फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपोलिस आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास बेमुदत उपाेषण

पोलिस आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास बेमुदत उपाेषण

Advertisements


ज्वाला धोटे यांचा इशारा:पोलिस आयुक्तालयात ‘भाजप पत्र परिषद’ प्रकरण

पोलिस आयुक्तालयात धोटे यांचे आक्रमक आंदोलन

वारांगंणांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पोलिस आयुक्तांनी पायदळी तुडवले:धोटे यांचा आरोप

नागपूरचे पोलिस आयुक्त महाभ्रष्ट!धोटे यांचा खळबळजनक आरोप

पोलिस आयुक्तालयाला आले पोलिस छावणीचे रुप:कडक बंदोबस्त:आयुक्त अनुपस्थित

शासकीय कार्यालयात राजकीय पक्षाची पत्र परिषद ही ऐतिहासिक घटनाच:धोटे यांचा टोला

नागपूर(Nagpur),ता. १८ जून २०२२: पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी २८ ऑगस्ट २०२१ रोजी गंगा-जमुनाला सार्वजनिक ठिकाण घोषित केले.याच महिन्यात १७ ऑगस्ट २०२१ रोजी पोलिस आयुक्तांनी या संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे रुप दिले.कडक पोलिसांचा पहारा बसवला,या सार्वजनिक ठिकाणांपासून २०० मीटरच्या परिसरात अनैतिक देहव्यापाराला कायद्यानुसार बंदी आहे,असा आदेश काढला.देहव्यापारासाठी या ठिकाणी कोणी प्रवेश केल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल,अशी अधिसूचना काढली,आता त्यांच्याच शासकीय पाेलिस आयुक्तालयाला त्यांनी सार्वजनिक इमारत घोषित केले,या इमारतीत बेकायदेशीररित्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांना पत्र परिषद भरविण्यास परवानगी दिल्याने आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरच फौजदारी गुन्हा दाखल व्हावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी, अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी आज सिव्हिल लाईन्स स्थित पोलिस आयुक्तालयात आंदोलनादरम्यान केली.

काँग्रेसचे माजी शहरअध्यक्ष शेख हुसेन यांनी गेल्या सोमवारी राहूल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात नागपूर काँग्रेसतर्फे पुकारण्यात आलेल्या सेमिनरी हिल्स येथील ईडी कार्यालयासमोरील आंदोलनात अतिशय खालच्यास्तरावर आपत्तीजनक टिपण्णी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.यावर भारतीय जनता पक्षाने शेख हुसेनच्या विरोधात अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी जुज्बी कारवाई करीत शेख हुसेनला जामिनावर सोडले.

हुसेन यांना कठोर शिक्षा व्हावी व हुसेन यांच्यावर कठोर कलमा लावण्यात यावा यासाठी भाजपचे(BJP) प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या नेतृत्वात काल शुक्रवारी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त कार्यालय गाठत, आयुक्तांना निवेदन सोपवले.यानंतर मात्र त्यांच्याच कार्यालयातील सभागृहात पत्र परिषद भरवली.

शासकीय इमारतीचा उपयोग एका राजकीय पक्षाने राजकारणासाठी केल्याने ज्वाला धोटे यांनी या अनैतिक कृत्याविषयी तीव्र संताप व्यक्त करीत, गंगा-जमुना येथील वारांगणांच्या प्रश्‍नावर आज आयुक्तांना दुपारी १ वाजता निवेदन सोपवतील व आयुक्तांच्या कार्यालयात भाजपप्रमाणेच पत्रकारांना संबोधति करतील असा इशारा त्यांनी दिला.

या पार्श्वभमीवर आज दुपारी पोलिस आयुक्तालयाला पोलिस छावणीचे रुप आले.दुपारी ज्वाला धोटे या आयुक्तालयात पोहोचल्यावर त्यांना ईमारतीच्या ६ व्या माळ्यावरील पोलिस आयुक्तांच्या कक्षात निवेदन सोपविण्यासाठी जाण्यास रोखण्यात आले.लिफ्ट जवळच महिला पोलिस अधिका-यांचा तगडा बंदोबस्त होता.

धोटे यांना लिफ्ट जवळच अडविण्यात आले व लिफ्ट बंद असल्याचे सांगून निवेदन आमच्याकडे सोपवा असे आदेश महिला पोलिस अधिका-यांनी दिले मात्र मी दिव्यांग नाही,मी जिना देखील चढून जाऊ शकते असे सांगत, धोटे हे जिन्याकडे जाऊ लागल्याने त्यांना तिथे ही अडविण्यात आले.

