Homeनागपूर न्यूज'राेजगार तुमच्या मुठीत':गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

‘राेजगार तुमच्या मुठीत’:गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम


‘मेगा जॉब’मेळाव्याला पदवीधर युवकांचा उत्सफुर्त प्रतिसाद

दहा हजारपेक्षा जास्त पदवीधरांनी केली नोंदणी

उद्या हॉटेल रिजेन्टा येथे सहभागी होणार ५० कंपन्या

नागपूर,ता. ६ नोव्हेंबर २०२२: विदर्भात प्रामुख्याने युवा बेरोजगारी,उद्योजकता विकास व शिक्षण ही सर्वात महत्वाची आवाहने आहेत.राेजगाराचे प्रश्‍न आणि त्यातून निर्माण होणा-या समाजातील इतर ज्वलंत प्रश्‍नांकडे बेरोजगार पदवीधरांची असहिष्णुता आणि गुन्हेगारीकडे कल वाढलेला दिसतो.विदर्भाच्या तरुणांमध्ये अफाट क्षमता,नाविन्य आणि सर्जनशीलतेची नैसर्गिक वृत्ती आहे.त्यांच्यात उच्च आकांक्षा आहेत. धाेरण,कौशल्य व तंंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांच्या स्वपप्नांना प्रत्यक्षात रुपांतरित करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेऊन विदर्भातील सुशिक्षित व पदवीधर युवकांना रोजगार उपलब्ध करुन विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करुन देण्यासाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनतर्फे ‘मेगा जॉब फेअर’चे आयोजन उद्या ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हॉटेल रिजेन्टा,तिसरा मजला,जगनाडे चौक,नंदनवन येथे करण्यात आले असल्याची माहिती आमदार अभिजित वंजारी यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.याप्रसंगी मंचावर समन्वयक डॉ.हेमंत सोनारे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अभिजित वंजारी म्हणाले,की २१ व्या शतकातील आजचे युग आव्हानात्मक स्पर्धेचे युग आहे.महाराष्ट्रात दर वर्षी मोठ्या संख्येने युवक,युवती शिक्षण घेऊन पदवी,डिप्लोमासह विविध शिक्षण संस्थांमधून बाहेर पडतात.नोक-यांचे प्रमाण त्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे पदवी नंतर पुढे काय?हा प्रश्‍न त्यांनासमोर ‘’वासून उभा राहतो.याच प्रश्‍नांचे उत्तर शोधण्यासाठी तसेव यासोबतच विदर्भातील सुशिक्षीत व पदवीधर युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मेगा जॉब फेअर’या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भातील युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांना प्रचंड यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.या ‘मेगा जॉब फेअर’मध्ये संपूर्ण भारतातील ५० नामांकित कंपन्यांनी भाग घेतला आहे.जवळपास ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी या मेगा जॉब फेअरमध्ये मिळणार असण्याचा दावा वंजारी यांनी केला.

या उपक्रमात ॲक्सीस बँक,डिफ्यूशन इंजिनिअरिंग,डीटीडीसी,एचडीएफसी लाईफ,जबील,लोगोस्कमी सॉल्यूशन,एलिट जनरल,ओरिस टेक्नॉलॉजीस, पीहान इन्फोटेक,टाटा मोटर्स,ट्रस्ट सॉफ्टवेअर,लाईट हाऊस,लक्ष्मीअग्नि,व्यंकिस,धन इन्फोटक,फूकोकू इंडिया लिमिटेड,दिनशॉस,इंडूरेन्स,जस्ट डायल,बैद्यनाथ,हर्मन इंटरनॅशनल,बीएस कॉरपोरेशन,डिजिट्रॉन,पनवा ग्रुप,पीसीआय ॲनालिटिक्स,योगानंदा ग्राफिक्स,मेडीयन हॉटेल,रेजिडा ग्रूप,रॉयल बेवटेक,इंडोरामा,धूत ट्रांमिशन,बजाज स्टिल इंडस्ट्रीज,मॅरिडियन आयएनएन,ऑरेंज बिट्स इत्यादी अश्‍या देशभरातील ५० नामांकित कंपन्या सहभागी होणार असून विदर्भातील कानाकोप-यांमधून जवळपास दहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांंनी या मेगा जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी नेांदणी केली आहे,आम्हाला मात्र अखेर १० हजार संख्येवर नोंदणी थांबवावी लागली असल्याचे वंजारी यांनी सांगितले.

