मोदी ब्राझिलविषयी बोलतात भारतातील लोकशाहीविषयी भूमिका काय?
नड्डांच्या औरंगाबादच्या सभेत खूर्च्या रिकाम्या
शरद पवारांनी स्वत: कबूल केले काँग्रेस संपू शकणा नाही
नागपूर,ता.१० जानेवारी २०२३: महाराष्ट्रात ज्या प्रकारची राजकीय व्यवस्था चालली आहे ती ‘दहशतवादी’पद्धतीची चालली आहे, एखाद्या माणसाला टार्गेट करायचं आणि त्याला उधवस्त करायचं.महिलांचा विषय असो,कुठलेही विषय असो,भाजप महागाईवर का बोलत नाही?बेरोजगारीवर का बोलत नाही?याचं उत्तर त्यांनी दिलं पाहीजे.शेतक-यांच्या प्रश्नावर,छोट्या व्यापा-यांच्या प्रश्नावर का बोलत नाही?ज्या उद्देशाने २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने जे मुद्दे घेऊन निवडणूक लढली,मते घेतली, आता त्या मुद्दांवर का येत नाही?असा सवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.ते आज मंगळवार (ता.१०) रोजी राणी कोठी येथे दुपारी २ वाजता पासून पार पडेलेल्या विस्तारीत कार्यकारीणीच्या बैठकीनंतर आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले,की ‘वन नेशन वन टॅक्स’चा जो त्यांनी नारा लावला होता,इन्सपेक्टर राज संपवून,आता जीएसटीच्या माध्यमातून छोट्या व्यापारांना विचारा,सगळ्यांनी व्यवसाय बंद करुन टाकले.आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात,अगदी नागपूरमधून देखील अनेक उद्योजक परदेशात निघून गेलेत.मूळ मुद्दावर का बोलत नाही भाजप?याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल आणि काँग्रेस त्यांना उत्तर देण्यास भाग पाडेल असे नाना म्हणाले.ज्या मुद्दांवर भाजप २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक लढली,त्या मुद्दांवर त्यांना समोर जावे लागेल,असा इशारा ही नाना यांनी या प्रसंगी दिला.
राहूल गांधींवर ज्या पद्धतीने भाजप टिका करीत आहे त्याचा आम्ही आजच्या बैठकीत निषेध केला.राहूल गांधी हे भारताच्या प्रत्येक नागरिकाला जोडण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेसाठी निघाले असून, ज्या प्रकारचं समर्थन त्यांना मिळतंय त्या समर्थनाचा विरोध भाजप करत आहे,ही लोकशाहीला न पटणारी गोष्ट आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नुकतेच एक विधान केले.यात ते ब्राझिल देशात हरणा-या लोकांच्या बंडाविषयी बोलले,त्यांनी राष्ट्रपतीनिवासावर हल्ला केला,हे लोकशाहीसाठी बरोबर नाही असे ते म्हणाले. भारतामधल्या लोकशाहीविषयी देखील मोदींनी बोलावं,आज काय परिस्थिती आहे,आपली भूमिका स्पष्ट करावी,हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
आज न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा केंद्र सरकार व न्यायपालिकेत रोज भांडण चालू आहे त्यामुळे न्याय व्यवस्था सुरक्ष् त नाही,निवडणूक आयोगसुद्धा सुरक्ष्त नाही.प्रशासकीय व्यवस्थासुद्धा सुरक्ष्त नाही,अशी परिस्थिती जेव्हा देशामध्ये आहे,या ही व्यवस्थेबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी काही भूमिका मांडावी,ही अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे,देशाच्या जनतेची आहे. देशामध्ये लोकशाही आता वाचली नाही,अशा परिस्थितीत राहूल गांधी यांची ‘भारत जोडो ’यात्रा जेव्हा श्रीनगरला पोहोचेल,अश्या वेळी राज्यातील असंख्य लोकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं,असे ही आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले असल्याचे नाना पटोले यांनी संागितले.
यावेळी त्यांनी बैठकीत जे एकूण सात ठराव मंजूर करण्यात आले,त्याविषयी माहिती दिली.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की राहूल गांधी यांचा संदेश आम्ही ‘हात से हात जोेडो‘या उपक्रमातून अगदी शेवटच्या माणसापर्यंत पाहोचवणार व त्या माध्यमातून काँग्रेसचा विचार पोहोचवणार आहोत. जे हिंदू-मुस्लिमवाद करीत सत्तेत बसलेले लोकं आहेत ते जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देतात,काँग्रेस जनेतचे मूळ प्रश्न घेऊन लोकांपर्यंत पोहोचणार व शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचे विचार पोहोचणार या पद्धतीचा संकल्प आम्ही आज ‘हात से हात जोडो‘उपक्रमात केला आहे.
राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’यात्रेदरम्यान नांदेड तसेच शेगावची जाहीर सभा असो त्यात देगलूर ते मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत जनेतने दिलेले योगदान,स्वयंर्फूतेतेनी आलेली लोकं,काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं,स्वयंसेवी संस्थांचे,डॉक्टर्स,अभियंते संघटनांचे,सिविल सोसायटीचं अनेक लोकांचे आभार आजच्या बैठकीत व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय राज्यामध्ये अतिवृष्टिमुळे राज्यातील जो शेतकरी वर्ग अडचणीत आला, त्याला पाहीजे ती मदत राज्य सरकारने केली नाही.पिक विम्यामध्ये केवळ मूठभर विमा कंपन्यांना फायदा कसा पोहोचेल हे केंद्र व राज्य सरकारचं धोरण आपल्याला लक्षात येत आहे. जे पीक आलं ते बघतोय की कापसाच्या गाठी आज केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात आयात करत आहे.कापसाच्या किमती खाली केल्या.सोयोबिनचे देखील हेच झाले.विदेशातून सोयाबिन आयात केल्यामुळे सोयाबिनचे दर कोसळले.१२ हजार क्विंटल दर असेलल्या सोयाबिनला आज चार हजार रुपये देखील प्रति क्विंटल मिळत नाही.धान उत्पादकांना ही महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी फसवलं.त्यांचा धान विकल्या गेला नाही,त्याला बोनस मिळाला नाही,‘घोषणा मोठी मात्र उंदिर निघाला’ अशी बोचरी टिका याप्रसंगी पटोले यांनी केली.
शेतकरी वर्ग फारच अडचणीत आहे,मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्या होतात म्हणून महाराष्ट्राच्या शेतक-यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.जेव्हा फडणवीस हे विरोधी पक्षात होते तेव्हा मध्यप्रदेशच्या सरकारने तेथील शेतक-यांचे करोनाकाळात ६ हजार ७०० कोटी रुपये माफ केले,त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील घडले पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली होती,आता त्यांनी नाकाने आघाडीची सरकार पाडली. आता ते स्वत: अर्थ मंत्री आहेत,उर्जा मंत्री आहेत,महाराष्ट्राचे सर्व शेतक-यांच्या शेती पंपाचे विज बिल आता त्यांनी माफ करावे,हा ठराव देखील आम्ही संमत केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारने व महाराष्ट्र सरकारने जे उद्योग राज्यातून पळवून नेले,महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा जो प्रयत्न करत आहेत,त्याचा ही निषेध आज बैठकीत करण्यात आल्याचे ते म्हणाले.
ओबीसीची जाती निहाय जनगणना झाली पाहिजे.विधान सभेत ही आम्ही ही भूमिका मांडली होती.अनूसूचित जाती-जमातीच्या लोकांची नोकरभर्ती व पदोन्नती तातडीने केली गेली पाहिजे याबाबत देखील आज ठराव समंत केला असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड हे प्रकल्प आहे त्यात उच्च प्रतिचा लोह खनिज साठा आहे,अनेक वर्ष पुरेल इतका साठा आहे,त्या ठिकाणी भिलाई स्टील प्लॅन्टपेक्षा मोठा प्रकल्प उभा करुन त्या लोह खनिजापासून तिथेच सगळ्या गोष्टी तयार झाल्या पाहिजे,लाखाे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे.नुसते गडचिरोली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास घडू शकतो,असं ते स्थळ आहे म्हणून राज्य सरकारने हे बाकीच्या राज्यामध्ये उद्योजकांच्या माध्यमातून जी लृट सुरु आहे,ती थांबवली पाहिजे,हा सुद्धा ठराव आज आम्ही मंजूर केला असल्याचे ते म्हणाले.
