

नागपूर,ता.३० सप्टेंबर २०२२: ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या ८० व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने व महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला रुपेश पवार दिग्दर्शित ‘अगस्त क्रांती‘ हे नाटक राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्थेतर्फे शनिवार,दि.१ ऑगस्ट रोजी सादर केले जाणार आहे.
देशाचा स्वातंत्र्य संग्राम जवळून बघितलेल्या व चळवळीशी जुळलेल्या राष्ट्रप्रेमी मान्यवरांनी या नाटकाला उत्स्फूर्त दाद दिली आहे. या नाटकाची निवड प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय नाटय विद्यालय, नवी दिल्ली आयोजित आंतरराष्ट्रीय ‘भारत रंग महोत्सव’ येथे झाली व ११ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई येथे या नाटकाचा प्रयोग झाला.
नाटकाच्या सादरीकरणाला महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची उपस्थिती लाभली होती व प्रयोगानंतर त्यांनी “नाटक सुरू झाले त्या क्षणापासून अगदी संपेपर्यंत नाटकाने मला बांधून ठेवलं, नाटकात ‘बा’ ला ज्या रीतीने दाखवलं तसं मी आतापर्यंत कुठल्याच नाटकात बघितले नाही” असे म्हणत नाटकाचे कौतुक केले व शाबासकीची थाप दिली.
८ ऑगस्ट २०२२ रोजी नागपूरात झालेल्या प्रयोगाला स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे या आवर्जून उपस्थित होत्या. ‘तुमच्या सारखी युवा पिढी हे जे काम करते आहे त्याला बघून माझी चिंता कमी झाली आहे व नाटकातील सगळीच दृश्य तुम्ही हुबेहूब उभी करत, मला परत स्वातंत्र्य संग्रामाच्या दिवसांमध्ये घेऊन गेले,अश्या शब्दात त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले.
‘अगस्त क्रांती’ या नाटकाचे सादरीकरण उद्या गांधी भवन, एलएडी कॉलेज चौक, नागपूर येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे . नाटकाचा प्रयोग निशुल्क असून नाट्यरसिकांने जास्तीतजास्त संख्येत नाटकाला उपस्थित राहून नाटकाचा आनंद घ्यावा असे आवाहन रुपेश पवार आणि त्यांच्या चमूने केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