मात्र,वर्षभरात सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार असल्याचे ते म्हणाले.यात विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये सुशिक्षित युवांसाठी जुन-जुलै दरम्यान करिअर काऊंसलिंग हा उपक्रम राबविला जाईल.याशिवाय स्वयंराेजगार मेळावे घेतले जाईल.याशिवाय रोजगार मेळावे देखील दर वर्षी घेण्यात येतील,अशी माहिती त्यांनी दिली.

उद्योग धंद्यांच्या बॅकलॉक विदर्भामध्ये भरायचा असल्यास आता पुणे,मुंबई,औरंगाबाद यासारख्या आधीच उद्योगधंद्यांच्या बाबतीत प्रचंड गुंतवणूक झालेल्या शहरांना वगळून, विदर्भात गुंतवणूकीची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.राज्य सरकारने या उद्याेजकांना राज्यात कमी दरात वीज,पाणी,जमीन तसेच इतर संसांधने पुरविली पाहिजे,यासाठी तातडीने त्यांनी धोरण आखावे,असे आवाहन याप्रसंगी अभिजित वंजारी यांनी केले.

माजी आमदार प्रा.अनिल सोले हे देखील दरवर्षी फेब्रुवरी महिन्यात रोजगार मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजित करीत असतात मात्र त्यांच्या या मेळाव्यांवर टिका करीत, सोले यांनी आजपर्यंत एकूण किती युवकांना रोजगार मेळाव्यातून मिळवून दिला,याची यादी मोबाईल क्रमांकासह द्यावी व जनता चौकात खुली चर्चा करावी,असे आव्हान तुम्ही दिले होते,आता तुम्ही देखील रोजगार संबधीचा दावा करीत आहात याचा काय पुरावा असणार?या प्रश्‍नावर बोलताना, आमच्या मेळाव्यात ज्या काही नियुक्त्या होतील त्यांच्या नावासह संपूर्ण माहिती माध्यमांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’अभियानाविषयी विचारले असता,राहूल गांधी यांच्या या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील स्वयंस्फूर्तीने लोक,संघटना,स्वयंसेवी संघटना या सहभागी होत असल्याचे ते म्हणाले.नांदेड व शेगावमध्ये राहूल गांधी यांच्या दोन सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंधेरी येथील पोटनिवडूकीत मोठ्या संख्येने ‘नोटा’चा झालेला वापर याविषयी छेडले असता,ही निवडणूक अविरोधच व्हायला हवी होती,असे त्यांनी सांगितले.

कंत्राटी पद्धत ही चुकीचीच-
याप्रसंगी बोलताना देशात सुशिक्षित तरुणाईचे सर्वात जास्त नुकसान जर कोणत्या धोरणाने केले असेल तर ते कंत्राटी धोरणावर नियुक्ती करणारे धोरण होय.अश्‍या रितीने सुशिक्षित तरुणांना रोजगार देणे व यानंतर १० ते ३५ वर्ष ही नोकरी केल्यानंतर केवळ कंत्राटी तत्वावर ते रुजू झाले असल्याने त्यांना कामावरुन काढून टाकणे,ही पद्धतच मूळात चुकीची असल्याचा घणाघात त्यांनी केला.सरकार कोणाचीही असो,शासनाच्या वेगवेगळ्या विभागात हेच धोरण राबविले जात आहे.त्यामुळे राज्यात ७५ हजार सरकारी नोक-यांवरील नियुक्तींचे स्वागतच केले पाहिजे मात्र त्यासोबतच कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या हे धोरणही आता बदलले पाहिजे व धाडसी निर्णय घेतला पाहिजे.असे मत त्यांनी व्यक्त केले.

नुकतेच ५ शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश परवानगी दिल्लीतील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने नाकारली आहे.त्यामुळे यावर्षी २०२२-२३ शैक्षणिक सत्रात होऊ घातलेल्या प्रवेश प्रक्रियेत पाच ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालये सहभागी होऊ शकणार नाहीत. या निर्णयामुळे राज्यातील ८ हजार आयुर्वेदाच्या बी.ए.एम.एस या पदवी अभ्यासक्रमासाठी नीट प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.या महाविद्यालयांमध्ये आवश्‍यक प्राध्यापकांची संख्या कमी होती याशिवाय इतर अनेक बाबींची पूर्तता केली नव्हती.या मुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून यासंबंधी देखील हिवाळी अधिवेशनात वाचा फोडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने संगणक ऑपरेटर्स काम करीत आहेत मात्र त्यांच्या नोक-या घेऊन दुस-या एजंसीला काम देण्याचा घाट घातला जात आहे,या विषीय विचारले असता,या संबंधीचा देखील तारांकित प्रश्‍न येत्या हिवाळी अधिवेशनात लावला असल्याची माहिती अभिजित वंजारी यांनी दिली.

Latest बातम्या