संविधानाने मला कुठेही जाण्याची मुभा दिली असून मी पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये,देशातील कोणत्याही राज्यात जाऊ शकते असे धोटे यांनी उपस्थित महिला अधिका-यांना ठणकावले.यावर लिफ्ट बंद असल्याने तुम्ही सोमवारी या अशी सूचना त्यांना पोलिसांकरवी करण्यात आली.यावर, मी देशाची एक नागरिक असून मी मुर्हूत काढून शासकीय अधिका-यांना निवेदन देणार का?असा संताप धोटे यांनी व्यक्त केला.

ज्या प्रकारे भाजपचे पदाधिकारी यांनी या शासकीय इमारतीचा उपयोग स्वत:ची मालमत्ता समजून पत्र परिषद भरवली, त्यावेळी त्यांना का रोखण्यात आले नाही?असा सवाल धोटे यांनी केला.‘चोर के दाढी में तिनका’असा संताप व्यक्त करीत नागपूरचे पोलिस आयुक्त हे सर्वात मोठे भ्रष्टाचारी असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

पोलिस आयुक्त हे कोणाचे मीठ खातात?महाराष्ट्र शासनाचे की केंद्र शासनाचे?की राजकीय पक्षाच्या काही मंत्र्याचे?जर या देशाच्या एका नागरिकाला ६ व्या मजल्यावर निवेदन देण्यासाठी जाता येत नसेल तर पोलिस आयुक्तांना लिफ्ट जवळच खूर्ची टाकून बसायला लावा,असा सज्जड दम धोटे यांनी दिला.

काल डझनभर भाजपच्या नेत्यांना आयुक्तांच्या कक्षापर्यंत जाऊ देण्यात आले,त्यांची संपूर्ण आवभगत करण्यात आली,यावर एका महिला पोलिस अधिका-यानी आम्ही भाजपच्या शिष्टमंडळाला देखील परवानगी दिली नसल्याचे सांगितले तसेच आज शासकीय सुटी असल्याने आयुक्त कार्यालयात हजर नसल्याचे सांगितले.यावर धोटे यांनी शासकीय सुटी असल्याची अधिसूचना दाखविण्याची मागणी केली.

याप्रसंगी धोटे यांचा घेराव घालून असणा-या सर्व महिला पोलिस अधिका-यांना धोटे यांनी वारांगणांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश वाचून दाखवले.वेश्‍या व्यवसाय हा देखील एक सन्माननिय पेशा असून वारांगणांना पाेलिसांनी सन्मानाची वागणूक द्यावी,असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नमूद आहे मात्र नागपूरच्या गंगा-जमुना भागात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या ११ महिन्यांपासून जो अन्याय-अत्याचार सुरु केला आहे त्या विरोधात आयुक्तांनाच निवेदन देणार असल्याचे धोटे यांनी ठणकावले.

विशेष म्हणजे पोलिस आयुक्त हे कार्यालयातच अनुपस्थित होते.धोटे यांचे निवेदन न स्वीकारता किंवा धोटे यांची बाजू न ऐकता त्यांनी तगडा बंदोबस्त आज पोलिस आयुक्तालयात लावला.परिणामी पोलिस आयुक्तांच्या मनमानी कारभारासाठी धोटे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला देखील चांगलेच धारेवर धरले.यासोबतच केंद्रिय मंत्र्यांच्या जोरावर मस्तावलेले नागपूरातील भाजपचे नेते,अश्‍या शब्दात भाजपवरही कठोर ताशेरे ओढले.

एका शासकीय इमारतीत चक्क एक राजकीय पक्ष पत्रकार परिषद भरवतो,ही नागपूरच्या इतिहासातील एक ‘न भूतो ना भविष्यती’अशी ऐतिहासिक घटना असल्याचा टोला त्यांनी लगावला.आयुक्तांच्या खूर्चीचा मान न राखता, आयुक्तांना बावणकुळे यांच्याकडून निवेदन स्वीकारण्यासाठी कॉन्फरेन्स हॉलमध्ये यावे लागले.निवेदन स्वीकारुन आयुक्त निघून गेल्यावर बावणकुळेंनी पत्रकार परिषद घेण्यासाठी शासकीय इमारतीचाच गैरवापर केला.यामुळे आता नागपूरचे ‘प्रेस क्लब’ आणि ‘पत्रकार भवनला’ टाळे लावण्याचे दिवस आलेत,असा टोला त्यांनी हाणला.

