

ॲड.धर्मपाल मेश्राम यांचा सल्ला
नागपूर,ता.११ ऑक्टोबर २०२२: रविवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन मेळाव्यातील भाषणात सुषमा अंधारे व भास्कर जाधव यांनी मानहानिकारक विधाने करुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती,या पार्श्वभमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी अंधारे यांना संविधानाच्या चौकटीत राहूनच प्रश्न उपस्थित करण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी ’नया मुुल्ला ज्यादा नमाज पढता है’अशी म्हण आम्ही ऐकली असल्याची बोचरी टिका करीत,ज्या परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाबद्दल आणि त्यांच्या संविधानाबाबत अंधारे या सांगत असतात, त्याच संविधानात कायद्याच्या आणि मर्यादेच्या चौकटीत राहून प्रश्न उपस्थित करने अपेक्षीत असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
मात्र असे न करता अंधारे या अंगविक्षेप करीत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करतात ,चेह-यावरचे हावभाव बदलतात ही कृती योग्य नसून,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार देशाच्या सर्वोच्च अश्या संवैधानिक पदावर बसलेल्या पंतप्रधानांविषयी कोणी जर फाजील बोलणार असतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.अंधारे यांची वर्तवणूक मलाच नव्हे तर या देशाच्या सव्वाशे कोटी जनतेला देखील रुचली नसावी,असे ते म्हणाले.
सुषमा अंधारे यांनी हा फाजीलपणा वेळीच थांबवावा व या पद्धतीचे एकपात्री प्रयोग करने व अश्या प्रयोगातून महाराष्ट्रातल्या जनतेचे मनोरंजन करने थांबवावे असा सल्ला त्यांनी दिला.अंधारे या स्वत:ला बाबासाहेबांची अनुयायी समजत असल्यास, अश्या कोणत्याही पद्धतीने गैरवर्तन करण्याची गरज नाही मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी अत्यंत जबाबदारीने प्रश्न उपस्थित करावे,असेही मेश्राम म्हणाले.
अंधारे या आता ख-या अर्थानं राजकारणात आल्यात आहेत की काय?असे असले तरी कधी राष्ट्रवादीच्या मंचावरुन किवा कधी शिवसेनेच्या मंचावरुन बोलता बोलता त्यांनी पातळी सोडू नये तसेच भाषेची आणि वर्तवणूकीची मर्यादा जपावी असे आवाहन ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केले.
ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये सुषमा अंधारे,खासदार विनायक राऊत,आमदार भास्कर जाधव,मधुकर देशमुख व अनिता बिर्जे यांच्या विरोधात आता कलम १५३ व ५०० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे,हे विशेष.

आमचे चॅनल subscribe करा