Homeनागपूर न्यूजबावणकुळेंच्या विधानावर देशमुखांचा ‘खुलासा!’

बावणकुळेंच्या विधानावर देशमुखांचा ‘खुलासा!’


बावणकुळेंना संदर्भ कळला नसल्याचा केला दावा

नागपूर, ता. १४ फेब्रुवरी २०२३ : वर्धेच्या सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत मी हे बोललो होतो, की मी जर अडीच वर्षांपूर्वी समझोता केला असता तर मला त्या वेळेस अटक झाले नसती,मी समझोता केला नाही म्हणून मला अटक झाली असे मी बोललो आहे,कोण्या पक्षामध्ये जाण्या-येण्याचा प्रश्‍न नाही,समझोता केला असता तर मला अटक झाली नसती,असे मी बोललो होतो.बावणकुळे यांना मी जे बोललो त्याचा संदर्भच कळला नाही,ज्यांना विषय माहीती आहे त्यांना मी जे बोललो त्यांना संदर्भासहित विषय कळला आहे,असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज मंगळवारी त्यांच्या निवास स्थानी आयोजित पत्र परिषेत म्हणाले.

मी जर तोंड उघडलं विधान सभा निवडणूकीच्या दोन दिवसांपूर्वी काय घडलं ते सांगायला, तर तुम्हाला तोंड उघडायला जागा राहणार नाही,असे बावणकुळे म्हणाले या संदर्भात विचारले असता,बावणकुळे हे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत,त्यांचं तोंड कोणी दाबण्याचा प्रश्‍नच येत नाही त्यांना स्वातंत्र्य आहे,अडवणूक कोणी केली?असे उत्तर अनिल देशमुख यांनी दिले.

विधान सभा निवडणूकीच्या दोन दिवसांपूर्वी नेमकं काय झालं होतं?असा प्रश्‍न विचारला असता,त्यांनीच सांगायला पाहिजे,एका मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत,त्यांनी तसं असं काही घडलं असेल तर त्यांनी खुलेआम सांगायला हवं,माझं तर आव्हान आहे,देशमुख म्हणाले.

तुम्हाला ऑफर होती का भाजपची?या प्रश्‍नाबाबत बोलताना, मी वर्धेच्या सभेत ज्या विषयावर बोललो तो विषयच वेगळा असल्याची पुनरोक्ती त्यांनी केली.तो विषय बावणकुळेंना समजलाच नसल्याचे ते म्हणाले.

बावणकुळेंच्या बोलण्याचा रोख हा होता की अनिल देशमुख भाजपमध्ये येणार होते,मंत्री गिरीश महाजन यांनी देखील काल हेच सांगितले याकडे देशमुखांचे लक्ष वेधले असता,ते काहीही बोलू शकतात,असे सांगून शरद पवारांच्या नेतृत्वात इतक्या वर्षांपासून मी काम करतोय,पुढे ही त्यांच्या नेतृत्वात काम करत राहू,असे ते म्हणाले.

वर्धेच्या सभेत अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मी समझोता केला असता तर मला अटक झाली नसती असे वक्तव्य केले होते. यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. याविषयी वेगवेगळे तर्क लावल्या जात आहेत. ‘गृहमंत्री’ असताना समझोता केला नाही म्हणून अटक करण्यात आली असे देशमुख यांचे म्हणणे असावे असा याचा अर्थ काढला जात आहे.

मात्र देशमुख यांनी अडीच वर्षांपूर्वी समझोता केला असता तर अटक झाली नसती असे आपण म्हटल्याचे सांगितले. तुम्ही कुठला समझोता केला नाही म्हणूण अटक केली या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळले. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपात घेण्यासाठी देशमुख यांनी विनवण्या केल्या होत्या याकडे लक्ष वेधले असताना अनिल देशमुख यांनी आरोप करणे विरोधकांचे कामच असल्याचे सांगून बोलणे टाळले.

बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावला. त्यांना विषय माहिती नसावा म्हणून ते बोलले असावे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना कोण अडवेल असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला. मी शरद पवार यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून काम करीत आहे. त्यामुळे भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. विधानसभेच्यावेळी भाजपात प्रवेश केला नाही म्हणून सूडबुद्धीने आपल्याला अडकवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मी दोन दिवसांपूर्वी नागपूरला परत आलो.आमच्या सर्व सहका-यांनी अतिशय भव्य स्वरुपात माझे स्वागत केले.शुक्रवारी १७ फेब्रुवारीला पहील्यांदा माझ्या मतदार संघात काटोलला जाणार असल्याचे सांगून काटोलला १७ फेब्रवरी रोजी माझी जाहीर सभा ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.
.
मुंबईवर हल्ला करणारा अतिरेकी कसाबला ऑर्थर रोड जेलमधील ज्या बॅरेक क्रमांक १२मध्ये ठेवण्यात आले होते. आपल्यालाही तेथेच ठेवले होते असे सांगून अनिल देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे अतिरेक्याप्रमाणे वागणूक दिल्याची सरकारवर टीका केली.

थोडक्यात आजच्या ही पत्र परिषदेत अनिल देशमुखांनी काही प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे टाळले व हात जोडून निघून गेले.आजची ‘तातडीची’पत्र परिषद ही फक्त आणि फक्त चंद्रशेखर बावणकुळे यांच्या आरोपांवर ‘खुलासा’करण्यासाठीच होती का?यावरही यानंतर चांगलीच रंगली.

काय म्हणाले होते बावणकुळे?

आपण समझोता केला असता तर अटक झाली नसती या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते जामिनावर बाहेर आले आहे याचे भान ठेवावे असे सांगून, मी तोंड उघडले तर ते अडचणीत येतील, असा इशारा दिला.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी काय झाले ते मी सांगितले तर देशमुख यांना महागात पडेल असेही बावनकुळे म्हणाले. देशमुख भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याची चर्चा त्यावेळी होती. देशमुख यांनी वर्धेच्या सभेत आपण भाजपसोबत समझोता केला नाही म्हणूण अटक करण्यात आल्याचे म्हटले होते.

विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनी भाजप आणि शिवसेनेला कौल दिला होता. मात्र शिवसेना-राष्ट्रवादीने षडयंत्र रचून महाविकास आघाडी स्थापन केले. जनतेच्या मताशी धोका केला म्हणून निसर्गानेच बदला घेऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडले. अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यातील बहुतांश आमदारच नव्हे तर मंत्रीसुद्धा नाराज होते.

शिवसेनेचे आमदार फोडून राष्ट्रवादीत आणण्याची योजना आखली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार आले. शरद पवार यांची साथ मिळत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे एवढी हिंमत करु शकत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला ‘धोपटी बेलणी’ घेऊन घरी बसावे लागले अशी भीती विरोधकांना वाटत होती. म्हणूणच कुठल्याही परिस्थिती फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते. त्याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पद्धतशीरपणे आघाडी तयार केली. काँग्रेसकडे त्यांच्यासोबत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असेही बावनकुळे म्हणाले होते..

Latest बातम्या