असे अनेक ठराव आहेत.आजच्या बैठकीत थोरात,अशोक चव्हाण तसेच यशोमती ठाकूर यांच्या अनुपस्थितीविषयी छेडले असता,यशोमती यांच्या सासूबाईंची तब्येत खराब असल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत तर थोरात यांना अधिवेशनादरम्यानच अपघात होऊन पायाचे हाड मोडले होते,अशोक चव्हाण यांना पाठीचा त्रास सुरु झाला असून पाच तासांचा प्रवास त्यांना झेपणार नव्हता,मात्र त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीविषयी मला आधी कळवले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
‘हात से हात जोडो’ हा उपक्रम कधी पासून राबविणार आहात?काय रणनीती आहे?या प्रश्नाबाबत बोलताना, येत्या २३ जानेवरीपासून हा उपक्रम सुरु होणार असल्याची माहीती त्यांनी दिली.प्रत्येक जिल्हा,तालुका,गाव,शहर,वार्डमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता नेते पोहोचणार आहे,त्या ठिकाणी पक्षाचा झेंडा फडकवला जाईल.२३ जानेवारी पासून हा कार्यक्रम सुरु होणार.घरा-घरावर स्टीकर देखील लावण्यात येणार आहे.लोकांना देशाच्या या मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.देश वाचविण्यासाठी,देशाची संवैधानिक व्यवस्था वाचवणं,ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच काँग्रेसची ही जबाबदारी असल्याने, आम्ही पुन्हा एकदा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा संकल्प या ‘हात से हात जोडो’उपक्रमांतर्गत राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एका प्रश्नावर बोलताना नाना म्हणाले,की हा शक्तीप्रदर्शनाचा नव्हे तर हा ऐतिहासिक क्षण आहे.या काळात सुद्धा एखाद्याने मानस तयार करावं आणि या देशाच्या विकासासाठी,हितासाठी स्वत:ला झोकून द्यावं.असं जे काम राहूल गांधींच्या हातून घडत आहे,कन्याकुमारी ते काश्मीर ही पदयात्रा काढणे हे काही सोपं नाही.आपल्याला बोलायला सोपं आहे.वास्तविकता तेव्हा कळली जेव्हा महाराष्ट्रातून ही यात्रा गेली.आम्ही स्वत: त्या यात्रेत सहभागी झालो,जेव्हा ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचणार तेव्हा त्या क्षणाला एक ऐतिहासिक क्षण म्हणूनच बघितलं पाहिजे.काँग्रेसचे लोकं तर जाणारच पण सर्वसामान्यांनी देखील त्या क्षणी उपस्थित राहावे,ही भूमिका आमची आहे.
‘काश्मीर फाईल्स‘विषयी छेडले असता,हा सिनेमा देश तोडणारा सिनेमा आहे,अश्या प्रतिक्रिया अनेक विश्लेषकांडून आल्या असल्याचे ते म्हणाले.ज्या पद्धतीने या हूकूमशाहीत आपलं मत मांडण्याच अधिकारच नाही,ज्या व्यवस्थेमध्ये ज्या सत्तेमध्ये त्यात सत्ता काहीही करु शकते अशी टिका त्यांनी केली.कारण त्यांच्याकडेच सगळ्याचं रिमोट कंट्रोल आहे कारण स्वायत्त संस्था आता वाचल्या नाहीत.त्यामुळे काश्मीर फाईल्स काय,आणखी कोणत्या तरी फाईल्स काढतील आणि ‘ऑस्कर’ला पाठवतील,त्यामुळे देशाची बदनामी करणे,देश हूकूमशाहीने चालविणे ही भाजपची मानसिकता आहे,हे आता देशाच्या जनतेलाही कळलेले आहे,असे ते म्हणाले.
आज काश्मीर पंडीतांची स्थिती काय आहे?माध्यमांना देखील ती दाखवता,मांडता येत नाही.हा प्रश्न जर भाजपला विचारला तर तो उत्तर देणार नाही.काश्मीर पंडीतांचा राजकीय लाभासाठी वापर करुन घेतला,पण आज ते सुखरुप नाहीत.काश्मीरमध्ये गेल्यास त्यांची देखील प्रतिक्रिया आम्ही घेऊ,असे ते म्हणाले.
राहूल गांधी यांनी पुजा-यांसंबधी केलेल्या टिकेकडे लक्ष वेधले असता,काही पोंगा पंडित ही असतात आणि काही प्रामाणिक पंडित ही असतात,राहूल यांचे विधान पोंगा पंडीतांना लागेल,पुजारी हा पुजारीच असतो.हा तपस्व्यांचा देश आहे,पुजा-यांचा नाही असे राहूल गांधी यांनी म्हटल्यास यात वावगं काय होतं?ज्यांना लागायचं ते लागेलच,अशी पुश्ती ही त्यांनी जोडली.
