Homeनागपूर न्यूजस्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बरळणा-या नाना पटोलेंची मनोवस्था ढासळली

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बरळणा-या नाना पटोलेंची मनोवस्था ढासळली

Advertisements

ॲड.धर्मपाल मेश्राम यांची टिका

नागपूर,ता.१० ऑक्टोबर २०२२: राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार गेल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फार मोठा मानसिक धक्का बसला अाहे, त्यामुळेच ते आता वाट्टेल ते बरगळायला लागले असल्याचा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.

याप्रसंगी बोलताना ॲड.मेश्राम म्हणाले की ज्या काँग्रेस पक्षाच्या बाबतीत नाना हे नेहमी वल्गना करीत असतात, स्वातंत्र्याच्या काळात काही इंदिरा काँग्रेस नव्हती,तरी देखील नाना हे इंदिरा काँग्रेसच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचा इतिहास मांडत असतात.

विशेष म्हणजे त्या काळी जे कोणते नेतृत्व काँग्रेसच्या नावाखाली स्वातंत्र्य लढ्याचा संग्राम लढत होती त्यापैकी किती जणांनी भयंकर अशी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे?असा सवाल त्यांनी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक तप काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे.ज्या काही सव्वाशे,दिडशे स्वातंत्र्य लढ्याच्या सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली,त्या पैकी एक स्वातंत्र्यवीर सावरकर होते.

पटोले हे ज्या काँग्रेसची गोष्ट करतात त्या काँग्रेसच्या पूर्वापार नेतृत्वाला किंबहूना पटोले यांच्या तरी पूर्वापार पिढ्यांमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा कोणाला झाली आहे?याचे ऐतिहासिक संशोधन करावे व महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेसमोर मांडावे,असे आव्हान ॲड.मेश्राम यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पटोलेंच्या विषयी खरंच बोलले,फडणवीस बोलले होते की अडीच जिल्ह्यांचंही नेतृत्व ज्या नानांना सांभाळता आले नाही त्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर बसून भारतीय जनता पक्षाचा विरोध मांडणे हे त्यांच्या नैतिकतेलाही धरुन नाही. त्यामुळेच फडणवीस हे जे बोलले की पटोले यांच्या कोणत्याही वक्तव्याला प्रतिक्रिया देण्याची गरज नाही,ते आता आमच्यासरख्या कार्यकर्त्यांनाही पटले असल्याची खोचक टिका ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली.

Latest बातम्या