Homeनागपूर न्यूजमी संविधानाचा माणूस:जिल्हाधिकारी इटनकर

मी संविधानाचा माणूस:जिल्हाधिकारी इटनकर

Advertisements

टिम वर्क म्हणून काम करणार

अभ्यासा अंती राख तलाव दुर्घटनेविषयी सांगतो:जिल्हाधिकारी यांचे अभिवचन

नागपूर,ता.२५ ऑगस्ट २०२२: माजी जिल्हाधिकारी विमला आर.यांचे जिल्हाधिकारी म्हणून नागपूर जिल्ह्यातील कार्य हे स्पृहणीय,कर्तव्यदक्ष व अतिशय चांगले असतानाही राज्यात सत्तांतर होताच, त्यांची उचलबांगडी करण्यात आली.त्या माजी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या मर्जीतील असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी डॉ.विपीन इटनकर यांच्या तडकाफडकीच्या नियुक्तीने अनेकांच्या भूवया उंचावून गेल्या. राज्यकर्ते धुरीणांची मांदियाळी असणा-या नागपूरात, इटनकर यांच्या नियुक्तीमुळे ते नेमके कोणाच्या ‘जवळचे’ आहेत?या प्रश्‍नाची कुजबुत सुरु असल्याने ‘मी कोणाचाही माणूस नाही,मी संविधानाचा माणूस’असे उत्तर त्यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पत्रकारांशी अनौपचारिक संवादाच्या वेळी त्यांनी एका प्रश्‍नावर हा खुलासा केला.पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी माझा कार्यकाळाची मुदत संपल्याने संविधानानुसार माझी बदली झाली,एवढंच.असे ते उत्तरले.आमचे सगळेच जवळचे,असे सांगण्यास ही ते विसरले नाहीत.

नागपूरात तब्बल बारा वर्षांनी ते परत आलेत.मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची पदवी घेताना व आता नेमके कोणते बदल शहरात दिसतात?या प्रश्‍नावर बोलताना,भरपूर बदल झालेत असे ते म्हणाले.विद्यार्थी दशेत हॅरिटेज वसतीगृहात शिकणारे आम्ही विद्यार्थी होतो आता त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या झाल्या.२००८ मध्ये मी नागपूर सोडलं होतं तेव्हाचे नागपूर आणि आताचे शहर यात फार बदल घडले आहे.नागपूरात मेट्रो आली,फूटाळ्याचे रुप बदलले.सिमेंट रस्ते,उड्डाण पूले या मुळे या शहराचा पूर्वीच्या तुलनेत चेहरा-मोहराच बदलला असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी म्हणून कोणत्या कामांना प्राधान्य असणार आहे?या प्रश्‍नावर,मी पण येथे खूप काही शिकणारच आहे,नेमकी आव्हाने कोणती?याची माहिती घेणार आहे.टीम वर्क म्हणून आम्ही काम करु.१५ दिवसात ३५ तालुके पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१६ जुलै रोजी कोराडी येथील औष्णिक वीज केंद्राच्या अधिका-यांच्या अक्षम्य व ढिसाळ कारभारामुळे राख तलावाचा बंधारा फूटला व आजूबाजूच्या गावातील घरे व शेती राखेमध्ये तब्दील झाली.हा विनाश एवढा विध्वंसक होता की आता येत्या ५ वर्षांत या गावातील हजारो ऐकर शेती ही नापीक झाली असून, किमान पाच वर्षे शेतात आता काहीही पेरता येणार नाही.वीज केंद्राकडून तुटपुंजे साढे चार लाखांच्या जवळपास मोबदला देण्यात आला तो ही या गावातील शेतक-यांनी परत केला.मानवी चुकांमुळे अनेकांचे आयुष्यच राख झाले असून यावर जिल्हाधिकारी म्हणून दोषींवर काय कारवाई करणार?उधवस्त शेतक-यांच्या मोबदल्याचे काय?या प्रश्‍नावर बोलताना,मला रुजू होऊन फक्त दोनच दिवस झाले आहेत,हा विषय मी पहिल्यांदाज ऐकतो आहे,मी आधी अभ्यास करतो मग सांगतो,असे उत्तर त्यांनी दिले.

यावेळी नागपूर जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसामुळे किती हेक्टरी शेतजमीनीचे नुकसान झाले याची आकडेवारीही त्यांनी सांगितली.जुलै मध्ये १ लाख १४ हजार ९३६ हेक्टर तर ऑगस्टमध्ये ३२ हजार ५९३ शेत जमीनीचे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्य सरकारने नव्याने आदेश पारित करीत नुकसानग्रस्त शेतीचा आकडा हा दोन एकर वरुन तीन एकर केला असल्याने यातच गावातील तलाठी आता एक एकर वाढवून देईल,यासाठी पुन्हा शेतामध्ये सर्वेक्षणासाठी जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश मंडळांसोबत नुकतीच बैठक पार पडली असल्याचे सांगून, गणेश मंडळांनी करोनाच्या बुस्टर डोजचे लसीकरण तसेच आधार कार्ड हा वोटर कार्डसोबत लिंक करण्याबाबत जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.यासाठी गणेश मंडळांच्या पँडोलमध्ये एका कर्मचा-याची नियुक्ती केली जाईल,असे ही आश्‍वासन त्यांनी दिले.

गणेशउत्सव जवळ आला असून उंच मूर्तींच्या विसर्जनासाठी नागपूरातील तलावांमध्ये बंदी असून शहरातील या मूर्ती कन्हान सारख्या नदी किवा ग्रामीण भागातील तलावांमध्ये विसर्जित केल्या जाईल का?या प्रश्‍नावर बोलताना, मोठ्या गणेश मूर्तींचेही विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्येच केले जाईल,ग्रामीण भागात भाविकांना कृत्रिम तलाव,माईन्स इत्यादीमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यास प्रेरित करु,यासाठी लवकरच पोलिस आयुक्त,मनपा आयुक्तांसोबत बैठक घेऊन चर्चा करु,असे त्यांनी सांगितले.

Latest बातम्या