Homeनागपूर न्यूजसंक्रमणाच्या काळातही पत्रकारिता जिवंत तर लोकशाही जिवंत:फडणवीस

संक्रमणाच्या काळातही पत्रकारिता जिवंत तर लोकशाही जिवंत:फडणवीस

Advertisements

स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२१

फडणवीसांनी पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपचे संघटन वाढवले:गिरीश गांधी

सजग,सुदृढ,समर्पित पत्रकारिता ही काळाची गरज:सत्कारमूर्ती राहूल पांडे

आतापर्यंत इतकं झालं पण पुढे ही खूप काही करायचे आहे:सत्कारमूर्ती महेंद्र सुके

पत्रकारिता हे व्रतच:माजी न्यायमूर्ती सिरपूरकर यांचे विधान

मी पुन्हा येईल’पत्रकार वाटच बघत होते:फडणवीस यांची कोपरखळी

माहिती आयुक्त पदी असताना पत्रकार म्हणून पुरस्काराचा स्वीकार: नीतीमत्तेत बसतं का?ज्येष्ठ पत्रकारांमध्ये रंगली चर्चा

नागपूर,ता.२४ सप्टेंबर २०२२: मी मुख्यमंत्री पदी असताना पत्रकारांच्या समस्या ख-या अर्थाने समजू शकलो.मुख्यमंत्री पदावर असताना पुष्कळ काही देण्याचा माझा रेकॉर्ड आहे.२०१५ साली तर पत्रकारांच्या पुरस्कारांचा चार वर्षांचा बॅकलॉग होता,त्या वर्षी मी तो बॅकलॉक भरुन काढला व एक साथ पाच ही वर्षांचे पुरस्कार प्रदान केले मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाले अन पत्रकार हिताचे कायदे,पेंशन,पत्रकारांसाठीची ऑक्रेडिशन समिती नाही,पत्रकारांसाठीच्या योजना बंद,अशी परिस्थिती उद् भवली.आता मी उपमुख्यमंत्री असून वित्त विभाग माझ्याचकडे आहे,यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संवेदनशील मनाचे आहेत,नुकतेच सोलापूरात पत्रकारांसाठीच्या एक कोटीच्या योजनेच्या प्रसत्तावावर मी स्वाक्षरी ही केली,त्यामुळेच ’मी पुन्हा येईल’ही वाट पत्रकार मात्र नक्कीच बघत होते अशी कोपरखळी मारत,पत्रकारिता कितीही संक्रमणाच्या काळात गेली तरी जोपर्यंत पत्रकारिता जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ते आज शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेस क्लब येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२१’ सोळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर होते.प्रमुख पाहूणे म्हणून कृष्णा इन्सिटिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस,कराडचे कुलपती डॉ.वेदप्रकाश मिश्रा,विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ.गिरीश गांधी,टिळक पत्रकार भवन ट्रस्ट,प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र,सदस्य व ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव,सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी व इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी दैनिक हितवादचे शहर संपादक व ज्येष्ठ पत्रकार व विद्यमान राज्याचे माहिती आयुक्त राहूल पांडे यांना तसेच नाट्यलेखन,दिग्दर्शक व दैनिक सकाळ मुंबई येथील सध्या पत्रकार म्हणून कार्यरत असणारे व मूळ नागपूरचे महेंद्र सुके यांना स्वर्गीय अनिलकुमार स्मृति पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की,पत्रकार सुके यांच्या मनोगतातील एक वाक्य मला खूप भावलं.ते म्हणाले की आतापर्यंत इतकं झालं पण पुढे ही खूप काही करायचं आहे.त्यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे.पत्रकारितेत समाधानी होने योग्य नाही.सुके हे स्वत:नाट्यकर्मी,नाट्य लेखक,दिग्दर्शक आहेत.पत्रकारितेत साहित्यिक मनाची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पत्रकारिता सारगर्भित व संवेदनशील होत नाही.सुके हे त्यांच्या पत्रकारितेतील चांगल्या प्रवासामुळेच या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी ठरल्याचे फडणवीस म्हणाले.या पुढे ही त्यांना मागे वळून बघायचे नाही,आनंद मिळवत पुढे जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे,असे फडणवीस म्हणाले.

ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते स्वर्गीय अनिलकुमार तेजस्वी होते,राष्ट्रप्रेमी होते,लेखक व साहित्यिक होते.त्यांच्या तेजपुंज नावाने गेल्या ४० वर्षांपासून पुरस्कार प्रदान केला जातो,पुढेही ही परंपरा चालत राहीली पाहिजे,अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली.हा प्रतिष्ठित पुरस्कार आजपर्यंत ज्यांना-ज्यांना देण्यात आला,ती सगळी नावे मी वाचली आहे,त्यातील सर्वांशीच माझा काही ना काही संबंध आला आहे.सध्या ‘गैर पत्रकार’असणारे राहूल पांडे हे या पुरस्काराचे योग्य मानकरी असल्याचे फडणवीस म्हणाले.

पत्रकारितेवर बोलताना,न्यायदानाचे जे कार्य चालतं,ते समजून न घेता अलीकडे बातम्या प्रसिद्ध होतात,असे ते म्हणाले.न्यायमूर्तींची टिपण्णी समजून न घेता अलीकडे बातम्या प्रसिद्ध केल्या जातात.न्यायमूर्तींची टिपण्णी आणि प्रत्यक्ष निकाल यात फार मोठा फरक असतो.टिपण्णींचा निकालाशी काही एक संबंध नसतो,त्यामुळेच न्यायालयात जे काही बोलल्या जातं ते कश्‍याप्रकारे छापल्या गेलं पाहिजे याचे आदर्श उदाहरण राहूल पांडे असल्याचे फडणवीस म्हणाले.

अनेक न्यायमूर्ती हे हितवादमधील राहूल पांडे यांची बातमी वाचत असत,हे फार महत्वाचे असल्याचे फडणवीस म्हणाले.राहूल यांच्या बातमीत सकारात्मकता असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.आज ही उचित मार्गाकडे न्यायाची जबाबदारी ते पार पाडीत आहे,हे काम ते सातत्याने करीत आहेत,जरी आज ते पत्रकार नाहीत ,राज्य माहिती आयुक्तसारख्या जबाबदार पदावर असले तरी मनाने ते पत्रकारच असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.
माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग खंडणीसाठी करणा-यांना रोखण्याचे काम राहूल पांडे करीत आहेत.अश्‍या अर्जांवर लॅण्डमार्क जजमेंट देण्याचे काम राहूल करीत असल्याचे सांगून, काही लोकांनी ब्लॅकमेलिंगसाठी या कायद्याचा आधार घेतला मात्र राहूल यांनी त्यावर चपराक बसवली,त्यांचे हे कार्य महाराष्ट्र व देशाला मार्गदर्शक राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

याप्रसंगी बोलताना राहूल पांडे म्हणाले,की २४ सप्टेंबर २०२१ रोजी माझा राज्य माहिती आयुक्त पदी शपथविधी झाला,एक वर्षा नंतर मी आज पत्रकारितेचा पुरस्कार स्वीकारत आहे.हा पुरस्कार स्वीकारावा की नाही,अश्‍या द्विधा मनस्थितीत मी होतो.दिवंगत समाजसेवी उमेश चौबे पासून तर प्रदीप मैत्रपर्यंत या पुरस्काराचे मानकरी राहीले आहेत.मी १९९८ पासून २०२१ पर्यंत दैनिक हितवाद सोबत जुळलेला असून पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काही थोडे फार कार्य करु शकलो तीच माझी जमापुंजी आहे.

पुरोहितांच्या स्कूल ऑफ जर्नलिझममध्ये मी फेलाेशिप करतोय असे सांगत, पत्रकारांच्या आंतरिक सुरक्षेच्या प्रश्‍नावर मी अभ्यास करीत असल्याचे ते म्हणाले.आपल्या लेखणीतून ‘टोपी उछालने का अधिकार नही’हे ब्रीद मला पाठ असून आपल्या लेखणीचा दुरुपयोग चूकून ही होता कामा नये,असे त्यांनी सांगितले.याच तत्वावर चालल्यामुळे हितवाद सारख्या वृत्तपत्राला ११० वर्षांची गौरवपूर्ण परंपरा लाभली असे सांगून,आज पत्रकार व माध्यमांना आपली विश्‍वाहर्ता राखण्याचे खूप मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले.

आज पत्रकारितेसंबंधी जनाक्रोश,प्रॉस्टिट्यूड,पेड न्यूज सारखे शब्द ऐकू येत आहे.माध्यमांविषयी सर्वसामान्य धोरण काय?माध्यमे काम कसे करीत आहेत?निर्णय प्रक्रियेत सहभाग किती?हे जनतेला माहितीच नाही.धोरणकर्ते फार चतूर झाले आहेत.माध्यमकर्मींवर टिका करतात मात्र माध्यम समूहांच्या मालकांना कोणी बोलत नाही!असा टोला त्यांनी हाणला.