आघाडी म्हणून निवडणूक लढणार का?किवा विदर्भात काँग्रेसने सर्वात जास्त जागा जिंकून आणण्याकडे लक्ष लावले आहे का?यावर बोलताना महाराष्ट्र हा काँग्रेसचा होता आणि राहणार असे ते म्हणाले.भाजपला टोमणा मारीत,त्यांनी पुढच्या काळात काय करावं,आता औरंगाबादची सभा झाली ती पाहीली ना आपण,त्यांचे केंद्रिय अध्यक्ष आले होते,माध्यमांनी दाखवलं नाही पण सोशल मिडीयावर व्हिडीयो बघितले ना!ते तर ४९ जागा म्हणतात पण ४८ जागाच आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या.
उदयपूरमध्ये पार पडलेल्या चिंतन शिबिराबाबत विचारले असता,त्या प्रक्रिया झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच देशातील सर्वोच्च न्यायालयाने ‘धर्मांतर’हा गंभीर मुद्दा असल्याचे निरीक्षण नोंदवले व ‘धर्मआचरणाचा’ अधिकार व ‘धर्मांतराचा’ अधिकार या मध्ये तफावत असल्याचे नमूद केले. काँग्रेसच्या आज राणी कोठी येथे पार पडलेल्या विस्तारीत कार्यकारणीच्या बैठकीत धर्मांतरणाचा मुद्दा चर्चेला आला का?किवा धर्मांतरणावर काँग्रेसची भूमिका काय आहे?या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले,की यात दोन गोष्टी आहेत,सर्वधर्मसमभाव आहे आणि प्रत्येक धर्मायियांना आपापल्या धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार आहे.कोणालाही आपल्या धर्मांत जबरदस्ती ओढून आणता येत नाही,हे अापल्या संविधानामध्येच म्हटलेलं आहे.सर्वोच्च न्यायालयात काय प्रकरण आहे ते मला माहिती नाही,पण संविधानानेच हे आपल्याला शिकवलेलं आहे मात्र,या पद्धतीचे मुद्दे जाणूनबूजून हे भाजपकडून आणले जातात आणि मूळ मुद्दांपासून लोकांचे लक्ष वळवले जाते,म्हणून आम्ही जनतेच्या अदालतमध्ये चार्जशीट त्यांच्यावर दाखल करणार आहेत,हीच आमची भूमिका आहे,असे नाना म्हणाले.
समान नागरीक कायदा केंद्राने आणल्यास समर्थन करणार का?या प्रश्नावर बोलताना,आपल्या देशामध्ये समान नागरी कायदा आहे,मात्र नाना पटोलेने केलं तर ते बरोबर,राज्यपालांनी,भाजपच्या मंत्र्यांनी महापुरुषांचा अवमान केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही,सोशल मिडीयावर कोणी काही लिहलं,एखाद्या मूर्तीची विटंबना झाली की त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात,मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही,त्यांच्यासाठी समान नागरी कायद्या आणायला पाहिजे जे लोकं या समान नागरी कायद्याला मानत नाही,आपल्या देशात पूर्वीपासूनच समान नागरी कायदा आहे,अजून काही वेगळा समान नागरी कायदा ते आणणार आहेत?याच्या मध्ये अजून काही प्रावधान,प्रस्ताव आलाच नाही.देशामध्ये सगळ्यांना न्याय आहे.
परवा लोकसभेत साढे दहा लाख कोटींचं कर्ज केंद्र सरकारने मूठभर उद्योगपतींचं माफ केलं.त्या खासदारांना प्रश्न केला होता की किती उद्योगपतींचं कर्ज माफ केलं,कोणाचं केलं आणि किती केलं त्यांनी सांगितलं की एवंढ कर्ज आम्ही माफ केलं पण रिझर्व बँकेने हे सांगितलं की त्या लोकांची नावे तुम्हाला उघड करता येणार नाही!रिझर्व बँकेच्या कायद्यामध्ये आपल्याला सगळ्यांसाठी कायदा सारखा आहे.जर तुम्ही दहा हजार रुपयांचे कर्ज घेतलं आणि ते तुम्ही फेडलं नाही तर वृत्तपत्रात तुमचा फोटो छापला जातो.घर जप्त केलं जातं.संपत्ती जप्त हाते पण रिझर्व बँक असं कसं सांगू शकते की ज्यांनी कर्ज बुडवले त्या उद्योगपतींची नावे नाही उघड करता येणार?ज्या देशामध्ये सर्वांसाठी कायदा समान आहे त्या देशात समान नागरी कायद्या तरी समान राहणार का?असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
याप्रसंगी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, खा. बाळूभाऊ धानोरकर, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा