Homeनागपूर न्यूजचुकीच्या समजूतीतून प्यारे खान विरोधात नारेबाजी!

चुकीच्या समजूतीतून प्यारे खान विरोधात नारेबाजी!

Advertisements


पत्र परिषदेत ताजबाग रहीवाश्‍यांचा दावा

ज्वाला धोटेंवर माफीवीरांचा रोख!

नागपूर,ता ११ ऑगस्ट २०२२: मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी ‘अन्याय निवारण समिती’च्या अध्यक्षा ज्वाला धोटे या मोठा ताजबाग येथे दर्शनासाठी आल्या असता त्यांना बघून परिसरातील काही तरुणांना सध्या मोठा ताजबाग येथे सुरु असणा-या अतिक्रमण विरोधी कारवाईत त्यांचीही घरे जाणार असल्याच्या समजूतीतून धोटे यांच्याकडे या तरुणांनी आपली कैफियत मांडली तसेच ताजबाग ट्रस्टचे विशवस्त प्यारे खान यांच्या विरोधात चुकीची नारेबाजीही करण्यात आली मात्र हे सगळं गैरसमजूतीतून घडले असून आता आमचे गैरसमज दूर झाले आहेत.प्यारे खान यांनी आमच्या तरुणांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे मागे घेतले असल्याचा खुलासा आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत ताजबाग येथील रहीवाशी यूसूफ खान व अन्य यांनी केला.

हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शंभराव्या वार्षिक उर्सच्या निमित्ताने बाबा ताजुद्दीन दरगाहच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे.बाबा ताजुद्दीन यांच्या शंभराव्या उर्सनिमित्त नागपूर महानगरपालिका,नागपूर सुधार प्रन्यास व पोलिस विभाग यांच्याद्वारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली असून या कारवाईत ज्यांनी शासनाच्या जमीनीवर अतिक्रमण केले होते त्यांचेच अतिक्रमण हटविण्यात आले.

मात्र काही लोकांनी या परिसरातील रहीवाश्‍यांना चुकीची माहिती दिली व या परिसरात ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय निर्माण होत असल्याने तुमचीही घरे व दूकाने तोडली जाणार असल्याची अफवाह पसरवली.याच मुद्दावर मंगळवारी कोणत्याही परवानगीशिवाय आंदोलन केल्या गेले,असा आरोप यूसूफ खान यांनी केला.

या आंदोलनात नागपूरातील समाज सेविका ज्वाला धोटे यांनी पुढाकार घेऊन मोर्चा काढला ज्या मध्ये नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार व ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
या मुळेच धोटे यांच्यावर ताजबाग शरीफ येथील सौंदयीकरणात तसेच सरकारी कामात बाधा निर्माण करण्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.धोटे यांनी ताजबाग शरीफ येथील रहीवाश्‍यांना भडकवले,ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत त्या ठिकाणी जाऊन असंवैधानिकरित्या नारेबाजी केली असा आरोप करीत,या नारेबाजीत पोलिस आयुक्त व प्यारे खान यांच्या विरोधात जो चुकीचा शब्द प्रयोग झाला त्या विषयी आम्ही त्यांची माफी मागितली असल्याचे यूसूफ खान यांनी याप्रसंगी सांगितले.

काल ताजबाग येथील रहीवाशी हे अतिक्रमणाच्या संदर्भात व ताजबाग ट्रस्टच्या विशवस्तांच्या विरोधात ज्वाला धोटेंना घेऊन सायंकाळी ५ वाजता पत्र परिषद घेणार होते तेच आज ताजबागचे विशवस्त यांच्या समर्थनार्थ पत्र परिषद घेत आहेत,कालची पत्र परिषद ऐन वेळी रद्द केली मात्र आजची पत्र परिषद आवर्जून घेण्यात आली,ताजबाग परिसरातील रहीवाश्‍यांच्या या बदललेल्या भूमिकेविषयी विचारले असता,कालची पत्र परिषद ही गैरसमजूतीतून होणार होती मात्र प्यारे खान यांनी आमच्या सगळ्या शंका दूर केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

प्यारे खान यांनी आम्हाला वचन दिले आहे की आमची घरे तोडल्या जाणार नाही,रस्त्याच्या बांधकामात ज्यांची दूकाने तोडली जात आहेत त्यांना पुन्हा दूकाने उपलब्ध करुन दिली जातील.प्यारे खान यांनीच सक्करदरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या आमच्या मुलांच्या विरुद्ध गुन्हे मागे घेण्यास पोलिसांना सांगितले असल्याचेही ते म्हणाले.

सक्करदरा पोलिस हे प्यारे खान यांच्या ईच्छेनुसार काम करते का?त्यांनी सांगितले तर गुन्हे दाखल करणार त्यांनी सांगितले तर गुन्हे मागे घेणार?यावर बोलताना युसुफ खान म्हणाले की आम्ही घाबरलो होतो,५०० खाटांचे रुग्णालय निर्माण होत असल्याने आमची घरे त्यात जातील मात्र प्यारे खान यांनी शब्द दिला आहे की कोणाचीही घरे तोडणार नाही.काल त्यांच्या विरोधात परिसरातील मुलांच्या मनात रोष होता मात्र प्यारे खान यांनी काल आम्हाला बोलावून सगळे मुद्दे स्पष्ट केले.

कोणाच्याही भडकाऊ गोष्टीत न येता ट्रस्टचे कार्यालय परिसरातच असल्यामुळे कार्यालयात या आणि आपल्या समस्या मांडा, आप लोगो की बात क्यो सूनते हो,ट्रस्ट के पास आओ,असे प्यारे खान यांनी आम्हाला आवाहन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तुमच्या मुलांवर पोलिस कारवाई झाली त्यामुळे तुम्ही घाबरला आहात का?तुम्ही कोणाच्या तरी दबावात येऊन पत्र परिषद घेत आहात का?या प्रश्‍नावर बोलताना ‘हम ना किसी के दबाव में है ना किसीके खिलाफ’असा खुलासा त्यांनी केला.मगर पोलिस प्रशासन के खिलाफ जो भी नारेबाजी हूई हमे उसका खेद है,असे पत्र परिषदेत मंचावर उपस्थित तरुणांनी सांगितले.

काही लोकांची अतिक्रमणे काढण्यात आली मात्र प्यारे खान यांच्या मर्जीतील लोकांची अतिक्रमणे तशीच ठेवण्यात आली आहे का?या प्रश्‍नावर बोलताना अनेकांनी फार पूर्वीच ट्रस्टकडे पैसे जमा करुन जमीनी स्वत:च्या नावाने केल्या आहेत,तो खूप जुना सौदा आहे त्या अतिक्रमणांना पाडण्यात आले नाही मात्र नवीन अतिक्रमणे पाडण्यात आली असल्याचे ते म्हणाले.रस्त्याच्या बांधकामात माझी व माझ्या लहान भावाची दूकाने देखील तोडण्यात आली असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.

ट्रस्टची मंशा ताजबाग परिसराचा विकास करने हा असून ट्रस्ट चांगले काम करीत आहे,प्यारे खान यांनीही आमची घरे तोडणार नसल्याचे आश्‍वासन दिले असल्याचे यूसूफ खान यांनी सांगितले.

धोटे या जेव्हा ताजबागला दर्शनासाठी आल्या त्यावेळी सणासुदीचा दिवस असल्याने ताजबाग येथे आधीच खूप गर्दी होती.धोटे यांना बघताच तरुणांनी अतिक्रमणात त्यांची घरे,दूकाने तोडली जातील अशी कैफियत त्यांच्याकडे मांडली,याची परिणिती आंदोलन व मोर्च्यात झाली,प्यारे खान व पोलिस आयुक्तांविरोधात नारेबाजी झाली,परिसरातील शेकडो मुलांविरुद्ध गुन्हे ही दाखल होणार होते,नारेबाजी करताना व्हिडीयोमध्ये जी चार मुले दिसत होती त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले मात्र प्यारे खानकडे आम्ही गेलो,आमच्या तरुणांचे भविष्य यामुळे खराब होईल,अशी विनंती त्यांना केली,तसेच नारेबाजी करणा-यांमध्ये काही बाहेरची मुले असल्याचे त्यांना सांगितले. आमच्या विनंतीला मान देऊन प्यारे खान यांनी सर्व तरुणांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे आम्हाला सांगितले.

Latest बातम्या