

खसाळा राख बंधारा फूटण्याचे दुष्परिणाम
आठ महिन्यांची राख सहा तासात गावोगावात!
नागपूर,ता.२१ जुलै २०२२: कोराडी औष्णिक केंद्राचा राख तलावाचा बंधारा शनिवार दि. १५ जुलै रोजी फूटला,यात खसाळा,उप्पलवाडी व कवठा म्हसाळासह अनेक गावे पाण्यात बुडाली तसेच कोट्यावधीचे नुकसान झाले.२०१५ मध्ये ६५ कोटी खर्च करुन हा बंधारा बांधण्यात आला होता मात्र निकृष्ट बांधकामामुळे बांध फूटल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला होता. या बंधा-याला अनेक ठिकाणी गळती लागली असल्याच्या अनेक तक्रारी देऊनसुद्धा महाजनकोच्या अधिका-यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले व अखेर सलग ९ दिवसांच्या पावसाममुळे या बंधा-याची क्षमताच संपली व आधीच कमकुवत असणारा राखेचा हा बंधारा फूटला.
या राख बंधा-याचे असलम आणि रामेश्वर उमाटे या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी पूर्ण निरीक्षण केले आणि तेथील कामगारांशी संवाद साधला, तेथील सत्य परिस्थिती समजून घेतली.
त्यांच्या सर्वेक्षणानुसार हा राख तलावाचा बंधारा फुटणार असून, गावामध्ये पाणी शिरणार अशी पूर्वकल्पना महाजनको याला आधीच होती. पण त्यांच्या निष्काळजीपणामुळे बांध फुटला.
आठ महिन्यात जेवढी राख उचलावी लागते आणि ट्रकच्या माध्यमातून बाहेर काढावी लागते तेवढं काम एक राखेचा बंधारा फुटल्यामुळे सहा तासात त्यांचं काम झालं.त्यामुळेच कोराडी महाजनको प्रशासनाला आणि कोराडी पावर यांना या आपत्तीचा कोणताही आर्थिक फटका बसणार नाही कारण त्यांचे काम बंधारा फूटल्याने अवघे सहा तासात अगदी सोप्या पद्धतीने झाले.*
या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी कवठा व मसाला ग्रामपंचाय कार्यायलातही भेट दिली. उपसरपंच शरद माकडे यांच्याशी संवाद साधला, त्यांनी सांगितले पावर प्लांटच्या मुळे त्यांची शेत जमीन पूर्णतः वांझ झालेली आहे. शेतीमध्ये तेवढी लागवड निघत नाही.या बंधा-यांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
यासोबतच गावातील नागरिकांचे ,राखेमुळे होणा-या वायु प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.गावातील अधिकांश लोक आजारी पडत आहेत .कर्क रुग्ण,त्वचा रोगाचे आजार, किडनी स्टोनचे आजार आणि दम्याचे आजार अशा पद्धतीने आजारांनी येथील रहीवाश्यांना घेरले आहे.
पिण्याचे पाणी हे क्षारयुक्त असल्यामुळे गावातील लोकांना वॉटर एटीएम मधून पाणी घ्यावे लागत आहे .परंतु काही कारणास्तव त्यातही एकदा एकदा बिघाड झाला होता.