आज माध्यमात जे काही घडत आहे,तो चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले.पत्रकारितेत चांगलं काम करणा-यांचं जास्त कौतूक होत नाही.तेव्हाचे तरुण,नंतरचे मुख्यमंत्री व आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र सातत्याने पत्रकारांच्या बाजूने भूमिका वठवित राहीले.नंतर ते विरोधी पक्ष नेते राहीले तेव्हा देखील ते आपल्यासाठीच्या धोरणांसाठी अग्रेसर राहीलेत.महाराष्ट्रात पत्रकारांसाठीची पेंशन योजना असो,यासाठी त्यांच्या अखत्यारितीतील वित्त विभागाचा विरोध बाजूला सारुन आद्य पत्रकार बाळासाहेब जांभेकरांच्या नावाने ही योजना राज्यात त्यांनी लागू केली असल्याचे ते म्हणाले.

आज प्रिंटचं अस्तित्व आहे की नाही?येत्या काळात ते राहणार की नाही?प्रचार माध्यमे असो किवा डिजिटल मिडीया,याविषयी माजी सरन्यायाधीश बोलून गेले आहेतच,या माध्यमांचे अस्तित्व काय?यासाठी शासनाकडे कोणतेही धोरणच नाही.भाषिक माध्यमांमध्ये देखील चांगल्या होतकरु पत्रकारांची कमतरता आढळते,असे ते म्हणाले.

समाजात पत्रकारांविषयीची अनास्था ही लोकशाहीसाठी घातक असल्याचा सूचक इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.आज सजग,सुदृढ,समर्पित तसेच पारदर्शी पत्रकारितेची गरज प्रतिपादीत करुन,पत्रकारांविषयी समाजाच्या मनात आस्था निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकारांना समाजाचा पाठिंबा असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

पांडे यांनी पुरस्काराचे श्रेय आई- वडील, पंजाबचे राज्यपाल आणि चंदिगढचे प्रशासक बनवारीलाल पुरोहीत, संपादक विजय फणशीकर यांना दिले. पुरस्कार कधी मिळाला यावर त्याचे मूल्य ठरत नाही तर तो मिळाला हे महत्त्वाचे असते, असे सांगितले. या पुरस्काराच्या रक्कमेमध्ये  पांडे यांच्याकडून अधिकची पाच हजार रुपयांची रक्कम देशाच्या आंतरिक सुरक्षेच्या प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या एखाद्या उमद्या, तरुण पत्रकाराला फेलोशीप मिळावी, असे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना पत्रकार महेंद्र सुके यांनी काही आठवणींना उजाळा दिला.दैनिक जनवादमध्ये असताना ‘असं झालं कसं’या नाटकाचे परिक्षण करण्याची संधी मिळाली.त्यावेळी अनिल महात्मे हे निवासी संपादक होते.त्यांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी सहका-यांनी’तुझ्या अंगावर कागदे भिरकावली जाऊ शकतात’अशी मानसिक तयारी करण्याचा सल्ला दिला होता मात्र ’परिक्षण कसे असावे याचं उत्तम उदाहरण आहे’अश्‍या शब्दात महात्मे यांनी कौतूक केले आणि ती शाबासकी माझ्यासाठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील माझा पहिला पुरस्कारच ठरली असल्याचे सुके यांनी सांगितले.

नाना ढाकूळकर हे ज्येष्ठ नाट्यकर्मी होते.दिपरंग नाट्य महोत्सवात ‘या अल्लाह हे राम’या नाटकाचे सादरीकरण बघून त्यांनी स्वत: ५०० रुपयांचे बक्षीस माझ्यासाठी जाहीर केले.अनेकवेळा त्यांनी तो धनादेश घेऊन जाण्यास सांगितले.एक दिवस मी तो धनादेश स्वीकारला.दर वेळी ते पेंशन काढत असत तेव्हा ५०० रुपये कमी झालेले त्यांना कधीही आढळले नाही.मी तो धनादेश आज ही पुरस्काररुपाने सांभाळून ठेवला असल्याचे सुके म्हणाले.
राज्य नाट्य स्पर्धेचा नियम आहे स्पर्धेत नवीन नाटकांचेच सादरीकरण होईल.या स्पर्धेत ’कोणी विकली अहिंसा’हे नाटक मी लिहले.गिरीश पांडे हे त्या नाटकाचे दिग्दर्शक होते.त्या नाटकालाही पुरस्कार मिळाला,त्या पुरस्कारापासून मी आज या पुरस्कारापर्यंत पोहोचलो,असे ते म्हणाले.

