
नागपूर,ता.१४ नोव्हेंबर २०२२: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवल्या जाताच,हे संघाचे कटकारस्थान असल्याचा जो कांगावा केला आहे ते बघता, अमोल मिटकरीसारखा थोतांड व थिल्लर राजकारणी उभ्या महाराष्ट्रात नसावा,असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.
महाविकास आघाडीची सरकार राज्यातून हद्दपार झाल्यानंतर अमोल मिटकरी सारख्या राजकारण्याकडे कोणतंही काम राहीलेलं नाही,त्यामुळेच माध्यमांचे लक्ष स्वत:कडे वेधण्याकरिता अश्या प्रकारचे वक्तव्य मिटकरी करीत असल्याचे आरोप करीत, मिटकरी यांनी तात्काळ अश्या प्रकारच्या विधानांचे ‘धंदे’ बंद करावे,असे आव्हान मेश्राम यांनी केले.
संघाच्या संदर्भात बोलण्याची पात्रता तसेच संघावर बेताल आरोप करण्याची कोणतीही कारणे अमोल मिटकरींकडे नाही,ज्या काही चुका होतील,जो कोणी चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक करण्याचे दुस्साहस करेल,त्यांना वेठीवर आणण्यासाठी कायदा आपल्या पद्धतीने काम करेल.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृहखातं काम करीत आहे.कोणत्याही प्रकारचे लांगुनचालन असेल,कोणत्याही पद्धतीची भ्रष्ट वर्तवणूक असेल ती या महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही,असा सज्जड इशारा धर्मपाल मेश्राम यांनी दिला.
नुकतेच आव्हाड संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी,हे संघांचे ठरवलेले षडयंत्र असल्याचे विधान केले होते.भारतीय जनता पक्ष,सनातनी प्रवृत्ती आणि राष्ट्रीय सेवक संघाच्या प्रमुख लक्ष्यावर जितेंद्र आव्हाड हे पूर्वपासूनच होते,हा ठरवलेला ट्रॅप आहे, ज्यामध्ये दूर्देवाने आव्हाड यांना अडकवण्यात आले,ही लोकशाही नसून हूकूमशाही असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला होता.
नुकतेच एका महिलेच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

आमचे चॅनल subscribe करा