ज्या शेतकऱ्यांकडे शेती होत नाही, शेती खाली पडून आहे, त्यांनी आपली जागा विटाभट्ट्या वाल्यांना भाड्याने दिलेली आहे परंतु त्याचा पण मोबदला त्यांना आता मिळू शकणार नाही कारण राख बंधारा फूटल्यामुळे विटाभट्टी वाल्यांचे खूप नुकसान झाले आहे.
श्रीहरी बावनकुळे या खसाळा येथील शेतक-या शेतामध्ये फूटलेल्या राख बंधा-याची राख पसरली असून शेती पूर्ण उध्वस्त झाली आहे, शेतामध्ये सोयाबीन, कापूस, दोडके लावण्यात आलेले होते परंतु हसबंड जवळच्या पुलामधून पूर्ण पाणी यांच्या शेतात शिरून, राखच राख झालेली आहे.त्यांच्या शेतीचे खूप नुकसान झाले आहे.
लखबीर सिंग यांची शेती सुद्धा म्हसाळा येथे असून यांच्या शेतामध्ये देखील अतिशय नुकसान झाले कारण रेल्वे ट्रॅकच्या अगदी बाजूला यांची शेती आहे आणि शेतीमध्ये आता पूर्णत: राख,मोठे मोठे दगड काँक्रेट आणि राख, चार चार फुटाच्या अंतरावर पसरले आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट केली होती. त्यांनी जांबची झाडे, संत्र्याची झाडे, मोसंबीची झाडे, चिकूची झाडे, सागवणाची झाडे अशी शेती केलेली होती, परंतु राखेचा बंधारा फुटल्यामुळे डॅम जवळील अंडर ब्रिज पूर्ण ओवर फ्लो होऊन यांच्या शेतामध्ये पूर्णतः पाणीच पाणी पसरले आणि राख आली त्यामुळे यांचे लाखो, करोडोचे नुकसान झालेे.
म्हसाळा येथील दामू कुंभारे या शेतकऱ्याची आप बिती तर खूपच वाईट आहे कारण की यांचे स्वतःचे शेत नसून त्यांनी बटाईवर शेत घेतलेले आहे आणि यांच्या शेतामध्ये दोडके, वांगे ,पालक ,मेथी, अशा भाज्यांची पेरणी केली होती. ती पूर्ण राखेमुळे उद्ध्वस्त झाली आहे. यांना चार मुली असून दोन मुलींचे लग्न झालेले आहेत आणि दोन मुलींचे शिक्षण त्यांच्या डोक्यावर आहे आणि यांनी शेत बटाईमुळे घेतल्यामुळे आर्थिक नुकसान अतिशय झालेले आहे. दोन वर्षापर्यंत तो शेतकरी आता काहीही करू शकत नाही आणि त्यांच्याजवळ पैसेही नाही.
रामेश्वर गोविंदराम उमाटे यांच्या शेतामध्ये वांगी, टमाटर, पालक, सोयाबीन, मेथी, सांभार, एस बंद करून येणाऱ्या नाल्यामुळे पूर्ण प्रभावित झाली आणि शेती पूर्णतः खराब झाली.
उप्पलवाडी, जगदंबा नगर टोली या समुदायाला भेट दिली असता कळले की, रेल्वे क्रॉसिंग च्या अगदी पन्नास मीटर अंतरावर यांची दीडशे घरेआहेत. परंतु तेरा लोकांच्या घरी पाणी शिरले आणि बंधा-यातली राख सुद्धा शिरली. यांना अचानक घराबाहेर पडावं लागलं कारण की यांना काही सुचलं नाही.त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपापले घर सोडले कारण त्यांच्या घरभर वेगाने पाणी शिरले. त्यांच्या घरातील पूर्ण सामान, खाद्यपदार्थ, धान्य सगळं राख आणि पाण्याने उद्ध्वस्त झालेले होते असे त्यांनी सांगितले.
आता मुले शाळेत सुद्धा जाऊ शकत नाही आहेत कारण की त्यांचे दप्तर, वह्या, पुस्तकं पूर्णतः नष्ट झालेली आहेत.
जगदंबा नगर येथील रिजवाना खान यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, अचानक तीनच्या सुमारात पाणी वस्तीमध्ये भरले असता त्यांना स्वतःचा जीव वाचवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि घरातून त्यांना तातडीने काहीही सोबत न घेता, बाहेर पडावे लागले पूर्णता त्यांचे घर पाण्यात बुडाले होते. घरातील अन्नधान्य मुलांचे दप्तर, वह्यया, पुस्तकं सगळं पाण्यामध्ये ओले होऊन गेले. त्यांना आता या परिस्थितीच्या सामना करणे फार कठीण झाले आहे…..!

आमचे चॅनल subscribe करा