

चित्रा वाघ यांचा आरोप:भंडारा बलात्कारित पिडीतेची घेतली भेट
पिडीतेवर तीन नव्हे तर चार नराधमांनी केला अत्याचार:पोलिसांनी घ्यावा चौथ्याचा शोध
आघाडी सरकारमधील डझनभर मंत्र्यांनीही नाही दिला लातूरच्या बलात्कारित आठ वर्षीय चिमुकलीला न्याय:शिंदे
सरकारमध्ये बस दो ही काफी है!
नाना पटोलेंनी न्यायालयात जावे!
नागपूर,ता. ६ ऑगस्ट २०२२: हिंगणघाटचे क्रोर्य घडले,एका तरुणीला उभ्याने पेटवून देण्यात आले,याचे पडसाद अवघ्या महराष्ट्रात उमटले,त्यावेळी आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलद गती न्यायालयांमध्ये या स्वरुपाच्या घटनांची सुनावणी घेण्यात येईल अशी घोषणा केली होती मात्र अडीच वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळात राज्यात जलद गती न्यायालयांची स्थापनाच करण्यात आली नसून, उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी खोटे बोलले असा आरोप करीत, राज्यातील १ लाख ६३ हजारांच्या वर महिला अत्याचाराच्या घटनेवरील सुनावणीसाठी भाजप शिवसेना युतीच्या सरकारने लवकरात लवकर जलद गती न्यायालयांची स्थापना करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केली.
३० जुलै रोजी भंडारा येथे एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर झालेल्या नृशंस बलात्काराची दखल घेत त्यांनी आत मेडीकल रुग्णालयात बलात्कार पिडीतेची भेट घेतली,या पार्श्वभूमीवर पत्र परिषदेत त्यांनी पिडीतेच्या स्वास्थ संबधी घडोमोडींची माहिती दिली.पिडीतेवर झालेला बलात्कार हा पाशवी,दूर्देवी व संतापजनक असल्याचे त्या म्हणाल्या.मेडीकलमधील डाॅ.मानसी श्रीगिरीवार व डॉ.कांचन गोलावार यांनी अथक परिश्रम घेत पिडीतेवर उपचार केले व तिची प्रकृती स्थिर केली.पशूंना सुद्धा लाज वाटेल असे कृत्य चार नराधमांनी तिच्यासोबत केले.माणूसकीला काळीमा फासणारीच ही घटना असल्याचे त्या म्हणाल्या.
३० जुलै रोजी ही पिडीता कौटूंबिक वादातून एकटीच घरा बाहेर पडली. तिला सुखरुप घरी पोहोचून देत असल्याची बतावणी करुन भंडारा जिल्ह्यातील कनाडमोहच्या जंगलात तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला.या ठिकाणी तिला दोन दिवस डांबून ठेवण्यात आले.यानंतर इतर दोघांनी गोंदिया जिल्ह्यातील मुर्दोजी जंगलात तिच्यावर पाशवी बलात्कार केला.२ ऑगस्ट रोजी याच जंगलाबाहेर गावक-यांना ती निर्वस्त्र व बेशुद्ध अवस्थेत दिसली.
गावक-यांनी पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी तिला गोंदियातील शासकीय रुग्णालयात भरती केले मात्र तिची अवस्था बघता नागपूरच्या मेडीकल रुग्णालयात तिला भरती करण्यात आले मात्र अद्याप पोलिसांना पिडीतेचे अधिकृत बयाण नोंदवता आले नाही.तिच्यावर उपचार करणा-या वैद्यकीय अधिका-यांना पिडीतेने दिलेल्या माहितीनुसार तिच्यावर तिघांनी नव्हे तर चार पुरुषांनी बलात्कार केला असल्याची नोंद वैद्यकीय अधिका-यांनी करुन ठेवली असल्याची माहिती यावेळी चित्रा वाघ यांनी दिली.पिडीतेची एक मोठी शस्त्रक्रिया झाली असून तिची प्रकृती स्थिर होताच आणखी एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती मेडीकल मधील वैद्यकीय अधिका-यांनी दिली असल्याचे त्या म्हणाल्या.