अध्यक्षस्थानावरुन माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी न्यायालयाच्या वार्तांकनाविषयी बोलताना एक उदहारण सांगितले.‘लिव्ह इन रिलेशनशिपला सर्वोच्च न्यायालयाचाच नकार!‘असा मथळा एका दैनिकात छापून आला आणि छापणारे ’हेच’होते!एका व्यक्तीने दूसरे लग्न केले व तिच्यापासून त्याला चार अपत्ये होती.मृत्यूनंतर त्याच्या पेंशनचा वाद उद भवला व त्याच्या पहील्या पत्नीने पेंशनसाठी दावा ठोकला.त्या व्यक्तीची मुले दुस-या पत्नीची असल्याने ती कायद्याच्या भाषेत ‘अनौरस’ होती.प्रत्यक्षात जन्मदाते अनौरस असू शकतात मात्र त्यांची मुले अनौरस होत नाहीत.या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहील्या पत्नीचा तसेच त्या मृत व्यक्तीच्या चारही अपत्यांचा अधिकार पेंशनसाठी मान्य केला,फक्त दुस-या पत्नीने सर्व अधिकार सोडावे हे लिहून मागितले,या घटनेची बातमी अश्‍या शीर्षकासह त्या दैनिकात उमटली!

पत्रकारिता हे व्रत आहे,वीर सावरकरांनी जे सांगितले ’घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने’पत्रकारांनी नाक,कान,डोळे व डोके सांभाळायला हवे,असा सल्ला देत, पत्रकारिता ही महाभारतातील संजयसारखी डोळस असावी.संजयने कुरुक्षेत्रातील अंध द्यृतराष्ट्राला द्रोणाचार्य,अशवतथामाचा अनीतने झालेला वध,अभिमन्यूसोबत झालेला अनाचार जसं त्या तसं सांगितलं.पत्रकारिताही तशीच असावी,तरच आपली लोकशाही टिकेल,असा सल्ला त्यांनी दिला.

प्रास्ताविकेत डॉ.गिरीश गांधी यांनी पत्रकारांनी बातमी आधी समजून घेतली पाहिजे तरच ती स्पष्टपणे सांगितली जाऊ शकते असे सांगत,फडणवीस यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे संघटन बळकट केले यासाठी देवेंद्रचे कौतूक केले गेले पाहिजे,असे ‘राजकीय ’ विधान केले.गडकरी यांनी विदर्भात भाजपला मोठे केले त्याचे तर कौतूक आहेच मात्र पश्‍चिम महाराष्ट्रात देवेंद्रने भाजपचे जे संघटन वाढवले त्याचे कौतूक करणार की नाही?असा खडा सवाल केला.

पत्रकारांनी विषय समजून घ्यावा मग भाष्य करावे,असे सांगत, मी जे लिहलं तेच सत्य असा अर्विभाव दूर्देवी असल्याचे ते म्हणाले.यावेळी राहूल पांडे यांना हा पुरस्कार देण्यास उशिर झाला,यासाठी त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

याप्रसंगी कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रेस क्लब नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले तर ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी आभार मानले.

माहिती आयुक्तांनी पुरस्कार घेणे टाळायला हवे होते!
पुरस्कार सोहळ्यानंतर अनेक ज्येष्ठ पत्रकारांमध्ये माहिती आयुक्तसारख्या अतिशय जबाबदार पदी असताना पत्रकार म्हणून कोणताही पुरस्कार स्वीकारणे राहूल पांडे यांनी टाळायला हवे होते,अशी खासगीत कुजबुज ऐकू आली.हा पुरस्कार मागच्या वर्षीचा असला तरी मागच्याच वर्षी राहूल पांडे यांची नियुक्ती एका जबाबदार पदावर झाली असल्याने पत्रकार म्हणून पुरस्कार स्वीकारणे नैतिकतेत बसतं का?अशी चर्चा रंगली.

अन्‌ श्रोत्यांच्या भूवया उंचावल्या!
माहिती आयुक्त राहूल पांडे यांनी माहिती अधिकारांतर्गत येणा-या अर्जांना चपराक बसवली,जे अर्ज ब्लॅकमेलिंगसाठी केले जात होते,आरटीआयचा दुरुपयोग कसा करता येत नाही यासाठी लॅण्डमार्क जजमेंट देण्याचे काम राहूल करतो,देवेंद्र फडणवीस यांचे हे विधान ऐकून सभागृहात अनेकांच्या भूवया उंचावल्या.श्रोते हे अचंभित झाले फडणवीस नेमकं असं का म्हणाले?याचा उलगडा कार्यक्रमानंतर घेण्याचा प्रयत्न ही झाला.

Latest बातम्या