ज्या राजकीय नेत्यांनी कायद्याचे उल्लंघन केले व प्रशासकीय इमारतीचा गैरवापर केला त्यांच्यावर कोणतीही दिरंगाई न दाखवता फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे यासोबतच ज्या पोलिस आयुक्तांनी व पोलिस अधिका-यांनी भाजपच्या नेते मंडळींना शासकीय इमारतीत पत्र परिषद घेण्यास मज्जाव केला नाही त्यांच्यावरी त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करा,अन्यथा सोमवारपासून याच पोलिस आयुक्तलयाच्या इमारतीसमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला.

कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहीजे.आम्हाला अडवायला शेकडो पोलिसांचा बंदोबस्त आणि भाजपसाठी पायघड्या,हा अन्याय खपवून घेणार नसल्याचे सांगत, सोमवारपासून याच ठिकाणी ठिय्या आंदोलन,जल त्याग उपोषण करणार असल्याचे धोटे यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचे आदेशांचे नागपूरात गंगा-जमुनात सर्रास उल्लंघन केल्या जात आहे.पोलिस हे गंगा-जमुनात येणा-या ग्राहकांवर सर्रास दंड्याने मारतात.

पोलिस अायुक्त हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत.ते पंतप्रधान किवा मनपा प्रशासन नाही.वारांगणांची तीन-तीन पिढ्यांपासूनची घरे सार्वजनिक ठिकाण पोलिस आयुक्त कोणत्या अधिकाराने घोषित करतात?उद्या ते ज्वाला धोटेंच्या घरालाही सार्वजनिक घोषित करतील,असा संताप व्यक्त करीत, असे बेशिस्त व अहंकारी,मनमानी कारभार करणा-या पोलिस आयुक्तांना आघाडी सरकारने नागपूरकरांच्या मानगुटीवर आणून बसवल्याचा संताप धोटे व्यक्त करतात.

औरंगाबादचे पोलिस आयुक्त असताना अमितेश कुमार यांच्यावर औरंगाबादच्या उच्च न्यायालयाने ७ लाखांचा दंड ठोठावला होता कारण एका गरीब माणसाचा अमितेश कुमारांनी छळवाद केला होता.यानंतर अमरावतीचे पोलिस आयुक्त असताना तेथील एका प्रकरणात राज्याच्या मानवाधिकार आयोगाने दीड लाखांचा दंड ठोठावला कारण एका महिलेला व तिच्या दोन तरुण मुलींना रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.यवतमाळचे एसपी असताना देखील दोन आरोपींचा पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता,ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सूरु असून न्यायालयानेच सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती धोटे यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलताना दिली.

दोन आरोपींच्या हत्येचा संशय ज्यांच्यावर आहे असे पोलिस आयुक्त ‘उपराजधानीत’ कसे येऊ शकतात?पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात माजी पोलिस संचालक परमबीर सिंग यांनी जो शंभर कोटींचा खळबळजनक आरोप लावला होता त्यात नागपूरच्या पोलिस अायुक्तांची देखील ‘सेटिंग’झाली आहे का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजित सिंग यांनी देखील आज नागपूरातील या आंदोलनाची दखल घेत, भाजपने एका शासकीय कार्यालयात घेतलेल्या पत्र परिषदेला गैरकायदेशीर ठरवित, पोलिस प्रशासनाचे हे कर्तव्यच आहे की त्यांनी जनसामान्यांचे निवेदन स्वीकारावे,त्यांचे म्हणने ऐकून घ्यावे असे ट्ठीट ज्वाला धोटे यांच्या आंदोलनाच्या संदर्भात केले आहे.

भाजपने जे केले त्यामुळे जनसामान्यांचा विश्‍वास पोलिस विभागावरुन उडून जाईल व त्यांना वाटेल पोलिस विभाग हा शासकीय नसून कोण्या एका पक्षाचा किवा राजकीय नेत्यांचा आहे.

त्यामुळेच अश्‍या गैरकायदेशीर घटनेत जो कोणी आमदार,राजकीय नेते किवा पोलिस अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसचा सचिव म्हणून करीत असल्याचे अजित सिंग यांनी नमूद केले.

या संदर्भात आमदार विकास ठाकरे यांनी देखील सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान झाल्यावर मंगळवारी शहर काँग्रेसतर्फे पोलिस आयुक्तालया समोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या