दिल्लीतील निर्भया घटनेप्रमाणेच ही घटना देखील तेवढीच नृशंस असून या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे.त्यांनी तातडीने एस पी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवली तसेच मेडीकलचे अधिष्ठाता यांच्याशीही संवाद साधला.पिडीतेच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता ठेऊ नये अशी सूचना फडणवीस यांनी केली आहे.गरज भासल्यास पिडीतेला सुपर स्पेशिलिटीलाही रेफर करावे,पिडीतेच्या उपचारासाठी तसेच पिडीतेच्या न्यायासाठी शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.या प्रकरणात एफआयआरमध्ये अपहरण करुन जबरीने डांबून ठेवणे ही भारतीय दंड संहितेची ३६२ कलम देखील समाविष्ट करण्याची सूचना पोलिसांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आमची तर सरकारकडे फक्त महिलांसाठीच्या सुनावणीसाठी ‘विशेष न्यायालये’ असावीत अशी मागणी आहे.राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अशी विशेष न्यायालये असावीत,पिडीतांना जलद गती न्यायासोबतच शासनाच्या मनोधैर्य योजनेतून लाभ मिळावा अशी मागणी करीत ,आघाडी सरकारच्या काळात मनोधैर्य योजनेसाठी अल्प राशी ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
हिंगणघाटच्या पिडीतेच्या कुटूंबिंयाना तर आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी वचन देऊनही अडीच वर्षांच्या आपल्या सत्ताकाळात ते पूर्ण केले नाही.या घटनेने तर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकला होता.रस्त्यावर उतरुन आंदोलने झाली.एका तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकणारी घटना ह्दयद्रावकच आहे.जिल्हाधिकारी यांनी आघाडी सरकारच्या सूचनेनुसार या कुटूंबियांना लिखित आश्वासन दिले होते.अडीच वर्षात या पिडीतेच्या परिवाराला दिलेले आश्वासनही आघाडी सरकारने पाळले नाही.त्याची सुद्धा वचनपूर्ती आम्ही करणार असल्याची ग्वाही या प्रसंगी चित्रा वाघ यांनी दिली.
भंडारा पिडीतेच्या घटनेत पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यात उशिर केला का?या प्रश्नावर बोलताना २ ऑगस्ट रोजी पिडीतेविषयी गावक-यांनी कळवताच त्याच दिवशी एफआयआर नोंदविल्याचे पोलिसांचे म्हणने आहे,या घटनेत पिडीतेचे बयाण मात्र आतापर्यंत घेणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात अश्या घटना वारंवार घडत आहेत.उमरेडमध्ये ११ वर्षाच्या चिमुरडीवर १० नराधमांनी बलात्कार झाला.डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर ३५ नराधमांनी बलात्कार केला.हे कुठेतरी थांबायला हवं.बलातका-यांना कायद्याचा धाकच राहीला नाही.फाशी किवा जन्मठेपेची शिक्षा देखील त्यांना अपूरी वाटते,अशी हताशा देखील वाघ यांनी व्यक्त केली.
एकटी महिला ही जबाबदारी असून संधी किवा सावज नाही,ती फक्त उपभोग्य असल्याची मानसिकता या देशातील पुरुषांमध्ये धर्मग्रंथाद्वारेच रुजवली जात आहे का?या प्रश्नावर बोलताना,महिला या सक्षम आहेत,त्या फक्त उपभोग्य नाहीत,आज गाव पातळीवरील महिला या सरपंच झाल्या आहेत.पुरुष श्रेठत्वाची मानसिकता या विषयी जगजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विषयीची चित्रफित तुम्ही व्हायरल केली होती,आता तुम्ही बॅक फूटवर आला आहात का?यावर बोलताना,मी नाही नाना बॅक फूटवर आले असल्याचे त्या म्हणाल्या.मी फक्त नाना तुम्ही पण का?एवढाच प्रश्न त्यांना सोशल मिडीयावर विचारला होता.याचे उत्तर त्यांनी देणे अपेक्षीत आहे.त्यांना आता कोर्टात जायचे असेल तर खुशाल जाऊ शकतात,माझा बॅक फूटवर येण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्या म्हणाल्या.
सध्या राज्यात दोनच मंत्री संपूर्ण कारभार सांभाळत आहे,याकडे लक्ष वेधले असता,आघाडी सरकारमध्ये तर जंबो मंत्रीमंडळ होते त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काय केले?असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये दोनच मंत्री आहेत मात्र ते सगळ्या ठिकाणी पोहोचत आहेत.काम त्यामुळे थांबलेले नाही.भंडारा पिडीतेची दखल फडणवीस यांनी घेतली आहे.आजही मंत्रालयात लोकांच्या रांगा दिसतात.मंत्री असू देत किवा नाही काम थांबलेले नाही.आघाडी सरकारमघ्ये डझनभर मंत्री होते त्यांनी काय केलं?लातूरच्या घटनेतील चिमुरडीवर पुणे किवा मुंबईच्या अद्यावत रुग्णालयात उपचार मिळावेत यासाठी आठ ते दहा मेल केले मात्र त्याचीही दखल घेण्यात आली नाही,अशी टिका त्यांनी केली.

आमचे चॅनल subscribe करा