Homeनागपूर न्यूजमला पावलेले गजानन महाराज....

मला पावलेले गजानन महाराज….

(अतिथीस्तंभ)

मला पावलेले गजानन महाराज….

(देवराव प्रधान)

नागपूर, दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण संत गजानन महाराजांच्या पादुका स्थापित होऊन आज चार वर्षे पूर्ण होऊन गेले. आज संत गजानन महारांजाचा १४५ वा प्रगटदिन आहे.

आपल्या घरी संत गजानन महाराजांच्या पादुका याव्या असे २०१७ सालापासून सतत वाटायचे त्यानंतर २०१८ मध्ये पादुकांकरिता मी माझं नाव नोंदविले. यावर्षीही तो योग घडून आलेला नाही. माझ्या शेजारी गणोरकर यांच्या घरी २०१७-१८ मध्ये गजानन महाराजांच्या पादुका आल्या होत्या त्याच वेळेस सुभेदार लेआउट मधील पडोळे दांदाकडे माझा नंबर दिला होता. नंतर त्याचे काय झाले कळलेच नाही मग आम्ही संकल्प घेतला आमच्या घरी गजानन महाराजांच्या पादुका आणायच्या असा ठाम निर्णय घेतला. पण कुठून ? कशा ?

दरम्यान लगेच सुचलं की आपण निर्मलनगरीतील संत गजानन मंदिरातील पादुका अणायंच ठरवलं ? माझे जिवलग मित्र निखिल भुते यांना याबाबत विचारले त्यांनी मला मार्गदर्शन केलं नाही आपण काचूर्णा येथील, वासुदेवराव विरखरे महाराजांच्या घरच्या पादुका आणायचं ठरविलं त्यासाठी चंद्रशेखर क्षेत्रपाल दादांनी पुढाकार घेतला पादुकांसाठी दोन महिने आधीपासूनच संपर्क साधून तारीख घेण्याचं ठरलं त्यांनी सांगितलं की, पुढच्या महिन्यात प्रताप नगरला चौधरी यांच्याकडे पादुका घेऊन येईल त्यावेळेस भेटा.

ठरल्याप्रमाणे तेथे मी आणि माझी पत्नी देवदर्शनाकरिता गेलो. विरखरे महाराजांची परिचय झाला. माझ्या घरी पादुका दर्शनाकरिता ३ फेब्रुवारी २०१९ रोजी आणायच्या आहेत असं त्यांच्या डायरीमध्ये नोट करून दर्शन घेऊन तारीख घेतली. पुढे दोन महिन्यानंतर माझ्या घरी पादुका येणार होत्या मी महाराजांना नेहमी फोन करीत होतो. मला आश्वासनच मिळालं त्यांनी माझ्याकडून काही माहिती घेतली कार्यक्रम मोठा आहे असं वाटतं ? किती भक्त येतात ? मी त्यांना सांगितलं. पाचशे ते सातशे लोक असतील आणि माझ्या घरी दिवसभर पादुका हव्यात ही सुद्धा बोललो ते हो म्हणाले.

माझ्या घरच्या पादुका तुमच्या घरी येतील. हे त्यांनी आश्वासन दिले. पण मी येणार नाही असे ते म्हणाले. तारीख ठरली ३ फेब्रुवारी २०१९. दिवस रविवार माझ्या घरी गजानन महाराजांच्या पादुका येणार असल्याचं मित्रांना, पाहुण्यांना, नातेवाईकांना, साऱ्या गजानन भक्तांना सांगितलं. पत्रिका छापल्या, मंडप डेकोरेशन जोरात केलेत, भजनाची तयारी केली. आचारी सांगितले. पादुका घ्यायला केव्हा व कधी यायचं याबाबत मी त्यांना फोनवर विचारलं ते म्हणाले माझ्या पत्नीची तब्येत ठीक नाही. तुमच्याकडे पादुका येणार नाही. मला एकदम धक्काच बसला.

लगेच मी भक्तगणांकडून माहिती घेतली. पादुका तुमच्याकडे येतील असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी शांत पण अस्वस्थ झोपलो. शनिवार २ फेब्रुवारी २०१९ ला संध्याकाळी सात- साडेसात वाजता माझ्या घरी गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली. आरती झाली. नातेवाईक, शेजारी, भक्त मंडळी भजन मंडळी उपस्थित होती. आणि रात्री दरम्यान घोटकरांचा फोन आला तुमच्या घरी पादुका येणार नाही आणि फोन बंद झाला. काय करावं सुचेनासे झाले. बायकोला तर रडूच कोसळले.

चंद्रशेखर क्षेत्रपाल दादांना मी माझी घडलेली कहाणी आणि आपबीती सांगितली. त्यांनी म्हटलं फोन लावा. मी पुन्हा महाराजांना फोन केला त्यांची मुलगी कल्पना चौधरी म्हणाल्या दादा तुमच्या घरी पादुका येणार नाही माझ्या आईला खाली टाकलं. मी माझ्या दुःखात आहे. त्यावर मी बोललो ताई ,संत गजानन माऊलीला काही होऊ देणार नाही आणि फोन कट झाला.

त्यानंतर मी माझ्या घरीच भजनांमध्ये व्यस्त झालो. दरम्यान मनीषनगर मधून घोटकर दादांचा रात्री २ वाजता. फोन आला. माऊलींचे निधन झालं ? तुमच्या घरी पादुका येणार नाही ? उद्या सकाळी कार्यक्रम आहे. मी गोंधळून गेलो. निर्मूलनगरी येथील मला गजानन महाराजांची मूर्ती सत्कारात मिळाली होती त्याच मूर्तीची स्थापना शनिवारी केली.

पहाटेच्या सुमारास फोन वाजता वाजला मी विजयराव मोरघरे बोलतोय मला कळले की, तुमच्या घरी पादुका येणार नाही. मला शेगाव वरून शिवशंकर पाटील यांचा फोन आला की, तुम्ही पादुका घेऊन जा. आपल्या वडिलांना म्हणजेच शंकरराव मोरघरे यांना पुंडलिक महाराजांनी पादुकाचा रथ दिला होता त्यामध्ये चांदीच्या पादुका बसविल्या त्या पादुका देवराव प्रधान कडे पाठवा. माझी इच्छा पूर्ण झाली. माझे भावसासरे विजयराव करते राहणार शेंदुरजना घाट, यांच्या हाताने पादुका आणायचं ठरवलं. लाकडी पुल येथील विजय मोरघरे यांच्या घरी सकाळी पोहोचलो त्यांनी पूजा करून त्यांच्या घरच्या चांदीच्या पादुका आम्हाला दिल्या आम्ही सारे भक्तगण पालखीसोबत वाजत गाजत घरी पोहचलो.

पादुकांचा अभिषेक करून त्यांना स्थापित केलं. हरिपाठ, स्तोत्र, महाआरती झाली. त्यानंतर दिवसभर पादुका माझ्या घरीच राहिल्या. कारण कार्चुर्णातील माऊलीचे निधन.त्याच दिवशी माझ्या घरी माऊली स्थापीत झालीं. हे सत्य आहे. ३ फेब्रुवारी रोजी दुपारची आरती झाल्यानंतर कुणीतरी एक अनोळखी व्यक्ती माझ्या घरी पादुका घेऊन आलात. त्या पादुका आजही माझ्या घरी स्थापित आहे. हे सत्य आहे. असे मला अनुभव आलेत.. म्हणून सांगतो मनात भाव पाहिजे तरच देव भेटते.

जय गजानन माऊली.
॥गण गण गणात बोते ॥

[9767859983,9588604711]

Latest बातम्या