा शहरातील सोंदर्यीकरण जे की उत्कृष्ट आहे.
बी सी भरतिया : प्रकल्पाला ८ वर्ष कसे झाले हे माहितीच नाही झाले. डॉ. दीक्षित यांनी दूर दृष्टिकोन ठेवून नि उत्कृष्ट कार्य केले. गर्दीच्या ठिकाणी तयार केलेले मेट्रो स्टेशन जे कि उत्कृष्ट वास्तूशास्त्राचा नमुना आहे. मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टमच्या क्षेत्रात मेट्रोच्या रूपात परिवर्तन झालेले दिसते. तसेच महसूल उत्पनाच्या दिशेने केलेले कार्य चांगले आहे..
माया जोगे : मेट्रो कर्मचाऱ्याना मेट्रो मध्ये गर्दी बघून त्रास होत नाही तर आनंद जास्ती होतो याचा मला आनंद वाटतो. प्रत्येक मेट्रो स्टेशनवरील कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कार्य व प्रवाश्याची मदत करत असतो. प्रजापती नगर भागात मेट्रो सेवा सुरु झाल्याने शाळेतील विद्यार्थ्याना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे बघून माझ्या सारख्या शिक्षिकेला याचा आनंद आहे.
अमित समर्थ : कोव्हीड नंतर मेट्रोच्या प्रति नागरिकांचा अधिक विश्वास वाढला व मोठ्या प्रमाणात नागरिक व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मेट्रोचा उपयोग करू लागला आहे हा एक सुखद अनुभव आहे. मेट्रो ट्रेनच्या आत सायकल नेऊ देण्याची सुरुवात करणे हि आश्चर्याची बाब होती जे कि युरोपियन देशात या आधी बघायला मिळायचे तसेच मेट्रोने फस्ट ऍण्ड लास्ट माईल कनेटिव्हीटीच्या दिशेने चांगले कार्य केले आहे.
विजय दर्गान : मेट्रो लाईनमुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इमारती तयार होत आहे तसेच आमचे सहकारी या भागात मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. ज्याचा फायदा आम्हाला होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नागरिकांची देखील मेट्रो लाईन जवळ घर खरेदी करण्याची प्राथमिकता दिसून आली आहे.
विष्णू मनोहर : नागपूर मेट्रो शहरा करता सर्वात चांगली भेट आहे. आम्ही मेट्रोचा प्रथम खोदकाम ते मेट्रो निर्माण होत पर्यंत हा प्रकल्प जवळून बघितला आहे. काही वर्षांनी शहरात मेट्रो तयार करणे शक्य झाले नसते तसेच हा प्रकल्प दूर दृष्टी ठेवून तयार झाला आहे.
मेट्रो फेज-२ विषयी…..
प्रदीप खंडेलवाल : नागपूर मेट्रो फेज – २ सुरु झाल्याने बुटीबोरी येथे सकाळी दिड तासाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी असेल यावेळेत सुमारे ३०००० यात्री मेट्रोने प्रवास करतील.
टोनी जग्गी : एच बी टाऊन मध्ये मेट्रो सेवा सुरु झाल्याने नागरिकांना फायदा होत आहे, यापुढे कापसी पर्यंत मेट्रो सुरु होईल तेव्हा श्रामिक वर्ग यांना आणखी लाभ होईल जो कि, दररोज शहरात कामा करता येत असतो. या भागात मेट्रो सुरु झाल्याने सर्व नागरिक याचा उपयोग करतील कारण या भागात मोठ्या पप्रमाणात व्यवसायिक वाहन चालत असतात.
विनय चव्हाण : मी, दररोज नागपूर ते कामठी असा प्रवास करतो कामठी या भागात मेट्रो सेवा सुरु झाल्यास माझ्या सारख्या असंख्य लोकांना याचा फायदा होईल. आता आटोमोटिव्ह चौक पर्यंत मेट्रो सेवा सुरु झाली आहे त्यामुळे, आमचे विद्यार्थी कंपनी मध्ये इंटरव्यू तसेच जॉब करता आता आटोमोटिव्ह चौक येथे आपले वाहन ठेवून किंवा कामठी – कन्हान हा प्रवास या स्टेशन पर्यंत करतात व पुढील प्रवास खापरी पर्यंत मेट्रोने प्रवास करण्यास प्रथम प्राधान्य देतात.
प्रतिभा निवांत : आजच्या आणि भविष्यातील पिढीला मेट्रो फेज – २ नक्कीच लाभ होईल व हिंगणा तसेच वानाडोंगरी या भागातील विध्यार्थ्यांना मेट्रो मुळे अधिकाधिक फायदा पोहोचेल.
योगेश कटारिया : मेट्रोने प्रवास करताना आपल्याला नागपूरचे विहंगम दृश्य बघायला मिळाले आणि ती आठवण आपल्या सद् स्मरणात राहील असे ते म्हणाले.
डॉ. उदय वाघे : यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे हजारो विद्यार्थी शहरातून दररोज येत असतात सध्यास्थित कॉलेज पासुन ३ किमी अंतरावर मेट्रो स्टेशन आहे. विद्यार्थ्याना अन्य साधनाने लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन पर्यंत प्रवास करावा लागत आहे परंतु फेज २ मध्ये मेट्रो सुरु झाल्यास सहज पणे कॉलेज पर्यंत विद्यार्थ्यांना मेट्रो उपलब्ध होऊ शकेल.
राजेश लोया : महा मेट्रो हे एकमेव संस्था आहे जी स्वतःचे कामाचे मुलांकडून बाहेरच्या व्यक्तींकडून करते आणि हे एक वैशिष्ठय आहे असे गौरवोद्गार चार्टर्ड अकाउंटंट श्री राजेश लोया म्हणाले. नागपूर मेट्रोने प्रॉपर्टी डेव्हलपमेंट अंतर्गत महा मेट्रोने केले कार्याचा उल्लेख करत त्यांनी या संबंधी काही सूचना देखील या संबंधाने दिल्या.
………………………………….

आमचे चॅनल subscribe करा